Close Menu
महाराष्ट्र संवादमहाराष्ट्र संवाद
  • Home
  • आंदोलन
  • आरोग्य
  • इतिहास
  • क्रिडा व कला
  • गुन्हेगारी
  • न्यायालय
  • महाराष्ट्र संवाद विशेष
  • राजकारण
  • विकास
  • विश्लेषण
  • शिक्षण
What's Hot

आंदोलनाची हवा काढण्यासाठीच मुख्यमंत्र्यांची भेट? : अमोल शेलकर यांचा घणाघात, पालकमंत्री व लोकप्रतिनिधींवर संगमनेरच्या हक्काची रेल्वे हिरावल्याचा थेट आरोप; कागदपत्रे सार्वजनिक करण्याचे आव्हान

09/09/2026

गणेश विसर्जनासाठी प्रवरा नदीपात्रात तातडीने पाणी सोडण्यासंदर्भात नगराध्यक्षा डॉ. मैथिली तांबे यांचे जिल्हाधिकाऱ्यांना निवेदन

09/09/2026

संगमनेर शहरात गणेशोत्सवाची जोरदार तयारी: खड्डेमुक्त रस्ते आणि मंडळांच्या समस्या सोडवण्यावर नगराध्यक्षा डॉ. मैथिली तांबे यांचा भर

09/09/2026
Facebook X (Twitter) Instagram
महाराष्ट्र संवादमहाराष्ट्र संवाद
  • Home
  • आंदोलन
  • आरोग्य
  • इतिहास
  • क्रिडा व कला
  • गुन्हेगारी
  • न्यायालय
  • महाराष्ट्र संवाद विशेष
  • राजकारण
  • विकास
  • विश्लेषण
  • शिक्षण
Facebook X (Twitter) Instagram
महाराष्ट्र संवादमहाराष्ट्र संवाद
Home » संगमनेर येथे बालरंगभूमी परिषदेच्या माध्यमातून विनामूल्य कला उपक्रम राबवणार : अभिनेत्री नीलम शिर्के-सामंत यांची घोषणा
क्रिडा व कला

संगमनेर येथे बालरंगभूमी परिषदेच्या माध्यमातून विनामूल्य कला उपक्रम राबवणार : अभिनेत्री नीलम शिर्के-सामंत यांची घोषणा

या महोत्सवात संगमनेर, अकोले आणि राहाता तालुक्यातील २७ शाळांमधील सुमारे ३००० विद्यार्थ्यांनी सहभाग नोंदविला होता.
Annant PpangarkarBy Annant Ppangarkar25/02/2026No Comments2 Mins Read
Facebook Twitter WhatsApp
Share
Facebook Twitter Email Telegram WhatsApp

संगमनेर, प्रतिनिधी – 
बालरंगभूमीच्या माध्यमातून संगमनेर येथे आगामी काळात विविध कार्यशाळा आणि उपक्रम आयोजित करण्यात येणार असून, हे सर्व उपक्रम विद्यार्थ्यांसाठी पूर्णपणे विनामूल्य उपलब्ध करून दिले जातील, अशी महत्त्वपूर्ण घोषणा बालरंगभूमीच्या अध्यक्षा तथा ख्यातनाम अभिनेत्री ॲड. नीलम शिर्के-सामंत यांनी केली. अखिल भारतीय मराठी नाट्य परिषद संगमनेर शाखेतर्फे दि. ग. सराफ विद्यालयातील बंडूलाल बाफना सभागृहात आयोजित १७ व्या कला स्पर्धा महोत्सवाच्या पारितोषिक वितरण समारंभात त्या प्रमुख पाहुण्या म्हणून बोलत होत्या. बाल शिक्षण मंडळाच्या सचिव नीलाताई जोशी आणि संगमनेर नाट्य परिषदेचे अध्यक्ष प्रा. डॉ. संजयकुमार दळवी यांच्या अध्यक्षतेखाली हा सोहळा संपन्न झाला.
याप्रसंगी विद्यार्थ्यांशी थेट संवाद साधताना नीलम शिर्के यांनी कलेच्या माध्यमातून व्यक्तिमत्त्वावर होणाऱ्या सकारात्मक परिणामांवर प्रकाश टाकला. गेल्या दीड वर्षात १८ वर्षांखालील सुमारे दीड लाख बालकांपर्यंत बालरंगभूमीचे कार्य पोहोचले असून, त्यात आता संगमनेर केंद्राची भर पडत असल्याबद्दल त्यांनी आनंद व्यक्त केला. मोबाईलच्या अतिवापरामुळे होणारे दुष्परिणाम रंजक उदाहरणांमधून मांडत त्यांनी मुलांचे प्रभावी प्रबोधन केले व त्यांना बालरंगभूमीचे सभासद होण्याचे आवाहन केले. त्यानंतर कवी अनंत फंदी नाट्यगृहाची पाहणी करताना त्यांनी तेथील नूतनीकरण प्रक्रियेबाबत वास्तुविशारद अरविंद वैद्य यांच्याकडून सविस्तर माहिती घेतली. महाराष्ट्रात किमान १०० सुसज्ज नाट्यगृहे उभी राहण्यासाठी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची भेट घेऊन मागणी करणार असल्याचे सांगतानाच, संगमनेरच्या नाट्यगृहासाठी नामवंत साधनव्यक्ती उपलब्ध करून देण्याची ग्वाही त्यांनी दिली.
या महोत्सवात संगमनेर, अकोले आणि राहाता तालुक्यातील २७ शाळांमधील सुमारे ३००० विद्यार्थ्यांनी सहभाग नोंदविला होता. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन कार्तिक जोशी यांनी केले, तर नीलाताई जोशी यांनी स्पर्धकांना शुभेच्छा दिल्या. अध्यक्षीय भाषणात डॉ. दळवी यांनी संगमनेरची नाट्य चळवळ महाराष्ट्रातील इतर शाखांच्या बरोबरीने कार्यरत राहील, अशी खात्री दिली. यावेळी अकोल्याचे अनिल पवार यांना ‘स्व. सुरेश म्हाळस कलाप्रेमी शिक्षक पुरस्कार’ तर प्राचार्य मधुकर कुळधरण यांना ‘स्व. चंद्रकांत पवार कलाप्रेमी मुख्याध्यापक पुरस्कार’ प्रदान करण्यात आला. तसेच स्व. उर्मिला लोटके कलाप्रेमी मुख्याध्यापिका पुरस्कारानेही मान्यवरांना सन्मानित करण्यात आले.
हा सोहळा यशस्वी करण्यासाठी स्पर्धा संयोजक अविनाश सूर्यवंशी, उपाध्यक्ष बाबासाहेब मेमाणे, कोषाध्यक्ष मोहसीन शेख, प्रमुख कार्यवाह विशाल कदम, विठ्ठल मुंगसे, विजय गायकवाड, सौ. दिघे मॅडम, सुनील मंडलिक, दत्तात्रय बटवाल, सुभाष कानडे, धनंजय ढोले, प्रशांत पेडणेकर आणि अंतून घोडके यांनी विशेष परिश्रम घेतले. या कार्यक्रमाला विद्यार्थी, पालक आणि शिक्षक मोठ्या संख्येने उपस्थित होते.

