Close Menu
महाराष्ट्र संवादमहाराष्ट्र संवाद
  • Home
  • आंदोलन
  • आरोग्य
  • इतिहास
  • क्रिडा व कला
  • गुन्हेगारी
  • न्यायालय
  • महाराष्ट्र संवाद विशेष
  • राजकारण
  • विकास
  • विश्लेषण
  • शिक्षण
What's Hot

स्थानिक गुन्हे शाखेची कारवाई: साडेसहा लाखांचा गुटखा जप्त, संगमनेरातील दोघांसह चार जणांवर गुन्हा दाखल

17/10/2026

संगमनेरातील ‘या’ मुख्य रस्त्याचे नशीब बदलणार! आमदार अमोल खताळ यांच्या प्रयत्नांना यश; १० कोटींचा मोठा निधी मंजूर

17/10/2026

संगमनेर तालुक्यातील धांदरफळ बुद्रुक येथे नवरात्रोत्सवातील दांडिया कार्यक्रमादरम्यान तुफान राडा; दोन्ही बाजूंच्या परस्परविरोधी गुन्ह्यांत लोखंडी रॉड, चाकू आणि फायटरने जीवघेणा हल्ला

17/10/2026
Facebook X (Twitter) Instagram
महाराष्ट्र संवादमहाराष्ट्र संवाद
  • Home
  • आंदोलन
  • आरोग्य
  • इतिहास
  • क्रिडा व कला
  • गुन्हेगारी
  • न्यायालय
  • महाराष्ट्र संवाद विशेष
  • राजकारण
  • विकास
  • विश्लेषण
  • शिक्षण
Facebook X (Twitter) Instagram
महाराष्ट्र संवादमहाराष्ट्र संवाद
Home » नशेच्या इंजेक्शन पाठोपाठ पोलिसांची कारवाई! संगमनेर शहरात गांजा विक्री करणाऱ्यास अटक; २६९५० रुपयांचा मुद्देमाल जप्त!
गुन्हेगारी

नशेच्या इंजेक्शन पाठोपाठ पोलिसांची कारवाई! संगमनेर शहरात गांजा विक्री करणाऱ्यास अटक; २६९५० रुपयांचा मुद्देमाल जप्त!

गेल्या आठवड्यामध्ये संगमनेरमध्ये पोलिसांनी राबविलेल्या स्ट्रिंग ऑपरेशनमध्ये नशेचे इंजेक्शन्स विक्री होत असल्याचे समोर आले होते. आदित्य किशोर गुप्ता याला पोलिसांनी पकडल्यानंतर या प्रकरणाचे राजकीय कनेक्शन आणि पोलिसांवर मोठा राजकीय दबाव आल्याचे समोर आल्याने हा विषय शहरात चर्चेचा विषय ठरला.
Annant PpangarkarBy Annant Ppangarkar04/11/2025No Comments2 Mins Read
Facebook Twitter WhatsApp
Share
Facebook Twitter Email Telegram WhatsApp

संगमनेर – अवैध धंद्यामुळे आधीपासूनच चर्चेत असलेल्या संगमनेरमध्ये थेट नशेच्या इंजेक्शनची होणारी विक्री समोर आल्यानंतर आता सोमवारी पोलिसांनी केलेल्या कारवाईत गांजासारखा अमली पदार्थ जवळ बाळगून त्याची चोरटी विक्री करणाऱ्या एका आरोपीला जेरबंद करण्यात यश आले आहे. या संदर्भात दोघांवर गुन्हा दाखल करण्यात आला असून एका आरोपीला अटक करण्यात आली आहे. 

