Close Menu
महाराष्ट्र संवादमहाराष्ट्र संवाद
  • Home
  • आंदोलन
  • आरोग्य
  • इतिहास
  • क्रिडा व कला
  • गुन्हेगारी
  • न्यायालय
  • महाराष्ट्र संवाद विशेष
  • राजकारण
  • विकास
  • विश्लेषण
  • शिक्षण
What's Hot

अकोले तालुक्यात भीषण स्फोट; मासेमारीसाठी नेण्यात येणाऱ्या स्फोटकांचा दुचाकीवरच स्फोट, एक जण गंभीर जखमी

June 10, 2026

अध्यात्म सांगणे सोपे, पण जगणे कठीण : नंदकुमार पोवार

June 10, 2026

धार्मिक कार्यानंतर नदीत पोहण्यासाठी गेलेल्या दोघांचा बुडून मृत्यू

June 10, 2026
Facebook X (Twitter) Instagram
महाराष्ट्र संवादमहाराष्ट्र संवाद
  • Home
  • आंदोलन
  • आरोग्य
  • इतिहास
  • क्रिडा व कला
  • गुन्हेगारी
  • न्यायालय
  • महाराष्ट्र संवाद विशेष
  • राजकारण
  • विकास
  • विश्लेषण
  • शिक्षण
Facebook X (Twitter) Instagram
महाराष्ट्र संवादमहाराष्ट्र संवाद
Home » अकोले तालुक्यात भीषण स्फोट; मासेमारीसाठी नेण्यात येणाऱ्या स्फोटकांचा दुचाकीवरच स्फोट, एक जण गंभीर जखमी
महाराष्ट्र संवाद विशेष

अकोले तालुक्यात भीषण स्फोट; मासेमारीसाठी नेण्यात येणाऱ्या स्फोटकांचा दुचाकीवरच स्फोट, एक जण गंभीर जखमी

स्फोटाची तीव्रता लक्षात घेऊन तातडीने नाशिक येथील 'बॉम्ब शोध व नाश पथक' (BDDS) आणि फॉरेन्सिक विभागाच्या अधिकाऱ्यांना पाचारण करण्यात आले.
अनंत पांगारकरBy अनंत पांगारकरJune 10, 2026No Comments2 Mins Read
Facebook Twitter WhatsApp
Share
Facebook Twitter Email Telegram WhatsApp

अकोले:
अकोले तालुक्यातील औरंगपूर फाटा येथे आज दुपारी एक अत्यंत धक्कादायक आणि भीषण स्फोट झाल्याची घटना घडली आहे. दुचाकीवरून स्फोटक पदार्थ वाहून नेत असताना हा स्फोट झाला असून, यामध्ये एक जण गंभीर जखमी झाला आहे. या प्रचंड स्फोटामुळे संपूर्ण अकोले परिसरात खळबळ उडाली असून नागरिकांमध्ये भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे.
​मिळालेल्या प्राथमिक माहितीनुसार, दिलीप उत्तम ताजने (रा. औरंगपूर) हा व्यक्ती आपल्या दुचाकीवरून स्फोटक पदार्थ घेऊन जात होता. औरंगपूर फाट्याजवळ अचानक या स्फोटक पदार्थांचा तीव्र स्फोट झाला. प्रत्यक्षदर्शींनी दिलेल्या माहितीनुसार हा स्फोट इतका भीषण आणि थरारक होता की, स्फोटाच्या तीव्रतेमुळे संबंधित दुचाकी तब्बल ५० फुटांपेक्षा अधिक उंच हवेत उडाली. धक्कादायक बाब म्हणजे हवेत उडाल्यानंतरही त्या दुचाकीचा आणखी एक मोठा स्फोट झाला. या दुर्घटनेनंतर परिसरात मोठ्या प्रमाणावर धुराचे लोट पसरले होते आणि आजूबाजूचे नागरिक भयभीत झाले.
​घटनेची माहिती मिळताच अकोले पोलीस प्रशासनाने तातडीने पावले उचलत घटनास्थळी धाव घेतली. घटनेचे गांभीर्य आणि स्फोटाची तीव्रता लक्षात घेऊन तातडीने नाशिक येथील ‘बॉम्ब शोध व नाश पथक’ (BDDS) आणि फॉरेन्सिक विभागाच्या अधिकाऱ्यांना पाचारण करण्यात आले. या पथकांनी घटनास्थळाची बारकाईने पाहणी करून तपासासाठी आवश्यक असलेले नमुने गोळा केले आहेत.
​याप्रकरणी सध्या अकोले पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्याची प्रक्रिया सुरू असून, हे स्फोटक पदार्थ नेमके कुठून आणले होते, त्यात कोणत्या रसायनांचा वापर केला होता आणि यामागे आणखी कोणाचा हात आहे का, या सर्व बाजूने पोलीस आता सखोल तपास करत आहेत.
दुचाकीवरून जात असलेल्या दिलीप उत्तम ताजने याच्या ताब्यातील स्फोटक पदार्थांचा अचानक स्फोट झाला असून तो यामध्ये गंभीर जखमी झाला आहे. प्राथमिक तपासानुसार, सदर व्यक्ती या स्फोटक पदार्थांचा वापर बेकायदेशीररीत्या मासेमारी करण्यासाठी करत होता, असा अंदाज आहे. – डॉ. कुणाल सोनवणे पोलीस उपअधीक्षक संगमनेर

