Close Menu
महाराष्ट्र संवादमहाराष्ट्र संवाद
  • Home
  • आंदोलन
  • आरोग्य
  • इतिहास
  • क्रिडा व कला
  • गुन्हेगारी
  • न्यायालय
  • महाराष्ट्र संवाद विशेष
  • राजकारण
  • विकास
  • विश्लेषण
  • शिक्षण
What's Hot

घारगाव बहुचर्चित खून प्रकरणात मोठा ट्विस्ट! मुख्य आरोपीच्या जामीन अर्जावर न्यायालयाचा निर्णय… न्यायालयीन युक्तिवादात काय घडले वाचा सविस्तर

16/10/2026

शुक्रवार १६ ऑक्टोंबर — आजचा दिवस कसा असेल जाणून घ्या

16/10/2026

कर्ज वसुलीच्या नावाखाली संगमनेरात महिलेचा विनयभंग; आरोपीवर गुन्हा दाखल

15/10/2026
Facebook X (Twitter) Instagram
महाराष्ट्र संवादमहाराष्ट्र संवाद
  • Home
  • आंदोलन
  • आरोग्य
  • इतिहास
  • क्रिडा व कला
  • गुन्हेगारी
  • न्यायालय
  • महाराष्ट्र संवाद विशेष
  • राजकारण
  • विकास
  • विश्लेषण
  • शिक्षण
Facebook X (Twitter) Instagram
महाराष्ट्र संवादमहाराष्ट्र संवाद
Home » संगमनेर पालिका रणधुमाळी: नगराध्यक्ष पदासाठी १९, नगरसेवक पदासाठी १७७ अर्ज; महायुतीत मोठी फाटाफट तर महाविकास आघाडी ‘ऑल इंडिया फॉरवर्ड ब्लॉक’… वाचा उमेदवारांची सविस्तर यादी
निवडणूक

संगमनेर पालिका रणधुमाळी: नगराध्यक्ष पदासाठी १९, नगरसेवक पदासाठी १७७ अर्ज; महायुतीत मोठी फाटाफट तर महाविकास आघाडी ‘ऑल इंडिया फॉरवर्ड ब्लॉक’… वाचा उमेदवारांची सविस्तर यादी

