Close Menu
महाराष्ट्र संवादमहाराष्ट्र संवाद
  • Home
  • आंदोलन
  • आरोग्य
  • इतिहास
  • क्रिडा व कला
  • गुन्हेगारी
  • न्यायालय
  • महाराष्ट्र संवाद विशेष
  • राजकारण
  • विकास
  • विश्लेषण
  • शिक्षण
What's Hot

मतचोरी अन् ‘SIR’च्या घोटाळ्याविरोधात संगमनेरमध्ये उद्धव ठाकरेंच्या शिवसेनेसह समविचारी पक्षांचा घणाघात; माजी खासदार खैरे, जिल्हाप्रमुख कोते पाटलांच्या नेतृत्वात रस्ता रोको करत निवडणूक आयोगाचा तीव्र निषेध

14/10/2026

बुधवार १४ ऑक्टोंबर — जाणून घ्या, आजच्या दिवसाचे राशिभविष्य

14/10/2026

थोरात सहकारी साखर कारखान्याच्या गळीत हंगामाचा उद्या शुभारंभ; जाणून घ्या कितवा आहे हा हंगाम!

13/10/2026
Facebook X (Twitter) Instagram
महाराष्ट्र संवादमहाराष्ट्र संवाद
  • Home
  • आंदोलन
  • आरोग्य
  • इतिहास
  • क्रिडा व कला
  • गुन्हेगारी
  • न्यायालय
  • महाराष्ट्र संवाद विशेष
  • राजकारण
  • विकास
  • विश्लेषण
  • शिक्षण
Facebook X (Twitter) Instagram
महाराष्ट्र संवादमहाराष्ट्र संवाद
Home » मराठवाड्यातील नुकसानग्रस्त भागाची पाहणी; शेतकऱ्यांच्या पाठीशी खंबीर उभे राहा, सरसकट कर्जमाफी द्या: माजी मंत्री बाळासाहेब थोरात यांचे राज्य सरकारला आवाहन
राजकारण

मराठवाड्यातील नुकसानग्रस्त भागाची पाहणी; शेतकऱ्यांच्या पाठीशी खंबीर उभे राहा, सरसकट कर्जमाफी द्या: माजी मंत्री बाळासाहेब थोरात यांचे राज्य सरकारला आवाहन

शासनाने आता कुठलेही कागदी घोडे न नाचवता, सर्व नियम व अटी टाळून तातडीने मदत केली पाहिजे, शेतकऱ्यांच्या पाठीशी उभे राहणे ही सरकारची पहिली भूमिका असली पाहिजे, मात्र दुर्दैवाने तसे होताना दिसत नाही.
Annant PpangarkarBy Annant Ppangarkar27/09/2025Updated:27/09/2025No Comments2 Mins Read
Facebook Twitter WhatsApp
Share
Facebook Twitter Email Telegram WhatsApp

छत्रपती संभाजीनगर: काँग्रेसच्या राष्ट्रीय वर्किंग कमिटीचे सदस्य, माजी कृषिमंत्री बाळासाहेब थोरात यांनी मराठवाड्यातील अतिवृष्टीमुळे झालेल्या नुकसानीची शनिवारी सकाळी पाहणी करून राज्य सरकारला ‘बाकी सारे सोडा, पहिले शेतकऱ्यांच्या पाठीशी खंबीरपणे उभे राहा’ असे कळकळीचे आवाहन केले आहे. त्यांनी तात्काळ आणि विनाअट मदत देण्याची मागणीही केली.

बांधावर जाऊन जाणून घेतल्या व्यथा- बिहारमध्ये काँग्रेसच्या राष्ट्रीय वर्किंग कमिटीच्या बैठकीसाठी उपस्थित राहिल्यानंतर, थोरात यांनी तातडीने मराठवाड्यातील अतिवृष्टीग्रस्त भागाकडे धाव घेतली. त्यांनी संभाजीनगर जिल्ह्यातील पैठण तालुक्यातील ढोरकिन आणि टाकळी फाटा येथील नुकसानग्रस्त शेतीची पाहणी केली आणि शेतकऱ्यांच्या व्यथा जाणून घेतल्या.

या पाहणी दौऱ्यात त्यांच्या समवेत खासदार कल्याण काळे, काँग्रेसचे जिल्हाध्यक्ष किरण पाटील डोणगावकर, इसुफ शेख, रवींद्र काळे, विनोद तांबे, भाऊसाहेब जगताप, अशोक डोळस, रावसाहेब नाडे, संभाजी काटे, रवींद्र आमले आदी पदाधिकारी आणि शेतकरी बांधव मोठ्या संख्येने उपस्थित होते.

‘नुसती शेती नाही, तर महाराष्ट्र खचलाय’- गेल्या आठवड्यात झालेल्या अतिवृष्टीमुळे मराठवाड्यात शेतकऱ्यांच्या पिकांचे मोठे नुकसान झाले आहे. घरे आणि संसारोपयोगी सामानाची वाताहत झाली असून अनेक कुटुंबे उघड्यावर आली आहेत. मात्र, शासनाकडून ठोस उपाययोजना होताना दिसत नसल्याबद्दल थोरात यांनी चिंता व्यक्त केली.

