संगमनेर – सर्वोच्च न्यायालयाच्या निर्देशानंतर राज्यभरात स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणूक प्रक्रियेने वेग घेतला आहे. या पार्श्वभूमीवर संगमनेर तालुक्यातील जिल्हा परिषद गट आणि पंचायत समिती गणासाठी राखीव जागांची आरक्षण सोडत सोमवारी (१३ ऑक्टोबर) काढण्यात येणार असल्याची माहिती प्रसिद्धी पत्रकाद्वारे तहसीलदार धीरज मांजरे यांनी दिली आहे.
संगमनेर तालुक्यामध्ये जिल्हा परिषदेचे ९ गट तर पंचायत समितीचे १८ गण आहेत. जिल्हा परिषदेच्या ९ गटामध्ये समनापुर, तळेगाव, आश्वी बुद्रुक, जोर्वे, घुलेवाडी, धांदरफळ बुद्रुक, चंदनापुरी, बोटा व साकुर या गटांचा समावेश आहे.
तर पंचायत समितीच्या १८ गणांमध्ये निमोण, समनापुर, तळेगाव, वडगाव पान, आश्वी बुद्रुक, आश्वी खुर्द, जोर्वे, अंभोरे, घुलेवाडी, गुंजाळवाडी, राजापूर, धांदरफळ बुद्रुक, संगमनेर खुर्द, चंदनापुरी, खंदळमाळवाडी, बोटा, पिंपळगाव देपा आणि साकुर या गणांचा समावेश आहे.
सोमवारी सकाळी ११ वाजता यशवंतराव चव्हाण प्रशासकीय इमारतीतील सभागृहात (प्रांत ऑफिस) या संबंधीची आरक्षण सोडत काढली जाणार आहे. आरक्षण सोडतीमध्ये जिल्हा परिषद गट व पंचायत समिती गणातील अनुसूचित जाती, अनुसूचित जमाती, नागरिकांचा मागासवर्ग प्रवर्ग व त्यामधील स्त्रियांसाठी राखून ठेवावयाच्या जागा, सर्वसाधारण स्त्रियांसाठी राखून ठेवावयाच्या जागा निश्चित केल्या जाणार आहे. या सभेसाठी जिल्हा परिषद व पंचायत समिती कार्यक्षेत्रातील रहिवाशांनी उपस्थित राहण्याचे सुचित करण्यात आले आहे.
याशिवाय जिल्हा परिषद व पंचायत समिती निवडणुकीसाठीचा कार्यक्रम राज्य निवडणूक आयोगाकडून घोषित करण्यात आला असून त्या अनुषंगाने जिल्हा परिषद व पंचायत समिती गटगणांची प्राप्त झालेली प्रारूप मतदार यादी गटविकास अधिकाऱ्यांकडून प्रसिद्ध करण्यात आली आहे.
या मतदार यादीवरील हरकती व सूचना आजपासून १४ ऑक्टोबर पर्यंत संगमनेर तहसील कार्यालयातील ग्रामपंचायत निवडणूक शाखेत दाखल करता येणार आहे, अशी देखील माहिती संगमनेरचे तहसीलदार धीरज मांजरे यांनी दिली आहे.
जिल्हा परिषद व पंचायत समिती जागांची संगमनेरमध्ये आरक्षण सोडत सोमवारी; प्रारूप मतदार यादीही झाली प्रसिद्ध
आरक्षण सोडत सोमवारी (१३ ऑक्टोबर) काढण्यात येणार असल्याची माहिती प्रसिद्धी पत्रकाद्वारे तहसीलदार धीरज मांजरे यांनी दिली आहे.



संगमनेर – 
तर पंचायत समितीच्या १८ गणांमध्ये
याशिवाय जिल्हा परिषद व पंचायत समिती निवडणुकीसाठीचा कार्यक्रम राज्य निवडणूक आयोगाकडून