Close Menu
महाराष्ट्र संवादमहाराष्ट्र संवाद
  • Home
  • आंदोलन
  • आरोग्य
  • इतिहास
  • क्रिडा व कला
  • गुन्हेगारी
  • न्यायालय
  • महाराष्ट्र संवाद विशेष
  • राजकारण
  • विकास
  • विश्लेषण
  • शिक्षण
What's Hot

वय विसरले अन् झिंगाटवर थिरकले! ४० वर्षांनंतर भेटले सेवानिवृत्त शिक्षक मित्र; भंडारदऱ्यातील भाऊक ‘गेट-टुगेदर’ची खास बातमी

16/10/2026

आदिवासी बांधवांचा शिंदेंच्या शिवसेनेत प्रवेश! आमदार खताळ सोडविणार शिरसगाव धुप्याचा पाणी, रस्ते, वीज प्रश्न

16/10/2026

घारगाव बहुचर्चित खून प्रकरणात मोठा ट्विस्ट! मुख्य आरोपीच्या जामीन अर्जावर न्यायालयाचा निर्णय… न्यायालयीन युक्तिवादात काय घडले वाचा सविस्तर

16/10/2026
Facebook X (Twitter) Instagram
महाराष्ट्र संवादमहाराष्ट्र संवाद
  • Home
  • आंदोलन
  • आरोग्य
  • इतिहास
  • क्रिडा व कला
  • गुन्हेगारी
  • न्यायालय
  • महाराष्ट्र संवाद विशेष
  • राजकारण
  • विकास
  • विश्लेषण
  • शिक्षण
Facebook X (Twitter) Instagram
महाराष्ट्र संवादमहाराष्ट्र संवाद
Home » एसीबीचा मोठा दणका; महावितरणचे सहाय्यक अभियंता आणि तंत्रज्ञ ५० हजारांची लाच घेताना जेरबंद, आरोपींना न्यायालयाने…
गुन्हेगारी

एसीबीचा मोठा दणका; महावितरणचे सहाय्यक अभियंता आणि तंत्रज्ञ ५० हजारांची लाच घेताना जेरबंद, आरोपींना न्यायालयाने…

आरोपींच्या आवाजाचे नमुने घेण्यासाठी व आणखी तपास करण्यासाठी अतिरिक्त सरकारी वकील मच्छिंद्र गवते यांनी न्यायालयाकडे दोन दिवसांच्या कोठडीची मागणी केली होती.
Annant PpangarkarBy Annant Ppangarkar02/01/2026No Comments2 Mins Read
Facebook Twitter WhatsApp
Share
Facebook Twitter Email Telegram WhatsApp

नेवासा | महाराष्ट्र संवाद न्यूज

वीज चोरीच्या कारवाईत तडजोड करून दंड कमी करण्यासाठी १ लाख २५ हजार रुपयांच्या लाचेची मागणी करून, त्यापैकी ५० हजार रुपयांचा पहिला हप्ता स्वीकारताना महावितरणच्या दोन अधिकाऱ्यांना अहिल्यानगरच्या लाचलुचपत प्रतिबंधक विभागाने (ACB) रंगेहाथ पकडले आहे. 

या कारवाईत किरण गजेंद्र मोरे (वय ३४, सहाय्यक अभियंता, महावितरण उपविभाग नेवासा) आणि शिवकुमार नारायण आचारी (वय ४७, प्रधान तंत्रज्ञ, महावितरण नेवासा ग्रामीण) या दोन लोकसेवकांना अटक करण्यात आली असून त्यांच्याविरुद्ध नेवासा पोलीस ठाण्यात भ्रष्टाचार प्रतिबंधक कायद्यान्वये गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

या घटनेची सविस्तर पार्श्वभूमी अशी की, या प्रकरणातील तक्रारदाराचे नेवासा शहरात राहते घर व पाण्याचा प्लांट आहे. २२ डिसेंबर २०२५ रोजी आरोपी किरण मोरे आणि शिवकुमार आचारी यांनी तक्रारदाराच्या घरी जाऊन वीज मीटरची तपासणी केली होती. यावेळी तुम्ही चोरून वीज वापरता, तुमच्यावर मोठी कारवाई होईल आणि तुम्हाला ४ लाख रुपये दंड भरावा लागेल, अशी भीती आरोपींनी तक्रारदाराला दाखवली. 

हा संभाव्य दंड आणि कायदेशीर कारवाई टाळण्यासाठी आरोपींनी सुरुवातीला २ लाख रुपयांच्या लाचेची मागणी केली होती. मात्र, तक्रारदाराची लाच देण्याची इच्छा नसल्याने त्यांनी ३१ डिसेंबर २०२५ रोजी लाचलुचपत प्रतिबंधक विभागाकडे तक्रार नोंदवली.

