Close Menu
महाराष्ट्र संवादमहाराष्ट्र संवाद
  • Home
  • आंदोलन
  • आरोग्य
  • इतिहास
  • क्रिडा व कला
  • गुन्हेगारी
  • न्यायालय
  • महाराष्ट्र संवाद विशेष
  • राजकारण
  • विकास
  • विश्लेषण
  • शिक्षण
What's Hot

स्थानिक गुन्हे शाखेची कारवाई: साडेसहा लाखांचा गुटखा जप्त, संगमनेरातील दोघांसह चार जणांवर गुन्हा दाखल

17/10/2026

संगमनेरातील ‘या’ मुख्य रस्त्याचे नशीब बदलणार! आमदार अमोल खताळ यांच्या प्रयत्नांना यश; १० कोटींचा मोठा निधी मंजूर

17/10/2026

संगमनेर तालुक्यातील धांदरफळ बुद्रुक येथे नवरात्रोत्सवातील दांडिया कार्यक्रमादरम्यान तुफान राडा; दोन्ही बाजूंच्या परस्परविरोधी गुन्ह्यांत लोखंडी रॉड, चाकू आणि फायटरने जीवघेणा हल्ला

17/10/2026
Facebook X (Twitter) Instagram
महाराष्ट्र संवादमहाराष्ट्र संवाद
  • Home
  • आंदोलन
  • आरोग्य
  • इतिहास
  • क्रिडा व कला
  • गुन्हेगारी
  • न्यायालय
  • महाराष्ट्र संवाद विशेष
  • राजकारण
  • विकास
  • विश्लेषण
  • शिक्षण
Facebook X (Twitter) Instagram
महाराष्ट्र संवादमहाराष्ट्र संवाद
Home » बसस्थानक परिसरात अश्लील हावभाव करणाऱ्या ११ महिलांवर पोलिसांची कारवाई
गुन्हेगारी

बसस्थानक परिसरात अश्लील हावभाव करणाऱ्या ११ महिलांवर पोलिसांची कारवाई

बस स्थानक परिसरात काही महिला रस्त्याच्या कडेला उभ्या राहून प्रवाशांकडे पाहून अश्लील हावभाव करत असल्याची गोपनीय माहिती
Annant PpangarkarBy Annant Ppangarkar11/02/2026No Comments1 Min Read
Facebook Twitter WhatsApp
Share
Facebook Twitter Email Telegram WhatsApp

अहिल्यानगर:
शहरातील माळीवाडा बस स्थानक परिसरात येणाऱ्या-जाणाऱ्या नागरिकांकडे पाहून अश्लील हावभाव करणाऱ्या आणि गाणी म्हणत सार्वजनिक शांतता व वातावरण दूषित करणाऱ्या ११ महिलांवर कोतवाली पोलिसांनी बुधवारी मोठी कारवाई केली. याप्रकरणी पोलिसांनी संबंधित महिलांना ताब्यात घेऊन त्यांच्याविरुद्ध विविध कलमान्वये गुन्हा दाखल केला आहे.
मिळालेल्या माहितीनुसार, माळीवाडा बस स्थानक परिसरात काही महिला रस्त्याच्या कडेला उभ्या राहून प्रवाशांकडे पाहून अश्लील हावभाव करत असल्याची गोपनीय माहिती उपविभागीय पोलीस अधिकारी दिलीप टिपरसे यांना मिळाली होती. या माहितीची गांभीर्याने दखल घेत त्यांनी तातडीने कारवाई करण्याचे आदेश दिले.
पोलीस निरीक्षक संभाजी गायकवाड यांच्या सूचनेनुसार, सहाय्यक पोलीस निरीक्षक तेजश्री थोरात, पोलीस उपनिरीक्षक मुगडे, प्रवीण पाटील आणि त्यांच्या पथकाने माळीवाडा परिसरात सापळा रचून खात्री केली. यावेळी काही महिला संशयास्पद रित्या अश्लील वर्तन करताना आढळल्याने पोलिसांनी त्यांना जागीच ताब्यात घेतले.
याप्रकरणी महिला पोलीस हवालदार रोहिणी दरंदले यांनी दिलेल्या फिर्यादीवरून कोतवाली पोलीस ठाण्यात गुन्हा रजिस्टर क्रमांक १०१/२०२६ नुसार भारतीय न्याय संहिता कलम २७१, २९२, २९६ सह महाराष्ट्र पोलीस अधिनियम कलम ११०/११७ अन्वये गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
ही कारवाई पोलीस अधीक्षक सोमनाथ घार्गे, अपर पोलीस अधीक्षक वैभव कलुबर्मे आणि उपविभागीय पोलीस अधिकारी दिलीप टिपरसे यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस निरीक्षक संभाजी गायकवाड, सहाय्यक पोलीस निरीक्षक तेजश्री थोरात, पोलीस उपनिरीक्षक मुगडे, पोलीस उपनिरीक्षक प्रवीण पाटील यांच्या पथकाने यशस्वीरित्या पूर्ण केली.

