Close Menu
महाराष्ट्र संवादमहाराष्ट्र संवाद
  • Home
  • आंदोलन
  • आरोग्य
  • इतिहास
  • क्रिडा व कला
  • गुन्हेगारी
  • न्यायालय
  • महाराष्ट्र संवाद विशेष
  • राजकारण
  • विकास
  • विश्लेषण
  • शिक्षण
What's Hot

रविवार विशेष लेख — सोनमजी, तुम्ही देशाला हवे आहात!

July 19, 2026

आज, रविवार १९ जुलै २०२६ – कसा असेल तुमचा आजचा दिवस जाणून घ्या

July 19, 2026

संगमनेर तालुक्यात ७५ टक्के पेरण्या पूर्ण; पाऊस लांबल्याने शेतकरी चिंतेत, दुबार पेरणीचे संकट

July 18, 2026
Facebook X (Twitter) Instagram
महाराष्ट्र संवादमहाराष्ट्र संवाद
  • Home
  • आंदोलन
  • आरोग्य
  • इतिहास
  • क्रिडा व कला
  • गुन्हेगारी
  • न्यायालय
  • महाराष्ट्र संवाद विशेष
  • राजकारण
  • विकास
  • विश्लेषण
  • शिक्षण
Facebook X (Twitter) Instagram
महाराष्ट्र संवादमहाराष्ट्र संवाद
Home » अनधिकृत फ्लेक्स लावणाऱ्या दोघांवर गुन्हा दाखल; कठोर कारवाईचा इशारा
गुन्हेगारी

अनधिकृत फ्लेक्स लावणाऱ्या दोघांवर गुन्हा दाखल; कठोर कारवाईचा इशारा

अनधिकृत फ्लेक्स लावल्याप्रकरणी उच्च न्यायालयाच्या आदेशानुसार संबंधितांवर गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
अनंत पांगारकरBy अनंत पांगारकरOctober 11, 2025No Comments1 Min Read
Facebook Twitter WhatsApp
Share
Facebook Twitter Email Telegram WhatsApp

अहिल्यानगर – शहरात विनापरवाना फ्लेक्स लावून शहर विद्रूप करणाऱ्यांवर अहिल्यानगर महानगरपालिकेने कारवाईचा बडगा उगारला आहे. प्रेमदान चौक आणि नागापूर पुलाजवळ अनधिकृत फ्लेक्स लावल्याप्रकरणी मनपाने संबंधितांविरुद्ध तोफखाना पोलिस ठाण्यात फिर्याद दिली असून गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

मनपा आयुक्त तथा प्रशासक यशवंत डांगे यांनी या संदर्भात कठोर भूमिका घेतली असून, ‘परवानगीशिवाय फ्लेक्स लावून विद्रुपीकरण केल्यास यापुढे फौजदारी आणि दंडात्मक अशा दोन्ही स्वरूपाच्या कठोर कारवाया केल्या जातील,’ असा स्पष्ट इशारा त्यांनी दिला आहे.

सावेडी प्रभाग कार्यालयाचे प्रभाग अधिकारी बाळासाहेब लक्ष्मण पवार यांनी याप्रकरणी फिर्याद दिली आहे. त्यांच्या फिर्यादीनुसार, अहिल्यानगर-मनमाड रोडवरील प्रेमदान चौकात रस्त्याच्या मध्यभागी असलेल्या लाईटच्या खांबाला ‘मंगलमुर्ती वास्तु प्रा. लि.’ या नावाचा फ्लेक्स बोर्ड बेकायदेशीरपणे लावण्यात आला होता. तसेच, नागापूर येथे पुलाच्या बाजूला रस्त्याच्या मध्यभागी लाईटच्या खांबाला ‘आकाश कातोरे यांना वाढदिवसाच्या शुभेच्छा’ असा फ्लेक्स बोर्ड देखील लावण्यात आला होता. महानगरपालिकेच्या पथकाने हे दोन्ही फ्लेक्स बोर्ड काढून जप्त केले आहेत.

