Close Menu
महाराष्ट्र संवादमहाराष्ट्र संवाद
  • Home
  • आंदोलन
  • आरोग्य
  • इतिहास
  • क्रिडा व कला
  • गुन्हेगारी
  • न्यायालय
  • महाराष्ट्र संवाद विशेष
  • राजकारण
  • विकास
  • विश्लेषण
  • शिक्षण
What's Hot

माजी मंत्री बाळासाहेब थोरात यांच्याकडून घुलेवाडीच्या पायी ज्योतीचे स्वागत; नवरात्रोत्सव हा शक्ती, भक्ती आणि चैतन्याचा उत्सव असल्याचे प्रतिपादन

11/10/2026

रविवार विशेष लेख — ज्ञानेशकुमारांचे समर्थक ढोंगी सत्यवान!

11/10/2026

दूध भेसळ प्रकरणी मुख्य आरोपीला सात दिवसांत अटकपूर्व जामीन मंजूर

11/10/2026
Facebook X (Twitter) Instagram
महाराष्ट्र संवादमहाराष्ट्र संवाद
  • Home
  • आंदोलन
  • आरोग्य
  • इतिहास
  • क्रिडा व कला
  • गुन्हेगारी
  • न्यायालय
  • महाराष्ट्र संवाद विशेष
  • राजकारण
  • विकास
  • विश्लेषण
  • शिक्षण
Facebook X (Twitter) Instagram
महाराष्ट्र संवादमहाराष्ट्र संवाद
Home » आमदार हल्ला प्रकरणाशी संबंध नाही, हे थोरातांना बदनाम करण्यासाठीचे राजकीय षडयंत्र; माजी मंत्री बाळासाहेब थोरात यांचे स्वीय सहाय्यक भास्कर खेमनर यांचे निवेदन
महाराष्ट्र संवाद विशेष

आमदार हल्ला प्रकरणाशी संबंध नाही, हे थोरातांना बदनाम करण्यासाठीचे राजकीय षडयंत्र; माजी मंत्री बाळासाहेब थोरात यांचे स्वीय सहाय्यक भास्कर खेमनर यांचे निवेदन

ते म्हणाले की, हे प्रकरण वैयक्तिक व्यवहाराचे असताना त्याला राजकीय स्वरूप दिले जात आहे. माजी मंत्री बाळासाहेब थोरात यांची प्रतिमा मलिन करण्यासाठी हे सर्व षडयंत्र रचले जात असल्याचा आरोप त्यांनी केला आहे.
Annant PpangarkarBy Annant Ppangarkar02/09/2025No Comments2 Mins Read
Facebook Twitter WhatsApp
Share
Facebook Twitter Email Telegram WhatsApp

संगमनेर-

माजी महसूल मंत्री बाळासाहेब थोरात यांचे स्वीय सहायक भास्कर खेमनर यांनी आमदार हल्ला प्रकरणातील त्यांचे नाव समोर आल्यानंतर एक निवेदन जारी केले आहे. या निवेदनात त्यांनी या प्रकरणाशी आपला कोणताही संबंध नसल्याचे स्पष्ट केले असून, हे थोरातांना बदनाम करण्यासाठी रचलेले राजकीय षडयंत्र असल्याचा आरोप केला आहे.

नेमकं काय म्हटलंय निवेदनात?- खेमनर यांनी आपल्या निवेदनात म्हटले आहे की, आमदार हल्ला प्रकरणातील आरोपी प्रसाद गुंजाळ याने त्यांना २२ ते २५ तारखेदरम्यान एक-दोन वेळा फोन केला होता. ‘साहेब कुठे भेटतील?’ एवढीच विचारणा त्याने केली होती. या १५-२० सेकंदाच्या फोनव्यतिरिक्त आरोपीसोबत त्यांचे आजवर कोणतेही बोलणे झालेले नाही.

खेमनर पुढे म्हणतात की, त्यांना दररोज विविध कामांसाठी शेकडो फोन आणि मेसेजेस येत असतात. त्यामुळे अनेकदा ते मेसेजेस वाचूही शकत नाहीत. गुंजाळने त्यांना काही व्हॉट्सॲप मेसेजेस पाठवले होते, अशी माहिती पोलिसांकडून मिळाली आहे. मात्र, त्या मेसेजेसमध्ये काय होते, हे त्यांना आजही माहीत नाही आणि त्यांनी कोणत्याही मेसेजला उत्तर दिलेले नाही. खेमनर यांनी आपण प्रसाद गुंजाळ नावाच्या या व्यक्तीला ओळखतही नसल्याचे म्हटले आहे.