anantpangarkar
अनंत पांगारकर

Post Views: 366
जिलेटिन स्फोट
Share. Facebook Twitter Pinterest WhatsApp
अनंत पांगारकर
  • Website

Related Posts

धार्मिक कार्यानंतर नदीत पोहण्यासाठी गेलेल्या दोघांचा बुडून मृत्यू

June 10, 2026

मान्सून खोळंबला; किमान १५ जूनपर्यंत राज्यात सार्वत्रिक पावसाची शक्यता धूसर, शेतकऱ्यांना घाई न करण्याचे आवाहन

June 7, 2026

संगमनेर नगरपरिषदेचा दणका: भाजप नेत्याच्या मुलाविरुद्ध अनधिकृत बांधकाम प्रकरणी गुन्हा दाखल करण्याचे पोलिसांना आदेश

June 6, 2026
Leave A Reply Cancel Reply

Document
Our Picks
  • Facebook
  • Twitter
  • Pinterest
  • Instagram
  • YouTube
Advertisement 1 Advertisement 2 Advertisement 3 Advertisement 4
Don't Miss
महाराष्ट्र संवाद विशेष

अकोले तालुक्यात भीषण स्फोट; मासेमारीसाठी नेण्यात येणाऱ्या स्फोटकांचा दुचाकीवरच स्फोट, एक जण गंभीर जखमी

By अनंत पांगारकरJune 10, 20260

अकोले: अकोले तालुक्यातील औरंगपूर फाटा येथे आज दुपारी एक अत्यंत धक्कादायक आणि भीषण स्फोट झाल्याची…

अध्यात्म सांगणे सोपे, पण जगणे कठीण : नंदकुमार पोवार

June 10, 2026

धार्मिक कार्यानंतर नदीत पोहण्यासाठी गेलेल्या दोघांचा बुडून मृत्यू

June 10, 2026

आज बुधवार, १० जून २०२६ – कसा असेल तुमचा आजचा दिवस जाणून घ्या

June 10, 2026
Thumbnail 1
Thumbnail 2
Thumbnail 3
Thumbnail 4
previous arrow
next arrow
Thumbnail 1
Thumbnail 2
Thumbnail 3
Thumbnail 4
previous arrow
next arrow

तुमचे हक्काचे व्यासपीठ

Facebook YouTube
Our Picks
June 2026
M T W T F S S
1234567
891011121314
15161718192021
22232425262728
2930  
« May    
  • Home
  • आंदोलन
  • आरोग्य
  • इतिहास
  • क्रिडा व कला
  • गुन्हेगारी
  • न्यायालय
  • पत्रकारिता
  • फोटो / गॅलरी
  • महाराष्ट्र संवाद विशेष
  • राजकारण
  • विकास
  • विश्लेषण
  • शिक्षण
  • शेती व सहकार
  • सामाजिक
  • CONTACT US
  • ABOUT US
  • PRIVACY POLICY
© 2026 ThemeSphere. Designed by ThemeSphere.

Type above and press Enter to search. Press Esc to cancel.