या निवडणुकीत महाविकास आघाडी (MVA) एकत्रितपणे लढणार असली तरी, त्यांनी एक मोठी राजकीय खेळी केली आहे. काँग्रेस, शिवसेना (ठाकरे गट) आणि राष्ट्रवादी काँग्रेस (शरद पवार गट) हे तिन्ही पक्ष त्यांचे अधिकृत चिन्ह न वापरता ऑल इंडिया फॉरवर्ड ब्लॉक (AIFB) च्या झेंड्याखाली एकत्रितपणे निवडणूक लढवणार आहेत.
Annant PpangarkarBy Annant Ppangarkar18/11/2025Updated:18/11/2025No Comments8 Mins Read
Facebook Twitter WhatsApp
Share
Facebook Twitter Email Telegram WhatsApp
संगमनेर: अनंत पांगारकर
संगमनेर नगर परिषद निवडणुकीसाठी उमेदवारी अर्ज दाखल करण्याची प्रक्रिया सोमवारी (काल) पूर्ण झाली असून, प्रशासनाच्या विस्कळीतपणामुळे उमेदवारांची अधिकृत यादी समोर येण्यास मंगळवारी पहाटे पावणे तीन वाजेपर्यंतचा विलंब लागला. सोमवारी शेवटच्या दिवशी मोठ्या संख्येने अर्ज दाखल झाल्याने प्रशासकीय गोंधळ उडाला. अखेर समोर आलेल्या आकडेवारीनुसार, नगराध्यक्ष पदासाठी २० तर नगरसेवक पदासाठी १७७ उमेदवारी अर्ज दाखल झाले आहेत.
प्रशासनाच्या गोंधळावर प्रश्नचिन्ह – अर्ज दाखल करण्याच्या शेवटच्या दिवशी मोठी गर्दी झाल्याने निवडणूक निर्णय अधिकाऱ्यांच्या विस्कळीत कारभाराचे चित्र समोर आले. सोमवारी अर्ज दाखल होऊनही उमेदवारांची अधिकृत नावे जाहीर होण्यासाठी तब्बल दुसऱ्या दिवशी पहाटेपर्यंत वाट पाहावी लागली. एवढ्या मोठ्या विलंबाचे ठोस कारण प्रशासनाने अद्याप स्पष्ट केलेले नाही. विशेष म्हणजे, यापूर्वी समजलेल्या उमेदवारी अर्जाच्या माहितीत आणि प्रत्यक्ष दाखल झालेल्या अर्जांच्या माहितीत तफावत असल्याचे स्पष्ट झाले आहे.
महाविकास आघाडीची अनोखी राजकीय खेळी आणि नेतृत्व बदल – या निवडणुकीत महाविकास आघाडी (MVA) एकत्रितपणे लढणार असली तरी, त्यांनी एक मोठी राजकीय खेळी केली आहे. काँग्रेस, शिवसेना (ठाकरे गट) आणि राष्ट्रवादी काँग्रेस (शरद पवार गट) हे तिन्ही पक्ष त्यांचे अधिकृत चिन्ह न वापरता ऑल इंडिया फॉरवर्ड ब्लॉक (AIFB) च्या झेंड्याखाली एकत्रितपणे निवडणूक लढवणार आहेत. या आघाडीचे नेतृत्व आमदार सत्यजित तांबे यांनी आपल्या हाती घेतल्याचे समोर आले आहे. यामुळे ज्येष्ठ नेते थोरात यांच्या ऐवजी तांबे यांनी संपूर्ण निवडणुकीची धुरा सांभाळल्याचे स्पष्ट झाले आहे, हा एक मोठा राजकीय नेतृत्व बदल मानला जात आहे.
महायुतीमध्ये मोठी ‘फाटाफूट’ आणि नेतृत्वाला आव्हान – महाविकास आघाडीने एकीचे प्रदर्शन केले असतानाच, विरोधी महायुतीमध्ये मात्र मोठी फाटाफट दिसून आली आहे. भाजप, राष्ट्रवादी काँग्रेस (अजित पवार गट) आणि शिवसेना (शिंदे गट) या तिन्ही पक्षांनी कोणत्याही समन्वयाशिवाय स्वतंत्रपणे आपले उमेदवारी अर्ज दाखल केले आहेत. नगराध्यक्ष पदासाठी देखील महायुतीतील या तिन्ही प्रमुख पक्षांनी आपले वेगवेगळे उमेदवार उभे केले आहेत. याशिवाय, महायुतीतील घटक पक्षांच्या अनेक पदाधिकाऱ्यांनी पक्षाला आव्हान देत अपक्ष उमेदवारी अर्ज दाखल करून ‘बंडाचा झेंडा’ फडकवला आहे. महायुतीतील या स्पष्ट फुटीमुळे निवडणुकीच्या अगदी सुरुवातीलाच महायुतीचे नेतृत्व करणारे आमदार अमोल खताळ यांची बाजू कमकुवत बनली आहे.
