Close Menu
महाराष्ट्र संवादमहाराष्ट्र संवाद
  • Home
  • आंदोलन
  • आरोग्य
  • इतिहास
  • क्रिडा व कला
  • गुन्हेगारी
  • न्यायालय
  • महाराष्ट्र संवाद विशेष
  • राजकारण
  • विकास
  • विश्लेषण
  • शिक्षण
What's Hot

तुमचे नगरसेवक टक्केवारी वसूल करतात… आमदार अमोल खताळांचा थेट हल्लाबोल, दिवाळीनंतर संघर्षाचे संकेत

07/11/2026

शनिवार ०७ नोव्हेंबर — आजच्या दिवसाचे राशिभविष्य जाणून घ्या तुमचा आजचा दिवस कसा असेल

07/11/2026

शरद पवार यांच्या प्रकृतीची बाळासाहेब थोरात यांनी रुग्णालयात जाऊन केली विचारपूस

06/11/2026
Facebook X (Twitter) Instagram
महाराष्ट्र संवादमहाराष्ट्र संवाद
  • Home
  • आंदोलन
  • आरोग्य
  • इतिहास
  • क्रिडा व कला
  • गुन्हेगारी
  • न्यायालय
  • महाराष्ट्र संवाद विशेष
  • राजकारण
  • विकास
  • विश्लेषण
  • शिक्षण
Facebook X (Twitter) Instagram
महाराष्ट्र संवादमहाराष्ट्र संवाद
Home » तुमचे नगरसेवक टक्केवारी वसूल करतात… आमदार अमोल खताळांचा थेट हल्लाबोल, दिवाळीनंतर संघर्षाचे संकेत
राजकारण

तुमचे नगरसेवक टक्केवारी वसूल करतात… आमदार अमोल खताळांचा थेट हल्लाबोल, दिवाळीनंतर संघर्षाचे संकेत

मला राजकारण कळत नाही, असा काहींचा समज असेल तर त्यांनी तो मनातून काढून टाकावा. दिवाळीनंतर राजकारणाचे डावपेच कसे खेळायचे असतात, हे दाखवून देऊ
Annant PpangarkarBy Annant Ppangarkar07/11/2026No Comments2 Mins Read
Facebook Twitter WhatsApp
Share
Facebook Twitter Email Telegram WhatsApp

महाराष्ट्र संवाद न्यूज ऑनलाईन-
संगमनेर नगरपालिका निवडणुकीत यश मिळाले म्हणून विरोधकांनी हुरळून जाऊ नये. तुमचे नगरसेवक टक्केवारी वसूल करण्याचे काम करतात; मात्र आमचे कार्यकर्ते नगरसेवक नसले तरी जनतेचे प्रश्न सोडविण्यासाठी रस्त्यावर उतरून जनसेवक म्हणून काम करत आहे शहरातील सर्वसामान्य नागरिक, व्यापारी आणि व्यावसायिकांना कोणी धमकावण्याचा प्रयत्न करत असेल, तर ते अजिबात खपवून घेतले जाणार नसल्याचा इशारा आमदार अमोल खताळ यांनी आपल्या विरोधकांना दिला आहे.
संगमनेर शहरातील अकोले नाका परिसरात शिवसेनेच्या शिव वाहतूक सेनेचे उद्घाटन आमदार खताळ यांच्या हस्ते करण्यात आले. यावेळी आयोजित कार्यक्रमात ते बोलत होते. व्यासपीठावर शिवसेनेचे शहरप्रमुख विनोद सूर्यवंशी, नगरसेविका साक्षी सूर्यवंशी यांच्यासह महायुतीचे पदाधिकारी, कार्यकर्ते उपस्थित होते.
खताळ म्हणाले, मला राजकारण कळत नाही, असा काहींचा समज असेल तर त्यांनी तो मनातून काढून टाकावा. दिवाळीनंतर राजकारणाचे डावपेच कसे खेळायचे असतात, हे दाखवून देऊ. राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे व माजी उपमुख्यमंत्री स्व. अजित पवार, पालकमंत्री राधाकृष्ण विखे पाटील यांच्यासोबत काम करण्याची संधी मला मिळाली आहे. त्यामुळे मला राजकारण शिकवण्याच्या फंदात कोणी पडू नका. दिवाळीनंतर डावपेच काय आहे हे मी तुम्हाला दाखवून देईल.
नातेवाईकांचे दवाखाने सुरू राहावे, म्हणून तुम्ही नगरपालिकेचे कॉटेज रुग्णालय बंद पाडले असून आता घुलेवाडी ग्रामीण रुग्णालयामध्ये १०० खाटांचे केवळ महिला व लहान मुलांसाठी स्वतंत्र रुग्णालय सुरू करण्यात येणार आहे. लवकरच आरोग्यमंत्री संगमनेरमध्ये येऊन येथील आरोग्य व्यवस्था सक्षम करण्याच्या दृष्टीने पावले उचलतील.
उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या नेतृत्वाखाली महायुती सरकारने विकासकामांना गती दिली. शेतकरी, कामगार, महिला, युवक आणि सर्वसामान्य नागरिकांच्या प्रश्नांना प्राधान्य देणे, हे शिवसेनेचे धोरण आहे. दुष्काळी परिस्थितीत शेतकऱ्यांच्या बांधावर जाऊन त्यांच्या समस्या समजून घेण्याचा प्रयत्न करण्यात आला. आगामी काळात महिलांना आर्थिकदृष्ट्या सक्षम करण्यासाठी बचतगटांच्या माध्यमातून विविध उपक्रम राबविण्यात येतील. तसेच गरजू महिलांना शिलाई यंत्रे उपलब्ध करून देण्याचाही प्रयत्न केला जाईल.
निवडणुका डोळ्यांसमोर ठेवून काम करणारा आमचा पक्ष नाही. जनतेच्या प्रश्नांसाठी चोवीस तास कार्यरत राहणे, हेच आमचे ध्येय आहे. सामान्य कार्यकर्त्याला जनतेने संधी दिल्यामुळेच आज मी आमदार झालो आहे. शिव वाहतूक सेनेच्या स्थापनेच्या निमित्ताने रिक्षाचालकांना संघटित करून त्यांच्या अडचणी सोडविण्यासाठी प्रयत्न केले जाणार असल्याचेही त्यांनी सांगितले.
संगमनेर शहरासह तालुक्यातील प्रत्येक गावात आणि शहरातील प्रत्येक उपनगरात ‘गाव तेथे शाखा आणि घर तेथे शिवसैनिक’ हा उपक्रम राबवून शिवसेनेच्या शाखा सुरू करण्याचा निर्धार खताळ यांनी व्यक्त केला. आगामी काळात होणाऱ्या निवडणुका लोकशाही मार्गाने लढविल्या जातील. शिवसेनेचा सामान्य कार्यकर्तादेखील निवडणुकीच्या मैदानात उतरेल, असे त्यांनी स्पष्ट केले.

