Close Menu
महाराष्ट्र संवादमहाराष्ट्र संवाद
  • Home
  • आंदोलन
  • आरोग्य
  • इतिहास
  • क्रिडा व कला
  • गुन्हेगारी
  • न्यायालय
  • महाराष्ट्र संवाद विशेष
  • राजकारण
  • विकास
  • विश्लेषण
  • शिक्षण
What's Hot

गुरुवार, १५ ऑक्टोंबर — आजचा दिवस कसा असेल जाणून घ्या!

15/10/2026

संगमनेरच्या बाजारपेठेला मोठा दिलासा, दुष्काळाच्या संकटातही थोरात कारखान्याचा मोठा निर्णय; कामगारांना मिळणार इतका बोनस अन् सानुग्रह अनुदान; ऊस उत्पादकांना प्रतिटन एवढी मदत! लोकनेते बाळासाहेब थोरात यांची घोषणा

14/10/2026

रस्त्यावरील वादातून मारहाण, जीवे मारण्याची धमकी; संगमनेर न्यायालयाने सुनावली ही शिक्षा

14/10/2026
Facebook X (Twitter) Instagram
महाराष्ट्र संवादमहाराष्ट्र संवाद
  • Home
  • आंदोलन
  • आरोग्य
  • इतिहास
  • क्रिडा व कला
  • गुन्हेगारी
  • न्यायालय
  • महाराष्ट्र संवाद विशेष
  • राजकारण
  • विकास
  • विश्लेषण
  • शिक्षण
Facebook X (Twitter) Instagram
महाराष्ट्र संवादमहाराष्ट्र संवाद
Home » दोन्ही आमदारांचा श्रेयवाद अन् ‘पत्रक युद्ध’ संपले; राज्य शासनाच्या योजनेतून संगमनेरकरांना ५०% शास्ती माफीचा मोठा दिलासा! नगराध्यक्षा डॉ. मैथिली तांबे यांची दमदार इनिंग सुरू
पत्रकारिता

दोन्ही आमदारांचा श्रेयवाद अन् ‘पत्रक युद्ध’ संपले; राज्य शासनाच्या योजनेतून संगमनेरकरांना ५०% शास्ती माफीचा मोठा दिलासा! नगराध्यक्षा डॉ. मैथिली तांबे यांची दमदार इनिंग सुरू

नवनिर्वाचित नगराध्यक्ष डॉ. मैथिली तांबे यांनी पदभार हाती घेताच त्यांच्या कार्यकाळातील अंमलबजावणी होणारा हा पहिलाच मोठा निर्णय ठरला आहे.
Annant PpangarkarBy Annant Ppangarkar10/01/2026Updated:10/01/2026No Comments2 Mins Read
Facebook Twitter WhatsApp
Share
Facebook Twitter Email Telegram WhatsApp

संगमनेर, अनंत पांगारकर- 

गेल्या काही दिवसांपासून संगमनेरच्या राजकीय वर्तुळात अत्यंत चर्चेचा आणि दोन्ही आमदारांच्या ‘पत्रक युद्धा’चा विषय ठरलेली मालमत्ता करावरील शास्ती माफी अखेर प्रत्यक्षात उतरली आहे. संगमनेर नगरपालिकेच्या हद्दीतील थकबाकीदार मिळकतधारकांसाठी राज्य शासनाच्या निर्णयानुसार ‘अभय योजना’ लागू करण्यात आली असून, यामुळे शहरातील हजारो मालमत्ताधारकांना मोठा आर्थिक दिलासा मिळणार आहे. या योजनेअंतर्गत मालमत्ता करावरील थकीत व्याजात (शास्ती) तब्बल ५० टक्के सवलत जाहीर करण्यात आली असून, प्रशासकीय पातळीवर झालेल्या पाठपुराव्याला अखेर यश आले आहे.

नवनिर्वाचित नगराध्यक्ष डॉ. मैथिली तांबे यांनी पदभार हाती घेताच त्यांच्या कार्यकाळातील अंमलबजावणी होणारा हा पहिलाच मोठा निर्णय ठरला आहे. गेली अनेक वर्ष संगमनेरकरांना अपेक्षित असलेला निर्णय तांबे यांच्या कार्यकाळात झाला. गेल्या काही महिन्यापासून या योजनेच्या अंमलबजावणीवरून शहरात मोठे राजकीय नाट्य पाहायला मिळाले होते. दोन्ही आमदारांनी या योजनेचे श्रेय घेण्यासाठी आपणच शासन दरबारी सातत्याने पाठपुरावा केल्याचा एकमेकांवर पत्रकांद्वारे जोरदार निशाणा साधला होता, यामुळे सामान्य नागरिकांमध्ये संभ्रमाचे वातावरण होते. मात्र, आता नगरपालिकेने अधिकृत जाहीर आवाहन केल्यामुळे या वादावर पडदा पडला असून शासकीय स्तरावरील कार्यवाही पूर्ण झाल्याचे स्पष्ट झाले आहे. नगरपालिकेने प्रसिद्ध केलेल्या अधिकृत माहितीनुसार, महाराष्ट्र नगरपरिषद, नगरपंचायत अधिनियम १९६५ च्या कलम १५० (क) मधील तरतुदीनुसार ही सवलत दिली जात आहे.