anantpangarkar
Annant Ppangarkar

Views: 1,473
अश्लील हावभाव कारवाई कोतवाली पोलीस
Share. Facebook Twitter Pinterest WhatsApp
Annant Ppangarkar
  • Website

Related Posts

स्थानिक गुन्हे शाखेची कारवाई: साडेसहा लाखांचा गुटखा जप्त, संगमनेरातील दोघांसह चार जणांवर गुन्हा दाखल

17/10/2026

संगमनेर तालुक्यातील धांदरफळ बुद्रुक येथे नवरात्रोत्सवातील दांडिया कार्यक्रमादरम्यान तुफान राडा; दोन्ही बाजूंच्या परस्परविरोधी गुन्ह्यांत लोखंडी रॉड, चाकू आणि फायटरने जीवघेणा हल्ला

17/10/2026

कर्ज वसुलीच्या नावाखाली संगमनेरात महिलेचा विनयभंग; आरोपीवर गुन्हा दाखल

15/10/2026
Leave A Reply Cancel Reply

Document
Our Picks
  • Facebook
  • Twitter
  • Pinterest
  • Instagram
  • YouTube
Advertisement 1 Advertisement 2 Advertisement 3 Advertisement 4
Don't Miss
गुन्हेगारी

स्थानिक गुन्हे शाखेची कारवाई: साडेसहा लाखांचा गुटखा जप्त, संगमनेरातील दोघांसह चार जणांवर गुन्हा दाखल

By Annant Ppangarkar17/10/20260

महाराष्ट्र संवाद न्यूज ऑनलाईन- संगमनेर शहरालगतच्या गुंजाळवाडी परिसरात अवैधरित्या गुटख्याची वाहतूक करणाऱ्या वाहनावर स्थानिक गुन्हे…

संगमनेरातील ‘या’ मुख्य रस्त्याचे नशीब बदलणार! आमदार अमोल खताळ यांच्या प्रयत्नांना यश; १० कोटींचा मोठा निधी मंजूर

17/10/2026

संगमनेर तालुक्यातील धांदरफळ बुद्रुक येथे नवरात्रोत्सवातील दांडिया कार्यक्रमादरम्यान तुफान राडा; दोन्ही बाजूंच्या परस्परविरोधी गुन्ह्यांत लोखंडी रॉड, चाकू आणि फायटरने जीवघेणा हल्ला

17/10/2026

महावितरण कर्मचाऱ्यांवर हल्ला आणि शासकीय कामात अडथळा आणल्याचा गंभीर गुन्हा ठरला फोल; संगमनेर कोर्टाकडून सर्व ५ आरोपींची निर्दोष मुक्तता!

17/10/2026
Thumbnail 1
Thumbnail 2
Thumbnail 3
Thumbnail 4
previous arrow
next arrow
Thumbnail 1
Thumbnail 2
Thumbnail 3
Thumbnail 4
previous arrow
next arrow

तुमचे हक्काचे व्यासपीठ

Facebook YouTube
Our Picks
October 2026
M T W T F S S
 1234
567891011
12131415161718
19202122232425
262728293031  
« Sep    
  • Home
  • आंदोलन
  • आरोग्य
  • इतिहास
  • क्रिडा व कला
  • गुन्हेगारी
  • न्यायालय
  • पत्रकारिता
  • फोटो / गॅलरी
  • महाराष्ट्र संवाद विशेष
  • राजकारण
  • विकास
  • विश्लेषण
  • शिक्षण
  • शेती व सहकार
  • सामाजिक
  • CONTACT US
  • ABOUT US
  • PRIVACY POLICY
© 2026 ThemeSphere. Designed by ThemeSphere.

Type above and press Enter to search. Press Esc to cancel.