Close Menu
महाराष्ट्र संवादमहाराष्ट्र संवाद
  • Home
  • आंदोलन
  • आरोग्य
  • इतिहास
  • क्रिडा व कला
  • गुन्हेगारी
  • न्यायालय
  • महाराष्ट्र संवाद विशेष
  • राजकारण
  • विकास
  • विश्लेषण
  • शिक्षण
What's Hot

माहिती अधिकाराचे प्रणेते अण्णा हजारे यांची मुख्य माहिती आयुक्त राहुल पांडे यांनी घेतली सदिच्छा भेट; प्रकृतीची केली विचारपूस

03/09/2026

अहिल्यानगरमध्ये ४० नशेची इंजेक्शन्स जप्त; व्यायामपटूंकडून वापराचा संशय, तिघांना अटक

03/09/2026

अहिल्यानगर जिल्ह्यात अवैध गुटखा विक्रीवर स्थानिक गुन्हे शाखेची मोठी कारवाई; ५.३० लाखांचा मुद्देमाल जप्त, ११ जणांवर गुन्हे दाखल

03/09/2026
Facebook X (Twitter) Instagram
महाराष्ट्र संवादमहाराष्ट्र संवाद
  • Home
  • आंदोलन
  • आरोग्य
  • इतिहास
  • क्रिडा व कला
  • गुन्हेगारी
  • न्यायालय
  • महाराष्ट्र संवाद विशेष
  • राजकारण
  • विकास
  • विश्लेषण
  • शिक्षण
Facebook X (Twitter) Instagram
महाराष्ट्र संवादमहाराष्ट्र संवाद
Home » गुंतवणूक करणाऱ्यांना सावधानतेचा इशारा! मोठ्या परताव्याचे आमिष दाखवून फसवणूक करणाऱ्या ‘ग्रो इन्व्हेस्टर’ कंपनीवर पोलिसांचा छापा; संदिपराज कपाटे ताब्यात, गुंतवणूकदारांनी तक्रार नोंदविण्याचे अपर पोलीस अधीक्षकांचे आवाहन
गुन्हेगारी

गुंतवणूक करणाऱ्यांना सावधानतेचा इशारा! मोठ्या परताव्याचे आमिष दाखवून फसवणूक करणाऱ्या ‘ग्रो इन्व्हेस्टर’ कंपनीवर पोलिसांचा छापा; संदिपराज कपाटे ताब्यात, गुंतवणूकदारांनी तक्रार नोंदविण्याचे अपर पोलीस अधीक्षकांचे आवाहन

पोलिसांनी नागरिकांना आवाहन केले आहे की, ज्या-ज्या लोकांनी 'ग्रो इन्व्हेस्टर' कंपनीमध्ये जादा परताव्याच्या आमिषाने पैसे गुंतवलेले असतील, त्यांनी स्वतःहून श्रीरामपूर तालुका पोलीस स्टेशन येथे गुंतवणुकीच्या कागदपत्रांसह हजर राहून आपला जबाब नोंदवावा.
Annant PpangarkarBy Annant Ppangarkar03/01/2026Updated:03/01/2026No Comments2 Mins Read
Facebook Twitter WhatsApp
Share
Facebook Twitter Email Telegram WhatsApp

श्रीरामपूर | महाराष्ट्र संवाद न्यूज

अल्पावधीत मोठ्या प्रमाणात परतावा देण्याचे आमिष दाखवून सर्वसामान्य जनतेची फसवणूक करणाऱ्या कंपन्यांविरुद्ध श्रीरामपूर पोलिसांनी मोठी मोहीम हाती घेतली आहे. अहिल्यानगर जिल्ह्यामध्ये अशा अनेक इन्व्हेस्टर कंपन्यांनी नागरिकांची लाखो रुपयांची फसवणूक केल्याप्रकरणी यापूर्वी गुन्हे दाखल आहेत. याच पार्श्वभूमीवर, श्रीरामपूर तालुक्यातील भोकर शिवारामध्ये ‘ग्रो इन्व्हेस्टर’ नावाच्या कंपनीकडून विनापरवाना मोठी आर्थिक गुंतवणूक स्वीकारली जात असल्याची गोपनीय माहिती पोलिसांना प्राप्त झाली होती.

या माहितीची खातरजमा करण्यासाठी अपर पोलीस अधीक्षक, श्रीरामपूर यांच्या कार्यालयातील पथकाने व उपविभागीय पोलीस अधिकारी जयदत्त भवर यांच्यासह पोलीस उपनिरीक्षक सतिष डोळे, पोलीस उपनिरीक्षक दादाभाई मगरे, पोलीस हेड कॉन्स्टेबल दादासाहेब लोंढे, पोलीस नाईक संदिप दरंदले, पोलीस कॉन्स्टेबल सहदेव चव्हाण, पोलीस कॉन्स्टेबल अशोक गाढे, पोलीस नाईक दादासाहेब गुंड, पोलीस नाईक अनिल शेंगाळे, महिला पोलीस कॉन्स्टेबल पुजा भावसार आणि महिला पोलीस कॉन्स्टेबल अरुण पवार यांनी खासगी वाहनाने भोकर शिवारातील हनुमानवाडी येथे छापा टाकला.

