
मेष: आज तुमचे कार्यक्षेत्र वाढणार आहे आणि दैनंदिन कामे मार्गी लागतील. नोकरीत बढती मिळेल तसेच व्यापार-व्यवसायात लाभ होईल. घर, कुटुंब आणि संतती संबंधी आनंद व संतोषाची भावना राहील. कामाच्या व्यापामुळे थोडा थकवा जाणवेल.
वृषभ: आज एखादी महत्त्वाची वार्ता समजेल. काही लोक धार्मिक कार्यात सहभागी होतील. व्यापार्यांसाठी दिवस शुभ आहे आणि नवीन आयोजन ते हाती घेऊ शकतील. आर्थिक लाभ होतील. दूरच्या प्रवासाची शक्यता आहे, पण कामाचा व्याप थकवा आणू शकतो.
मिथुन: आरोग्याच्या तक्रारी जाणवतील आणि काहींना मानसिक अस्वस्थता जाणवेल, त्यामुळे जास्त ताण घेणे टाळा. करिअर-व्यवसायाच्या संधींमध्ये वाढ होईल आणि व्यवस्थापन सुधारेल. नवीन कामे करण्यापूर्वी संपूर्ण योजनेचा आढावा घ्या.
कर्क: भागीदारी व्यवसायात सुयश लाभेल. मन आनंदी व आशावादी राहील. कामाच्या ठिकाणी सकारात्मक परिस्थितीचा तुम्हाला फायदा होईल. एखादे महत्त्वाचे काम पूर्ण झाल्याने आनंद मिळेल. व्यवसायात अनपेक्षित नफा दिसू शकतो.
सिंह: काहींचा मनोरंजनाकडे कल राहील, पण खर्चाचे प्रमाण वाढेल, त्यामुळे खर्चावर नियंत्रण ठेवा. कार्यालयातून लवकर बाहेर पडून मौजमजा आणि विरंगुळ्यासाठी वेळ काढा. छोटी-छोटी लाभ योजना फायद्याच्या ठरतील.
कन्या: तुमच्या कार्यक्षेत्रात सुसंधी व प्रसिद्धी लाभेल आणि काहींचे वैचारिक परिवर्तन होईल. शारीरिक सुदृढतेसाठी विशेषतः मानसिकदृष्ट्या कणखर बनण्यासाठी ध्यानधारणा आणि योगाचा आधार घ्या. गुंतवणुकीत सावधगिरी बाळगा.

तूळ: आज कामानिमित्त प्रवास होतील आणि ते सुखकर होतील. अनेक चांगल्या बातम्यांचा अनुभव येईल आणि कामाच्या ठिकाणी अनुकूल दिवस असेल. अचानक होणाऱ्या खर्चांवर नियंत्रण ठेवणे आवश्यक आहे. जुनी इच्छा पूर्ण होण्याची शक्यता आहे.
वृश्चिक: आज तुम्ही जिद्दीने कार्यरत राहाल आणि एखादी महत्त्वाची जबाबदारी तुमच्यावर येऊन पडेल. चंद्राच्या अनुकूल प्रभावामुळे कार्यक्षेत्रात नवीन ऊर्जा जाणवेल आणि आत्मविश्वास वाढेल. थांबलेल्या कामांना गती मिळेल.
धनू: जुनी येणी वसूल होतील. व्यवसायात नवीन तंत्र व मंत्र अमलात आणू शकाल. सामाजिक स्नेह मेळावे आणि रम्य सहली तुम्हाला आनंदी आणि रिलॅक्स करतील. तुम्हाला मोठी जबाबदारी मिळण्याची शक्यता आहे.
मकर: रखडलेली कामे मार्गी लागतील आणि आरोग्य उत्तम राहील. तुम्ही आराम करू शकाल. कामावर अधिक निष्ठा ठेवावी लागेल आणि कष्टाला मागे पडू नका. धार्मिक कामात सहभागी होण्याची संधी मिळेल.
कुंभ: समोरील संधीचा लाभ घ्यावा. अधिकार्यांचा पाठिंबा मिळवाल. आध्यात्मिक आवड वाढीस लागेल आणि वेळेचा सदुपयोग करावा. दिलेली जबाबदारी पूर्ण करण्यासाठी दुसऱ्यांवर अवलंबून राहू नका. कुटुंबाकडून एखादी खुशखबर मिळू शकते.
मीन: कुटूंबातील काही सदस्यांच्या मत्सरी वागणुकीमुळे तुम्ही त्रासून जाल, परंतु तुम्ही तुमची बुद्धी वापरून ती परिस्थिती व्यवस्थित हाताळाल आणि यशस्वी व्हाल. नोकरीत सहकाऱ्यांना खाजगी माहिती देऊ नका. व्यापारात मोठे धोकादायक निर्णय घेणे टाळा.


