Close Menu
महाराष्ट्र संवादमहाराष्ट्र संवाद
  • Home
  • आंदोलन
  • आरोग्य
  • इतिहास
  • क्रिडा व कला
  • गुन्हेगारी
  • न्यायालय
  • महाराष्ट्र संवाद विशेष
  • राजकारण
  • विकास
  • विश्लेषण
  • शिक्षण
What's Hot

आंदोलनाची हवा काढण्यासाठीच मुख्यमंत्र्यांची भेट? : अमोल शेलकर यांचा घणाघात, पालकमंत्री व लोकप्रतिनिधींवर संगमनेरच्या हक्काची रेल्वे हिरावल्याचा थेट आरोप; कागदपत्रे सार्वजनिक करण्याचे आव्हान

09/09/2026

गणेश विसर्जनासाठी प्रवरा नदीपात्रात तातडीने पाणी सोडण्यासंदर्भात नगराध्यक्षा डॉ. मैथिली तांबे यांचे जिल्हाधिकाऱ्यांना निवेदन

09/09/2026

संगमनेर शहरात गणेशोत्सवाची जोरदार तयारी: खड्डेमुक्त रस्ते आणि मंडळांच्या समस्या सोडवण्यावर नगराध्यक्षा डॉ. मैथिली तांबे यांचा भर

09/09/2026
Facebook X (Twitter) Instagram
महाराष्ट्र संवादमहाराष्ट्र संवाद
  • Home
  • आंदोलन
  • आरोग्य
  • इतिहास
  • क्रिडा व कला
  • गुन्हेगारी
  • न्यायालय
  • महाराष्ट्र संवाद विशेष
  • राजकारण
  • विकास
  • विश्लेषण
  • शिक्षण
Facebook X (Twitter) Instagram
महाराष्ट्र संवादमहाराष्ट्र संवाद
Home » संगमनेरमधील मोठी बातमी: ईव्हीएम स्ट्रॉंग रूममधील सीसीटीव्ही कॅमेरे काही वेळेसाठी बंद! संगमनेरकरांमध्ये संताप आणि मोठा संभ्रम, नेमकं काय घडलं!
निवडणूक

संगमनेरमधील मोठी बातमी: ईव्हीएम स्ट्रॉंग रूममधील सीसीटीव्ही कॅमेरे काही वेळेसाठी बंद! संगमनेरकरांमध्ये संताप आणि मोठा संभ्रम, नेमकं काय घडलं!

देशात आणि राज्यात सत्ताधारी ईव्हीएमच्या जोरावर निवडणूक जिंकत असल्याचा आरोप सातत्याने होत आहे. त्यातच संगमनेरमध्ये स्ट्रॉंग रूममधील सीसीटीव्ही कॅमेरे एक तास बंद पडणे, हा प्रकार नेमका काय आहे? याचे समाधानकारक उत्तर प्रशासनाने दिले पाहिजे. प्रशासनावर काही वेगळे करण्याचा दबाव तर नव्हता ना, अशी शंका नागरिकांच्या मनात निर्माण झाली आहे.
Annant PpangarkarBy Annant Ppangarkar07/12/2025Updated:07/12/2025No Comments2 Mins Read
Facebook Twitter WhatsApp
Share
Facebook Twitter Email Telegram WhatsApp

संगमनेर (प्रतिनिधी): संगमनेर नगरपरिषद निवडणुकीनंतर ईव्हीएम मशीन सुरक्षित ठेवण्यात आलेल्या क्रीडा संकुलातील स्ट्रॉंग रूमवरील सीसीटीव्ही कॅमेरे अचानकपणे काही वेळासाठी बंद पडल्याने शहरात खळबळ उडाली आहे. प्रशासनाच्या या हलगर्जीपणाबद्दल संगमनेरकरांनी तीव्र नाराजी व्यक्त केली असून, ही माहिती मिळताच उमेदवार आणि त्यांच्या समर्थक कार्यकर्त्यांनी तातडीने घटनास्थळी धाव घेतली आहे. ईव्हीएमच्या सुरक्षेबाबत नागरिकांच्या मनात असलेल्या शंका या घटनेमुळे आणखी गडद झाल्या आहेत.