anantpangarkar
Annant Ppangarkar

Views: 53
अमोल खताळ राजकारण शिव वाहतूक सेना
Share. Facebook Twitter Pinterest WhatsApp
Annant Ppangarkar
  • Website

Related Posts

लोकांना आम्ही फक्त गाड्यांमध्ये फिरताना दिसतो, पण…; विखे पाटलांनी सांगितली मंत्रिपदाची इनसाईड स्टोरी

06/11/2026

संगमनेरात निकृष्ट कामाचा पर्दाफाश! १६ कोटींच्या योजनेची गाडलेली पाइपलाइन उकरून दर्जा तपासणार; आमदार अमोल खताळ आक्रमक

05/11/2026

आमदार अमोल खताळांच्या जिल्हा परिषदेच्या शाळा भेटीमध्ये समोर आले हे गंभीर वास्तव! नेमकं काय घडलं…

05/11/2026
Leave A Reply Cancel Reply

Document
Our Picks
  • Facebook
  • Twitter
  • Pinterest
  • Instagram
  • YouTube
Advertisement 1 Advertisement 2 Advertisement 3 Advertisement 4
Don't Miss
राजकारण

तुमचे नगरसेवक टक्केवारी वसूल करतात… आमदार अमोल खताळांचा थेट हल्लाबोल, दिवाळीनंतर संघर्षाचे संकेत

By Annant Ppangarkar07/11/20260

महाराष्ट्र संवाद न्यूज ऑनलाईन- संगमनेर नगरपालिका निवडणुकीत यश मिळाले म्हणून विरोधकांनी हुरळून जाऊ नये. तुमचे…

शनिवार ०७ नोव्हेंबर — आजच्या दिवसाचे राशिभविष्य जाणून घ्या तुमचा आजचा दिवस कसा असेल

07/11/2026

शरद पवार यांच्या प्रकृतीची बाळासाहेब थोरात यांनी रुग्णालयात जाऊन केली विचारपूस

06/11/2026

लोकांना आम्ही फक्त गाड्यांमध्ये फिरताना दिसतो, पण…; विखे पाटलांनी सांगितली मंत्रिपदाची इनसाईड स्टोरी

06/11/2026
Thumbnail 1
Thumbnail 2
Thumbnail 3
Thumbnail 4
previous arrow
next arrow
Thumbnail 1
Thumbnail 2
Thumbnail 3
Thumbnail 4
previous arrow
next arrow

तुमचे हक्काचे व्यासपीठ

Facebook YouTube
Our Picks
November 2026
M T W T F S S
 1
2345678
9101112131415
16171819202122
23242526272829
30  
« Oct    
  • Home
  • आंदोलन
  • आरोग्य
  • इतिहास
  • क्रिडा व कला
  • गुन्हेगारी
  • न्यायालय
  • पत्रकारिता
  • फोटो / गॅलरी
  • महाराष्ट्र संवाद विशेष
  • राजकारण
  • विकास
  • विश्लेषण
  • शिक्षण
  • शेती व सहकार
  • सामाजिक
  • CONTACT US
  • ABOUT US
  • PRIVACY POLICY
© 2026 ThemeSphere. Designed by ThemeSphere.

Type above and press Enter to search. Press Esc to cancel.