Close Menu
महाराष्ट्र संवादमहाराष्ट्र संवाद
  • Home
  • आंदोलन
  • आरोग्य
  • इतिहास
  • क्रिडा व कला
  • गुन्हेगारी
  • न्यायालय
  • महाराष्ट्र संवाद विशेष
  • राजकारण
  • विकास
  • विश्लेषण
  • शिक्षण
What's Hot

जिल्ह्यात अवैध गुटखा विक्रीवर एलसीबीचा सर्जिकल स्ट्राईक; एकाच दिवशी ६ छापे, सुमारे ६ लाखांचा मुद्देमाल जप्त

30/08/2026

वाळू तस्करांवर कारवाई, ट्रॅक्टरसह ११ लाखांचा मुद्देमाल जप्त, दोघांना अटक तर तिघे फरार

30/08/2026

रविवार विशेष — पुणे–नाशिक रेल्वे : २५ दिवस संपले, आता प्रश्न फक्त कमिटीचा नाही… सरकारच्या इच्छाशक्तीचा आहे! एक संगमनेरकर म्हणून काही थेट प्रश्न…

30/08/2026
Facebook X (Twitter) Instagram
महाराष्ट्र संवादमहाराष्ट्र संवाद
  • Home
  • आंदोलन
  • आरोग्य
  • इतिहास
  • क्रिडा व कला
  • गुन्हेगारी
  • न्यायालय
  • महाराष्ट्र संवाद विशेष
  • राजकारण
  • विकास
  • विश्लेषण
  • शिक्षण
Facebook X (Twitter) Instagram
महाराष्ट्र संवादमहाराष्ट्र संवाद
Home » चंदनापुरीजवळ पुणे-नाशिक महामार्ग ठप्प: ब्रेक फेल झाल्याने मालवाहतूक कंटेनर उलटला; तिघे किरकोळ जखमी
अपघात

चंदनापुरीजवळ पुणे-नाशिक महामार्ग ठप्प: ब्रेक फेल झाल्याने मालवाहतूक कंटेनर उलटला; तिघे किरकोळ जखमी

पुणे-नाशिक महामार्ग हा राज्यातील एक व्यस्त राष्ट्रीय मार्ग असल्याने, वाहतूक कोंडीमुळे नाशिककडून पुण्याकडे परतणाऱ्या प्रवाशांची मोठी गैरसोय झाली.
Annant PpangarkarBy Annant Ppangarkar27/10/2025No Comments2 Mins Read
Facebook Twitter WhatsApp
Share
Facebook Twitter Email Telegram WhatsApp

संगमनेर – पुणे-नाशिक राष्ट्रीय महामार्गावर संगमनेर तालुक्यातील चंदनापुरी शिवारात काल रविवारी सकाळी मालवाहतूक कंटेनर उलटल्याने मोठी वाहतूक कोंडी झाली होती. हा प्रमुख महामार्ग बराच वेळ वाहतुकीसाठी पूर्णपणे ठप्प झाला होता, यामुळे महामार्गाच्या दोन्ही बाजूंना वाहनांच्या मोठ्या अंतरापर्यंत लांब रांगा लागल्या होत्या. या अपघातात कंटेनरचालकासह तिघे किरकोळ जखमी झाले आहेत.

मिळालेल्या माहितीनुसार, पुण्याकडून नाशिकच्या दिशेने जात असलेला मालवाहतूक कंटेनर चंदनापुरी शिवारातील जावळे वस्तीजवळ आला असता, त्याचे ब्रेक अचानक फेल झाले. ब्रेक निकामी झाल्यामुळे चालकाचे कंटेनरवरील नियंत्रण सुटले आणि वाहन थेट रस्त्याच्या मध्यभागी असलेल्या दुभाजकावर जाऊन आदळले. या जोरदार धडकेमुळे कंटेनर रस्त्यावरच उलटला आणि त्याने महामार्गावरील दोन्ही लेन अडवून टाकल्या.

हा अपघात ऐन रविवारी आणि दिवाळीची सुट्टी संपून नागरिक आपापल्या कामावर परतत असताना झाला. पुणे-नाशिक महामार्ग हा राज्यातील एक व्यस्त राष्ट्रीय मार्ग असल्याने, वाहतूक कोंडीमुळे नाशिककडून पुण्याकडे परतणाऱ्या प्रवाशांची मोठी गैरसोय झाली. अनेक कार, बस आणि इतर वाहने रस्त्यात अडकून पडल्याने प्रवाशांना तब्बल दीड तास थांबावे लागले.

