संगमनेर – संगमनेर तालुक्यात वडगावपान येथील एका २९ वर्षीय तरुणाचा दुर्दैवी मृत्यू विजेचा धक्का लागल्याने झाला आहे. ही हृदयद्रावक घटना शुक्रवारी (दिनांक २१ नोव्हेंबर) दुपारी पावणेचार वाजण्याच्या सुमारास घडली आहे.
मयत तरुणाचे नाव नितीन विलास वाघ (वय २९, रा. वडगावपान, ता. संगमनेर, जि. अहिल्यानगर) असे आहे. विजेचा धक्का लागल्याने त्याला उपचाराकरिता तातडीने संगमनेर मधील खासगी रुग्णालयात दाखल करण्यात आले. मात्र, रुग्णालयातील डॉक्टरांनी उपचारापूर्वीच त्याचा मृत्यू झाल्याचे घोषित केले.
हॉस्पिटलचे मेडिकल ऑफिसर यांनी या घटनेबाबत पोलिसांना डेथ मेमो प्राप्त करून माहिती दिली आहे. या घटनेची नोंद संगमनेर तालुका पोलीस स्टेशनमध्ये अकस्मात मृत्यू रजिस्टर नं. १५६/२०२५ बीएनएसएस कलम १९४ प्रमाणे करण्यात आली आहे.
माहिती मिळताच प्रभारी अधिकारी पोलीस निरीक्षक प्रवीण साळुंखे आणि तपास अधिकारी पोलीस हेड कॉन्स्टेबल डी. बी. बडधे हे रुग्णालयात पोहोचले.
पोलीस निरीक्षक साळुंखे यांच्या आदेशाने पोलीस हेड कॉन्स्टेबल बडधे हे या प्रकरणाचा प्राथमिक तपास करत आहेत.
विजेचा धक्का लागून २९ वर्षीय तरुणाचा मृत्यू; संगमनेरमध्ये हृदयद्रावक घटना