Close Menu
महाराष्ट्र संवादमहाराष्ट्र संवाद
  • Home
  • आंदोलन
  • आरोग्य
  • इतिहास
  • क्रिडा व कला
  • गुन्हेगारी
  • न्यायालय
  • महाराष्ट्र संवाद विशेष
  • राजकारण
  • विकास
  • विश्लेषण
  • शिक्षण
What's Hot

जवळेकडलगच्या दुर्देवी घटनेनंतर माजी मंत्री बाळासाहेब थोरात यांची पवार कुटुंबाला सांत्वन भेट; बिबट्यांच्या दहशतीवर प्रशासनाने ठोस उपाययोजना करण्याची मागणी

02/09/2026

संगमनेर सत्र न्यायालयाचा महत्त्वपूर्ण निकाल: प्राणघातक हल्ल्याप्रकरणी तिघा आरोपींची २ वर्षांची सक्तमजुरी कायम

02/09/2026

पोलिसांचा वाळू माफियांना मोठा धक्का; या दोन तालुक्यातून २० लाखांचा मुद्देमाल जप्त

02/09/2026
Facebook X (Twitter) Instagram
महाराष्ट्र संवादमहाराष्ट्र संवाद
  • Home
  • आंदोलन
  • आरोग्य
  • इतिहास
  • क्रिडा व कला
  • गुन्हेगारी
  • न्यायालय
  • महाराष्ट्र संवाद विशेष
  • राजकारण
  • विकास
  • विश्लेषण
  • शिक्षण
Facebook X (Twitter) Instagram
महाराष्ट्र संवादमहाराष्ट्र संवाद
Home » संगमनेरला मिळाले अत्याधुनिक मल्टिप्लेक्स, मालपाणी मल्टिप्लेक्सचे आज भव्य उद्घाटन! संगमनेरकरांना एकाच वेळी दोन पडद्यांवर चित्रपट बघण्याची सोय
इतिहास

संगमनेरला मिळाले अत्याधुनिक मल्टिप्लेक्स, मालपाणी मल्टिप्लेक्सचे आज भव्य उद्घाटन! संगमनेरकरांना एकाच वेळी दोन पडद्यांवर चित्रपट बघण्याची सोय

श्रीमती ललिता मालपाणी आणि श्रीमती सुवर्णा मालपाणी यांच्या हस्ते आज 'मालपाणी मल्टिप्लेक्स'चा औपचारिक शुभारंभ होणार आहे.
Annant PpangarkarBy Annant Ppangarkar17/10/2025No Comments2 Mins Read
Facebook Twitter WhatsApp
Share
Facebook Twitter Email Telegram WhatsApp

संगमनेर – वॉटरपार्क आणि थीमपार्कच्या माध्यमातून देशभरात नावलौकिक मिळवणाऱ्या मालपाणी उद्योग समूहाने आता संगमनेरच्या मनोरंजन क्षेत्रात दमदार पाऊल टाकले आहे. शहराच्या सांस्कृतिक जीवनात गेल्या अनेक वर्षांपासून जाणवणारी अत्याधुनिक चित्रपटगृहाची पोकळी भरून काढत, या उद्योग समूहाने दोन पडद्यांचा समावेश असलेल्या ‘मालपाणी मल्टिप्लेक्स’ची उभारणी केली आहे.आज (शुक्रवार, दि. १७) सायंकाळी या मल्टिप्लेक्सचा भव्य शुभारंभ होत आहे. या नव्या मल्टिप्लेक्समुळे दर्जेदार चित्रपट पाहण्यासाठी संगमनेरकरांना लोणी किंवा नाशिक येथे करावी लागणारी ‘वारी’ आता थांबणार आहे.
‘गाय छाप’मुळे देशात परिचित असलेल्या मालपाणी उद्योग समूहाने गेल्या दोन दशकांत वॉटरपार्क आणि थीमपार्कच्या क्षेत्रात मोठी व्यावसायिक क्रांती घडवली आहे. शिर्डी येथील वॉटरपार्कपासून सुरू झालेला हा प्रवास आशिया खंडातील सर्वात मोठ्या ‘इमेजीका वर्ल्ड’पर्यंत, तसेच मध्य प्रदेशातील इंदूर आणि गुजरातमधील सुरतपर्यंत पोहोचला आहे. देशाच्या प्रगतीमध्ये महत्त्वाचा वाटा उचलणाऱ्या मालपाणी समूहाने नेहमीच आपल्या मूळ शहराप्रती असलेली सामाजिक जाणीव जपली आहे.
याच जाणिवेतून, संगमनेरकरांना दीर्घकाळापासून अपेक्षित असलेल्या या मनोरंजन गृहाची निर्मिती करण्यात आली आहे. या मल्टिप्लेक्समध्ये प्रेक्षकांना मोठ्या पडद्यावर एकाचवेळी दोन वेगवेगळे चित्रपट पाहण्याचा पर्याय उपलब्ध होणार आहे. आकर्षक डिजिटल ध्वनी प्रणाली, उत्कृष्ट अंतर्गत रचना आणि भव्य रुपेरी पडदा यामुळे चित्रपट पाहताना प्रेक्षकांना एक अविस्मरणीय अनुभूती मिळेल, असा विश्वास मालपाणी परिवाराला आहे.
दिवाळीच्या पहिल्या दिवसाचा शुभ मुहूर्त साधून, मालपाणी परिवारातील ज्येष्ठ सदस्या श्रीमती ललिता मालपाणी आणि श्रीमती सुवर्णा मालपाणी यांच्या हस्ते आज ‘मालपाणी मल्टिप्लेक्स’चा औपचारिक शुभारंभ होणार आहे.