anantpangarkar
Annant Ppangarkar

Post Views: 478
अखिल भारतीय मराठी नाट्य परिषद कला स्पर्धा महोत्सव नीलम शिर्के-सामंत पारितोषिक वितरण बालरंगभूमी परिषद
Share. Facebook Twitter Pinterest WhatsApp
Annant Ppangarkar
  • Website

Related Posts

जयहिंद कला महोत्सव: १२ हजार विद्यार्थ्यांचा उत्स्फूर्त सहभाग; कौशल्यपूर्ण शिक्षणासाठी उपक्रम राज्यासाठी दिशादर्शक – माजी मंत्री बाळासाहेब थोरात

08/09/2026

संगमनेरात बालकला महोत्सवाचे उत्साहात उद्घाटन; बालगोपाळांच्या कलागुणांना मिळाले हक्काचे व्यासपीठ!

07/09/2026

संगमनेरात जयहिंद लोकचळवळीच्या वतीने उद्या आणि परवा बालकला महोत्सवाचे आयोजन; विविध उपक्रमांसह रंगभरण स्पर्धेची पर्वणी

05/09/2026
Leave A Reply Cancel Reply

Document
Our Picks
  • Facebook
  • Twitter
  • Pinterest
  • Instagram
  • YouTube
Advertisement 1 Advertisement 2 Advertisement 3 Advertisement 4
Don't Miss
राजकारण

आंदोलनाची हवा काढण्यासाठीच मुख्यमंत्र्यांची भेट? : अमोल शेलकर यांचा घणाघात, पालकमंत्री व लोकप्रतिनिधींवर संगमनेरच्या हक्काची रेल्वे हिरावल्याचा थेट आरोप; कागदपत्रे सार्वजनिक करण्याचे आव्हान

By Annant Ppangarkar09/09/20260

Annant Ppangarkar महाराष्ट्र संवाद न्यूज ऑनलाईन – संगमनेर मार्गे जाणारा पुणे–नाशिक सेमीस्पीड रेल्वे प्रकल्प GMRT…

गणेश विसर्जनासाठी प्रवरा नदीपात्रात तातडीने पाणी सोडण्यासंदर्भात नगराध्यक्षा डॉ. मैथिली तांबे यांचे जिल्हाधिकाऱ्यांना निवेदन

09/09/2026

संगमनेर शहरात गणेशोत्सवाची जोरदार तयारी: खड्डेमुक्त रस्ते आणि मंडळांच्या समस्या सोडवण्यावर नगराध्यक्षा डॉ. मैथिली तांबे यांचा भर

09/09/2026

सोशल मीडिया रिल्सच्या प्रभावापासून दूर राहून तरुणांनी ‘गुंतवणूक भान’ जपावे : सुनील कडलग

09/09/2026
Thumbnail 1
Thumbnail 2
Thumbnail 3
Thumbnail 4
previous arrow
next arrow
Thumbnail 1
Thumbnail 2
Thumbnail 3
Thumbnail 4
previous arrow
next arrow

तुमचे हक्काचे व्यासपीठ

Facebook YouTube
Our Picks
September 2026
M T W T F S S
 123456
78910111213
14151617181920
21222324252627
282930  
« Aug    
  • Home
  • आंदोलन
  • आरोग्य
  • इतिहास
  • क्रिडा व कला
  • गुन्हेगारी
  • न्यायालय
  • पत्रकारिता
  • फोटो / गॅलरी
  • महाराष्ट्र संवाद विशेष
  • राजकारण
  • विकास
  • विश्लेषण
  • शिक्षण
  • शेती व सहकार
  • सामाजिक
  • CONTACT US
  • ABOUT US
  • PRIVACY POLICY
© 2026 ThemeSphere. Designed by ThemeSphere.

Type above and press Enter to search. Press Esc to cancel.