Close Menu
महाराष्ट्र संवादमहाराष्ट्र संवाद
  • Home
  • आंदोलन
  • आरोग्य
  • इतिहास
  • क्रिडा व कला
  • गुन्हेगारी
  • न्यायालय
  • महाराष्ट्र संवाद विशेष
  • राजकारण
  • विकास
  • विश्लेषण
  • शिक्षण
What's Hot

आमदार सत्यजीत तांबे यांच्या प्रयत्नांना यश; संगमनेरच्या रस्ते विकासासाठी १० कोटींचा निधी मंजूर! बसस्थानक ते प्रवरापुलापर्यंतच्या रस्त्याचा होणार विकास; रुंदीकरणासह ड्रेनेज व्यवस्थेचाही समावेश

16/10/2026

दसरा विशेष: संगमनेरच्या मालपाणी पार्कमध्ये होणाऱ्या ‘या’ खास सोहळ्याचे संपूर्ण वेळापत्रक आणि प्रमुख आकर्षणे एका क्लिकवर!

16/10/2026

२ वर्षे २ महिने तुरुंगवास अन् अखेर न्याय! पोक्सो खटल्यातून संगमनेरच्या तरुणाची सुटका; न्यायालयाचा ‘हा’ महत्त्वाचा निर्णय

16/10/2026
Facebook X (Twitter) Instagram
महाराष्ट्र संवादमहाराष्ट्र संवाद
  • Home
  • आंदोलन
  • आरोग्य
  • इतिहास
  • क्रिडा व कला
  • गुन्हेगारी
  • न्यायालय
  • महाराष्ट्र संवाद विशेष
  • राजकारण
  • विकास
  • विश्लेषण
  • शिक्षण
Facebook X (Twitter) Instagram
महाराष्ट्र संवादमहाराष्ट्र संवाद
Home » अपर पोलीस अधीक्षक सोमनाथ वाकचौरेंची मोठी मोहीम: पोलिसांचे ‘ऑपरेशन ऑल आऊट’; एकाच रात्रीत गुन्हेगारांचे धाबे दणाणले! शिवजयंतीच्या पार्श्वभूमीवर गुन्हेगारांवर धडक कारवाई
गुन्हेगारी

अपर पोलीस अधीक्षक सोमनाथ वाकचौरेंची मोठी मोहीम: पोलिसांचे ‘ऑपरेशन ऑल आऊट’; एकाच रात्रीत गुन्हेगारांचे धाबे दणाणले! शिवजयंतीच्या पार्श्वभूमीवर गुन्हेगारांवर धडक कारवाई

कारवाई जिल्हा पोलीस अधीक्षक सोमनाथ घार्गे आणि अपर पोलीस अधीक्षक सोमनाथ वाकचौरे यांच्या मार्गदर्शनाखाली उपविभागीय पोलीस अधिकारी जयदत्त भवर (श्रीरामपूर), कुणाल सोनवणे (संगमनेर), अमोल भारती (शिर्डी), निरज राजगुरू (शेवगाव) आणि त्यांच्या पथकाने यशस्वीरीत्या पार पाडली.
Annant PpangarkarBy Annant Ppangarkar19/02/2026No Comments2 Mins Read
Facebook Twitter WhatsApp
Share
Facebook Twitter Email Telegram WhatsApp

श्रीरामपूर, प्रतिनिधी – 

शिवजयंती आणि आगामी सण-उत्सवांच्या पार्श्वभूमीवर कायदा व सुव्यवस्था अबाधित राखण्यासाठी अपर पोलीस अधीक्षक सोमनाथ वाकचौरे यांच्या मार्गदर्शनाखाली श्रीरामपूर विभागातील १७ पोलीस स्टेशनच्या हद्दीत ‘ऑपरेशन ऑल आऊट’ राबविण्यात आले. १७ फेब्रुवारी २०२६ रोजी रात्री ११ ते पहाटे २ वाजेपर्यंत चाललेल्या या धडक मोहिमेमुळे संपूर्ण जिल्ह्यात गुन्हेगारांचे धाबे दणाणले आहेत. या कारवाईत वॉरंट बजावणी, अवैध धंदे, शस्त्रसाठा आणि अंमली पदार्थांच्या विरोधात मोठी कारवाई करण्यात आली आहे.

या मोहिमेत पोलिसांनी न्यायालयाचे आदेश पायदळी तुडवणाऱ्या आरोपींविरुद्ध विशेष मोहीम राबवली. यामध्ये ६१२ समन्स बजावण्यात आले असून, २१२ जणांविरुद्ध अजामीनपात्र वॉरंटची अंमलबजावणी करण्यात आली. विशेष म्हणजे, न्यायालयासमोर हजर न राहिलेल्या १०० आरोपींपैकी ३१ जणांना अटक करण्यात आली असून ६९ आरोपींना प्रत्यक्ष हजर करण्यात आले आहे.

अवैध व्यवसायांविरुद्धच्या कारवाईत दारूबंदी कायद्यांतर्गत ४२ गुन्हे दाखल करून ८० हजार ५०० रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला. तसेच जुगार कायद्यान्वये १८ गुन्हे नोंदवून १ लाख ५४ हजार ४४० रुपयांची रोकड व साहित्य जप्त करण्यात आले. हत्यारबंदी कायद्याचे उल्लंघन करणाऱ्यांवरही कडक कारवाई करण्यात आली. 

श्रीरामपूर शहर आणि कोपरगाव परिसरात तलवार बाळगणाऱ्या शाहरुख शेख, इरफान सय्यद, अर्जुन सोनवणे आणि विशाल जगधने या चार जणांना अटक करून त्यांच्याकडून लोखंडी तलवारी जप्त करण्यात आल्या आहेत.

