Close Menu
महाराष्ट्र संवादमहाराष्ट्र संवाद
  • Home
  • आंदोलन
  • आरोग्य
  • इतिहास
  • क्रिडा व कला
  • गुन्हेगारी
  • न्यायालय
  • महाराष्ट्र संवाद विशेष
  • राजकारण
  • विकास
  • विश्लेषण
  • शिक्षण
What's Hot

गुरुवार, १५ ऑक्टोंबर — आजचा दिवस कसा असेल जाणून घ्या!

15/10/2026

संगमनेरच्या बाजारपेठेला मोठा दिलासा, दुष्काळाच्या संकटातही थोरात कारखान्याचा मोठा निर्णय; कामगारांना मिळणार इतका बोनस अन् सानुग्रह अनुदान; ऊस उत्पादकांना प्रतिटन एवढी मदत! लोकनेते बाळासाहेब थोरात यांची घोषणा

14/10/2026

रस्त्यावरील वादातून मारहाण, जीवे मारण्याची धमकी; संगमनेर न्यायालयाने सुनावली ही शिक्षा

14/10/2026
Facebook X (Twitter) Instagram
महाराष्ट्र संवादमहाराष्ट्र संवाद
  • Home
  • आंदोलन
  • आरोग्य
  • इतिहास
  • क्रिडा व कला
  • गुन्हेगारी
  • न्यायालय
  • महाराष्ट्र संवाद विशेष
  • राजकारण
  • विकास
  • विश्लेषण
  • शिक्षण
Facebook X (Twitter) Instagram
महाराष्ट्र संवादमहाराष्ट्र संवाद
Home » मंत्रालयातून महात्मा फुलेंचे साहित्य गायब; बहुजन इतिहास पुसण्याचे मोठे षडयंत्र! संगमनेरमध्ये संताप, प्रांताधिकाऱ्यांना RGSS ने दिले निवेदन
महाराष्ट्र संवाद विशेष

मंत्रालयातून महात्मा फुलेंचे साहित्य गायब; बहुजन इतिहास पुसण्याचे मोठे षडयंत्र! संगमनेरमध्ये संताप, प्रांताधिकाऱ्यांना RGSS ने दिले निवेदन

महात्मा फुले यांचे विचार सरकारला अडचणीचे ठरत असल्यानेच हे साहित्य गायब केले जात असल्याचे निवेदनात नमूद करण्यात आले आहे
Annant PpangarkarBy Annant Ppangarkar13/01/2026No Comments2 Mins Read
Facebook Twitter WhatsApp
Share
Facebook Twitter Email Telegram WhatsApp

संगमनेर, प्रतिनिधी –
मंत्रालयाच्या माहिती व जनसंपर्क विभागातून थोर समाजसुधारक क्रांतिसूर्य महात्मा जोतिबा फुले यांच्या जीवनावर आधारित ऐतिहासिक साहित्य आणि माहिती गहाळ झाल्याचा अत्यंत गंभीर प्रकार समोर आला आहे. ही केवळ साहित्याची चोरी नसून बहुजन महापुरुषांचा इतिहास पुसण्याचे एक मोठे षडयंत्र असल्याचा खळबळजनक आरोप करत, यासंदर्भात राहुल गांधी समर्थक संघाच्या (RGSS) कार्यकर्त्यांनी संगमनेरच्या प्रांताधिकार्‍यांना निवेदन दिले. नायब तहसीलदार मार्तंड माळवे यांनी निवेदन स्वीकारले.
या निवेदनात म्हटले आहे की, २०१७ ते २०२० या दरम्यान महात्मा फुले यांच्या कार्याशी संबंधित महत्त्वाची माहिती मंत्रालयातून गायब झाली आहे. मंत्रालयासारख्या अतिसुरक्षित ठिकाणी जर ऐतिहासिक दस्तऐवज सुरक्षित नसतील, तर सर्वसामान्य नागरिकांच्या सुरक्षेचा प्रश्न निर्माण होतो. नागरिकांनी नक्की कोणाच्या भरोशावर जगायचे, असा प्रश्नही या निमित्ताने उपस्थित करण्यात आला आहे. एकीकडे सरकारचे समर्थक महापुरुषांचा अवमान करतात आणि दुसरीकडे त्याच सरकारच्या काळात महापुरुषांचे साहित्य नष्ट होते, हे जाणीवपूर्वक रचलेले कारस्थान असल्याचा संशय कार्यकर्त्यांनी व्यक्त केला आहे.
महात्मा फुले यांचे विचार सरकारला अडचणीचे ठरत असल्यानेच हे साहित्य गायब केले जात असल्याचे निवेदनात नमूद करण्यात आले आहे. विशेष म्हणजे, गेल्या काही वर्षांपासून महात्मा फुले यांचे कोणतेही नवीन साहित्य प्रकाशित झाले नसतानाही त्यावरील निधी खर्च केला जात आहे, याकडेही प्रशासनाचे लक्ष वेधण्यात आले.
या प्रकरणाबाबत मरीन ड्राईव्ह पोलीस ठाण्यात अज्ञात व्यक्तीविरुद्ध गुन्हा दाखल असूनही, अद्याप कोणालाही अटक झालेली नाही. या विज्ञानयुगात आरोपीचा शोध न लागणे ही मोठी शोकांतिका असल्याचे कार्यकर्त्यांनी म्हटले आहे. या प्रकरणाची सखोल चौकशी करून गुन्हेगारांवर कठोर कारवाई करावी आणि महापुरुषांचा इतिहास जिवंत ठेवावा, अशी आग्रही मागणी यावेळी करण्यात आली.
हे निवेदन देताना आर.जी.एस.एस. चे समन्वयक सतीश खताळ, राम अरगडे, अमोल शेलकर, अरुण चव्हाण, प्रकाश कडलग, अरुणकाका गावित्रे, अरुण जाधव, रवींद्र हासे आणि राजेंद्र गिरी यांच्यासह इतर पदाधिकारी व कार्यकर्ते उपस्थित होते.

