Close Menu
महाराष्ट्र संवादमहाराष्ट्र संवाद
  • Home
  • आंदोलन
  • आरोग्य
  • इतिहास
  • क्रिडा व कला
  • गुन्हेगारी
  • न्यायालय
  • महाराष्ट्र संवाद विशेष
  • राजकारण
  • विकास
  • विश्लेषण
  • शिक्षण
What's Hot

संगमनेरकरांची प्रतीक्षा संपणार! ‘कवी अनंत फंदी’ नाट्यगृहाची तिसरी घंटा लवकरच वाजणार; आमदार सत्यजित तांबे यांच्याकडून कामाची पाहणी

26/10/2026

कर्जत-भीमाशंकर जंगलतोडीविरोधात संगमनेरमध्ये एल्गार! पर्यावरणाचा विनाश थांबवा! संगमनेरातील पर्यावरणप्रेमींचे मुख्यमंत्र्यांना निवेदन

26/10/2026

माजीमंत्री बाळासाहेब थोरातांच्या नेतृत्वात संगमनेर तालुक्याचा विकासाचा वेग कायम राखणार: आमदार सत्यजित तांबे

26/10/2026
Facebook X (Twitter) Instagram
महाराष्ट्र संवादमहाराष्ट्र संवाद
  • Home
  • आंदोलन
  • आरोग्य
  • इतिहास
  • क्रिडा व कला
  • गुन्हेगारी
  • न्यायालय
  • महाराष्ट्र संवाद विशेष
  • राजकारण
  • विकास
  • विश्लेषण
  • शिक्षण
Facebook X (Twitter) Instagram
महाराष्ट्र संवादमहाराष्ट्र संवाद
Home » संगमनेरकरांची प्रतीक्षा संपणार! ‘कवी अनंत फंदी’ नाट्यगृहाची तिसरी घंटा लवकरच वाजणार; आमदार सत्यजित तांबे यांच्याकडून कामाची पाहणी
क्रिडा व कला

संगमनेरकरांची प्रतीक्षा संपणार! ‘कवी अनंत फंदी’ नाट्यगृहाची तिसरी घंटा लवकरच वाजणार; आमदार सत्यजित तांबे यांच्याकडून कामाची पाहणी

एक हजार आसनक्षमतेचे हे बंदिस्त नाट्यगृह तालुका स्तरावर अत्यंत वैशिष्ट्यपूर्ण ठरेल. काम अंतिम टप्प्यात आले असून आवश्यक निधी उपलब्ध करून देत हे नाट्यगृह लवकरात लवकर रसिकांच्या सेवेत दाखल करण्याचा आमचा प्रयत्न आहे.
Annant PpangarkarBy Annant Ppangarkar26/10/2026No Comments2 Mins Read
Facebook Twitter WhatsApp
Share
Facebook Twitter Email Telegram WhatsApp

