Close Menu
महाराष्ट्र संवादमहाराष्ट्र संवाद
  • Home
  • आंदोलन
  • आरोग्य
  • इतिहास
  • क्रिडा व कला
  • गुन्हेगारी
  • न्यायालय
  • महाराष्ट्र संवाद विशेष
  • राजकारण
  • विकास
  • विश्लेषण
  • शिक्षण
What's Hot

संगमनेरमध्ये अल्पवयीन मुलीवर अत्याचार; आरोपीविरुद्ध गुन्हा दाखल

July 15, 2026

पोलीस दलातील बहुचर्चित अंमलदार चौधरी यांचे निलंबन, एसपींचा मोठा निर्णय

July 15, 2026

घारगावमध्ये केमिकलयुक्त ताडीच्या अड्ड्यावर राज्य उत्पादन शुल्कचा छापा; २२० लिटर ताडी नष्ट!

July 15, 2026
Facebook X (Twitter) Instagram
महाराष्ट्र संवादमहाराष्ट्र संवाद
  • Home
  • आंदोलन
  • आरोग्य
  • इतिहास
  • क्रिडा व कला
  • गुन्हेगारी
  • न्यायालय
  • महाराष्ट्र संवाद विशेष
  • राजकारण
  • विकास
  • विश्लेषण
  • शिक्षण
Facebook X (Twitter) Instagram
महाराष्ट्र संवादमहाराष्ट्र संवाद
Home » नगराध्यक्षपदाच्या रिंगणात ‘लेडीज स्पेशल’ १६ उमेदवारांचे २० अर्ज, महायुतीत ऐनवेळी ‘बेबनाव’, नाराजी नाट्याने तिन्ही पक्षांचे स्वतंत्र अर्ज; महायुतीचा ‘एक विचाराचा’ दावा कोसळला… संगमनेर सेवा समितीच्या पाया भक्कम!
निवडणूक

नगराध्यक्षपदाच्या रिंगणात ‘लेडीज स्पेशल’ १६ उमेदवारांचे २० अर्ज, महायुतीत ऐनवेळी ‘बेबनाव’, नाराजी नाट्याने तिन्ही पक्षांचे स्वतंत्र अर्ज; महायुतीचा ‘एक विचाराचा’ दावा कोसळला… संगमनेर सेवा समितीच्या पाया भक्कम!

माजी नगरसेविका सुषमा संजय तवरेज यांच्यासह शबाना बेपारी, आलिया सय्यद, तबस्सुम शेख, रुपाली जोंधळे, मेघा भगत, अफसाना शेख, बानोबी शेख, रेखा गलांडे आणि अलिशा शेख अशा १६ महिला उमेदवारांनी एकूण २० अर्ज भरले आहेत.
अनंत पांगारकरBy अनंत पांगारकरNovember 17, 2025No Comments2 Mins Read
Facebook Twitter WhatsApp
Share
Facebook Twitter Email Telegram WhatsApp

संगमनेर – अनंत पांगारकर

प्रचंड राजकीय उत्सुकता निर्माण केलेल्या संगमनेर नगरपालिकेच्या नगराध्यक्षपदाच्या सार्वत्रिक निवडणुकीसाठी उमेदवारी अर्ज दाखल करण्याच्या अंतिम दिवशी मोठी राजकीय उलथापालथ झाली. नगराध्यक्षपदासाठी तब्बल १६ महिलांनी २० उमेदवारी अर्ज दाखल करत निवडणुकीच्या रिंगणाला मोठे वळण दिले आहे. 

विशेष म्हणजे, महायुतीच्या राज्यस्तरीय नेत्यांनी ‘एकत्रित लढण्या’चे संकेत देऊनही स्थानिक महायुतीत मात्र ऐनवेळी मोठा गोंधळ उडाला आणि भाजप, शिवसेना व राष्ट्रवादी (अजित पवार गट) या तिन्ही घटकपक्षांनी आपले स्वतंत्र उमेदवार उभे केले, यामुळे महायुतीचा ‘बेबनाव’ उघड झाला आहे. आमदार खताळ यांच्याकडून सुरू करण्यात आलेल्या घराणेशाहीमुळे महायुतीतील कार्यकर्ते पदाधिकारी नाराज झाले आहे. ही नाराजी समाज माध्यमातून व्यक्त होत आहे.

निवडणुकीपूर्वी महायुतीकडून सुकाणू समितीच्या माध्यमातून निश्चित झालेल्या उमेदवारांच्या नावाची पडताळणी मुख्यमंत्री आणि पालकमंत्र्यांपर्यंत विविध पातळ्यांवर केली जाणार असल्याचे दावे केले जात होते. मात्र, अर्ज दाखल करण्याच्या शेवटच्या क्षणापर्यंत उमेदवाराचे नाव निश्चित न झाल्याने आणि समन्वय साधण्यात स्थानिक नेत्यांना अपयश आल्याने सर्व काही ‘आलबेल’ नसल्याचे सिद्ध झाले.

पक्षांनी दाखल केलेले अर्ज 

शिवसेना: आमदार अमोल खताळ यांच्या वहिणी सुवर्णा विठ्ठल रहाणे उर्फ सुवर्णा संदीप खताळ यांचे नाव अचानक पुढे आले. त्यांच्यासह सुनिता कैलास केसेकर यांनीही अर्ज भरला.

भारतीय जनता पक्ष (भाजप): सुजाता राजेंद्र देशमुख यांनी अर्ज दाखल केला.