गेल्या आठवड्यामध्ये संगमनेरमध्ये पोलिसांनी राबविलेल्या स्ट्रिंग ऑपरेशनमध्ये नशेचे इंजेक्शन्स विक्री होत असल्याचे समोर आले होते. आदित्य किशोर गुप्ता याला पोलिसांनी पकडल्यानंतर या प्रकरणाचे राजकीय कनेक्शन आणि पोलिसांवर मोठा राजकीय दबाव आल्याचे समोर आल्याने हा विषय शहरात चर्चेचा विषय ठरला. दबावानंतरही पोलिसांनी केलेली कारवाई शहरात कौतुकाचा विषय ठरली होती. गेल्या काही दिवसांपासून संगमनेरमध्ये अवैध व्यावसायिकांनी डोके वर काढले आहे. यामुळे संगमनेरचे सामाजिक स्वास्थ बिघडण्याची चिन्हे निर्माण झाली असतानाच शहर पोलिसांनी केलेल्या कारवाईत एका गांजा विक्रेत्याला पकडण्यात आले आहे तर दुसरा फरार आहे.

सोमवारी (०३ नोव्हेंबर) सायंकाळी साडेपाचच्या सुमारास मदिनानगर, पाच पीरबाबा, संगमनेर येथील एका बंद घराच्या आडोश्याला ही कारवाई करण्यात आली. या प्रकरणी अबरार रउफ शेख (वय ४६ वर्षे, रा. अलका नगर, संगमनेर) या आरोपीस ताब्यात घेऊन अटक करण्यात आली आहे. आरोपी अबरार शेख हा १५३८ ग्रॅम वजनाचा गांजा कब्जात बाळगून त्याची विक्री करताना मिळून आला. 

चौकशीदरम्यान त्याने सांगितले की, सदरचा गांजा नासिर मोहम्मद शेख (वय ४० वर्षे, रा. संगमनेर) या दुसऱ्या आरोपीने कुठूनतरी प्राप्त करून आणून दिला होता. याप्रकरणी संगमनेर शहर पोलीस स्टेशनमध्ये गु.र.नं. ९७८/२०२५ अन्वये अमली औषधी द्रव्य मन प्रभावी पदार्थ अधिनियम १९८५ चे कलम ८ (क), सह २० (क), (२) (क), प्रमाणे गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

जप्त मुद्देमालाची एकूण किंमत अंदाजे २६,९५०/- रुपये असून या कारवाईत पोलिसांनी २०,०००/- किमतीचा १२१० ग्रॅम वजनाचा काळपट व हिरवट रंगाची पाने, फुले, काड्या व बिया असलेला उग्र वास येणारा सुकलेला सुट्टा गांजा (कॅनाबीस) प्लॅस्टिकच्या पिशवीतून जप्त केला. तसेच, ५,२००/- किमतीच्या ३२८ ग्रॅम वजनाच्या २६ गांजाच्या पुड्या (कॅनाबीस वनस्पतीचे शेंडे) जप्त करण्यात आल्या. याव्यतिरिक्त, रोख १७५०/- रुपयेदेखील आरोपीकडून हस्तगत करण्यात आल्या आहेत. जप्त केलेल्या गांज्याचे एकूण वजन १५३८ ग्रॅम होते.

पोलीस अधीक्षक सोमनाथ घार्गे, अपर पोलीस अधीक्षक सोमनाथ वाघचौरे, पोलीस उपअधीक्षक डॉ. कुणाल सोनवणे यांच्या मार्गदर्शनाखाली संगमनेर शहर पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक रविंद्र देशमुख यांच्या नेतृत्वाखालील पथकाने ही उल्लेखनीय कामगिरी केली असल्याचे सांगितले जात असून या पथकात पोलीस उपनिरीक्षक श्रीकांत सावंत, पोलीस हेड कॉन्स्टेबल बाबासाहेब सातपुते, पोलीस कॉन्स्टेबल विजय आगलावे, पोलीस कॉन्स्टेबल विजय खुळे, पोलीस कॉन्स्टेबल अजित कुऱ्हे, पोलीस कॉन्स्टेबल राहुल पांडे, पोलीस कॉन्स्टेबल राहुल क्षीरसागर आणि पोलीस कॉन्स्टेबल रामकिसन मुकरे यांचा समावेश होता. पुढील तपास संगमनेर शहर पोलीस करत आहे.

