Close Menu
महाराष्ट्र संवादमहाराष्ट्र संवाद
  • Home
  • आंदोलन
  • आरोग्य
  • इतिहास
  • क्रिडा व कला
  • गुन्हेगारी
  • न्यायालय
  • महाराष्ट्र संवाद विशेष
  • राजकारण
  • विकास
  • विश्लेषण
  • शिक्षण
What's Hot

संगमनेर तालुका व शहर काँग्रेसच्या नव्या पदाधिकाऱ्यांच्या निवडी जाहीर; अजय फटांगरे, सोमेश्वर दिवटे आणि अमोल शेलकर यांच्यावर मोठी जबाबदारी

July 18, 2026

जंतरमंतरवर हायव्होल्टेज ड्रामा: सोनम वांगचुक रुग्णालयात दाखल; अभिजीत दिपके पोलिसांच्या ताब्यात… रात्री काय घडलं!

July 18, 2026

आज, शनिवार १८ जुलै २०२६ – कसा असेल तुमचा आजचा दिवस जाणून घ्या

July 18, 2026
Facebook X (Twitter) Instagram
महाराष्ट्र संवादमहाराष्ट्र संवाद
  • Home
  • आंदोलन
  • आरोग्य
  • इतिहास
  • क्रिडा व कला
  • गुन्हेगारी
  • न्यायालय
  • महाराष्ट्र संवाद विशेष
  • राजकारण
  • विकास
  • विश्लेषण
  • शिक्षण
Facebook X (Twitter) Instagram
महाराष्ट्र संवादमहाराष्ट्र संवाद
Home » ‘कौन बनेगा नगराध्यक्ष?’ संगमनेर नगराध्यक्षपदाचे आरक्षण आज निश्चित होणार; राजकीय धुरिणांचे लक्ष
निवडणूक

‘कौन बनेगा नगराध्यक्ष?’ संगमनेर नगराध्यक्षपदाचे आरक्षण आज निश्चित होणार; राजकीय धुरिणांचे लक्ष

आरक्षित प्रवर्गात योग्य, सक्षम आणि विजयी होऊ शकणाऱ्या उमेदवाराचा शोध घेणे, हे मोठे आव्हान आता सर्वच राजकीय पक्षांसमोर असेल.
अनंत पांगारकरBy अनंत पांगारकरOctober 6, 2025Updated:October 6, 2025No Comments1 Min Read
Facebook Twitter WhatsApp
Share
Facebook Twitter Email Telegram WhatsApp

संगमनेर: आगामी संगमनेर नगरपरिषदेच्या निवडणुकीसाठी भावी नगराध्यक्षांची निवड थेट जनतेतून होणार असल्याचे स्पष्ट झाल्यानंतर, आज (सोमवार, ०६ ऑक्टोबर) होणाऱ्या आरक्षण सोडतीकडे संपूर्ण संगमनेरकरांचे तसेच इच्छुक उमेदवारांचे आणि राजकीय पक्षांच्या धुरिणांचे लक्ष लागले आहे. आजच्या सोडतीत नगराध्यक्षपद कोणत्या प्रवर्गासाठी राखीव होणार, यावर आता निवडणुकीची पुढील दिशा ठरणार आहे.

नगराध्यक्षपदाच्या आरक्षणाबाबत गेल्या अनेक दिवसांपासून विविध राजकीय आडाखे बांधले जात होते. मात्र, आजच्या सोडतीमुळे हे सर्व आडाखे संपुष्टात येणार आहेत. ज्या प्रवर्गासाठी हे पद आरक्षित होईल, त्या प्रवर्गातील इच्छुकांमध्ये उमेदवारी मिळवण्यासाठी मोर्चेबांधणीला आणि प्रयत्नांना तात्काळ वेग येईल.

राज्यातील २४७ नगरपरिषदा आणि १२७ नगरपंचायतींच्या नगराध्यक्षपदांचे आरक्षण आज निश्चित केले जाणार आहे. ही सोडत मुंबईतील मंत्रालयाच्या सहाव्या मजल्यावरील परिषद सभागृहात काढण्यात येणार आहे. या संदर्भात विभागाकडून सर्व राजकीय पक्षांच्या अध्यक्ष आणि सचिवांना रितसर पत्र पाठवण्यात आले आहे.

