Close Menu
महाराष्ट्र संवादमहाराष्ट्र संवाद
  • Home
  • आंदोलन
  • आरोग्य
  • इतिहास
  • क्रिडा व कला
  • गुन्हेगारी
  • न्यायालय
  • महाराष्ट्र संवाद विशेष
  • राजकारण
  • विकास
  • विश्लेषण
  • शिक्षण
What's Hot

जवळेकडलगच्या दुर्देवी घटनेनंतर माजी मंत्री बाळासाहेब थोरात यांची पवार कुटुंबाला सांत्वन भेट; बिबट्यांच्या दहशतीवर प्रशासनाने ठोस उपाययोजना करण्याची मागणी

02/09/2026

संगमनेर सत्र न्यायालयाचा महत्त्वपूर्ण निकाल: प्राणघातक हल्ल्याप्रकरणी तिघा आरोपींची २ वर्षांची सक्तमजुरी कायम

02/09/2026

पोलिसांचा वाळू माफियांना मोठा धक्का; या दोन तालुक्यातून २० लाखांचा मुद्देमाल जप्त

02/09/2026
Facebook X (Twitter) Instagram
महाराष्ट्र संवादमहाराष्ट्र संवाद
  • Home
  • आंदोलन
  • आरोग्य
  • इतिहास
  • क्रिडा व कला
  • गुन्हेगारी
  • न्यायालय
  • महाराष्ट्र संवाद विशेष
  • राजकारण
  • विकास
  • विश्लेषण
  • शिक्षण
Facebook X (Twitter) Instagram
महाराष्ट्र संवादमहाराष्ट्र संवाद
Home » स्थानिक गुन्हे शाखेची मोठी कारवाई; ४०० किलो प्रतिबंधित मांगुर माशासह २९ लाखांचा मुद्देमाल पकडला, चार परप्रांतीयांना बेड्या
गुन्हेगारी

स्थानिक गुन्हे शाखेची मोठी कारवाई; ४०० किलो प्रतिबंधित मांगुर माशासह २९ लाखांचा मुद्देमाल पकडला, चार परप्रांतीयांना बेड्या

या प्रकरणी मत्स्य विकास अधिकारी प्रतिक्षा पाटेकर यांच्या फिर्यादीवरून शिर्डी पोलीस ठाण्यात भारतीय न्याय संहिता २०२३ चे कलम २२३, २७५, ३(५) प्रमाणे गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
Annant PpangarkarBy Annant Ppangarkar03/03/2026No Comments2 Mins Read
Facebook Twitter WhatsApp
Share
Facebook Twitter Email Telegram WhatsApp

संगमनेर, प्रतिनिधी
राज्यात प्रतिबंधित असलेल्या मांगुर माशांच्या बेकायदेशीर वाहतुकीविरोधात स्थानिक गुन्हे शाखेने शिर्डी पोलीस ठाण्याच्या हद्दीत मोठी कारवाई केली आहे. या कारवाईत पोलिसांनी ४०० किलो मांगुर मासे आणि एक ट्रक असा एकूण २१ लाख रुपयांचा मुद्देमाल जप्त केला असून चार आरोपींना ताब्यात घेतले आहे.
अहिल्यानगरचे पोलीस अधीक्षक सोमनाथ घार्गे यांनी जिल्ह्यातील अवैध व्यवसायांवर कारवाई करण्याचे आदेश दिले होते. त्यानुसार स्थानिक गुन्हे शाखेचे पोलीस निरीक्षक किरणकुमार कबाडी यांच्या मार्गदर्शनाखाली सहाय्यक पोलीस निरीक्षक दीपक मेवे, पोलीस अंमलदार राहुल द्वारके, शाहिदा शेख, फुरकान शेख, राहुल डोके, सुनील माळवदकर, प्रशांत राठोड, सतीश भवर आणि चालक उमाकांत गावडे यांच्या पथकाने ही कारवाई केली.
पोलीस अधिकाऱ्यांनी दिलेल्या माहितीनुसार, मनमाड हायवे रोडवरील निमगाव बायपासवरून एका ट्रकमध्ये (क्रमांक WB25M5023) केंद्र सरकारने प्रतिबंधित केलेले मांगुर मासे नेले जात असल्याची खात्रीशीर माहिती पथकाला मिळाली. स्थानिक गुन्हे शाखेने तातडीने शिर्डी पोलीस स्टेशनचे पोलीस निरीक्षक रणजित गलांडे, सागर काळे व त्यांच्या पथकाला सोबत घेऊन निमगाव बायपास रोडवर सापळा रचला. संशयित ट्रक अडवून त्याची झडती घेतली असता, त्यामध्ये प्रतिबंधित मांगुर मासे आढळून आले.
या प्रकरणी पोलिसांनी चार जणांना ताब्यात घेतले असून त्यांची नावे स्वप्न नियम डे (वय ३६ वर्षे, रा. वामनगंज, जि. बाराशाद, पश्चिम बंगाल), मकबुल रौफ सरदार (वय ३१ वर्षे, रा. मसलंदापूर, जि. नॉर्थ २४ परगणा, पश्चिम बंगाल), कुतुब आयुब मंडल (वय ३५ वर्षे, रा. बदुडीया, जि. नॉर्थ २४ परगणा, पश्चिम बंगाल) आणि मृत्युंजय मुकुल विश्वास (वय २७ वर्षे, रा. हाबरा, जि. नॉर्थ २४ परगणा, पश्चिम बंगाल) अशी आहेत. चौकशीदरम्यान आरोपींनी हे मासे पश्चिम बंगालमधून आणले असून ते मिराज यांच्याकडून घेऊन खोपोली येथील भाई नावाच्या व्यक्तीला देण्यासाठी जात असल्याचे सांगितले.
मत्स्य विकास अधिकारी प्रतिक्षा सुधाकर पाटेकर यांनी घटनास्थळी येत या माशांची पाहणी केली आणि ते प्रतिबंधित मांगुर मासे असल्याचा अभिप्राय दिला. पोलिसांनी ४ लाख रुपये किमतीचे ४०० किलो मासे आणि १७ लाख रुपयांचा ट्रक असा एकूण २१ लाख रुपयांचा मुद्देमाल जप्त केला आहे. जप्त केलेले मासे कायदेशीर प्रक्रिया पूर्ण करून नष्ट करण्यात आले आहेत.
या प्रकरणी मत्स्य विकास अधिकारी प्रतिक्षा पाटेकर यांच्या फिर्यादीवरून शिर्डी पोलीस ठाण्यात भारतीय न्याय संहिता २०२३ चे कलम २२३, २७५, ३(५) प्रमाणे गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

