Close Menu
महाराष्ट्र संवादमहाराष्ट्र संवाद
  • Home
  • आंदोलन
  • आरोग्य
  • इतिहास
  • क्रिडा व कला
  • गुन्हेगारी
  • न्यायालय
  • महाराष्ट्र संवाद विशेष
  • राजकारण
  • विकास
  • विश्लेषण
  • शिक्षण
What's Hot

आमदार सत्यजीत तांबे यांच्या प्रयत्नांना यश; संगमनेरच्या रस्ते विकासासाठी १० कोटींचा निधी मंजूर! बसस्थानक ते प्रवरापुलापर्यंतच्या रस्त्याचा होणार विकास; रुंदीकरणासह ड्रेनेज व्यवस्थेचाही समावेश

16/10/2026

दसरा विशेष: संगमनेरच्या मालपाणी पार्कमध्ये होणाऱ्या ‘या’ खास सोहळ्याचे संपूर्ण वेळापत्रक आणि प्रमुख आकर्षणे एका क्लिकवर!

16/10/2026

२ वर्षे २ महिने तुरुंगवास अन् अखेर न्याय! पोक्सो खटल्यातून संगमनेरच्या तरुणाची सुटका; न्यायालयाचा ‘हा’ महत्त्वाचा निर्णय

16/10/2026
Facebook X (Twitter) Instagram
महाराष्ट्र संवादमहाराष्ट्र संवाद
  • Home
  • आंदोलन
  • आरोग्य
  • इतिहास
  • क्रिडा व कला
  • गुन्हेगारी
  • न्यायालय
  • महाराष्ट्र संवाद विशेष
  • राजकारण
  • विकास
  • विश्लेषण
  • शिक्षण
Facebook X (Twitter) Instagram
महाराष्ट्र संवादमहाराष्ट्र संवाद
Home » वडीलोपार्जित संपत्तीच्या वादावरून ७० वर्षीय वृद्धेला चौघींकडून बेदम मारहाण! संगमनेरमधील महिलांसह चौघेविरोधात मुंबईच्या वडाळ्यात गुन्हा दाखल
गुन्हेगारी

वडीलोपार्जित संपत्तीच्या वादावरून ७० वर्षीय वृद्धेला चौघींकडून बेदम मारहाण! संगमनेरमधील महिलांसह चौघेविरोधात मुंबईच्या वडाळ्यात गुन्हा दाखल

पोलीस ठाण्यात अदखलपात्र गुन्हा म्हणून करण्यात आली होती. त्यानंतर शुक्रवारी (२३ जानेवारी) सकाळी १०:४५ च्या सुमारास पुन्हा या वादाचा भडका उडाला.
Annant PpangarkarBy Annant Ppangarkar24/01/2026No Comments2 Mins Read
Facebook Twitter WhatsApp
Share
Facebook Twitter Email Telegram WhatsApp

मुंबई (वडाळा):

मुंबईतील वडाळा पूर्व येथील आनंदवाडी परिसरात वडिलोपार्जित मालमत्तेच्या वादाने हिंसक वळण घेतले आहे. एका ७० वर्षीय वृद्ध महिलेला तिच्याच नातेवाईक असलेल्या चार महिलांनी घरात घुसून बेदम मारहाण केल्याची खळबळजनक घटना समोर आली आहे. या हल्ल्यात मध्यस्थी करणाऱ्या वृद्धेच्या मुलीलाही आरोपींनी सोडले नाही. याप्रकरणी वडाळा पोलिस ठाण्यात चार महिलांविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

तक्रारदार ज्योत्सना राजेंद्र जाधव (४३) यांनी दिलेल्या माहितीनुसार, त्यांचे आई-वडील आणि चुलत भाऊ किशोर दादू वाघमारे यांच्यामध्ये गेल्या अनेक दिवसांपासून संपत्तीचा वाद सुरू आहे. हा वाद प्रामुख्याने अहिल्यानगर जिल्ह्यातील संगमनेर येथील शेतजमिनीशी संबंधित वाद न्यायालयात सुरू आहे. तसेच मुंबईतील वडाळा येथील घराशी संबंधितही हा वाद आहे. २१ जानेवारी २०२६ रोजी वांद्रे येथील एस.आर.ए. कार्यालयात झालेल्या सुनावणीत तक्रारदाराच्या आईने घराची सर्व अधिकृत कागदपत्रे सादर केली होती. 

मात्र, किशोर वाघमारेकडे कोणतीही कायदेशीर कागदपत्रे नसल्याने त्याला तेथून बाहेर काढण्यात आले होते, याचा राग त्याने मनात धरला होता. २२ जानेवारी रोजी देखील किशोरने वृद्ध सुमन वाघमारे यांच्याशी हुज्जत घातली होती, याची नोंद वडाळा पोलीस ठाण्यात अदखलपात्र गुन्हा म्हणून करण्यात आली होती.