आरक्षण निश्चित झाल्यानंतर, आगामी स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीच्या दृष्टीने राजकीय हालचालींना प्रचंड वेग येईल. सध्या तरी सर्वच प्रवर्गातील संभाव्य इच्छुकांनी तयारी सुरू केली आहे. मात्र, आज आरक्षण जाहीर झाल्यानंतर, आरक्षित प्रवर्गातील इच्छुकांच्या संख्येत लक्षणीय वाढ होणार आहे.

इच्छुकांच्या वाढत्या संख्येमुळे उमेदवारी निश्चित करताना पक्षश्रेष्ठींसमोर मोठी डोकेदुखी वाढणार आहे. आरक्षित प्रवर्गात योग्य, सक्षम आणि विजयी होऊ शकणाऱ्या उमेदवाराचा शोध घेणे, हे मोठे आव्हान आता सर्वच राजकीय पक्षांसमोर असेल.

anantpangarkar
अनंत पांगारकर

Post Views: 991
आरक्षण सोडत नगराध्यक्ष मंत्रालय
Share. Facebook Twitter Pinterest WhatsApp
अनंत पांगारकर
  • Website

Related Posts

शिक्षण प्रसारक संस्थेत पुन्हा मालपाणींचे वर्चस्व, मात्र एकाकी लढतीत ॲड. संग्राम जोंधळे यांनी दिली कडवी झुंज; ११२ मतांनी वेधले सर्वांचे लक्ष

May 25, 2026

बारामती पोटनिवडणुकीत सुनेत्रा पवार यांचा ऐतिहासिक विजय; अजित पवारांचा मताधिक्याचा विक्रम मोडला, आत्तापर्यंतचा देशातील सर्वात मोठा विजय

May 4, 2026

विधान परिषदेच्या ९ जागांसाठी रणधुमाळी सुरू; १२ मे रोजी मतदान आणि निकाल, पाहा संपूर्ण वेळापत्रक!

April 16, 2026
Leave A Reply Cancel Reply

Document
Our Picks
  • Facebook
  • Twitter
  • Pinterest
  • Instagram
  • YouTube
Advertisement 1 Advertisement 2 Advertisement 3 Advertisement 4
Don't Miss
यश / निवड / पुरस्कार

संगमनेर तालुका व शहर काँग्रेसच्या नव्या पदाधिकाऱ्यांच्या निवडी जाहीर; अजय फटांगरे, सोमेश्वर दिवटे आणि अमोल शेलकर यांच्यावर मोठी जबाबदारी

By अनंत पांगारकरJuly 18, 20260

महाराष्ट्र संवाद न्यूज ऑनलाईन संगमनेर: महाराष्ट्र प्रदेश काँग्रेस कमिटीच्या ‘संघटन सृजन अभियान’ अंतर्गत संगमनेर तालुका…

जंतरमंतरवर हायव्होल्टेज ड्रामा: सोनम वांगचुक रुग्णालयात दाखल; अभिजीत दिपके पोलिसांच्या ताब्यात… रात्री काय घडलं!

July 18, 2026

आज, शनिवार १८ जुलै २०२६ – कसा असेल तुमचा आजचा दिवस जाणून घ्या

July 18, 2026

यू डायस अहवाल: राज्यातील हजारो शाळा पायाभूत सुविधांअभावी अंधारात, डिजिटल शिक्षणाचा दावा ठरतोय फोल

July 17, 2026
Thumbnail 1
Thumbnail 2
Thumbnail 3
Thumbnail 4
previous arrow
next arrow
Thumbnail 1
Thumbnail 2
Thumbnail 3
Thumbnail 4
previous arrow
next arrow

तुमचे हक्काचे व्यासपीठ

Facebook YouTube
Our Picks
July 2026
M T W T F S S
 12345
6789101112
13141516171819
20212223242526
2728293031  
« Jun    
  • Home
  • आंदोलन
  • आरोग्य
  • इतिहास
  • क्रिडा व कला
  • गुन्हेगारी
  • न्यायालय
  • पत्रकारिता
  • फोटो / गॅलरी
  • महाराष्ट्र संवाद विशेष
  • राजकारण
  • विकास
  • विश्लेषण
  • शिक्षण
  • शेती व सहकार
  • सामाजिक
  • CONTACT US
  • ABOUT US
  • PRIVACY POLICY
© 2026 ThemeSphere. Designed by ThemeSphere.

Type above and press Enter to search. Press Esc to cancel.