राष्ट्रवादी काँग्रेस (अजित पवार गट): रुपाली कपिलेश्‍वर पवार यांनीही नगराध्यक्षपदासाठी उमेदवारी दाखल केली.

यामुळे महायुतीच्या ‘एक विचारा’च्या घोषणेची हवा निघून गेली असून, अंतर्गत नाराजीचे प्रतिबिंब निवडणूक निकालातून उमटण्याची दाट शक्यता निर्माण झाली आहे.

तांबे गटाचे मोठे आव्हान – सत्ताधारी गटाकडूनही नगराध्यक्षपदासाठी तगडे आव्हान उभे करण्यात आले आहे. संगमनेर सेवा समितीच्या वतीने मैथिली सत्यजीत तांबे यांची उमेदवारी जाहीर करण्यात आली आहे.

अपक्षांची ‘डझनभर’ फौज- पक्षीय उमेदवारांसोबतच तब्बल डझनभर महिला उमेदवारांनी अपक्ष म्हणून अर्ज दाखल करून निवडणुकीचे समीकरण अधिक गुंतागुंतीचे केले आहे. माजी नगरसेविका सुषमा संजय तवरेज यांच्यासह शबाना बेपारी, आलिया सय्यद, तबस्सुम शेख, रुपाली जोंधळे, मेघा भगत, अफसाना शेख, बानोबी शेख, रेखा गलांडे आणि अलिशा शेख अशा १६ महिला उमेदवारांनी एकूण २० अर्ज भरले आहेत.

मंगळवारी दाखल अर्जांची छाननी झाल्यानंतर शुक्रवारी माघार घेण्याची मुदत संपल्यानंतर खरी लढत कोणामध्ये होणार, याचा संभ्रम दूर होईल. मात्र, महायुतीमध्ये उमेदवारीवरून झालेला गोंधळ पाहता, या निवडणुकीत मोठे राजकीय पेचप्रसंग निर्माण होण्याची चिन्हे आहेत. तर दुसरीकडे आमदार सत्यजित तांबे यांच्या नेतृत्वाखालील संगमनेर सेवा समितीने आपला पाया बळकट केला आहे.

anantpangarkar
अनंत पांगारकर

Post Views: 2,032
उमेदवारी अर्ज नगराध्यक्ष संगमनेर नगरपालिका निवडणूक
Share. Facebook Twitter Pinterest WhatsApp
अनंत पांगारकर
  • Website

Related Posts

शिक्षण प्रसारक संस्थेत पुन्हा मालपाणींचे वर्चस्व, मात्र एकाकी लढतीत ॲड. संग्राम जोंधळे यांनी दिली कडवी झुंज; ११२ मतांनी वेधले सर्वांचे लक्ष

May 25, 2026

बारामती पोटनिवडणुकीत सुनेत्रा पवार यांचा ऐतिहासिक विजय; अजित पवारांचा मताधिक्याचा विक्रम मोडला, आत्तापर्यंतचा देशातील सर्वात मोठा विजय

May 4, 2026

विधान परिषदेच्या ९ जागांसाठी रणधुमाळी सुरू; १२ मे रोजी मतदान आणि निकाल, पाहा संपूर्ण वेळापत्रक!

April 16, 2026
Leave A Reply Cancel Reply

Document
Our Picks
  • Facebook
  • Twitter
  • Pinterest
  • Instagram
  • YouTube
Advertisement 1 Advertisement 2 Advertisement 3 Advertisement 4
Don't Miss
गुन्हेगारी

संगमनेरमध्ये अल्पवयीन मुलीवर अत्याचार; आरोपीविरुद्ध गुन्हा दाखल

By अनंत पांगारकरJuly 15, 20260

महाराष्ट्र संवाद न्यूज ऑनलाईन संगमनेर: संगमनेर शहर पोलीस ठाण्याच्या हद्दीत खांडगाव शिवारात एका १५ वर्षीय…

पोलीस दलातील बहुचर्चित अंमलदार चौधरी यांचे निलंबन, एसपींचा मोठा निर्णय

July 15, 2026

घारगावमध्ये केमिकलयुक्त ताडीच्या अड्ड्यावर राज्य उत्पादन शुल्कचा छापा; २२० लिटर ताडी नष्ट!

July 15, 2026

युरियाचा बफर स्टॉक तातडीने खुला करा, अन्यथा तीव्र आंदोलन; संगमनेर तालुका काँग्रेसचा प्रशासनाला इशारा

July 15, 2026
Thumbnail 1
Thumbnail 2
Thumbnail 3
Thumbnail 4
previous arrow
next arrow
Thumbnail 1
Thumbnail 2
Thumbnail 3
Thumbnail 4
previous arrow
next arrow

तुमचे हक्काचे व्यासपीठ

Facebook YouTube
Our Picks
July 2026
M T W T F S S
 12345
6789101112
13141516171819
20212223242526
2728293031  
« Jun    
  • Home
  • आंदोलन
  • आरोग्य
  • इतिहास
  • क्रिडा व कला
  • गुन्हेगारी
  • न्यायालय
  • पत्रकारिता
  • फोटो / गॅलरी
  • महाराष्ट्र संवाद विशेष
  • राजकारण
  • विकास
  • विश्लेषण
  • शिक्षण
  • शेती व सहकार
  • सामाजिक
  • CONTACT US
  • ABOUT US
  • PRIVACY POLICY
© 2026 ThemeSphere. Designed by ThemeSphere.

Type above and press Enter to search. Press Esc to cancel.