Close Menu
महाराष्ट्र संवादमहाराष्ट्र संवाद
  • Home
  • आंदोलन
  • आरोग्य
  • इतिहास
  • क्रिडा व कला
  • गुन्हेगारी
  • न्यायालय
  • महाराष्ट्र संवाद विशेष
  • राजकारण
  • विकास
  • विश्लेषण
  • शिक्षण
What's Hot

माजी मंत्री बाळासाहेब थोरात यांच्याकडून घुलेवाडीच्या पायी ज्योतीचे स्वागत; नवरात्रोत्सव हा शक्ती, भक्ती आणि चैतन्याचा उत्सव असल्याचे प्रतिपादन

11/10/2026

रविवार विशेष लेख — ज्ञानेशकुमारांचे समर्थक ढोंगी सत्यवान!

11/10/2026

दूध भेसळ प्रकरणी मुख्य आरोपीला सात दिवसांत अटकपूर्व जामीन मंजूर

11/10/2026
Facebook X (Twitter) Instagram
महाराष्ट्र संवादमहाराष्ट्र संवाद
  • Home
  • आंदोलन
  • आरोग्य
  • इतिहास
  • क्रिडा व कला
  • गुन्हेगारी
  • न्यायालय
  • महाराष्ट्र संवाद विशेष
  • राजकारण
  • विकास
  • विश्लेषण
  • शिक्षण
Facebook X (Twitter) Instagram
महाराष्ट्र संवादमहाराष्ट्र संवाद
Home » आमदार खताळ हल्ला प्रकरण…. खताळ, संदेश देशमुख व इतरांवर आरोपीच्या आईचे गंभीर आरोप; घटनेचा राजकारणाशी कोणताही संबंध नाही
महाराष्ट्र संवाद विशेष

आमदार खताळ हल्ला प्रकरण…. खताळ, संदेश देशमुख व इतरांवर आरोपीच्या आईचे गंभीर आरोप; घटनेचा राजकारणाशी कोणताही संबंध नाही

मानसिक तणावामुळे आणि धमक्यांमुळे प्रसादने आत्महत्येचा विचार केला आणि अखेरीस त्याला हे टोकाचे पाऊल उचलण्यास भाग पाडले गेले.
Annant PpangarkarBy Annant Ppangarkar01/09/2025Updated:01/09/2025No Comments2 Mins Read
Facebook Twitter WhatsApp
Share
Facebook Twitter Email Telegram WhatsApp

संगमनेर, अहिल्यानगर – 

आमदार अमोल खताळ यांना मारहाण करणारा आरोपी प्रसाद गुंजाळ पोलीस कोठडीत असतानाच आता त्याच्या आईने पोलिसांकडे केलेल्या तक्रारीमुळे या हल्ला प्रकरणाला वेगळे वळण मिळाले आहे.

अनिता आप्पासाहेब गुंजाळ यांनी संगमनेर शहर पोलीस स्टेशनमध्ये आमदार अमोल खताळ, संदेश देशमुख व इतरांच्याविरोधात तक्रार केली आहे. ही तक्रार आपल्या मुलाची आर्थिक फसवणूक, ब्लॅकमेलिंग आणि मानसिक छळ केल्याप्रकरणी आहे. या घटनेचा राजकारणाशी कोणताही संबंध नसून, घटनेचे राजकारण झाले तर आम्हाला न्याय मिळणार नाही. हे केवळ आर्थिक फसवणुकीतून घडले असल्याचे गुंजाळ यांनी स्पष्ट केले आहे.

अनिता गुंजाळ यांच्या तक्रार अर्जानुसार, त्यांचा मुलगा प्रसाद गुंजाळ आणि आमदार खताळ हे अनेक वर्षांपासून मित्र आहेत. प्रसाद हा अमोल खताळ यांच्या कुटुंबातील सदस्यासारखाच होता आणि त्यांनी अनेक कौटुंबिक आणि वाढदिवसाचे कार्यक्रम एकत्र साजरे केले आहेत.

या दोघांमध्ये अनेक आर्थिक व्यवहार झाले होते. प्रसाद गुंजाळ शेअर मार्केटमध्ये काम करत असे आणि यामध्ये गुंतवणुकीसाठी खताळ यांच्या मध्यस्थीने आणि त्यांच्यासमोरच काही आर्थिक व्यवहार झाले होते. यातील बरेच व्यवहार रोख स्वरूपात झाले असून, त्यांची नोटरीदेखील केलेली आहे. हे सर्व व्यवहार खताळ यांच्या कार्यालयातच झाले होते आणि याची कागदपत्रे उपलब्ध असल्याचा दावा गुंजाळ यांनी केला आहे.

तक्रारीनुसार, आमदार खताळ यांनी प्रसाद गुंजाळकडून सही केलेले कोरे चेकबुक घेतले होते. शेअर मार्केटमध्ये अपयश आल्यानंतर प्रसादने आपली जमीन विकून लोकांचे पैसे परत केले होते. हे पैसे बँकेच्या खात्यातून चेकने परत केले गेले, असे असूनही, त्याच्याकडे असलेले चेक पुन्हा बँकेत टाकून त्याला फसविण्यात आले, असे तक्रारीत म्हटले आहे. गेल्या वर्षभरापासून प्रसाद प्रचंड मानसिक तणावात होता आणि त्याला वारंवार ब्लॅकमेल करून त्याच्यावर दबाव टाकला जात होता.

