Close Menu
महाराष्ट्र संवादमहाराष्ट्र संवाद
  • Home
  • आंदोलन
  • आरोग्य
  • इतिहास
  • क्रिडा व कला
  • गुन्हेगारी
  • न्यायालय
  • महाराष्ट्र संवाद विशेष
  • राजकारण
  • विकास
  • विश्लेषण
  • शिक्षण
What's Hot

तुमचे नगरसेवक टक्केवारी वसूल करतात… आमदार अमोल खताळांचा थेट हल्लाबोल, दिवाळीनंतर संघर्षाचे संकेत

07/11/2026

शनिवार ०७ नोव्हेंबर — आजच्या दिवसाचे राशिभविष्य जाणून घ्या तुमचा आजचा दिवस कसा असेल

07/11/2026

शरद पवार यांच्या प्रकृतीची बाळासाहेब थोरात यांनी रुग्णालयात जाऊन केली विचारपूस

06/11/2026
Facebook X (Twitter) Instagram
महाराष्ट्र संवादमहाराष्ट्र संवाद
  • Home
  • आंदोलन
  • आरोग्य
  • इतिहास
  • क्रिडा व कला
  • गुन्हेगारी
  • न्यायालय
  • महाराष्ट्र संवाद विशेष
  • राजकारण
  • विकास
  • विश्लेषण
  • शिक्षण
Facebook X (Twitter) Instagram
महाराष्ट्र संवादमहाराष्ट्र संवाद
Home » बिबट्यांच्या हल्ल्यांना प्रतिबंध: जिल्हा नियोजन व विकास समितीच्या माध्यमातून अहिल्यानगरमध्ये ११५० बिबट्यांसाठी ८ कोटी १३ लाखांचा निधी!
राजकारण

बिबट्यांच्या हल्ल्यांना प्रतिबंध: जिल्हा नियोजन व विकास समितीच्या माध्यमातून अहिल्यानगरमध्ये ११५० बिबट्यांसाठी ८ कोटी १३ लाखांचा निधी!

हा निधी बिबट्यांच्या हल्ल्यांना आळा घालण्यासाठी आणि वन विभाग व स्थानिकांमध्ये समन्वय साधण्यासाठी अत्यंत महत्त्वाचा ठरणार आहे.
Annant PpangarkarBy Annant Ppangarkar14/11/2025No Comments2 Mins Read
Facebook Twitter WhatsApp
(संग्रह छायाचित्र)
Share
Facebook Twitter Email Telegram WhatsApp

अहिल्यानगर – 

अहिल्यानगर जिल्ह्यात बिबट्यांची वाढती संख्या आणि त्यांच्या हल्ल्यांमुळे निर्माण झालेली गंभीर परिस्थिती लक्षात घेऊन, जिल्हा नियोजन व विकास समितीने प्रतिबंधात्मक उपाययोजनांसाठी मोठा निधी मंजूर केला आहे. जिल्ह्याचे पालकमंत्री तथा जलसंपदामंत्री डॉ. राधाकृष्ण विखे पाटील यांनी याबाबत माहिती दिली आहे.

जिल्ह्यात तब्बल ११५० बिबटे असल्याची माहिती प्राप्त झाली आहे. या बिबट्यांच्या हल्ल्यांना आळा घालण्यासाठी आणि नागरिकांचे संरक्षण करण्यासाठी ८ कोटी १३ लाख ४४ हजार रुपये एवढा निधी तातडीने उपलब्ध करून देण्यात आला आहे.

पालकमंत्री डॉ. विखे पाटील यांनी गेल्या दोन दिवसांपासून जिल्हाधिकारी आणि वन विभागाशी सतत संपर्क साधून परिस्थितीचा आढावा घेतला. तसेच, त्यांनी वनमंत्री गणेश नाईक यांच्याशी चर्चा करून जिल्ह्यासाठी आवश्यक असणारी अतिरिक्त यंत्रसामग्री तातडीने उपलब्ध करून देण्यास सांगितले आहे.

उपलब्ध निधीतून वन विभागाला आवश्यक असणारी अत्याधुनिक उपकरणे व वाहने खरेदी करण्याचे निर्देश देण्यात आले आहेत. यामध्ये ३०० पिंजरे आणि ३०० ट्रॅप कॅमेरे खरेदी केले जातील. तसेच, जॅकेट, शूज, टॉर्च गन्स आणि संरक्षणात्मक किट यांसारखी आवश्यक रेस्क्यू उपकरणे खरेदी करण्यात येणार आहेत. बिबट्यांना पकडण्यासाठी आणि स्थलांतरित करण्यासाठी तातडीने २२ रेस्क्यू वाहने खरेदी करण्यासही प्रशासनास सांगण्यात आले आहे.