अनधिकृत फ्लेक्स लावल्याप्रकरणी उच्च न्यायालयाच्या आदेशानुसार संबंधितांवर गुन्हा दाखल करण्यात आला आहे. शहरातील नागरिकांनी विनापरवाना फ्लेक्स लावू नयेत, असे आवाहन मनपाकडून वारंवार करण्यात येत आहे. यापुढेही अनधिकृत फ्लेक्स आढळल्यास कोणत्याही प्रकारची दया न दाखवता फौजदारी व दंडात्मक अशा दुहेरी कारवाया केल्या जातील, असे आयुक्त डांगे यांनी स्पष्ट केले आहे.

anantpangarkar
अनंत पांगारकर

Post Views: 689
अनधिकृत फ्लेक्स कारवाई गुन्हा
Share. Facebook Twitter Pinterest WhatsApp
अनंत पांगारकर
  • Website

Related Posts

कोतुळमध्ये ६ लाखांचा गुटखा व कार जप्त; पोलीस उपअधीक्षकांच्या पथकाची मोठी कारवाई

July 17, 2026

जिओ पेट्रोल पंपाच्या नावाखाली अहिल्यानगरच्या व्यावसायिकाला ८४ लाखांचा गंडा

July 16, 2026

संगमनेरमध्ये अल्पवयीन मुलीवर अत्याचार; आरोपीविरुद्ध गुन्हा दाखल

July 15, 2026
Leave A Reply Cancel Reply

Document
Our Picks
  • Facebook
  • Twitter
  • Pinterest
  • Instagram
  • YouTube
Advertisement 1 Advertisement 2 Advertisement 3 Advertisement 4
Don't Miss
विश्लेषण

रविवार विशेष लेख — सोनमजी, तुम्ही देशाला हवे आहात!

By अनंत पांगारकरJuly 19, 20260

प्रवीण पुरो अनेक वर्षांच्या ब्रिटिश गुलामगिरीतून बाहेर पडलेला भारत आपल्या स्वातंत्र्याचा सुवर्णमहोत्सव साजरा करत असताना,…

आज, रविवार १९ जुलै २०२६ – कसा असेल तुमचा आजचा दिवस जाणून घ्या

July 19, 2026

संगमनेर तालुक्यात ७५ टक्के पेरण्या पूर्ण; पाऊस लांबल्याने शेतकरी चिंतेत, दुबार पेरणीचे संकट

July 18, 2026

संगमनेर तालुका व शहर काँग्रेसच्या नव्या पदाधिकाऱ्यांच्या निवडी जाहीर; अजय फटांगरे, सोमेश्वर दिवटे आणि अमोल शेलकर यांच्यावर मोठी जबाबदारी

July 18, 2026
Thumbnail 1
Thumbnail 2
Thumbnail 3
Thumbnail 4
previous arrow
next arrow
Thumbnail 1
Thumbnail 2
Thumbnail 3
Thumbnail 4
previous arrow
next arrow

तुमचे हक्काचे व्यासपीठ

Facebook YouTube
Our Picks
July 2026
M T W T F S S
 12345
6789101112
13141516171819
20212223242526
2728293031  
« Jun    
  • Home
  • आंदोलन
  • आरोग्य
  • इतिहास
  • क्रिडा व कला
  • गुन्हेगारी
  • न्यायालय
  • पत्रकारिता
  • फोटो / गॅलरी
  • महाराष्ट्र संवाद विशेष
  • राजकारण
  • विकास
  • विश्लेषण
  • शिक्षण
  • शेती व सहकार
  • सामाजिक
  • CONTACT US
  • ABOUT US
  • PRIVACY POLICY
© 2026 ThemeSphere. Designed by ThemeSphere.

Type above and press Enter to search. Press Esc to cancel.