या प्रकरणी 2024 मध्ये संगमनेर पोलीस स्टेशनमध्ये अमोल खताळ, तत्कालीन पोलीस निरीक्षक भगवान मथुरे, प्रसादचे वडील आणि ज्यांना पैसे द्यायचे होते त्यांची संयुक्त बैठक झाल्याचेही तक्रारीत नमूद आहे. या सततच्या मानसिक तणावामुळे आणि धमक्यांमुळे प्रसादने आत्महत्येचा विचार केला आणि अखेरीस त्याला हे टोकाचे पाऊल उचलण्यास भाग पाडले गेले.

या घटनेमुळे गुंजाळ कुटुंबाची समाजा बदनामी झाली असून, त्यांना जगणे असह्य झाल्याचे त्यांनी तक्रारीत म्हटले आहे. तसेच, त्यांच्या जीविताला धोका असून, जर त्यांच्या जीवाला काही बरे-वाईट झाले, तर त्याला अमोल खताळ, संदेश देशमुख आणि त्यांचे सहकारी जबाबदार असतील, असा आरोप त्यांनी केला आहे.

गुंजाळ यांनी आपल्या मुलाची फसवणूक केल्याप्रकरणी आणि कुटुंबाची बदनामी केल्याप्रकरणी अमोल खताळ आणि संदेश देशमुख यांच्यासह दोषींवर कठोर कारवाई करण्याची मागणी पोलिसांकडे केली आहे.

दरम्यान यासंदर्भात संगमनेर शहर पोलीस निरीक्षक, पोलीस उपअधीक्षक व अपर पोलीस अधीक्षक यांच्याशी संपर्क केला असता त्यांच्याकडून कोणताही प्रतिसाद मिळू शकला नाही त्यामुळे संबंधित आरोपीच्या आईच्या तक्रारीवरून संगमनेर शहर पोलिसांनी पुढे काय कार्यवाही केली याबाबत माहिती मिळू शकली नाही.
anantpangarkar
Annant Ppangarkar

Post Views: 1,838
अनिता गुंजाळ अमोल खताळ आमदार खताळ हल्ला संदेश देशमुख
Share. Facebook Twitter Pinterest WhatsApp
Annant Ppangarkar
  • Website

Related Posts

MPSC आंदोलनाला डॉ. जयश्रीताई थोरात यांचा पाठिंबा; समाज आणि आयोगातील ब्लड कॅन्सर ठीक करायचाय!

10/10/2026

आमदार अमोल खताळ यांनी वेधले ऊर्जा राज्यमंत्र्यांचे लक्ष; मेंढवन उपकेंद्राचे काम तातडीने सुरू करण्याची मागणी

10/10/2026

संगमनेर आगारात ‘शिवाई’ इलेक्ट्रिक बसेस, आमदार अमोल खताळ यांच्या हस्ते लोकार्पण; लोकार्पण कार्यक्रमात ज्येष्ठ अभिनेते नाना पाटेकर यांना उपस्थितांकडून श्रद्धांजली

08/10/2026
Leave A Reply Cancel Reply

Document
Our Picks
  • Facebook
  • Twitter
  • Pinterest
  • Instagram
  • YouTube
Advertisement 1 Advertisement 2 Advertisement 3 Advertisement 4
Don't Miss
राजकारण

माजी मंत्री बाळासाहेब थोरात यांच्याकडून घुलेवाडीच्या पायी ज्योतीचे स्वागत; नवरात्रोत्सव हा शक्ती, भक्ती आणि चैतन्याचा उत्सव असल्याचे प्रतिपादन

By Annant Ppangarkar11/10/20260

महाराष्ट्र संवाद न्यूज ऑनलाईन- नवरात्रोत्सवाच्या पार्श्वभूमीवर संगमनेर तालुक्यात विविध ठिकाणांहून देवीच्या पायी ज्योती आणण्याची धार्मिक…

रविवार विशेष लेख — ज्ञानेशकुमारांचे समर्थक ढोंगी सत्यवान!

11/10/2026

दूध भेसळ प्रकरणी मुख्य आरोपीला सात दिवसांत अटकपूर्व जामीन मंजूर

11/10/2026

रविवार ११ ऑक्टोबर २०२६ — जाणून घ्या तुमचा आजचा दिवस कसा असेल

11/10/2026
Thumbnail 1
Thumbnail 2
Thumbnail 3
Thumbnail 4
previous arrow
next arrow
Thumbnail 1
Thumbnail 2
Thumbnail 3
Thumbnail 4
previous arrow
next arrow

तुमचे हक्काचे व्यासपीठ

Facebook YouTube
Our Picks
October 2026
M T W T F S S
 1234
567891011
12131415161718
19202122232425
262728293031  
« Sep    
  • Home
  • आंदोलन
  • आरोग्य
  • इतिहास
  • क्रिडा व कला
  • गुन्हेगारी
  • न्यायालय
  • पत्रकारिता
  • फोटो / गॅलरी
  • महाराष्ट्र संवाद विशेष
  • राजकारण
  • विकास
  • विश्लेषण
  • शिक्षण
  • शेती व सहकार
  • सामाजिक
  • CONTACT US
  • ABOUT US
  • PRIVACY POLICY
© 2026 ThemeSphere. Designed by ThemeSphere.

Type above and press Enter to search. Press Esc to cancel.