नगराध्यक्ष पदासाठी दाखल झालेल्या २० उमेदवारी अर्जामध्ये विविध पक्षांतील बंडखोरांसह महिला उमेदवारांचा लक्षणीय सहभाग आहे. पक्षांतर्गत बंडखोरी करत काही पदाधिकाऱ्यांनी अपक्ष अर्ज दाखल केले आहेत, तर माजी नगरसेविकेसह काही महिलांनी देखील अपक्ष अर्ज दाखल करत या प्रतिष्ठेच्या लढतीत आपले नशीब आजमावण्याचा निर्णय घेतला आहे.
आता दाखल झालेल्या उमेदवारी अर्जांची छाननी आणि माघारीनंतर संगमनेर नगर परिषदेचे खरे राजकीय चित्र स्पष्ट होणार आहे.
नगराध्यक्षपदासाठी दाखल झालेले उमेदवारी अर्ज (कंसात पक्ष) – सय्यद आलिया शौकतअली (अपक्ष) शेख तबसूम मोहम्मद अरिफ (अपक्ष) तांबे मैथिली सत्यजित २ अर्ज (इंडिया फॉरवर्ड ब्लॉक) अंजली सुधीर तांबे ऑल (इंडिया फॉरवर्ड ब्लॉक) भगत मेधा दीपक (अपक्ष) डॉ. रूपाली संग्राम जोंधळे (अपक्ष) सुजाता राजेंद्र देशमुख (भारतीय जनता पार्टी) शेख अफसाना इलियास (अपक्ष) तवरेज सुषमा संजय (अपक्ष) शेख बानोबी लियाकत (अपक्ष) गलांडे रेखा संपत (शिवसेना, शिंदे) श्रीमत सुवर्णा विठ्ठल राहणे (शिवसेना) श्रीमती सुवर्णा विठ्ठल राहणे उर्फ श्रीमती सुवर्ण संदीप खताळ (शिवसेना) रूपाली कपिलेश्वर पवार (राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी अजित पवार) आलिशा असलम शेख (अपक्ष) केसेकर सुनिता कैलास (अपक्ष)
नगरसेवक पदासाठी दाखल झालेले प्रभागनिहाय उमेदवारी अर्ज पुढील प्रमाणे –
प्रभाग १ अ – नागरिकांचा मागास प्रवर्ग महिला (४ अर्ज)
पुंड हिराबाई ज्ञानेश्वर (अपक्ष), खराटे सीमा महेश (ऑल इंडिया फॉरवर्ड ब्लॉक), फड वैष्णवी संजय (अपक्ष) व मनिषा शेखर नेवासकर (शिवसेना).
प्रभाग १ ब – सर्वसाधारण (४ अर्ज)
लोंढे संकेत सुभाष (अपक्ष), पुंड दिलीप सहदेव (ऑल इंडिया फॉरवर्ड ब्लॉक पक्ष), अभिजीत अरुण पुंड (शिवसेना) व आरोटे ऋषिकेश चंद्रकांत (अपक्ष)
प्रभाग २ अ – अनुसूचित जाती (४ अर्ज)
गोडगे आकाश अर्जुन (अपक्ष), बोऱ्हाडे भारत चंद्रभान (ऑल इंडिया फॉरवर्ड ब्लॉक), रवींद्र विलास बोऱ्हाडे (शिवसेना) व धनंजय राजेंद्र आव्हाड (राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष)
प्रभाग २ ब – सर्वसाधारण महिला (७ अर्ज)
दिड्डी रुपाली अभिजीत (अपक्ष), सुजाता सायन्ना ऐनगंदूल (अपक्ष), संगीता विकास पुंड (शिवसेना), संगीता विकास पुंड (भाजप), म्हस्के सुवर्णा दत्तात्रय (राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी), दिघे अर्चना सुभाष (ऑल इंडिया फॉरवर्ड ब्लॉक) व इंदिरा शशांक नामन (शिवसेना)
प्रभाग ३ अ – नागरिकांचा मागास प्रवर्ग (६ अर्ज)
फटांगरे भरत भिकाजी (भारतीय जनता पार्टी), कासार सौरभ विवेक (ऑल इंडिया फॉरवर्ड ब्लॉक), वाकचौरे राजेश चंद्रकांत (भारतीय जनता पार्टी), म्हस्के अमोल सुभाष (राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी), मिलिंद बाबुराव अभंग (अपक्ष) व मुकेश गोविंद मुर्तडक (शिवसेना)
प्रभाग ३ ब – सर्वसाधारण महिला (३ अर्ज)
मंगल बाबुराव वर्पे (भारतीय जनता पार्टी), पवार शोभा बाळासाहेब (ऑल इंडिया फॉरवर्ड ब्लॉक), व सुनंदा मच्छिंद्र दिघे (अपक्ष)
प्रभाग ४ अ – सर्वसाधारण महिला(४ अर्ज)
काशीद प्राची भानुदास (ऑल इंडिया फॉरवर्ड ब्लॉक), गायकवाड चंद्रकला शंकर (राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी), कडलग विद्या प्रकाश (अपक्ष) व कविता दिनेश फटांगरे (शिवसेना)
प्रभाग ४ ब – सर्वसाधारण (५ अर्ज)