anantpangarkar
Annant Ppangarkar

Post Views: 2,249
मालपाणी मल्टिप्लेक्स शुभारंभ
Share. Facebook Twitter Pinterest WhatsApp
Annant Ppangarkar
  • Website

Related Posts

भटक्या कुत्र्यांच्या त्रासातून लवकरच संगमनेरकरांची सुटका; मालपाणी परिवाराच्या सहकार्याने अत्याधुनिक श्वान निर्बिजीकरण व लसीकरण केंद्राचा शुभारंभ

06/07/2026

संगमनेरमध्ये छत्रपती शिवाजी महाराज आणि डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या स्मारकांच्या उभारणीला गती

01/07/2026

संगमनेरमध्ये शिवरायांचे भव्य अश्वारूढ स्मारक साकारणार; संगमनेरकरांची अश्वारूढ स्मारकाला पसंती, जनमताचा आदर करत पालिकेच्या सभेत ठरावावर शिक्कामोर्तब

14/04/2026
Leave A Reply Cancel Reply

Document
Our Picks
  • Facebook
  • Twitter
  • Pinterest
  • Instagram
  • YouTube
Advertisement 1 Advertisement 2 Advertisement 3 Advertisement 4
Don't Miss
सांत्वन

जवळेकडलगच्या दुर्देवी घटनेनंतर माजी मंत्री बाळासाहेब थोरात यांची पवार कुटुंबाला सांत्वन भेट; बिबट्यांच्या दहशतीवर प्रशासनाने ठोस उपाययोजना करण्याची मागणी

By Annant Ppangarkar02/09/20260

Annant Ppangarkar महाराष्ट्र संवाद न्यूज ऑनलाईन: जवळेकडलग येथील अकरा वर्षीय बालक कृष्णा वसंत पवार याचा…

संगमनेर सत्र न्यायालयाचा महत्त्वपूर्ण निकाल: प्राणघातक हल्ल्याप्रकरणी तिघा आरोपींची २ वर्षांची सक्तमजुरी कायम

02/09/2026

पोलिसांचा वाळू माफियांना मोठा धक्का; या दोन तालुक्यातून २० लाखांचा मुद्देमाल जप्त

02/09/2026

सत्याचा आवाज, लेखणीचा पहारेकरी – ज्येष्ठ पत्रकार अनंत पांगारकर यांचा आंबेडकरी चळवळीच्यावतीने हृद्य सत्कार

02/09/2026
Thumbnail 1
Thumbnail 2
Thumbnail 3
Thumbnail 4
previous arrow
next arrow
Thumbnail 1
Thumbnail 2
Thumbnail 3
Thumbnail 4
previous arrow
next arrow

तुमचे हक्काचे व्यासपीठ

Facebook YouTube
Our Picks
September 2026
M T W T F S S
 123456
78910111213
14151617181920
21222324252627
282930  
« Aug    
  • Home
  • आंदोलन
  • आरोग्य
  • इतिहास
  • क्रिडा व कला
  • गुन्हेगारी
  • न्यायालय
  • पत्रकारिता
  • फोटो / गॅलरी
  • महाराष्ट्र संवाद विशेष
  • राजकारण
  • विकास
  • विश्लेषण
  • शिक्षण
  • शेती व सहकार
  • सामाजिक
  • CONTACT US
  • ABOUT US
  • PRIVACY POLICY
© 2026 ThemeSphere. Designed by ThemeSphere.

Type above and press Enter to search. Press Esc to cancel.