Close Menu
महाराष्ट्र संवादमहाराष्ट्र संवाद
  • Home
  • आंदोलन
  • आरोग्य
  • इतिहास
  • क्रिडा व कला
  • गुन्हेगारी
  • न्यायालय
  • महाराष्ट्र संवाद विशेष
  • राजकारण
  • विकास
  • विश्लेषण
  • शिक्षण
What's Hot

अहिल्यानगर जिल्ह्यात अवैध गुटखा विक्रीवर स्थानिक गुन्हे शाखेची मोठी कारवाई; ५.३० लाखांचा मुद्देमाल जप्त, ११ जणांवर गुन्हे दाखल

03/09/2026

अवैध वाळू वाहतूक करणारा हायवा जप्त, २५.६० लाखांचा मुद्देमाल हस्तगत

03/09/2026

आज गुरुवार, ०३ सप्टेंबर २०२६ — तुमचा आजचा दिवस कसा असेल, जाणून घ्या

03/09/2026
Facebook X (Twitter) Instagram
महाराष्ट्र संवादमहाराष्ट्र संवाद
  • Home
  • आंदोलन
  • आरोग्य
  • इतिहास
  • क्रिडा व कला
  • गुन्हेगारी
  • न्यायालय
  • महाराष्ट्र संवाद विशेष
  • राजकारण
  • विकास
  • विश्लेषण
  • शिक्षण
Facebook X (Twitter) Instagram
महाराष्ट्र संवादमहाराष्ट्र संवाद
Home » बंटी जहागीरदारची हत्या करून पसार होण्याच्या बेतात असलेल्या दोघांना पोलिसांनी शिताफीने पकडले! सविस्तर वाचा, नेमकी काय आहे ही घटना…
गुन्हेगारी

बंटी जहागीरदारची हत्या करून पसार होण्याच्या बेतात असलेल्या दोघांना पोलिसांनी शिताफीने पकडले! सविस्तर वाचा, नेमकी काय आहे ही घटना…

हत्या कोणत्या कारणातून झाली, हत्येचा कट कोणी रचला आणि गुन्ह्यात वापरलेली शस्त्रे कोठून आणली, याचा सखोल तपास पोलीस करत आहे
Annant PpangarkarBy Annant Ppangarkar01/01/2026Updated:01/01/2026No Comments2 Mins Read
Facebook Twitter WhatsApp
Share
Facebook Twitter Email Telegram WhatsApp

श्रीरामपूर | महाराष्ट्र संवाद न्यूज-

अहिल्यानगर जिल्ह्याच्या श्रीरामपूरमध्ये जर्मन बेकरी बॉम्ब स्फोट प्रकरणातील आरोपी बंटी जहागीरदार याची बुधवारी हत्या करण्यात आली. जहागीरदार याची गोळ्या घालून हत्या करणाऱ्या दोन आरोपींना पोलिसांनी अवघ्या २४ तासांत ताब्यात घेतले आहे. ३१ डिसेंबर रोजी दुपारी जर्मन रुग्णालयासमोर झालेल्या या थरारामुळे शहरात मोठी खळबळ उडाली होती.

३१ डिसेंबर २०२५ रोजी दुपारी पावणे तीन वाजेच्या सुमारास, कब्रस्तान परिसरातील जर्मन रुग्णालयासमोर बंटी जहागीरदारवर अज्ञातांनी गोळीबार केला होता. या हल्ल्यात बंटीचा उपचारादरम्यान मृत्यू झाला, तर त्याच्यासोबत असलेला अमिन गुलाब शेख हा गंभीर जखमी झाला आहे. याप्रकरणी श्रीरामपूर शहर पोलीस ठाण्यात भारतीय न्याय संहिता आणि आर्म ऍक्टच्या विविध कलमान्वये गुन्हा दाखल करण्यात आला असून मृतदेहाचे शवविच्छेदन छत्रपती संभाजीनगर येथील घाटी रुग्णालयात करण्यात आले आहे.

पोलीस अधीक्षक सोमनाथ घार्गे आणि अपर पोलीस अधीक्षक सोमनाथ वाकचौरे यांच्या मार्गदर्शनाखाली पोलिसांनी तपासासाठी तीन पथके तैनात केली होती. रात्री उशिरा पोलिसांनी सिद्धार्थनगर येथील कृष्णा अरुण शिनगारे आणि भिमनगर येथील रवींद्र गौतम निकाळजे या दोन तरुणांना नाकाबंदी दरम्यान ताब्यात घेतले आहे. या दोघांची पोलीस प्रशासनाकडून पासून चौकशी सुरू आहे.