कानवडे प्रवीण अरुण २ अर्ज (राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी), प्रवीण सिद्राम दिड्डी (शिवसेना), आहेर सतीश भाऊसाहेब (अपक्ष) व पवार किशोर हिरालाल (ऑल इंडिया फॉरवर्ड ब्लॉक)
प्रभाग ५ अ – नागरिकांचा मागास प्रवर्ग महिला (३ अर्ज)
ढोरे कांचन भरत (अपक्ष), सातपुते अनुराधा निलेश (ऑल इंडिया फॉरवर्ड ब्लॉक) व संगीता भारत गवळी (शिवसेना)
प्रभाग ५ ब – सर्वसाधारण (४ अर्ज)
मंडलिक संजय एकनाथ (अपक्ष), पवार किशोर सावळेराम (अपक्ष), रवींद्र देवराम म्हस्के (शिवसेना) व मुर्तडक विश्वास रतन (ऑल इंडिया फॉरवर्ड ब्लॉक)
प्रभाग ६ अ – सर्वसाधारण महिला (४ अर्ज)
कांचन शंकर मुर्तडक (अपक्ष), भुजबळ सरला संतोष (राष्ट्रवादी काँग्रेस), घुले शोभा सुनील (भारतीय जनता पक्ष) व गाडे वनिता संजय (ऑल इंडिया फॉरवर्ड ब्लॉक)
प्रभाग ६ ब – सर्वसाधारण (५ अर्ज)
भुजबळ संतोष रमेश (राष्ट्रवादी काँग्रेस), राहुल नंदकुमार भोईर (शिवसेना), गजेंद्र बजाबा अभंग (ऑल इंडिया फॉरवर्ड ब्लॉक), कानकाटे सोमनाथ सदाशिव (अपक्ष) व राहुल देवराम म्हस्के (अपक्ष)
प्रभाग ७ अ – सर्वसाधारण महिला (३ अर्ज)
डाके मालती धनंजय (ऑल इंडिया फॉरवर्ड ब्लॉक), मंडलिक किशोरी सुभाष (अपक्ष) व अनाप पुनम धोंडीराम (भारतीय जनता पार्टी)
प्रभाग ७ ब – सर्वसाधारण (७ अर्ज)
भरीतकर माधव त्रिंबक (अपक्ष), कोठवळ आशिष तुकाराम (अपक्ष), खोजे अभय दत्तात्रय (अपक्ष), अमित पंढरीनाथ मंडलिक (भारतीय जनता पक्ष), अभंग नितीन बाजीराव (ऑल इंडिया फॉरवर्ड ब्लॉक), गोरे प्रसाद ज्ञानदेव (राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष) व मंडलिक किशोरी सुभाष (अपक्ष)
प्रभाग ८ अ – नागरिकांचा मागास प्रवर्ग महिला (६ अर्ज)
भगत मेधा दीपक (भारतीय जनता पार्टी), मोमीन फातिमा शोयब (अपक्ष), पठाण फातमाबी सरदारखान (अपक्ष), अरगडे प्रीती अनुज (अपक्ष), ताजने पायल आशिष (भारतीय जनता पार्टी), व पंचारिया दिपाली जीवन ऑल इंडिया फॉरवर्ड ब्लॉक)
प्रभाग ८ ब – सर्वसाधारण (४ अर्ज)
कुक्कर भगवान रामदास (अपक्ष), बागवान मो. साकिब अनिस (अपक्ष), गुंजाळ श्रीगणेश रंगनाथ (ऑल इंडिया फॉरवर्ड ब्लॉक), व राठी प्रकाश सुरेश (भारतीय जनता पक्ष)
प्रभाग ९ अ – नागरिकांचा मागास प्रवर्ग (६ अर्ज)
बाळासाहेब सहादू माताडे (अपक्ष), इनामदार आतिक कमरुद्दीन (राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष), सय्यद अमजद दाऊद (अपक्ष), अमजदखान उमरखान पठाण (ऑल इंडिया फॉरवर्ड ब्लॉक), समीर रज्जाक शेख (शिवसेना), व पठाण शरीफखान रशीदखान (अपक्ष)
प्रभाग ९ ब – सर्वसाधारण महिला (७ अर्ज)
काझी तस्लिम रऊफ (अपक्ष), देशमुख आयशा कदीर (अपक्ष), शेख मुस्कान मुजफ्फर (अपक्ष), गुंजाळ विजया जयराम (ऑल इंडिया फॉरवर्ड ब्लॉक), काझी तस्लिम रऊफ (अपक्ष), शेख सायरा इलियास (अपक्ष), व रोहिणी तुकाराम सातपुते (शिवसेना)
प्रभाग १० अ – सर्वसाधारण महिला (७ अर्ज)
शेख फैरोजा इम्तियाज (अपक्ष), शेख खैरूणिसा रहीम (अपक्ष), शेख जुलैखा फैरोज (अपक्ष), कुरेशी कुरेशी हुरबानो गुलामसाबिर (अपक्ष), पठाण नाजनीन मिर्झा (राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष), बेग शकीला इलियासबेग (ऑल इंडिया फॉरवर्ड ब्लॉक) व जुबेदा निहाल पिंजारी (अपक्ष)