राजकीय षडयंत्र असल्याचा आरोप- या संपूर्ण प्रकरणात गुन्हा दाखल झाल्याचे कळाल्यानंतर खेमनर यांनी तीव्र नाराजी व्यक्त केली आहे. ते म्हणाले की, हे प्रकरण वैयक्तिक व्यवहाराचे असताना त्याला राजकीय स्वरूप दिले जात आहे. माजी मंत्री बाळासाहेब थोरात यांची प्रतिमा मलिन करण्यासाठी हे सर्व षडयंत्र रचले जात असल्याचा आरोप त्यांनी केला आहे.

खेमनर यांनी पोलिसांना या प्रकरणाचा निःपक्षपाती तपास करण्याचे आवाहन केले आहे आणि आपण पोलिसांना पूर्ण सहकार्य करण्यास तयार असल्याचेही सांगितले आहे. शेवटी, त्यांनी न्यायव्यवस्थेवर आपला विश्वास व्यक्त केला असून जनता सुज्ञ असल्याचे म्हटले आहे.

anantpangarkar
Annant Ppangarkar

Post Views: 1,329
निवेदन भास्कर खेमनर संगमनेर पोलीस
Share. Facebook Twitter Pinterest WhatsApp
Annant Ppangarkar
  • Website

Related Posts

MPSC आंदोलनाला डॉ. जयश्रीताई थोरात यांचा पाठिंबा; समाज आणि आयोगातील ब्लड कॅन्सर ठीक करायचाय!

10/10/2026

आमदार अमोल खताळ यांनी वेधले ऊर्जा राज्यमंत्र्यांचे लक्ष; मेंढवन उपकेंद्राचे काम तातडीने सुरू करण्याची मागणी

10/10/2026

दुष्काळग्रस्तांकडून सक्तीची वीज बिल वसुली थांबवा; अन्यथा आंदोलन — शिवसेना ठाकरे शहर प्रमुख अमित चव्हाण

08/10/2026
Leave A Reply Cancel Reply

Document
Our Picks
  • Facebook
  • Twitter
  • Pinterest
  • Instagram
  • YouTube
Advertisement 1 Advertisement 2 Advertisement 3 Advertisement 4
Don't Miss
राजकारण

माजी मंत्री बाळासाहेब थोरात यांच्याकडून घुलेवाडीच्या पायी ज्योतीचे स्वागत; नवरात्रोत्सव हा शक्ती, भक्ती आणि चैतन्याचा उत्सव असल्याचे प्रतिपादन

By Annant Ppangarkar11/10/20260

महाराष्ट्र संवाद न्यूज ऑनलाईन- नवरात्रोत्सवाच्या पार्श्वभूमीवर संगमनेर तालुक्यात विविध ठिकाणांहून देवीच्या पायी ज्योती आणण्याची धार्मिक…

रविवार विशेष लेख — ज्ञानेशकुमारांचे समर्थक ढोंगी सत्यवान!

11/10/2026

दूध भेसळ प्रकरणी मुख्य आरोपीला सात दिवसांत अटकपूर्व जामीन मंजूर

11/10/2026

रविवार ११ ऑक्टोबर २०२६ — जाणून घ्या तुमचा आजचा दिवस कसा असेल

11/10/2026
Thumbnail 1
Thumbnail 2
Thumbnail 3
Thumbnail 4
previous arrow
next arrow
Thumbnail 1
Thumbnail 2
Thumbnail 3
Thumbnail 4
previous arrow
next arrow

तुमचे हक्काचे व्यासपीठ

Facebook YouTube
Our Picks
October 2026
M T W T F S S
 1234
567891011
12131415161718
19202122232425
262728293031  
« Sep    
  • Home
  • आंदोलन
  • आरोग्य
  • इतिहास
  • क्रिडा व कला
  • गुन्हेगारी
  • न्यायालय
  • पत्रकारिता
  • फोटो / गॅलरी
  • महाराष्ट्र संवाद विशेष
  • राजकारण
  • विकास
  • विश्लेषण
  • शिक्षण
  • शेती व सहकार
  • सामाजिक
  • CONTACT US
  • ABOUT US
  • PRIVACY POLICY
© 2026 ThemeSphere. Designed by ThemeSphere.

Type above and press Enter to search. Press Esc to cancel.