या कारवाईत संदिपराज मोहिणीबाई कपाटे (वय ३६ वर्षे, रा. हनुमानवाडी, भोकर शिवार, ता. श्रीरामपूर) याला पथकाने ताब्यात घेतले. पोलिसांनी त्याच्याकडे अधिकृत परवान्याबाबत विचारणा केली असता, लोकांकडून पैसे स्वीकारण्याबाबत कोणताही परवाना नसल्याचे त्याने सांगितले. त्यानंतर त्याच्या घराची झडती घेतली असता पोलिसांना ९ पासबुक, १० चेकबुक, एक हिशोबाची नोंद असलेली वही, १ ॲपल कंपनीचा लॅपटॉप, ३ कॉम्प्युटर स्क्रीन, २ पेन ड्राईव्ह, १ कॅश काउंटिंग मशीन, २ तिजोरी, ३ वॉकीटॉकी, १ H.H.M.D. आणि १,०४,६००/- रुपयांची रोख रक्कम असा मुद्देमाल मिळून आला. इन्व्हेस्टर कंपनीच्या मालकाने या साहित्याबाबत आणि आर्थिक व्यवहाराबाबत कोणताही समाधानकारक खुलासा न केल्यामुळे पंचासमक्ष हा सर्व मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे.

पोलिसांनी नागरिकांना आवाहन केले आहे की, ज्या-ज्या लोकांनी ‘ग्रो इन्व्हेस्टर’ कंपनीमध्ये जादा परताव्याच्या आमिषाने पैसे गुंतवलेले असतील, त्यांनी स्वतःहून श्रीरामपूर तालुका पोलीस स्टेशन येथे गुंतवणुकीच्या कागदपत्रांसह हजर राहून आपला जबाब नोंदवावा. नागरिकांनी वेळीच पुढे येऊन तक्रार दिल्यास पोलीस तपासाला गती मिळेल आणि संबंधित दोषींविरुद्ध कडक कारवाई करणे सोपे होईल, असे श्रीरामपूर विभागाचे अपर पोलीस अधीक्षक सोमनाथ वाघचौरे यांनी म्हटले आहे.

anantpangarkar
Annant Ppangarkar

Post Views: 955
आवाहन कारवाई गुन्हेगारी फसवणूक सोमनाथ वाघचौरे
Share. Facebook Twitter Pinterest WhatsApp
Annant Ppangarkar
  • Website

Related Posts

अहिल्यानगरमध्ये ४० नशेची इंजेक्शन्स जप्त; व्यायामपटूंकडून वापराचा संशय, तिघांना अटक

03/09/2026

अहिल्यानगर जिल्ह्यात अवैध गुटखा विक्रीवर स्थानिक गुन्हे शाखेची मोठी कारवाई; ५.३० लाखांचा मुद्देमाल जप्त, ११ जणांवर गुन्हे दाखल

03/09/2026

अवैध वाळू वाहतूक करणारा हायवा जप्त, २५.६० लाखांचा मुद्देमाल हस्तगत

03/09/2026
Leave A Reply Cancel Reply

Document
Our Picks
  • Facebook
  • Twitter
  • Pinterest
  • Instagram
  • YouTube
Advertisement 1 Advertisement 2 Advertisement 3 Advertisement 4
Don't Miss
महाराष्ट्र संवाद विशेष

माहिती अधिकाराचे प्रणेते अण्णा हजारे यांची मुख्य माहिती आयुक्त राहुल पांडे यांनी घेतली सदिच्छा भेट; प्रकृतीची केली विचारपूस

By Annant Ppangarkar03/09/20260

Annant Ppangarkar मुंबई: माहिती अधिकाराचे प्रणेते आणि ज्येष्ठ समाजसेवक अण्णा हजारे हे सध्या प्रकृती अस्वास्थ्यामुळे…

अहिल्यानगरमध्ये ४० नशेची इंजेक्शन्स जप्त; व्यायामपटूंकडून वापराचा संशय, तिघांना अटक

03/09/2026

अहिल्यानगर जिल्ह्यात अवैध गुटखा विक्रीवर स्थानिक गुन्हे शाखेची मोठी कारवाई; ५.३० लाखांचा मुद्देमाल जप्त, ११ जणांवर गुन्हे दाखल

03/09/2026

अवैध वाळू वाहतूक करणारा हायवा जप्त, २५.६० लाखांचा मुद्देमाल हस्तगत

03/09/2026
Thumbnail 1
Thumbnail 2
Thumbnail 3
Thumbnail 4
previous arrow
next arrow
Thumbnail 1
Thumbnail 2
Thumbnail 3
Thumbnail 4
previous arrow
next arrow

तुमचे हक्काचे व्यासपीठ

Facebook YouTube
Our Picks
September 2026
M T W T F S S
 123456
78910111213
14151617181920
21222324252627
282930  
« Aug    
  • Home
  • आंदोलन
  • आरोग्य
  • इतिहास
  • क्रिडा व कला
  • गुन्हेगारी
  • न्यायालय
  • पत्रकारिता
  • फोटो / गॅलरी
  • महाराष्ट्र संवाद विशेष
  • राजकारण
  • विकास
  • विश्लेषण
  • शिक्षण
  • शेती व सहकार
  • सामाजिक
  • CONTACT US
  • ABOUT US
  • PRIVACY POLICY
© 2026 ThemeSphere. Designed by ThemeSphere.

Type above and press Enter to search. Press Esc to cancel.