प्रभाग १० ब – सर्वसाधारण (७ अर्ज)
शेख रईस अहमद (अपक्ष), शेख शादाब मुस्ताक (अपक्ष), शेख नूरमोहम्मद पीरमोहम्मद (ऑल इंडिया फॉरवर्ड ब्लॉक) शेख शादाब मुस्ताक (अपक्ष), सय्यद तसलीम साबीर (अपक्ष), पठाण अमजद अब्बास (अपक्ष) व सय्यद तसलीम साबीर (अपक्ष)
प्रभाग ११ अ – नागरिकांचा मागास प्रवर्ग महिला (५ अर्ज)
सय्यद परवीन अमजद (अपक्ष), शेख साहेबजान शकील (अपक्ष), शेख अंजुम इरफान (अपक्ष), सरोजना संदीप पगार (ऑल इंडिया फॉरवर्ड ब्लॉक), व दिपाली शाम कोळकर (अपक्ष)
प्रभाग ११ ब – सर्वसाधारण (११ अर्ज)
शेख रईस मुक्तार (अपक्ष), अनुप प्रदीप म्हाळस (अपक्ष), शेख कलीम हाजी (अपक्ष), शोएब मुजीब शेख (अपक्ष), सय्यद अन्सार मकबूल (अपक्ष), सय्यद अन्सार मकबूल (राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार) खान शहानवाज रईस (ऑल इंडिया फॉरवर्ड ब्लॉक), सय्यद जावेदअली शमशेरआली (अपक्ष), जहागीरआली जावेदआली सय्यद (अपक्ष) व शेख असीम अहमद अश्पाक (अपक्ष)
प्रभाग १२ अ – नागरिकांचा मागास प्रवर्ग (५ अर्ज)
टोकसे किशोर बद्रीनारायण (ऑल इंडिया फॉरवर्ड ब्लॉक) अमृतवाड व्यंकटेश सोमनाथ (अपक्ष) बेपारी शफी हाजीपापाभाई (अपक्ष), बेपारी तबरेज मो. रफीक (अपक्ष) व उमेश बाळासाहेब ढोले (शिवसेना)
प्रभाग १२ ब – सर्वसाधारण महिला (३ अर्ज)
शाह प्रियंका श्रीपाल (ऑल इंडिया फॉरवर्ड ब्लॉक), अमृतवाड दीपा व्यंकटेश (अपक्ष) व पूनम शशिकांत दायमा (भारतीय जनता पक्ष)
प्रभाग १३ अ – अनुसूचित जाती महिला (७ अर्ज)
जेथे सुनीता कुंदन (अपक्ष), कतारी कविता अमर (ऑल इंडिया फॉरवर्ड ब्लॉक), खरे प्रिया विलास (राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी), घोगले रूपाली विजय (अपक्ष), दारोळे मयुरी रामदास (अपक्ष), साक्षी विनोद सूर्यवंशी (शिवसेना) व ललिता लखन घोरपडे (अपक्ष)
प्रभाग १३ ब – सर्वसाधारण (९ अर्ज)
घोडेकर सुनील सुखदेव (अपक्ष), वाडेकर प्रशांत पद्माकर (अपक्ष), सागर नारायण भोईर (भारतीय जनता पार्टी), डफेदार दिनेश सुरेश (राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष), बिचकर योगेश वसंत (अपक्ष), बीचकर योगेश वसंत (अपक्ष), उपरे मुकुंद मुरलीधर (भारतीय जनता पार्टी), उपरे मुकुंद मुरलीधर (अपक्ष) व कलंत्री शैलेश राजगोपाल (ऑल इंडिया फॉरवर्ड ब्लॉक)
प्रभाग १४ अ – सर्वसाधारण महिला (३ अर्ज)
मोहरीकर निता सिताराम (भारतीय जनता पक्ष), गरुडकर नंदा मुकुंद (ऑल इंडिया फॉरवर्ड ब्लॉक) व कल्पना संतोष काळे (अपक्ष)
प्रभाग १४ ब – सर्वसाधारण (६ अर्ज)
पठाण अकील नजीरखान (अपक्ष), पवार प्रसाद जयवंत (ऑल इंडिया फॉरवर्ड ब्लॉक), गौरव सुभाष मालपाणी (भारतीय जनता पार्टी), सोनाली दिलीप बोटवे (शिवसेना), योगेश अशोक जाजू (अपक्ष) व प्रवीण सखाराम कर्पे (भारतीय जनता पार्टी)
प्रभाग १५ अ – नागरिकांचा मागास प्रवर्ग (३ अर्ज)
खान पठाण मुजीब अब्दुल्ला (ऑल इंडिया फॉरवर्ड ब्लॉक) जावेद गुलाम मोहम्मद शेख (अपक्ष) व पठाण रईसखान महबूबखान (अपक्ष)
प्रभाग १५ ब – सर्वसाधारण महिला (५ अर्ज)
शेख रेहाना सिराजुद्दीन (अपक्ष), पठाण जुलेखा निसारखान (अपक्ष), शेख जुलैखा फैरोज (अपक्ष), पठाण नासिमबानो इसाकखान (ऑल इंडिया फॉरवर्ड ब्लॉक) व सईदा गफ्फार शेख (अपक्ष)
anantpangarkar
Annant Ppangarkar