सहकार महर्षी भाऊसाहेब थोरात क्रीडा संकुलातील स्ट्रॉंग रूममध्ये नगरपालिका निवडणुकीतील सर्व १५ प्रभागांतील ईव्हीएम मशीन कडेकोट बंदोबस्तात ठेवण्यात आले आहेत. सर्व उमेदवार, त्यांचे प्रतिनिधी आणि शासकीय प्रतिनिधी यांच्या समक्ष सील करण्यात आलेल्या या स्ट्रॉंग रूमवर सतत देखरेख ठेवण्यासाठी सीसीटीव्ही कॅमेरे लावण्यात आले होते.

मात्र, आज रविवारी, (७ डिसेंबर) हे सीसीटीव्ही कॅमेरे अचानकपणे काही वेळासाठी बंद पडल्याची गंभीर बाब समोर आली. ही माहिती मिळताच संगमनेर सेवा समितीचे पदाधिकारी व कार्यकर्ते तसेच विविध पक्षांचे उमेदवार आणि त्यांचे प्रतिनिधी मोठ्या संख्येने तातडीने घटनास्थळी दाखल झाले. या घटनेमुळे संपूर्ण शहरात संभ्रम आणि तणावाचे वातावरण निर्माण झाले आहे.

ईव्हीएम मशीन आणि त्याची सुरक्षा ही लोकशाही प्रक्रियेतील अत्यंत महत्त्वाची गोष्ट आहे. देशात आणि राज्यात ईव्हीएमबद्दल पूर्वीपासूनच नागरिकांमध्ये संभ्रम असताना, संगमनेरमध्ये घडलेल्या या प्रकाराने शंकांना अधिक बळ मिळाले आहे. कॅमेरे नेमके कशामुळे बंद पडले, याचे समाधानकारक उत्तर प्रशासनाचे अधिकारी घटनास्थळी उपस्थित असलेल्या उमेदवार आणि कार्यकर्त्यांना देऊ शकले नाहीत. प्रशासनाच्या या हलगर्जीपणाच्या कारभारावर नागरिकांनी क्रीडा संकुलाबाहेर बसून तीव्र नाराजी व्यक्त केली.

सीसीटीव्ही बंद पडण्यामागील स्पष्टीकरण न मिळाल्यास तीव्र आंदोलन छेडण्याचा इशारा यावेळी नागरिकांनी दिला आहे. या घटनेचे पडसाद तालुका आणि जिल्हा स्तरावर उमटले असून, निवडणूक प्रक्रियेच्या पारदर्शकतेवर मोठे प्रश्नचिन्ह निर्माण झाले आहे. या प्रकरणी निवडणूक प्रशासनाने तातडीने खुलासा करून नागरिकांच्या शंका दूर करणे आणि दोषींवर कारवाई करणे आवश्यक आहे. मात्र सदरचे वृत्त लिहीपर्यंत प्रशासनाकडून अधिकृतपणे कोणताही खुलासा करण्यात आलेला नव्हता. तर संगमनेर नगर परिषदेचे मुख्याधिकारी तथा सहाय्यक निवडणूक निर्णय अधिकारी दयानंद गोरे यांनी समाज माध्यमावर टाकलेल्या पोस्टनुसार सीसीटीव्ही रेकॉर्डिंगची हार्ड डिस्क मेमरी भरल्याने बदलण्यात आली. त्यामुळे थोडा गैरसमज झाला. हार्ड डिस्क बदलताना व्हिडिओ शूटिंग करण्यात आले असल्याचे म्हटले आहे.