anantpangarkar
Annant Ppangarkar

Post Views: 814
अहिल्यानगर एलसीबी मांगुर मासे कारवाई शिर्डी
Share. Facebook Twitter Pinterest WhatsApp
Annant Ppangarkar
  • Website

Related Posts

पोलिसांचा वाळू माफियांना मोठा धक्का; या दोन तालुक्यातून २० लाखांचा मुद्देमाल जप्त

02/09/2026

पोलिसांच्या ताब्यात असलेल्या तरुणाला आमदार खताळ यांच्या कार्यकर्त्याकडून मारहाण; संदेश देशमुख यांच्यावर एनसी दाखल

01/09/2026

जिल्ह्यात अवैध गुटखा विक्रीवर एलसीबीचा सर्जिकल स्ट्राईक; एकाच दिवशी ६ छापे, सुमारे ६ लाखांचा मुद्देमाल जप्त

30/08/2026
Leave A Reply Cancel Reply

Document
Our Picks
  • Facebook
  • Twitter
  • Pinterest
  • Instagram
  • YouTube
Advertisement 1 Advertisement 2 Advertisement 3 Advertisement 4
Don't Miss
सांत्वन

जवळेकडलगच्या दुर्देवी घटनेनंतर माजी मंत्री बाळासाहेब थोरात यांची पवार कुटुंबाला सांत्वन भेट; बिबट्यांच्या दहशतीवर प्रशासनाने ठोस उपाययोजना करण्याची मागणी

By Annant Ppangarkar02/09/20260

Annant Ppangarkar महाराष्ट्र संवाद न्यूज ऑनलाईन: जवळेकडलग येथील अकरा वर्षीय बालक कृष्णा वसंत पवार याचा…

संगमनेर सत्र न्यायालयाचा महत्त्वपूर्ण निकाल: प्राणघातक हल्ल्याप्रकरणी तिघा आरोपींची २ वर्षांची सक्तमजुरी कायम

02/09/2026

पोलिसांचा वाळू माफियांना मोठा धक्का; या दोन तालुक्यातून २० लाखांचा मुद्देमाल जप्त

02/09/2026

सत्याचा आवाज, लेखणीचा पहारेकरी – ज्येष्ठ पत्रकार अनंत पांगारकर यांचा आंबेडकरी चळवळीच्यावतीने हृद्य सत्कार

02/09/2026
Thumbnail 1
Thumbnail 2
Thumbnail 3
Thumbnail 4
previous arrow
next arrow
Thumbnail 1
Thumbnail 2
Thumbnail 3
Thumbnail 4
previous arrow
next arrow

तुमचे हक्काचे व्यासपीठ

Facebook YouTube
Our Picks
September 2026
M T W T F S S
 123456
78910111213
14151617181920
21222324252627
282930  
« Aug    
  • Home
  • आंदोलन
  • आरोग्य
  • इतिहास
  • क्रिडा व कला
  • गुन्हेगारी
  • न्यायालय
  • पत्रकारिता
  • फोटो / गॅलरी
  • महाराष्ट्र संवाद विशेष
  • राजकारण
  • विकास
  • विश्लेषण
  • शिक्षण
  • शेती व सहकार
  • सामाजिक
  • CONTACT US
  • ABOUT US
  • PRIVACY POLICY
© 2026 ThemeSphere. Designed by ThemeSphere.

Type above and press Enter to search. Press Esc to cancel.