Close Menu
महाराष्ट्र संवादमहाराष्ट्र संवाद
  • Home
  • आंदोलन
  • आरोग्य
  • इतिहास
  • क्रिडा व कला
  • गुन्हेगारी
  • न्यायालय
  • महाराष्ट्र संवाद विशेष
  • राजकारण
  • विकास
  • विश्लेषण
  • शिक्षण
What's Hot

बाळासाहेब थोरातांचा राज्य सरकारला मोठा इशारा: ‘कर्नाटकच्या धर्तीवर महाराष्ट्रात तातडीने चारा छावण्या सुरू करा, अन्यथा परिस्थिती हाताबाहेर जाईल!’

21/10/2026

संगमनेरमध्ये जनसागर! ३६ फुटी रावणदहन अन् हजारो झाडांचे वाटप; मालपाणी इंडस्ट्रियल पार्कमध्ये ‘सीमोल्लंघन’चा उत्साह

21/10/2026

अंकाई गडावर दर्शनासाठी गेले अन् काळानं घाला घातला! भाजपा कायदा सेलचे पदाधिकारी असलेल्या संगमनेरच्या वकिलाचे निधन

21/10/2026
Facebook X (Twitter) Instagram
महाराष्ट्र संवादमहाराष्ट्र संवाद
  • Home
  • आंदोलन
  • आरोग्य
  • इतिहास
  • क्रिडा व कला
  • गुन्हेगारी
  • न्यायालय
  • महाराष्ट्र संवाद विशेष
  • राजकारण
  • विकास
  • विश्लेषण
  • शिक्षण
Facebook X (Twitter) Instagram
महाराष्ट्र संवादमहाराष्ट्र संवाद
Home » मेनरोड शिवसेना शाखेकडून गणेशोत्सव गौरव समारंभ: मंडळांना विविध पारितोषिक
धार्मिक

मेनरोड शिवसेना शाखेकडून गणेशोत्सव गौरव समारंभ: मंडळांना विविध पारितोषिक

या कार्यक्रमात केवळ गणेश मंडळांनाच नव्हे, तर समाजातील विविध क्षेत्रांत मोलाचे योगदान देणाऱ्या व्यक्तींचाही सत्कार केला जाईल.
Annant PpangarkarBy Annant Ppangarkar02/09/2025No Comments2 Mins Read
Facebook Twitter WhatsApp
Share
Facebook Twitter Email Telegram WhatsApp

संगमनेर – 

दरवर्षीप्रमाणे यंदाही मेनरोड शिवसेना शाखा क्र. ११ च्या वतीने गणेशोत्सव २०२५ च्या निमित्ताने भव्य गणेश उत्सव गौरव सोहळ्याचे आयोजन करण्यात आले आहे. यावर्षी, संगमनेर शहरातील सर्व गणेश मंडळांचे स्वागत आणि गौरव करण्यात येणार आहे.

उद्योगपती ओंकारनाथजी व माधवलालजी मालपाणी यांच्या स्मरणार्थ हा स्वागत सत्कार आणि पारितोषिक वितरण सोहळा गणेश विसर्जन मिरवणुकीत आयोजित करण्यात आला आहे. यावेळी मानाचे गणपती मंडळ तसेच इतर सर्व मंडळांना त्यांच्या उत्कृष्ट देखावे, भव्य मूर्ती आणि शिस्तबद्ध मिरवणुकीसाठी सन्मानित केले जाईल.

या सोहळ्यात अनेक आकर्षक पारितोषिके दिली जाणार आहेत. यामध्ये, उत्कृष्ट मूर्ती, भव्य मूर्ती, उत्कृष्ट देखावा, भव्य देखावा, भव्य लायटिंग आणि भव्य मिरवणूक यांसाठी मंडळांना विशेष गौरवण्यात येईल. याव्यतिरिक्त, समाज प्रबोधनपर देखावे, धार्मिक देखावे आणि सामाजिक, राजकीय, आर्थिक, आध्यात्मिक तसेच प्रशासकीय विषयांवर जनजागृती करणारे देखावे सादर करणाऱ्या मंडळांनाही सन्मानित केले जाईल.

या कार्यक्रमात केवळ गणेश मंडळांनाच नव्हे, तर समाजातील विविध क्षेत्रांत मोलाचे योगदान देणाऱ्या व्यक्तींचाही सत्कार केला जाईल. यामध्ये पारंपरिक वाद्य वाजवणारे कलाकार, ढोल-ताशे, हलगी-ताशे वाजवणारे कारागीर, लाठ्या-काठ्या व दांडपट्टा फिरवणारे कलाकार, गायक, समाजसेवक, मूर्तिकार, लेखक, व्यंगचित्रकार आणि पत्रकार यांचा सन्मानचिन्ह देऊन गौरव करण्यात येणार आहे.