महाराष्ट्र संवाद न्यूज ऑनलाईन-
संगमनेरच्या समृद्ध साहित्यिक, सांस्कृतिक आणि नाट्यपरंपरेला आधुनिकतेची जोड देणारे, कवी अनंत फंदी यांच्या नावाने उभारण्यात येत असलेले एक हजार आसनक्षमतेचे अद्ययावत बंदिस्त नाट्यगृह लवकरच प्रेक्षकांच्या सेवेत दाखल होणार आहे. या महत्त्वाकांक्षी प्रकल्पाच्या अंतिम टप्प्यातील कामाची आमदार सत्यजित तांबे यांनी प्रत्यक्ष पाहणी करून संबंधित अधिकाऱ्यांना उर्वरित कामे त्वरित पूर्ण करण्याच्या स्पष्ट सूचना दिल्या आहेत. हे अद्ययावत नाट्यगृह पूर्णत्वाकडे जात असल्याने संगमनेरमधील नाट्यप्रेमी आणि कलारसिकांमध्ये उत्साहाचे वातावरण निर्माण झाले आहे.
​महाराष्ट्राचे ज्येष्ठ नेते बाळासाहेब थोरात यांच्या मार्गदर्शनाखाली आणि माजी नगराध्यक्ष दुर्गाताई तांबे यांच्या कार्यकाळात कवी अनंत फंदी खुले नाट्यगृह बंदिस्त करण्याच्या कामाचा पाया रचला गेला. या प्रकल्पासाठी आमदार सत्यजित तांबे यांनी सातत्याने राज्यस्तरावर पाठपुरावा करत आवश्यक निधी उपलब्ध करून देण्यात महत्त्वाची भूमिका बजावली आहे. या पाहणीप्रसंगी तांबे यांच्यासोबत अजय फटांगरे, वास्तुविशारद अरविंद वैद्य, नगरपालिकेचे मुख्याधिकारी दयानंद गोरे आणि अभियंता पंकज मुंगसे यांच्यासह शहरातील विविध प्रमुख पदाधिकारी आणि संबंधित अधिकारी उपस्थित होते.
​संगमनेर शहराला कवी अनंत फंदी यांच्यापासून ते शाहीर विठ्ठल उमप, पद्मश्री रघुवीर खेडकर आणि कांताबाई सातारकर यांच्यासारख्या दिग्गज कलावंतांची मोठी परंपरा लाभली आहे. साहित्य, लोककला, नाटक आणि संगीताच्या क्षेत्रात येथील कलाकारांनी आपला वेगळा ठसा उमटवला असून, या सांस्कृतिक वारशाचे जतन करण्यासाठी शहरात दर्जेदार सोयी-सुविधांची गरज होती. कवी अनंत फंदी नाट्यगृहाचा हा विकास संगमनेरच्या सांस्कृतिक प्रवासातील एक सुवर्ण अध्याय ठरणार आहे.
​आमदार सत्यजित तांबे यांनी राज्यातील विविध आधुनिक नाट्यगृहांचा अभ्यास करून संगमनेरच्या नाट्यगृहात अत्याधुनिक सुविधांचा समावेश केला आहे. या प्रकल्पासाठी अखिल भारतीय मराठी नाट्य परिषदेचे अध्यक्ष तथा प्रसिद्ध अभिनेते प्रशांत दामले यांनीही भेट देऊन महत्त्वपूर्ण मार्गदर्शन केले होते. नाटक, संगीत, व्याख्याने आणि विविध सांस्कृतिक कार्यक्रमांसाठी अत्यंत उपयुक्त ठरणारे हे नाट्यगृह स्थानिक कलाकारांना हक्काचे दर्जेदार व्यासपीठ उपलब्ध करून देईल.
​उर्वरित कामासाठी आमदार सत्यजित तांबे यांनी आमदार निधीतून अतिरिक्त निधी उपलब्ध करून देण्याची ग्वाही दिली असून, तालुका स्तरावर हे एक अत्यंत सुसज्ज आणि अद्ययावत नाट्यगृह ठरणार आहे. येत्या काही दिवसांत हे नाट्यगृह रसिकांसाठी खुले होणार असल्याने संगमनेरच्या कलाविश्वात एका नव्या पर्वाची सुरुवात होत असून सर्वांना ‘तिसरी घंटा’ वाजण्याची उत्सुकता लागली आहे.
​संगमनेरच्या सांस्कृतिक परंपरेला नवी ऊर्जा मिळेल – आमदार सत्यजित तांबे
“संगमनेरने राज्याला आणि देशाला अनेक नामवंत कलावंत दिले आहेत. या समृद्ध सांस्कृतिक वारशाचे जतन करून तो नव्या पिढीपर्यंत पोहोचविणे ही आपली जबाबदारी आहे. एक हजार आसनक्षमतेचे हे बंदिस्त नाट्यगृह तालुका स्तरावर अत्यंत वैशिष्ट्यपूर्ण ठरेल. काम अंतिम टप्प्यात आले असून आवश्यक निधी उपलब्ध करून देत हे नाट्यगृह लवकरात लवकर रसिकांच्या सेवेत दाखल करण्याचा आमचा प्रयत्न आहे.