एसीबीच्या पथकाने या तक्रारीची अत्यंत गोपनीयरीत्या पडताळणी केली असता, आरोपींनी लाचेची मागणी केल्याचे निष्पन्न झाले. तडजोडीनंतर लाचेची एकूण रक्कम १ लाख २५ हजार रुपये निश्चित करण्यात आली. नववर्षाच्या पहिल्याच दिवशी १ जानेवारी २०२६ रोजी आरोपींनी तक्रारदाराला लाचेच्या रकमेसह नेवासा फाटा येथे बोलावले होते, येथील देवरे हॉस्पिटलजवळ सापळा रचण्यात आला. तक्रारदाराने लाचेचा पहिला हप्ता म्हणून ५०,००० रुपये आरोपींकडे सुपूर्द केले. यामध्ये एसीबीने पावडर लावलेल्या ४० हजार रुपयांच्या खऱ्या नोटा आणि १० हजार रुपयांच्या २० बनावट नोटांचा समावेश केला होता. ही रक्कम स्वीकारताच दबा धरून बसलेल्या एसीबीच्या पथकाने आरोपींना रंगेहाथ ताब्यात घेतले.

ही कारवाई लाचलुचपत प्रतिबंधक विभागाचे पोलीस उपअधीक्षक अजित त्रिपुटे, पोलीस निरीक्षक श्रीमती छाया देवरे आणि त्यांच्या पथकाने यशस्वीरित्या पार पाडली. या कारवाईमुळे महावितरण विभागासह इतर शासकीय कार्यालयांमध्ये मोठी खळबळ उडाली आहे.


  • दरम्यान अटक करण्यात आलेल्या दोन्ही आरोपींना शुक्रवारी सत्र न्यायाधीश आर. आर. हस्तेकर यांच्यासमोर हजर करण्यात आले होते. आरोपींच्या आवाजाचे नमुने घेण्यासाठी व आणखी तपास करण्यासाठी अतिरिक्त सरकारी वकील मच्छिंद्र गवते यांनी न्यायालयाकडे दोन दिवसांच्या कोठडीची मागणी केली होती. न्यायालयाने आरोपींना एक दिवसाची पोलीस कोठडी सुनावली आहे.

anantpangarkar
Annant Ppangarkar

Views: 4,051
एसीबी गुन्हेगारी न्यायालय पोलीस कोठडी महावितरण लाच लुचपत लाचखोरी
Share. Facebook Twitter Pinterest WhatsApp
Annant Ppangarkar
  • Website

Related Posts

कर्ज वसुलीच्या नावाखाली संगमनेरात महिलेचा विनयभंग; आरोपीवर गुन्हा दाखल

15/10/2026

सायखिंडी फाटा गांजा तस्करीत आरोपींना पुन्हा १२ ऑक्टोबरपर्यंत पोलीस कस्टडी; बँक खात्यांचे आर्थिक व्यवहार पोलिसांच्या रडारवर

09/10/2026

दुष्काळग्रस्तांकडून सक्तीची वीज बिल वसुली थांबवा; अन्यथा आंदोलन — शिवसेना ठाकरे शहर प्रमुख अमित चव्हाण

08/10/2026
Leave A Reply Cancel Reply

Document
Our Picks
  • Facebook
  • Twitter
  • Pinterest
  • Instagram
  • YouTube
Advertisement 1 Advertisement 2 Advertisement 3 Advertisement 4
Don't Miss
महाराष्ट्र संवाद विशेष

वय विसरले अन् झिंगाटवर थिरकले! ४० वर्षांनंतर भेटले सेवानिवृत्त शिक्षक मित्र; भंडारदऱ्यातील भाऊक ‘गेट-टुगेदर’ची खास बातमी

By Annant Ppangarkar16/10/20260

महाराष्ट्र संवाद न्यूज ऑनलाईन- अहिल्यानगरच्या युनियन अध्यापक विद्यालयातून सन १९८४ ते १९८६ च्या वर्गातून बाहेर…

आदिवासी बांधवांचा शिंदेंच्या शिवसेनेत प्रवेश! आमदार खताळ सोडविणार शिरसगाव धुप्याचा पाणी, रस्ते, वीज प्रश्न

16/10/2026

घारगाव बहुचर्चित खून प्रकरणात मोठा ट्विस्ट! मुख्य आरोपीच्या जामीन अर्जावर न्यायालयाचा निर्णय… न्यायालयीन युक्तिवादात काय घडले वाचा सविस्तर

16/10/2026

शुक्रवार १६ ऑक्टोंबर — आजचा दिवस कसा असेल जाणून घ्या

16/10/2026
Thumbnail 1
Thumbnail 2
Thumbnail 3
Thumbnail 4
previous arrow
next arrow
Thumbnail 1
Thumbnail 2
Thumbnail 3
Thumbnail 4
previous arrow
next arrow

तुमचे हक्काचे व्यासपीठ

Facebook YouTube
Our Picks
October 2026
M T W T F S S
 1234
567891011
12131415161718
19202122232425
262728293031  
« Sep    
  • Home
  • आंदोलन
  • आरोग्य
  • इतिहास
  • क्रिडा व कला
  • गुन्हेगारी
  • न्यायालय
  • पत्रकारिता
  • फोटो / गॅलरी
  • महाराष्ट्र संवाद विशेष
  • राजकारण
  • विकास
  • विश्लेषण
  • शिक्षण
  • शेती व सहकार
  • सामाजिक
  • CONTACT US
  • ABOUT US
  • PRIVACY POLICY
© 2026 ThemeSphere. Designed by ThemeSphere.

Type above and press Enter to search. Press Esc to cancel.