Close Menu
महाराष्ट्र संवादमहाराष्ट्र संवाद
  • Home
  • आंदोलन
  • आरोग्य
  • इतिहास
  • क्रिडा व कला
  • गुन्हेगारी
  • न्यायालय
  • महाराष्ट्र संवाद विशेष
  • राजकारण
  • विकास
  • विश्लेषण
  • शिक्षण
What's Hot

सोशल मीडिया रिल्सच्या प्रभावापासून दूर राहून तरुणांनी ‘गुंतवणूक भान’ जपावे : सुनील कडलग

09/09/2026

आज बुधवार, ०९ सप्टेंबर २०२६ — तुमचा आजचा दिवस कसा असेल, जाणून घ्या

09/09/2026

विशेष वृत्त राजकीय दबावातून पोलिसांची संगमनेरच्या सुरक्षेकडे पाठ; २०० कॅमेऱ्यांच्या लोकार्पण सोहळ्यावर बहिष्कारातून नागरिकांमध्ये संताप… नगरपालिकेची सुरक्षेसाठी धडपड, तर पोलीस प्रशासनाची उघड-उघड उदासीनता

08/09/2026
Facebook X (Twitter) Instagram
महाराष्ट्र संवादमहाराष्ट्र संवाद
  • Home
  • आंदोलन
  • आरोग्य
  • इतिहास
  • क्रिडा व कला
  • गुन्हेगारी
  • न्यायालय
  • महाराष्ट्र संवाद विशेष
  • राजकारण
  • विकास
  • विश्लेषण
  • शिक्षण
Facebook X (Twitter) Instagram
महाराष्ट्र संवादमहाराष्ट्र संवाद
Home » संगमनेरात जनसागर उसळला! कृषी प्रदर्शनाला ३ लाखांहून अधिक नागरिकांची भेट; ‘ट्युलिप गार्डन’ ठरतेय मुख्य आकर्षण
महाराष्ट्र संवाद विशेष

संगमनेरात जनसागर उसळला! कृषी प्रदर्शनाला ३ लाखांहून अधिक नागरिकांची भेट; ‘ट्युलिप गार्डन’ ठरतेय मुख्य आकर्षण

डेअरी प्रदर्शनामध्ये राज्यभरातून दाखल झालेल्या २५० विविध जातींच्या गाई आणि दीड टन वजनाचा अजस्त्र वळू पाहण्यासाठी शेतकऱ्यांसह तरुणांनी मोठी गर्दी केली आहे.
Annant PpangarkarBy Annant Ppangarkar11/01/2026No Comments2 Mins Read
Facebook Twitter WhatsApp
Share
Facebook Twitter Email Telegram WhatsApp

संगमनेर, प्रतिनिधी- 

कृषी क्षेत्रात येणाऱ्या नवनवीन तंत्रज्ञानाची माहिती थेट शेतकऱ्यांच्या बांधापर्यंत पोहोचावी, या उद्देशाने शिवछत्रपती प्रतिष्ठान व अमृतवाहिनी शिक्षण संस्थेच्या वतीने आयोजित करण्यात आलेल्या ‘कळस कृषी व डेअरी प्रदर्शनाने’ लोकप्रियतेचे सर्व विक्रम मोडीत काढले आहेत. थोरात कृषी महाविद्यालयाच्या प्रांगणात भरलेल्या या ज्ञानकुंभाला गेल्या तीन दिवसांमध्ये तब्बल ३ लाख ९ हजार ४७२ नागरिकांनी भेट दिली असून, संपूर्ण परिसर जनसागराने ओसंडून वाहत आहे.

माजी कृषिमंत्री लोकनेते बाळासाहेब थोरात यांच्या मार्गदर्शनाखाली ४० एकरच्या विस्तीर्ण परिसरात हे भव्य प्रदर्शन भरवण्यात आले आहे. या प्रदर्शनाला माजी आमदार डॉ. सुधीर तांबे, माजी मंत्री दिनेश ठाकूर, केंद्रीय पशुसंवर्धन आयुक्त प्रवीण मलिक, माजी नगराध्यक्ष दुर्गाताई तांबे, एकविरा फाउंडेशनच्या संस्थापक डॉ. जयश्रीताई थोरात, संगमनेरच्या नगराध्यक्ष डॉ. मैथिलीताई तांबे आणि दूध संघाचे कार्यकारी संचालक डॉ. सुजित खिलारी यांच्यासह अमृत उद्योग समूहातील पदाधिकारी आणि राज्यभरातील मान्यवरांनी भेटी दिल्या.

या प्रदर्शनाचे मुख्य वैशिष्ट्य म्हणजे पाच एकर परिसरामध्ये उभारलेले प्रशस्त पीक प्रात्यक्षिक प्लॉट, जिथे ६९ विविध पिकांच्या ३५० जातींची माहिती शेतकऱ्यांना प्रत्यक्ष पाहता येत आहे. आधुनिक यंत्रसामग्रीचा ‘मशिनरी एक्स्पो’, शैक्षणिक माहिती देणारा ‘एज्युकेशन एक्स्पो’ आणि महिला बचत गटांच्या हाताला काम देणारे विविध वस्तूंचे स्टॉल्स यामुळे या प्रदर्शनाला व्यावसायिक स्वरूप प्राप्त झाले आहे. डेअरी प्रदर्शनामध्ये राज्यभरातून दाखल झालेल्या २५० विविध जातींच्या गाई आणि दीड टन वजनाचा अजस्त्र वळू पाहण्यासाठी शेतकऱ्यांसह तरुणांनी मोठी गर्दी केली आहे.