थोरात म्हणाले, झालेल्या अतिवृष्टीने नुसती शेती खचलेली नाही, तर महाराष्ट्र खचला आहे. शेतकऱ्यांसमोर मोठे भयानक संकट उभे आहे. अनेक ठिकाणी पूर्ण पिके पाण्याखाली गेली, तर काही ठिकाणी जमिनीही वाहून गेल्या आहेत. अनेक कुटुंबे उघड्यावर आली आहेत.

तातडीने मदत द्या आणि सरसकट कर्जमाफी करा- शासनाने आता कुठलेही कागदी घोडे न नाचवता, सर्व नियम व अटी टाळून तातडीने मदत केली पाहिजे, शेतकऱ्यांच्या पाठीशी उभे राहणे ही सरकारची पहिली भूमिका असली पाहिजे, मात्र दुर्दैवाने तसे होताना दिसत नाही. अनेक जाचक अटी टाकल्या जात आहेत.

यावेळी त्यांनी सरकारकडे पंचनाम्यांना गती देण्याबरोबरच, महाराष्ट्रातील सर्व शेतकऱ्यांची सरसकट कर्जमाफी करावी, अशी जोरदार मागणी केली.

खासदार कल्याण काळे यांनी यावेळी सत्ताधाऱ्यांवर टीकास्त्र सोडले. सत्ताधारी येऊन केवळ फोटोसेशन करत आहेत, मात्र कुठलीही ठोस मदत जाहीर करत नाहीत. अत्यंत दुर्दैवी आहे. या सरकारला फक्त राजकारण करायचे असून शेतकऱ्यांशी काही देणे-घेणे नाही, असे ते म्हणाले.


  • आपला लोकनेता संकटकाळात बांधावर आल्याचे पाहून अनेक शेतकऱ्यांच्या डोळ्यांमध्ये अश्रू तरळले. थोरात यांनी यावेळी ‘खंबीर राहा, आम्ही तुमच्या सोबत आहोत’ असे सांगत सर्व शेतकरी व नागरिकांना धीर दिला.

anantpangarkar
Annant Ppangarkar

Post Views: 374
कल्याण काळे पाहणी दौरा बाळासाहेब थोरात मराठवाडा
Share. Facebook Twitter Pinterest WhatsApp
Annant Ppangarkar
  • Website

Related Posts

थोरात सहकारी साखर कारखान्याच्या गळीत हंगामाचा उद्या शुभारंभ; जाणून घ्या कितवा आहे हा हंगाम!

13/10/2026

पंचनाम्यात वेळ घालवू नका, सरसकट मदत करा! दिल्लीवरून थेट शेतकऱ्यांच्या बांधावर पोहोचून बाळासाहेब थोरात आक्रमक!

13/10/2026

नुकसानग्रस्त शेतकऱ्यांना आर्थिक मदत कधी मिळणार? आमदार अमोल खताळांनी दिली ही माहिती

13/10/2026
Leave A Reply Cancel Reply

Document
Our Picks
  • Facebook
  • Twitter
  • Pinterest
  • Instagram
  • YouTube
Advertisement 1 Advertisement 2 Advertisement 3 Advertisement 4
Don't Miss
आंदोलन

मतचोरी अन् ‘SIR’च्या घोटाळ्याविरोधात संगमनेरमध्ये उद्धव ठाकरेंच्या शिवसेनेसह समविचारी पक्षांचा घणाघात; माजी खासदार खैरे, जिल्हाप्रमुख कोते पाटलांच्या नेतृत्वात रस्ता रोको करत निवडणूक आयोगाचा तीव्र निषेध

By Annant Ppangarkar14/10/20260

महाराष्ट्र संवाद न्यूज ऑनलाईन- देशभरात मतदार याद्यांमधील कथित प्रचंड घोळ, ‘एसआयआर’ (विशेष सखोल मतदार यादी…

बुधवार १४ ऑक्टोंबर — जाणून घ्या, आजच्या दिवसाचे राशिभविष्य

14/10/2026

थोरात सहकारी साखर कारखान्याच्या गळीत हंगामाचा उद्या शुभारंभ; जाणून घ्या कितवा आहे हा हंगाम!

13/10/2026

पंचनाम्यात वेळ घालवू नका, सरसकट मदत करा! दिल्लीवरून थेट शेतकऱ्यांच्या बांधावर पोहोचून बाळासाहेब थोरात आक्रमक!

13/10/2026
Thumbnail 1
Thumbnail 2
Thumbnail 3
Thumbnail 4
previous arrow
next arrow
Thumbnail 1
Thumbnail 2
Thumbnail 3
Thumbnail 4
previous arrow
next arrow

तुमचे हक्काचे व्यासपीठ

Facebook YouTube
Our Picks
October 2026
M T W T F S S
 1234
567891011
12131415161718
19202122232425
262728293031  
« Sep    
  • Home
  • आंदोलन
  • आरोग्य
  • इतिहास
  • क्रिडा व कला
  • गुन्हेगारी
  • न्यायालय
  • पत्रकारिता
  • फोटो / गॅलरी
  • महाराष्ट्र संवाद विशेष
  • राजकारण
  • विकास
  • विश्लेषण
  • शिक्षण
  • शेती व सहकार
  • सामाजिक
  • CONTACT US
  • ABOUT US
  • PRIVACY POLICY
© 2026 ThemeSphere. Designed by ThemeSphere.

Type above and press Enter to search. Press Esc to cancel.