anantpangarkar
Annant Ppangarkar

Views: 92
#Sangamner #SatyajitTambe #KaviAnantFandiNatyagruh #SangamnerNews #MaharashtraSamvadNews #SangamnerCultural #BalasahebThorat #Drama #MarathiNatak #CulturalHub #SangamnerUpdates
Share. Facebook Twitter Pinterest WhatsApp
Annant Ppangarkar
  • Website

Related Posts

राज्यस्तरीय कराटे स्पर्धेत गीता परिवाराचा ऐतिहासिक पराक्रम; सव्वाशे पदकांसह उपविजेतेपदावर कोरले नाव

07/10/2026

जयहिंद कला महोत्सव: १२ हजार विद्यार्थ्यांचा उत्स्फूर्त सहभाग; कौशल्यपूर्ण शिक्षणासाठी उपक्रम राज्यासाठी दिशादर्शक – माजी मंत्री बाळासाहेब थोरात

08/09/2026

संगमनेरात बालकला महोत्सवाचे उत्साहात उद्घाटन; बालगोपाळांच्या कलागुणांना मिळाले हक्काचे व्यासपीठ!

07/09/2026
Leave A Reply Cancel Reply

Document
Our Picks
  • Facebook
  • Twitter
  • Pinterest
  • Instagram
  • YouTube
Advertisement 1 Advertisement 2 Advertisement 3 Advertisement 4
Don't Miss
क्रिडा व कला

संगमनेरकरांची प्रतीक्षा संपणार! ‘कवी अनंत फंदी’ नाट्यगृहाची तिसरी घंटा लवकरच वाजणार; आमदार सत्यजित तांबे यांच्याकडून कामाची पाहणी

By Annant Ppangarkar26/10/20260

महाराष्ट्र संवाद न्यूज ऑनलाईन- संगमनेरच्या समृद्ध साहित्यिक, सांस्कृतिक आणि नाट्यपरंपरेला आधुनिकतेची जोड देणारे, कवी अनंत…

कर्जत-भीमाशंकर जंगलतोडीविरोधात संगमनेरमध्ये एल्गार! पर्यावरणाचा विनाश थांबवा! संगमनेरातील पर्यावरणप्रेमींचे मुख्यमंत्र्यांना निवेदन

26/10/2026

माजीमंत्री बाळासाहेब थोरातांच्या नेतृत्वात संगमनेर तालुक्याचा विकासाचा वेग कायम राखणार: आमदार सत्यजित तांबे

26/10/2026

संगमनेरात FDA चा दणका; फेस्टिव्हल ड्राईव्ह २०२६ अंतर्गत १५ लाखांचा संशयास्पद धने व बडीशेपसाठा जप्त!

26/10/2026
Thumbnail 1
Thumbnail 2
Thumbnail 3
Thumbnail 4
previous arrow
next arrow
Thumbnail 1
Thumbnail 2
Thumbnail 3
Thumbnail 4
previous arrow
next arrow

तुमचे हक्काचे व्यासपीठ

Facebook YouTube
Our Picks
October 2026
M T W T F S S
 1234
567891011
12131415161718
19202122232425
262728293031  
« Sep    
  • Home
  • आंदोलन
  • आरोग्य
  • इतिहास
  • क्रिडा व कला
  • गुन्हेगारी
  • न्यायालय
  • पत्रकारिता
  • फोटो / गॅलरी
  • महाराष्ट्र संवाद विशेष
  • राजकारण
  • विकास
  • विश्लेषण
  • शिक्षण
  • शेती व सहकार
  • सामाजिक
  • CONTACT US
  • ABOUT US
  • PRIVACY POLICY
© 2026 ThemeSphere. Designed by ThemeSphere.

Type above and press Enter to search. Press Esc to cancel.