हा सोहळा यशस्वी करण्यासाठी मेनरोड शिवसेना शाखा क्र. ११ चे सदस्य प्रयत्न करत आहेत. यामध्ये माजी नगरसेवक कैलास वाकचौरे, बाळासाहेब डावखरे, भैय्या तांबोळी, दत्ता भांदुर्गे, अमित पवार, गोटूशेठ अट्टल, कृष्णा केसेकर, संजय वलवाणी, सचिन बांगर, महादेव शिंदे, रमेश सस्कर, शशिकांत घोलप, दत्ताराज कोळपकर, इसाक रंगरेज, विजू नाना बापटे, संदीप मोरे, नारायण वाकचौरे, महेश आळने, सुनील देशमुख, सुनील वालझाडे, समीर ओझा, सुनील गायकवाड, प्रसाद बांगर आणि प्रल्हाद आल्हाट यांचा समावेश आहे.

anantpangarkar
Annant Ppangarkar

Views: 356
गणेश विसर्जन मिरवणूक गणेशोत्सव बक्षीस
Share. Facebook Twitter Pinterest WhatsApp
Annant Ppangarkar
  • Website

Related Posts

संगमनेरमध्ये जनसागर! ३६ फुटी रावणदहन अन् हजारो झाडांचे वाटप; मालपाणी इंडस्ट्रियल पार्कमध्ये ‘सीमोल्लंघन’चा उत्साह

21/10/2026

“सर्व अडचणी दूर होऊन जनतेच्या जीवनात सुख-समाधान नांदो!”; नवरात्रोत्सवात माजीमंत्री बाळासाहेब थोरात यांची भावूक प्रार्थना

20/10/2026

दसरा विशेष: संगमनेरच्या मालपाणी पार्कमध्ये होणाऱ्या ‘या’ खास सोहळ्याचे संपूर्ण वेळापत्रक आणि प्रमुख आकर्षणे एका क्लिकवर!

16/10/2026
Leave A Reply Cancel Reply

Document
Our Picks
  • Facebook
  • Twitter
  • Pinterest
  • Instagram
  • YouTube
Advertisement 1 Advertisement 2 Advertisement 3 Advertisement 4
Don't Miss
राजकारण

बाळासाहेब थोरातांचा राज्य सरकारला मोठा इशारा: ‘कर्नाटकच्या धर्तीवर महाराष्ट्रात तातडीने चारा छावण्या सुरू करा, अन्यथा परिस्थिती हाताबाहेर जाईल!’

By Annant Ppangarkar21/10/20260

महाराष्ट्र संवाद न्यूज ऑनलाईन- राज्यामध्ये दुष्काळाचे अत्यंत भीषण सावट पसरले असून पिण्याच्या पाण्यासह जनावरांच्या चाऱ्याचा…

संगमनेरमध्ये जनसागर! ३६ फुटी रावणदहन अन् हजारो झाडांचे वाटप; मालपाणी इंडस्ट्रियल पार्कमध्ये ‘सीमोल्लंघन’चा उत्साह

21/10/2026

अंकाई गडावर दर्शनासाठी गेले अन् काळानं घाला घातला! भाजपा कायदा सेलचे पदाधिकारी असलेल्या संगमनेरच्या वकिलाचे निधन

21/10/2026

बुधवार, २१ ऑक्टोंबर —- आजच्या दिवसाचे राशिभविष्य

21/10/2026
Thumbnail 1
Thumbnail 2
Thumbnail 3
Thumbnail 4
previous arrow
next arrow
Thumbnail 1
Thumbnail 2
Thumbnail 3
Thumbnail 4
previous arrow
next arrow

तुमचे हक्काचे व्यासपीठ

Facebook YouTube
Our Picks
October 2026
M T W T F S S
 1234
567891011
12131415161718
19202122232425
262728293031  
« Sep    
  • Home
  • आंदोलन
  • आरोग्य
  • इतिहास
  • क्रिडा व कला
  • गुन्हेगारी
  • न्यायालय
  • पत्रकारिता
  • फोटो / गॅलरी
  • महाराष्ट्र संवाद विशेष
  • राजकारण
  • विकास
  • विश्लेषण
  • शिक्षण
  • शेती व सहकार
  • सामाजिक
  • CONTACT US
  • ABOUT US
  • PRIVACY POLICY
© 2026 ThemeSphere. Designed by ThemeSphere.

Type above and press Enter to search. Press Esc to cancel.