मेष (Aries): आजचा दिवस तुमच्यासाठी चांगला आहे. तुम्ही दानधर्मात खर्च कराल. सामाजिक स्नेहमेळावे आणि सहली तुम्हाला आनंद देतील. आरोग्याकडे थोडे लक्ष द्या.
वृषभ (Taurus): तुमच्या आकर्षक व्यक्तिमत्त्वामुळे इतरांचे लक्ष वेधून घ्याल. इच्छा पूर्ण होण्याचा दिवस आहे. कामाच्या ठिकाणी तुमचे महत्त्व वाढेल.
मिथुन (Gemini): प्रदीर्घ काळापासून सुरू असलेला तणाव कमी होईल. कामात बदल केल्यास फायदा होईल. कामात प्रगती दिसून येईल.
कर्क (Cancer): दूरचा प्रवास टाळा, कारण प्रकृती आज साथ देणार नाही. पैशाच्या बाबतीत काळजी घ्या. कुटुंबात शांततेचे वातावरण राहील.
सिंह (Leo): तुमचा सकारात्मक दृष्टिकोन आज तुमच्या आजूबाजूच्या लोकांवर चांगला प्रभाव टाकेल. कामात तुमची क्षमता वाढलेली दिसेल आणि वरिष्ठांकडून तुमच्या प्रयत्नांचे कौतुक होईल.
कन्या (Virgo): आरोग्याच्या समस्या काही प्रमाणात कमी होऊ शकतात. मनातील निराशाजनक विचार काढून टाका आणि आवडीच्या कामांवर लक्ष केंद्रित करा. जोडीदाराशी समजूतदारपणे वागा.
तुळ (Libra): दीर्घ आजारातून बरे होण्याची शक्यता आहे. आर्थिक दृष्ट्या आज तुम्ही मजबूत असाल. जर तुम्ही कामाच्या पद्धती बदलल्या तर कामे लवकर पूर्ण होतील. रागावर नियंत्रण ठेवा.
वृश्चिक (Scorpio): आज घराबाहेर भटकंती, मेजवान्या तुमचा मूड चांगला ठेवतील. व्यवसायात काळजीपूर्वक आणि प्रामाणिकपणे काम करावे लागेल. व्यवसाय विस्ताराच्या योजनांवर पुनर्विचार करा.
धनु (Sagittarius): जीवन आनंदाने जगण्याच्या आपल्या आशा-आकांक्षा तपासून पाहा. योग आणि ध्यान साधनेची मदत घ्या. नवीन संधींचा लाभ घ्या.
मकर (Capricorn): तुम्हाला शांत ठेवणाऱ्या उपक्रमांमध्ये स्वतःला गुंतवा. अचानक धनलाभ होण्याची शक्यता आहे. नोकरीमध्ये आपल्या कामाचे बक्षीस मिळून प्रशंसा होऊ शकते.
कुंभ (Aquarius): तुमचा तणाव पूर्वीपेक्षा कमी होऊ शकतो. आजूबाजूच्या लोकांसोबत मिळून काम करण्याचा दिवस आहे. दैनंदिन कामे वेळेवर पूर्ण होऊ शकतात. नवीन सुरुवात करण्यास चांगला दिवस आहे.
मीन (Pisces): परिस्थितीवर तुमचे नियंत्रण आले की चिंता नाहीशी होईल. लव्ह लाईफमध्ये वाद होण्याची शक्यता आहे. विद्यार्थ्यांचे मन अभ्यासात लागणार नाही. अचानक धनलाभ होऊ शकतो. शत्रूंपासून सावध राहा.
जाणून घ्या आज शुक्रवार, ३ ऑक्टोबर २०२५ रोजीचे राशिभविष्य
हे सर्वसाधारण राशीभविष्य आहे. वैयक्तिक स्थितीनुसार यात बदल होऊ शकतो.



मेष (Aries): आजचा दिवस तुमच्यासाठी चांगला आहे. तुम्ही दानधर्मात खर्च कराल. सामाजिक स्नेहमेळावे आणि सहली तुम्हाला आनंद देतील. आरोग्याकडे थोडे लक्ष द्या.