जिल्ह्यातील ११५० बिबट्यांची संख्या लक्षात घेऊन, त्यांना पकडण्यासाठी विशेष मोहीम राबविण्यात येणार आहे. पकडलेल्या बिबट्यांना वनतारा येथे स्थलांतरित करण्याबाबत वरिष्ठ पातळीवर निर्णय घेण्यात आला आहे. पालकमंत्र्यांनी या सर्व कार्यवाहीची अंमलबजावणी त्वरित करण्याचे निर्देश दिले आहेत. तसेच, जिल्हाधिकाऱ्यांना तालुकानिहाय परिस्थितीचा सविस्तर आढावा घेऊन आवश्यक उपाययोजना राबवण्याचे आदेश दिले आहेत, असे पालकमंत्री डॉ. विखे पाटील यांनी सांगितले.

हा निधी बिबट्यांच्या हल्ल्यांना आळा घालण्यासाठी आणि वन विभाग व स्थानिकांमध्ये समन्वय साधण्यासाठी अत्यंत महत्त्वाचा ठरणार आहे.

anantpangarkar
Annant Ppangarkar

Views: 581
जिल्हा नियोजन व विकास समिती निधी बिबटे राधाकृष्ण विखे
Share. Facebook Twitter Pinterest WhatsApp
Annant Ppangarkar
  • Website

Related Posts

तुमचे नगरसेवक टक्केवारी वसूल करतात… आमदार अमोल खताळांचा थेट हल्लाबोल, दिवाळीनंतर संघर्षाचे संकेत

07/11/2026

लोकांना आम्ही फक्त गाड्यांमध्ये फिरताना दिसतो, पण…; विखे पाटलांनी सांगितली मंत्रिपदाची इनसाईड स्टोरी

06/11/2026

संगमनेरात निकृष्ट कामाचा पर्दाफाश! १६ कोटींच्या योजनेची गाडलेली पाइपलाइन उकरून दर्जा तपासणार; आमदार अमोल खताळ आक्रमक

05/11/2026
Leave A Reply Cancel Reply

Document
Our Picks
  • Facebook
  • Twitter
  • Pinterest
  • Instagram
  • YouTube
Advertisement 1 Advertisement 2 Advertisement 3 Advertisement 4
Don't Miss
राजकारण

तुमचे नगरसेवक टक्केवारी वसूल करतात… आमदार अमोल खताळांचा थेट हल्लाबोल, दिवाळीनंतर संघर्षाचे संकेत

By Annant Ppangarkar07/11/20260

महाराष्ट्र संवाद न्यूज ऑनलाईन- संगमनेर नगरपालिका निवडणुकीत यश मिळाले म्हणून विरोधकांनी हुरळून जाऊ नये. तुमचे…

शनिवार ०७ नोव्हेंबर — आजच्या दिवसाचे राशिभविष्य जाणून घ्या तुमचा आजचा दिवस कसा असेल

07/11/2026

शरद पवार यांच्या प्रकृतीची बाळासाहेब थोरात यांनी रुग्णालयात जाऊन केली विचारपूस

06/11/2026

लोकांना आम्ही फक्त गाड्यांमध्ये फिरताना दिसतो, पण…; विखे पाटलांनी सांगितली मंत्रिपदाची इनसाईड स्टोरी

06/11/2026
Thumbnail 1
Thumbnail 2
Thumbnail 3
Thumbnail 4
previous arrow
next arrow
Thumbnail 1
Thumbnail 2
Thumbnail 3
Thumbnail 4
previous arrow
next arrow

तुमचे हक्काचे व्यासपीठ

Facebook YouTube
Our Picks
November 2026
M T W T F S S
 1
2345678
9101112131415
16171819202122
23242526272829
30  
« Oct    
  • Home
  • आंदोलन
  • आरोग्य
  • इतिहास
  • क्रिडा व कला
  • गुन्हेगारी
  • न्यायालय
  • पत्रकारिता
  • फोटो / गॅलरी
  • महाराष्ट्र संवाद विशेष
  • राजकारण
  • विकास
  • विश्लेषण
  • शिक्षण
  • शेती व सहकार
  • सामाजिक
  • CONTACT US
  • ABOUT US
  • PRIVACY POLICY
© 2026 ThemeSphere. Designed by ThemeSphere.

Type above and press Enter to search. Press Esc to cancel.