त्यानंतर शुक्रवारी (२३ जानेवारी) सकाळी १०:४५ च्या सुमारास पुन्हा या वादाचा भडका उडाला. किशोर वाघमारेची पत्नी माया, आणि त्याच्या तीन बहिणी संगीता दिलीप अभंग, वनिता कैलाश पवार व सुनिता रविंद्र पवार या सर्वजणी खळी, संगमनेरहून वडाळ्यात आल्या. या महिलांनी प्रथम तक्रारदार ज्योत्सना जाधव यांच्या घराच्या वरच्या मजल्यावर लोखंडी शिडीने चढण्याचा प्रयत्न केला व शिवीगाळ सुरू केली. घाबरलेल्या जाधव यांनी घराची लोखंडी जाळी बंद करून घेतली, त्यामुळे आरोपी महिलांचा मोर्चा शेजारीच राहणाऱ्या ७० वर्षीय सुमन रामदास वाघमारे यांच्या घराकडे वळाला.

आरोपी माया, संगीता, वनिता आणि सुनिता यांनी सुमन वाघमारे यांच्या घरात बळजबरीने प्रवेश केला आणि त्यांना ओढत घराबाहेर काढले. मायाने सुमन यांना घट्ट पकडून ठेवले, तर इतर तिघींनी त्यांना जमिनीवर पाडून लाथाबुक्क्यांनी अमानुष मारहाण केली. आपल्या आईचा जीव वाचवण्यासाठी धावून आलेल्या ज्योत्सना जाधव यांनाही या महिलांनी मारहाण करून दुखापत केली.

हल्ल्यानंतर सुमन वाघमारे यांची प्रकृती चिंताजनक झाल्याने त्यांना तातडीने सायन रुग्णालयात उपचारासाठी दाखल करण्यात आले आहे. वडाळा पोलिसांनी या घटनेची गंभीर दखल घेत आरोपी माया वाघमारे, संगीता अभंग, वनिता पवार आणि सुनिता पवार यांच्या विरोधात भारतीय न्याय संहिता (BNS), २०२३ च्या कलम ३(५), ३५२, ११५(२) आणि ३२९(४) अन्वये गुन्हा नोंदवला आहे. पोलीस निरीक्षक सुदर्शन होनवाडजकर यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस उपनिरीक्षक श्रीधर डोंगरे या प्रकरणाचा सखोल तपास करत आहेत.

anantpangarkar
Annant Ppangarkar

Views: 691
गुन्हेगारी मारहाण
Share. Facebook Twitter Pinterest WhatsApp
Annant Ppangarkar
  • Website

Related Posts

कर्ज वसुलीच्या नावाखाली संगमनेरात महिलेचा विनयभंग; आरोपीवर गुन्हा दाखल

15/10/2026

संगमनेरमध्ये ८८ लाखांचा गांजा जप्त; दोन तस्करांना अटक, तीन साथीदार फरार

06/10/2026

एलसीबी अन्‌ एफडीएची धडक कारवाई; १२.८१ लाखांच्या गुटख्यासह दोघांना अटक, चार जण फरार

05/10/2026
Leave A Reply Cancel Reply

Document
Our Picks
  • Facebook
  • Twitter
  • Pinterest
  • Instagram
  • YouTube
Advertisement 1 Advertisement 2 Advertisement 3 Advertisement 4
Don't Miss
राजकारण

आमदार सत्यजीत तांबे यांच्या प्रयत्नांना यश; संगमनेरच्या रस्ते विकासासाठी १० कोटींचा निधी मंजूर! बसस्थानक ते प्रवरापुलापर्यंतच्या रस्त्याचा होणार विकास; रुंदीकरणासह ड्रेनेज व्यवस्थेचाही समावेश

By Annant Ppangarkar16/10/20260

महाराष्ट्र संवाद न्यूज ऑनलाईन- संगमनेर शहराच्या पायाभूत सुविधा विकासाला चालना देण्यासाठी आमदार सत्यजीत तांबे यांच्या…

दसरा विशेष: संगमनेरच्या मालपाणी पार्कमध्ये होणाऱ्या ‘या’ खास सोहळ्याचे संपूर्ण वेळापत्रक आणि प्रमुख आकर्षणे एका क्लिकवर!

16/10/2026

२ वर्षे २ महिने तुरुंगवास अन् अखेर न्याय! पोक्सो खटल्यातून संगमनेरच्या तरुणाची सुटका; न्यायालयाचा ‘हा’ महत्त्वाचा निर्णय

16/10/2026

वय विसरले अन् झिंगाटवर थिरकले! ४० वर्षांनंतर भेटले सेवानिवृत्त शिक्षक मित्र; भंडारदऱ्यातील भाऊक ‘गेट-टुगेदर’ची खास बातमी

16/10/2026
Thumbnail 1
Thumbnail 2
Thumbnail 3
Thumbnail 4
previous arrow
next arrow
Thumbnail 1
Thumbnail 2
Thumbnail 3
Thumbnail 4
previous arrow
next arrow

तुमचे हक्काचे व्यासपीठ

Facebook YouTube
Our Picks
October 2026
M T W T F S S
 1234
567891011
12131415161718
19202122232425
262728293031  
« Sep    
  • Home
  • आंदोलन
  • आरोग्य
  • इतिहास
  • क्रिडा व कला
  • गुन्हेगारी
  • न्यायालय
  • पत्रकारिता
  • फोटो / गॅलरी
  • महाराष्ट्र संवाद विशेष
  • राजकारण
  • विकास
  • विश्लेषण
  • शिक्षण
  • शेती व सहकार
  • सामाजिक
  • CONTACT US
  • ABOUT US
  • PRIVACY POLICY
© 2026 ThemeSphere. Designed by ThemeSphere.

Type above and press Enter to search. Press Esc to cancel.