anantpangarkar
Annant Ppangarkar

Views: 931
कारवाई गांजा विक्री
Share. Facebook Twitter Pinterest WhatsApp
Annant Ppangarkar
  • Website

Related Posts

स्थानिक गुन्हे शाखेची कारवाई: साडेसहा लाखांचा गुटखा जप्त, संगमनेरातील दोघांसह चार जणांवर गुन्हा दाखल

17/10/2026

संगमनेर तालुक्यातील धांदरफळ बुद्रुक येथे नवरात्रोत्सवातील दांडिया कार्यक्रमादरम्यान तुफान राडा; दोन्ही बाजूंच्या परस्परविरोधी गुन्ह्यांत लोखंडी रॉड, चाकू आणि फायटरने जीवघेणा हल्ला

17/10/2026

कर्ज वसुलीच्या नावाखाली संगमनेरात महिलेचा विनयभंग; आरोपीवर गुन्हा दाखल

15/10/2026
Leave A Reply Cancel Reply

Document
Our Picks
  • Facebook
  • Twitter
  • Pinterest
  • Instagram
  • YouTube
Advertisement 1 Advertisement 2 Advertisement 3 Advertisement 4
Don't Miss
गुन्हेगारी

स्थानिक गुन्हे शाखेची कारवाई: साडेसहा लाखांचा गुटखा जप्त, संगमनेरातील दोघांसह चार जणांवर गुन्हा दाखल

By Annant Ppangarkar17/10/20260

महाराष्ट्र संवाद न्यूज ऑनलाईन- संगमनेर शहरालगतच्या गुंजाळवाडी परिसरात अवैधरित्या गुटख्याची वाहतूक करणाऱ्या वाहनावर स्थानिक गुन्हे…

संगमनेरातील ‘या’ मुख्य रस्त्याचे नशीब बदलणार! आमदार अमोल खताळ यांच्या प्रयत्नांना यश; १० कोटींचा मोठा निधी मंजूर

17/10/2026

संगमनेर तालुक्यातील धांदरफळ बुद्रुक येथे नवरात्रोत्सवातील दांडिया कार्यक्रमादरम्यान तुफान राडा; दोन्ही बाजूंच्या परस्परविरोधी गुन्ह्यांत लोखंडी रॉड, चाकू आणि फायटरने जीवघेणा हल्ला

17/10/2026

महावितरण कर्मचाऱ्यांवर हल्ला आणि शासकीय कामात अडथळा आणल्याचा गंभीर गुन्हा ठरला फोल; संगमनेर कोर्टाकडून सर्व ५ आरोपींची निर्दोष मुक्तता!

17/10/2026
Thumbnail 1
Thumbnail 2
Thumbnail 3
Thumbnail 4
previous arrow
next arrow
Thumbnail 1
Thumbnail 2
Thumbnail 3
Thumbnail 4
previous arrow
next arrow

तुमचे हक्काचे व्यासपीठ

Facebook YouTube
Our Picks
October 2026
M T W T F S S
 1234
567891011
12131415161718
19202122232425
262728293031  
« Sep    
  • Home
  • आंदोलन
  • आरोग्य
  • इतिहास
  • क्रिडा व कला
  • गुन्हेगारी
  • न्यायालय
  • पत्रकारिता
  • फोटो / गॅलरी
  • महाराष्ट्र संवाद विशेष
  • राजकारण
  • विकास
  • विश्लेषण
  • शिक्षण
  • शेती व सहकार
  • सामाजिक
  • CONTACT US
  • ABOUT US
  • PRIVACY POLICY
© 2026 ThemeSphere. Designed by ThemeSphere.

Type above and press Enter to search. Press Esc to cancel.