याप्रसंगी केंद्रीय पशु आयुक्त प्रवीण मलिक यांनी माजी मंत्री बाळासाहेब थोरात यांच्या कृषी क्षेत्रातील कार्याचा गौरव केला. थोरात यांच्या कार्यकाळात महाराष्ट्रात मोठी कृषी क्रांती झाली असून, एकाच ठिकाणी सर्व आधुनिक सोयी-सुविधा उपलब्ध करून देणारे हे प्रदर्शन देशपातळीवरील मानाचे प्रदर्शन असल्याचे त्यांनी नमूद केले. तर डॉ. मैथिलीताई तांबे यांनी ग्रामीण भागातील विद्यार्थी आणि महिलांच्या मोठ्या सहभागाचे कौतुक करताना, शेतीकडे व्यवसाय म्हणून पाहिल्यास आणि तंत्रज्ञानाची जोड दिल्यास ती नक्कीच प्रगतीकारक ठरेल, असा विश्वास व्यक्त केला.

या प्रदर्शनाचे आणखी एक आकर्षण म्हणजे महाराष्ट्रातील पहिले ‘ट्युलिप गार्डन’. लोकनेते बाळासाहेब थोरात यांच्या संकल्पनेतून साकारलेल्या या काश्मीरच्या धर्तीवरील बागेला आतापर्यंत १ लाख ८० हजार नागरिकांनी भेट दिली आहे. रंगीबेरंगी ट्युलिपची फुले आणि सेल्फी पॉईंट्समुळे तरुणाईची येथे मोठी झुंबड उडाली आहे. केवळ अहिल्यानगर जिल्हाच नव्हे, तर पश्चिम बंगाल आणि कर्नाटकसारख्या राज्यांतूनही शेतकरी येथे मोठ्या संख्येने येत आहेत.

कार्यक्रमाचे प्रास्ताविक डॉ. जयश्रीताई थोरात यांनी केले, तर सूत्रसंचालन नामदेव कहांडळ व बाचकर जी.बी. यांनी केले. शेवटी सागर वाकचौरे यांनी उपस्थितांचे आभार मानले.

anantpangarkar
Annant Ppangarkar

Post Views: 849
अमृतवाहिनी कृषी महाविद्यालय कळस कृषी प्रदर्शन
Share. Facebook Twitter Pinterest WhatsApp
Annant Ppangarkar
  • Website

Related Posts

वर्गणीवरून व्यापाऱ्याला मारहाण; गणेशोत्सवाच्या तोंडावर बाजारपेठेत खळबळ, पोलीस तक्रारीविना चर्चेला उधाण

05/09/2026

माहिती अधिकाराचे प्रणेते अण्णा हजारे यांची मुख्य माहिती आयुक्त राहुल पांडे यांनी घेतली सदिच्छा भेट; प्रकृतीची केली विचारपूस

03/09/2026

रविवार विशेष — पुणे–नाशिक रेल्वे : २५ दिवस संपले, आता प्रश्न फक्त कमिटीचा नाही… सरकारच्या इच्छाशक्तीचा आहे! एक संगमनेरकर म्हणून काही थेट प्रश्न…

30/08/2026
Leave A Reply Cancel Reply

Document
Our Picks
  • Facebook
  • Twitter
  • Pinterest
  • Instagram
  • YouTube
Advertisement 1 Advertisement 2 Advertisement 3 Advertisement 4
Don't Miss
आर्थिक

सोशल मीडिया रिल्सच्या प्रभावापासून दूर राहून तरुणांनी ‘गुंतवणूक भान’ जपावे : सुनील कडलग

By Annant Ppangarkar09/09/20260

Annant Ppangarkar महाराष्ट्र संवाद न्यूज ऑनलाईन – सोशल मीडियावरील रिल्स, भ्रामक ट्रेंड आणि ऑनलाइन चर्चांच्या…

आज बुधवार, ०९ सप्टेंबर २०२६ — तुमचा आजचा दिवस कसा असेल, जाणून घ्या

09/09/2026

विशेष वृत्त राजकीय दबावातून पोलिसांची संगमनेरच्या सुरक्षेकडे पाठ; २०० कॅमेऱ्यांच्या लोकार्पण सोहळ्यावर बहिष्कारातून नागरिकांमध्ये संताप… नगरपालिकेची सुरक्षेसाठी धडपड, तर पोलीस प्रशासनाची उघड-उघड उदासीनता

08/09/2026

शिंदेवाडी जिल्हा परिषद शाळेत ‘एक विद्यार्थी, एक बेंच’ उपक्रमाला अभूतपूर्व प्रतिसाद; आठवडाभरात ६८ हजारांच्या लोकसहभागातून ४० बेंचचे लोकार्पण

08/09/2026
Thumbnail 1
Thumbnail 2
Thumbnail 3
Thumbnail 4
previous arrow
next arrow
Thumbnail 1
Thumbnail 2
Thumbnail 3
Thumbnail 4
previous arrow
next arrow

तुमचे हक्काचे व्यासपीठ

Facebook YouTube
Our Picks
September 2026
M T W T F S S
 123456
78910111213
14151617181920
21222324252627
282930  
« Aug    
  • Home
  • आंदोलन
  • आरोग्य
  • इतिहास
  • क्रिडा व कला
  • गुन्हेगारी
  • न्यायालय
  • पत्रकारिता
  • फोटो / गॅलरी
  • महाराष्ट्र संवाद विशेष
  • राजकारण
  • विकास
  • विश्लेषण
  • शिक्षण
  • शेती व सहकार
  • सामाजिक
  • CONTACT US
  • ABOUT US
  • PRIVACY POLICY
© 2026 ThemeSphere. Designed by ThemeSphere.

Type above and press Enter to search. Press Esc to cancel.