अंमली पदार्थांच्या तस्करीला आळा घालण्यासाठी संगमनेर शहर पोलिसांनी मुन्ना अब्बास शेख आणि संजय ऊर्फ संदीप मालुंजकर यांच्याकडून २४ हजार ९२५ रुपयांचा गांजा जप्त केला असून त्यांच्यावर एनडीपीएस कायद्यांतर्गत गुन्हा दाखल केला आहे. याशिवाय, पोलिसांच्या रेकॉर्डवरील ९ फरार आरोपींना पकडण्यात यश आले असून १९ हिस्ट्रीशीटर आणि १६ तडीपार आरोपींच्या हालचालींवर बारकाईने लक्ष ठेवण्यात आले आहे.

रस्ते सुरक्षेच्या दृष्टीने मोटार वाहन कायद्यांतर्गत ६७ केसेस करून ४९ हजार रुपयांचा दंड वसूल करण्यात आला. नेवासा पोलीस स्टेशनच्या हद्दीत चोरीच्या उद्देशाने वावरणाऱ्या दोन संशयितांना ताब्यात घेण्यात आले, तर शिर्डीत तडीपार आदेशाचे उल्लंघन करणाऱ्या एकाला अटक करण्यात आली. संगमनेरमध्ये गोवंश हत्येच्या उद्देशाने बांधून ठेवलेल्या ३० हजार रुपये किमतीच्या गायीची सुटका करून अज्ञात आरोपींविरुद्ध प्राणी संरक्षण कायद्यानुसार गुन्हा नोंदवण्यात आला आहे.

ही कारवाई जिल्हा पोलीस अधीक्षक सोमनाथ घार्गे आणि अपर पोलीस अधीक्षक सोमनाथ वाकचौरे यांच्या मार्गदर्शनाखाली उपविभागीय पोलीस अधिकारी जयदत्त भवर (श्रीरामपूर), कुणाल सोनवणे (संगमनेर), अमोल भारती (शिर्डी), निरज राजगुरू (शेवगाव) आणि त्यांच्या पथकाने यशस्वीरीत्या पार पाडली.

anantpangarkar
Annant Ppangarkar

Views: 614
ऑपरेशन ऑल आउट श्रीरामपूर विभाग सोमनाथ घार्गे सोमनाथ वाघचौरे
Share. Facebook Twitter Pinterest WhatsApp
Annant Ppangarkar
  • Website

Related Posts

कर्ज वसुलीच्या नावाखाली संगमनेरात महिलेचा विनयभंग; आरोपीवर गुन्हा दाखल

15/10/2026

संगमनेरमध्ये ८८ लाखांचा गांजा जप्त; दोन तस्करांना अटक, तीन साथीदार फरार

06/10/2026

एलसीबी अन्‌ एफडीएची धडक कारवाई; १२.८१ लाखांच्या गुटख्यासह दोघांना अटक, चार जण फरार

05/10/2026
Leave A Reply Cancel Reply

Document
Our Picks
  • Facebook
  • Twitter
  • Pinterest
  • Instagram
  • YouTube
Advertisement 1 Advertisement 2 Advertisement 3 Advertisement 4
Don't Miss
राजकारण

आमदार सत्यजीत तांबे यांच्या प्रयत्नांना यश; संगमनेरच्या रस्ते विकासासाठी १० कोटींचा निधी मंजूर! बसस्थानक ते प्रवरापुलापर्यंतच्या रस्त्याचा होणार विकास; रुंदीकरणासह ड्रेनेज व्यवस्थेचाही समावेश

By Annant Ppangarkar16/10/20260

महाराष्ट्र संवाद न्यूज ऑनलाईन- संगमनेर शहराच्या पायाभूत सुविधा विकासाला चालना देण्यासाठी आमदार सत्यजीत तांबे यांच्या…

दसरा विशेष: संगमनेरच्या मालपाणी पार्कमध्ये होणाऱ्या ‘या’ खास सोहळ्याचे संपूर्ण वेळापत्रक आणि प्रमुख आकर्षणे एका क्लिकवर!

16/10/2026

२ वर्षे २ महिने तुरुंगवास अन् अखेर न्याय! पोक्सो खटल्यातून संगमनेरच्या तरुणाची सुटका; न्यायालयाचा ‘हा’ महत्त्वाचा निर्णय

16/10/2026

वय विसरले अन् झिंगाटवर थिरकले! ४० वर्षांनंतर भेटले सेवानिवृत्त शिक्षक मित्र; भंडारदऱ्यातील भाऊक ‘गेट-टुगेदर’ची खास बातमी

16/10/2026
Thumbnail 1
Thumbnail 2
Thumbnail 3
Thumbnail 4
previous arrow
next arrow
Thumbnail 1
Thumbnail 2
Thumbnail 3
Thumbnail 4
previous arrow
next arrow

तुमचे हक्काचे व्यासपीठ

Facebook YouTube
Our Picks
October 2026
M T W T F S S
 1234
567891011
12131415161718
19202122232425
262728293031  
« Sep    
  • Home
  • आंदोलन
  • आरोग्य
  • इतिहास
  • क्रिडा व कला
  • गुन्हेगारी
  • न्यायालय
  • पत्रकारिता
  • फोटो / गॅलरी
  • महाराष्ट्र संवाद विशेष
  • राजकारण
  • विकास
  • विश्लेषण
  • शिक्षण
  • शेती व सहकार
  • सामाजिक
  • CONTACT US
  • ABOUT US
  • PRIVACY POLICY
© 2026 ThemeSphere. Designed by ThemeSphere.

Type above and press Enter to search. Press Esc to cancel.