यातील मृत बंटी जहागीरदारवर पुणे बॉम्बस्फोटासह १७ गंभीर स्वरूपाचे गुन्हे दाखल होते. या पार्श्वभूमीवर, ही हत्या कोणत्या कारणातून झाली, हत्येचा कट कोणी रचला आणि गुन्ह्यात वापरलेली शस्त्रे कोठून आणली, याचा सखोल तपास डीवायएसपी जयदत्त भवर आणि पोलीस निरीक्षक नितीन देशमुख करत आहेत.

घटनेच्या गांभीर्यामुळे श्रीरामपूर शहरात सध्या मोठा पोलीस बंदोबस्त तैनात करण्यात आला आहे. सोशल मीडियावर देखील पोलिसांचे बारकाईने लक्ष असून कुणीही घटनेबाबत आक्षेपार्ह पोस्ट शेअर केल्यास, चुकीची माहिती प्रसिद्ध केल्यास किंवा अफवा पसरवल्यास त्यांच्यावर कठोर कायदेशीर कारवाई करण्यात येईल, असा इशारा पोलीस प्रशासनाने दिला आहे. नागरिकांनी शांतता राखण्याचे आवाहन करण्यात आले आहे.

anantpangarkar
Annant Ppangarkar

Post Views: 2,962
आरोपी अटक बंटी जहागीरदार श्रीरामपूर हत्या
Share. Facebook Twitter Pinterest WhatsApp
Annant Ppangarkar
  • Website

Related Posts

अहिल्यानगर जिल्ह्यात अवैध गुटखा विक्रीवर स्थानिक गुन्हे शाखेची मोठी कारवाई; ५.३० लाखांचा मुद्देमाल जप्त, ११ जणांवर गुन्हे दाखल

03/09/2026

अवैध वाळू वाहतूक करणारा हायवा जप्त, २५.६० लाखांचा मुद्देमाल हस्तगत

03/09/2026

पोलिसांचा वाळू माफियांना मोठा धक्का; या दोन तालुक्यातून २० लाखांचा मुद्देमाल जप्त

02/09/2026
Leave A Reply Cancel Reply

Document
Our Picks
  • Facebook
  • Twitter
  • Pinterest
  • Instagram
  • YouTube
Advertisement 1 Advertisement 2 Advertisement 3 Advertisement 4
Don't Miss
गुन्हेगारी

अहिल्यानगर जिल्ह्यात अवैध गुटखा विक्रीवर स्थानिक गुन्हे शाखेची मोठी कारवाई; ५.३० लाखांचा मुद्देमाल जप्त, ११ जणांवर गुन्हे दाखल

By Annant Ppangarkar03/09/20260

Annant Ppangarkar महाराष्ट्र संवाद न्यूज ऑनलाईन: जिल्ह्यातील अवैध गुटखा, सुगंधीत तंबाखू आणि मावा विक्री करणाऱ्या…

अवैध वाळू वाहतूक करणारा हायवा जप्त, २५.६० लाखांचा मुद्देमाल हस्तगत

03/09/2026

आज गुरुवार, ०३ सप्टेंबर २०२६ — तुमचा आजचा दिवस कसा असेल, जाणून घ्या

03/09/2026

जवळेकडलगच्या दुर्देवी घटनेनंतर माजी मंत्री बाळासाहेब थोरात यांची पवार कुटुंबाला सांत्वन भेट; बिबट्यांच्या दहशतीवर प्रशासनाने ठोस उपाययोजना करण्याची मागणी

02/09/2026
Thumbnail 1
Thumbnail 2
Thumbnail 3
Thumbnail 4
previous arrow
next arrow
Thumbnail 1
Thumbnail 2
Thumbnail 3
Thumbnail 4
previous arrow
next arrow

तुमचे हक्काचे व्यासपीठ

Facebook YouTube
Our Picks
September 2026
M T W T F S S
 123456
78910111213
14151617181920
21222324252627
282930  
« Aug    
  • Home
  • आंदोलन
  • आरोग्य
  • इतिहास
  • क्रिडा व कला
  • गुन्हेगारी
  • न्यायालय
  • पत्रकारिता
  • फोटो / गॅलरी
  • महाराष्ट्र संवाद विशेष
  • राजकारण
  • विकास
  • विश्लेषण
  • शिक्षण
  • शेती व सहकार
  • सामाजिक
  • CONTACT US
  • ABOUT US
  • PRIVACY POLICY
© 2026 ThemeSphere. Designed by ThemeSphere.

Type above and press Enter to search. Press Esc to cancel.