घटनेची माहिती मिळताच डोळासणे महामार्ग पोलीस मदत केंद्राचे पोलीस उपनिरीक्षक राजू खेडकर, तसेच पोलीस कर्मचारी खंडेराव राहणे, गणेश सदगीर आणि विठ्ठल शेरमाळे यांनी तात्काळ घटनास्थळी धाव घेतली. सुमारे दीड तासांच्या अथक प्रयत्नांनंतर उलटलेला कंटेनर बाजूला करून दोन्ही लेनवरील वाहतूक अखेर पूर्ववत करण्यात आली.

या अपघातात कंटेनरचालक आणि दुचाकीस्वार किरकोळ जखमी झाले असून, त्यांना जवळच्या खासगी रुग्णालयात उपचारासाठी दाखल करण्यात आले आहे.

anantpangarkar
Annant Ppangarkar

Post Views: 1,067
अपघात चंदनापुरी
Share. Facebook Twitter Pinterest WhatsApp
Annant Ppangarkar
  • Website

Related Posts

दुःखावर दुःखाचा डोंगर! नातेवाईकाच्या दशक्रिया विधीसाठी आलेल्या महिलेचा विजेच्या धक्क्याने दुर्दैवी मृत्यू

21/08/2026

संगमनेरच्या डॉक्टरवर राहता पोलिसात गुन्हा दाखल! एकाचा मृत्यू, एक गंभीर

21/08/2026

पर्यटकांच्या भरधाव स्कॉर्पिओच्या धडकेत आरुषी कर्पे या विद्यार्थिनीचा जागीच मृत्यू

02/08/2026
Leave A Reply Cancel Reply

Document
Our Picks
  • Facebook
  • Twitter
  • Pinterest
  • Instagram
  • YouTube
Advertisement 1 Advertisement 2 Advertisement 3 Advertisement 4
Don't Miss
गुन्हेगारी

जिल्ह्यात अवैध गुटखा विक्रीवर एलसीबीचा सर्जिकल स्ट्राईक; एकाच दिवशी ६ छापे, सुमारे ६ लाखांचा मुद्देमाल जप्त

By Annant Ppangarkar30/08/20260

Annant Ppangarkar महाराष्ट्र संवाद न्यूज ऑनलाईन  अहिल्यानगर: स्थानिक गुन्हे शाखेने अहिल्यानगर, कर्जत आणि राहुरी पोलीस…

वाळू तस्करांवर कारवाई, ट्रॅक्टरसह ११ लाखांचा मुद्देमाल जप्त, दोघांना अटक तर तिघे फरार

30/08/2026

रविवार विशेष — पुणे–नाशिक रेल्वे : २५ दिवस संपले, आता प्रश्न फक्त कमिटीचा नाही… सरकारच्या इच्छाशक्तीचा आहे! एक संगमनेरकर म्हणून काही थेट प्रश्न…

30/08/2026

रविवार विशेष लेख: बेसुमार कर्जमाफीची बेशर्मी

30/08/2026
Thumbnail 1
Thumbnail 2
Thumbnail 3
Thumbnail 4
previous arrow
next arrow
Thumbnail 1
Thumbnail 2
Thumbnail 3
Thumbnail 4
previous arrow
next arrow

तुमचे हक्काचे व्यासपीठ

Facebook YouTube
Our Picks
August 2026
M T W T F S S
 12
3456789
10111213141516
17181920212223
24252627282930
31  
« Jul    
  • Home
  • आंदोलन
  • आरोग्य
  • इतिहास
  • क्रिडा व कला
  • गुन्हेगारी
  • न्यायालय
  • पत्रकारिता
  • फोटो / गॅलरी
  • महाराष्ट्र संवाद विशेष
  • राजकारण
  • विकास
  • विश्लेषण
  • शिक्षण
  • शेती व सहकार
  • सामाजिक
  • CONTACT US
  • ABOUT US
  • PRIVACY POLICY
© 2026 ThemeSphere. Designed by ThemeSphere.

Type above and press Enter to search. Press Esc to cancel.