anantpangarkar
Annant Ppangarkar

Views: 504
आरजीएसएस निवेदन राहुल गांधी समर्थक संघ
Share. Facebook Twitter Pinterest WhatsApp
Annant Ppangarkar
  • Website

Related Posts

“राजा किती क्रूर आणि खोटारडा आहे…” आई-बाळाची आर्त हाक अन् पोलिसांचा पाशवी हात; संजय राऊतांनी शेअर केलेल्या ‘त्या’ एका छायाचित्राने हादरवला महाराष्ट्र!

12/10/2026

MPSC आंदोलनाला डॉ. जयश्रीताई थोरात यांचा पाठिंबा; समाज आणि आयोगातील ब्लड कॅन्सर ठीक करायचाय!

10/10/2026

आमदार अमोल खताळ यांनी वेधले ऊर्जा राज्यमंत्र्यांचे लक्ष; मेंढवन उपकेंद्राचे काम तातडीने सुरू करण्याची मागणी

10/10/2026
Leave A Reply Cancel Reply

Document
Our Picks
  • Facebook
  • Twitter
  • Pinterest
  • Instagram
  • YouTube
Advertisement 1 Advertisement 2 Advertisement 3 Advertisement 4
Don't Miss
राशिभविष्य

गुरुवार, १५ ऑक्टोंबर — आजचा दिवस कसा असेल जाणून घ्या!

By Annant Ppangarkar15/10/20260

आजचे राशिभविष्य- मेष – घरात शुभ कार्याचे आयोजन होईल. वाहन विषयक काम मार्गी लागेल. एखादी…

संगमनेरच्या बाजारपेठेला मोठा दिलासा, दुष्काळाच्या संकटातही थोरात कारखान्याचा मोठा निर्णय; कामगारांना मिळणार इतका बोनस अन् सानुग्रह अनुदान; ऊस उत्पादकांना प्रतिटन एवढी मदत! लोकनेते बाळासाहेब थोरात यांची घोषणा

14/10/2026

रस्त्यावरील वादातून मारहाण, जीवे मारण्याची धमकी; संगमनेर न्यायालयाने सुनावली ही शिक्षा

14/10/2026

माझं गाव माझा अभिमान… राजापूर

14/10/2026
Thumbnail 1
Thumbnail 2
Thumbnail 3
Thumbnail 4
previous arrow
next arrow
Thumbnail 1
Thumbnail 2
Thumbnail 3
Thumbnail 4
previous arrow
next arrow

तुमचे हक्काचे व्यासपीठ

Facebook YouTube
Our Picks
October 2026
M T W T F S S
 1234
567891011
12131415161718
19202122232425
262728293031  
« Sep    
  • Home
  • आंदोलन
  • आरोग्य
  • इतिहास
  • क्रिडा व कला
  • गुन्हेगारी
  • न्यायालय
  • पत्रकारिता
  • फोटो / गॅलरी
  • महाराष्ट्र संवाद विशेष
  • राजकारण
  • विकास
  • विश्लेषण
  • शिक्षण
  • शेती व सहकार
  • सामाजिक
  • CONTACT US
  • ABOUT US
  • PRIVACY POLICY
© 2026 ThemeSphere. Designed by ThemeSphere.

Type above and press Enter to search. Press Esc to cancel.