संगमनेर नगरपालिकेच्या नगराध्यक्ष डॉ. मैथिली सत्यजित तांबे आणि मुख्याधिकारी दयानंद गोरे यांनी नागरिकांना या योजनेचा जास्तीत जास्त लाभ घेण्याचे आवाहन केले आहे. 

या योजनेचे स्वरूप स्पष्ट करताना प्रशासनाने म्हटले आहे की, १९ मे २०२४ पर्यंत ज्या मिळकतधारकांची मालमत्ता कराची शास्ती थकबाकी आहे, त्यांनाच या ५० टक्के माफीचा लाभ घेता येईल. ही योजना केवळ एकदाच लागू करण्यात आली असून, लाभार्थ्यांनी ५० टक्के व्याज वगळता उर्वरित संपूर्ण थकबाकीची रक्कम एकरकमी भरणे अनिवार्य आहे. विशेष म्हणजे, ३१ मार्च २०२६ पर्यंतच या योजनेचा लाभ घेता येणार असून त्यानंतर कोणतीही सवलत लागू राहणार नाही, असेही प्रशासनाने सांगितले आहे.

सध्या सन २०२५-२६ च्या मालमत्ता कराची बिले नागरिकांना वाटप करण्यात आली आहेत. या पार्श्वभूमीवर, जुन्या थकबाकीवरील व्याजाचा बोजा कमी करण्याची ही सुवर्णसंधी असल्याचे नगराध्यक्ष डॉ. मैथिली तांबे यांनी नमूद केले आहे. तर मुख्याधिकारी दयानंद गोरे यांनी तांत्रिक बाबी स्पष्ट करताना सांगितले की, १९ मे २०२४ नंतरच्या थकबाकीवर ही योजना लागू होणार नाही, त्यामुळे नागरिकांनी मुदतीपूर्वी आपल्या कराचा भरणा करून शहराच्या विकासकामांना सहकार्य करावे. राजकीय श्रेयवादाच्या लढाईत अडकलेली ही योजना अखेर मार्गी लागल्याने संगमनेरच्या करदात्यांनी सुटकेचा निःश्वास सोडला आहे.

anantpangarkar
Annant Ppangarkar

Views: 1,095
माफी मैथिली तांबे शास्ती कर शास्ती योजना
Share. Facebook Twitter Pinterest WhatsApp
Annant Ppangarkar
  • Website

Related Posts

आमदार सत्यजीत तांबे यांची सपत्नीक श्री सोमेश्वर मंदिरात पूजा करून मानाच्या ‘इच्छापूर्ती गणेशा’च्या विसर्जन सोहळ्याला सुरुवात – नगराध्यक्षा डॉ. मैथिली तांबे व आमदार सत्यजित तांबे यांचा सपत्नीक सहभाग

25/09/2026

संगमनेर शहरात गणेशोत्सवाची जोरदार तयारी: खड्डेमुक्त रस्ते आणि मंडळांच्या समस्या सोडवण्यावर नगराध्यक्षा डॉ. मैथिली तांबे यांचा भर

09/09/2026

संगमनेर शहरात वाढणार सीसीटीव्हीची नजर; विविध विकासकामांचे सोमवारी बाळासाहेब थोरात यांच्या हस्ते होणार लोकार्पण

05/09/2026
Leave A Reply Cancel Reply

Document
Our Picks
  • Facebook
  • Twitter
  • Pinterest
  • Instagram
  • YouTube
Advertisement 1 Advertisement 2 Advertisement 3 Advertisement 4
Don't Miss
राशिभविष्य

गुरुवार, १५ ऑक्टोंबर — आजचा दिवस कसा असेल जाणून घ्या!

By Annant Ppangarkar15/10/20260

आजचे राशिभविष्य- मेष – घरात शुभ कार्याचे आयोजन होईल. वाहन विषयक काम मार्गी लागेल. एखादी…

संगमनेरच्या बाजारपेठेला मोठा दिलासा, दुष्काळाच्या संकटातही थोरात कारखान्याचा मोठा निर्णय; कामगारांना मिळणार इतका बोनस अन् सानुग्रह अनुदान; ऊस उत्पादकांना प्रतिटन एवढी मदत! लोकनेते बाळासाहेब थोरात यांची घोषणा

14/10/2026

रस्त्यावरील वादातून मारहाण, जीवे मारण्याची धमकी; संगमनेर न्यायालयाने सुनावली ही शिक्षा

14/10/2026

माझं गाव माझा अभिमान… राजापूर

14/10/2026
Thumbnail 1
Thumbnail 2
Thumbnail 3
Thumbnail 4
previous arrow
next arrow
Thumbnail 1
Thumbnail 2
Thumbnail 3
Thumbnail 4
previous arrow
next arrow

तुमचे हक्काचे व्यासपीठ

Facebook YouTube
Our Picks
October 2026
M T W T F S S
 1234
567891011
12131415161718
19202122232425
262728293031  
« Sep    
  • Home
  • आंदोलन
  • आरोग्य
  • इतिहास
  • क्रिडा व कला
  • गुन्हेगारी
  • न्यायालय
  • पत्रकारिता
  • फोटो / गॅलरी
  • महाराष्ट्र संवाद विशेष
  • राजकारण
  • विकास
  • विश्लेषण
  • शिक्षण
  • शेती व सहकार
  • सामाजिक
  • CONTACT US
  • ABOUT US
  • PRIVACY POLICY
© 2026 ThemeSphere. Designed by ThemeSphere.

Type above and press Enter to search. Press Esc to cancel.