  • माजी नगराध्यक्ष विश्वासराव मुर्तडक यांनी या घटनेबद्दल तीव्र संताप व्यक्त केला आहे. त्यांनी ‘सत्ताधारी काहीही करू शकतात’ असे म्हणत देशात आणि राज्यात सत्ताधारी ईव्हीएमच्या जोरावर निवडणूक जिंकत असल्याचा आरोप सातत्याने होत आहे. त्यातच संगमनेरमध्ये स्ट्रॉंग रूममधील सीसीटीव्ही कॅमेरे एक तास बंद पडणे, हा प्रकार नेमका काय आहे? याचे समाधानकारक उत्तर प्रशासनाने दिले पाहिजे. प्रशासनावर काही वेगळे करण्याचा दबाव तर नव्हता ना, अशी शंका नागरिकांच्या मनात निर्माण झाली असल्याचे म्हटले आहे.
anantpangarkar
Annant Ppangarkar

Post Views: 5,246
निवडणूक स्ट्रॉंग रूम संगमनेर नगर परिषद सीसीटीव्ही कॅमेरे
Share. Facebook Twitter Pinterest WhatsApp
Annant Ppangarkar
  • Website

Related Posts

संगमनेर शहरात गणेशोत्सवाची जोरदार तयारी: खड्डेमुक्त रस्ते आणि मंडळांच्या समस्या सोडवण्यावर नगराध्यक्षा डॉ. मैथिली तांबे यांचा भर

09/09/2026

संगमनेर शहरात वाढणार सीसीटीव्हीची नजर; विविध विकासकामांचे सोमवारी बाळासाहेब थोरात यांच्या हस्ते होणार लोकार्पण

05/09/2026

संगमनेर पालिकेचा अनोखा उपक्रम! १ ते २५ सप्टेंबरदरम्यान होणार प्रभागनिहाय बैठका; नगराध्यक्ष डॉ. मैथिली तांबे यांच्या पुढाकाराने नागरिकांच्या प्रश्नांना थेट व्यासपीठ

29/08/2026
Leave A Reply Cancel Reply

Document
Our Picks
  • Facebook
  • Twitter
  • Pinterest
  • Instagram
  • YouTube
Advertisement 1 Advertisement 2 Advertisement 3 Advertisement 4
Don't Miss
राजकारण

आंदोलनाची हवा काढण्यासाठीच मुख्यमंत्र्यांची भेट? : अमोल शेलकर यांचा घणाघात, पालकमंत्री व लोकप्रतिनिधींवर संगमनेरच्या हक्काची रेल्वे हिरावल्याचा थेट आरोप; कागदपत्रे सार्वजनिक करण्याचे आव्हान

By Annant Ppangarkar09/09/20260

Annant Ppangarkar महाराष्ट्र संवाद न्यूज ऑनलाईन – संगमनेर मार्गे जाणारा पुणे–नाशिक सेमीस्पीड रेल्वे प्रकल्प GMRT…

गणेश विसर्जनासाठी प्रवरा नदीपात्रात तातडीने पाणी सोडण्यासंदर्भात नगराध्यक्षा डॉ. मैथिली तांबे यांचे जिल्हाधिकाऱ्यांना निवेदन

09/09/2026

संगमनेर शहरात गणेशोत्सवाची जोरदार तयारी: खड्डेमुक्त रस्ते आणि मंडळांच्या समस्या सोडवण्यावर नगराध्यक्षा डॉ. मैथिली तांबे यांचा भर

09/09/2026

सोशल मीडिया रिल्सच्या प्रभावापासून दूर राहून तरुणांनी ‘गुंतवणूक भान’ जपावे : सुनील कडलग

09/09/2026
Thumbnail 1
Thumbnail 2
Thumbnail 3
Thumbnail 4
previous arrow
next arrow
Thumbnail 1
Thumbnail 2
Thumbnail 3
Thumbnail 4
previous arrow
next arrow

तुमचे हक्काचे व्यासपीठ

Facebook YouTube
Our Picks
September 2026
M T W T F S S
 123456
78910111213
14151617181920
21222324252627
282930  
« Aug    
  • Home
  • आंदोलन
  • आरोग्य
  • इतिहास
  • क्रिडा व कला
  • गुन्हेगारी
  • न्यायालय
  • पत्रकारिता
  • फोटो / गॅलरी
  • महाराष्ट्र संवाद विशेष
  • राजकारण
  • विकास
  • विश्लेषण
  • शिक्षण
  • शेती व सहकार
  • सामाजिक
  • CONTACT US
  • ABOUT US
  • PRIVACY POLICY
© 2026 ThemeSphere. Designed by ThemeSphere.

Type above and press Enter to search. Press Esc to cancel.