Views: 1,998
उमेदवारी अर्ज संगमनेर नगर परिषद संगमनेर नगरपालिका निवडणूक
Share. Facebook Twitter Pinterest WhatsApp
Annant Ppangarkar
  • Website

Related Posts

अहिल्यानगर जिल्हा बँक निवडणूक अपडेट: विखे, राजळे, लहामटे अन् जगतापांच्या अर्जांवर हरकती; निकालाकडे जिल्ह्याचे लक्ष, छाननी दरम्यान काय घडले….

06/10/2026

सूचकांच्या एका निर्णयाने जिल्हा बँकेच्या निवडणुकीला नवा ट्विस्ट; संगमनेर-राहात्यातील समीकरणे घडली, विखे-देशमुखांच्या गुलालाचा मार्ग मोकळा?

06/10/2026

अहिल्यानगर जिल्हा बँकेसाठी संगमनेर तालुक्यातून शिवसेनेचे तीन उमेदवार मैदानात — यांनी केले अर्ज दाखल

05/10/2026
Leave A Reply Cancel Reply

Document
Our Picks
  • Facebook
  • Twitter
  • Pinterest
  • Instagram
  • YouTube
Advertisement 1 Advertisement 2 Advertisement 3 Advertisement 4
Don't Miss
न्यायालय

घारगाव बहुचर्चित खून प्रकरणात मोठा ट्विस्ट! मुख्य आरोपीच्या जामीन अर्जावर न्यायालयाचा निर्णय… न्यायालयीन युक्तिवादात काय घडले वाचा सविस्तर

By Annant Ppangarkar16/10/20260

महाराष्ट्र संवाद न्यूज ऑनलाईन- संगमनेर तालुक्यातील घारगाव परिसरातील बहुचर्चित खून प्रकरणात मुख्य आरोपी प्रकाश जाधव…

शुक्रवार १६ ऑक्टोंबर — आजचा दिवस कसा असेल जाणून घ्या

16/10/2026

कर्ज वसुलीच्या नावाखाली संगमनेरात महिलेचा विनयभंग; आरोपीवर गुन्हा दाखल

15/10/2026

‘ब्रिक्स’ आंतरराष्ट्रीय महोत्सवात संगमनेरी योगवैभव! अहमदाबादेत ध्रुव ग्लोबलच्या १० खेळाडूंनी घडवले योगपरंपरेचे दर्शन

15/10/2026
Thumbnail 1
Thumbnail 2
Thumbnail 3
Thumbnail 4
previous arrow
next arrow
Thumbnail 1
Thumbnail 2
Thumbnail 3
Thumbnail 4
previous arrow
next arrow

तुमचे हक्काचे व्यासपीठ

Facebook YouTube
Our Picks
October 2026
M T W T F S S
 1234
567891011
12131415161718
19202122232425
262728293031  
« Sep    
  • Home
  • आंदोलन
  • आरोग्य
  • इतिहास
  • क्रिडा व कला
  • गुन्हेगारी
  • न्यायालय
  • पत्रकारिता
  • फोटो / गॅलरी
  • महाराष्ट्र संवाद विशेष
  • राजकारण
  • विकास
  • विश्लेषण
  • शिक्षण
  • शेती व सहकार
  • सामाजिक
  • CONTACT US
  • ABOUT US
  • PRIVACY POLICY
© 2026 ThemeSphere. Designed by ThemeSphere.

Type above and press Enter to search. Press Esc to cancel.