Close Menu
महाराष्ट्र संवादमहाराष्ट्र संवाद
  • Home
  • आंदोलन
  • आरोग्य
  • इतिहास
  • क्रिडा व कला
  • गुन्हेगारी
  • न्यायालय
  • महाराष्ट्र संवाद विशेष
  • राजकारण
  • विकास
  • विश्लेषण
  • शिक्षण
What's Hot

१९७२ पेक्षा भयावह दुष्काळ; राजकारण बाजूला ठेवून जनतेला दिलासा द्या, मागेल त्याला पिण्याच्या पाण्याचे टँकर द्या – सत्यजित तांबे यांचे अधिकाऱ्यांना निर्देश

15/10/2026

गुरुवार, १५ ऑक्टोंबर — आजचा दिवस कसा असेल जाणून घ्या!

15/10/2026

संगमनेरच्या बाजारपेठेला मोठा दिलासा, दुष्काळाच्या संकटातही थोरात कारखान्याचा मोठा निर्णय; कामगारांना मिळणार इतका बोनस अन् सानुग्रह अनुदान; ऊस उत्पादकांना प्रतिटन एवढी मदत! लोकनेते बाळासाहेब थोरात यांची घोषणा

14/10/2026
Facebook X (Twitter) Instagram
महाराष्ट्र संवादमहाराष्ट्र संवाद
  • Home
  • आंदोलन
  • आरोग्य
  • इतिहास
  • क्रिडा व कला
  • गुन्हेगारी
  • न्यायालय
  • महाराष्ट्र संवाद विशेष
  • राजकारण
  • विकास
  • विश्लेषण
  • शिक्षण
Facebook X (Twitter) Instagram
महाराष्ट्र संवादमहाराष्ट्र संवाद
Home » भंडारदरा धरणाचा शताब्दी महोत्सव पर्यटनासाठी जागतिक आकर्षण ठरावा; जलसंपदामंत्री डॉ. राधाकृष्ण विखे पाटील यांनी घेतला कृती आराखड्याचा आढावा
महाराष्ट्र संवाद विशेष

भंडारदरा धरणाचा शताब्दी महोत्सव पर्यटनासाठी जागतिक आकर्षण ठरावा; जलसंपदामंत्री डॉ. राधाकृष्ण विखे पाटील यांनी घेतला कृती आराखड्याचा आढावा

Annant PpangarkarBy Annant Ppangarkar11/03/2026No Comments2 Mins Read
Facebook Twitter WhatsApp
Share
Facebook Twitter Email Telegram WhatsApp

शिर्डी:
उत्तर अहिल्यानगर जिल्ह्याची जीवनवाहिनी असलेल्या भंडारदरा धरणाचे शताब्दी वर्ष सांस्कृतिक आणि निसर्ग पर्यटनाच्या माध्यमातून अविस्मरणीय करण्यासाठी एक सर्वंकष कृती आराखडा तयार करण्याचे निर्देश जलसंपदामंत्री तथा जिल्ह्याचे पालकमंत्री राधाकृष्ण विखे पाटील यांनी दिले आहेत.
विधान भवनात या आराखड्याचा सविस्तर आढावा घेण्यासाठी आयोजित विशेष बैठकीत ते बोलत होते. याप्रसंगी जिल्हाधिकारी डॉ. पंकज आशिया, जलसंपदा विभागाचे मुख्य अभियंता प्रकाश मिसाळ, कार्यकारी अभियंता बाळासाहेब शेटे, स्वप्नील काळे यांसह विविध विभागांचे वरिष्ठ अधिकारी उपस्थित होते.
भंडारदरा धरणाचे शताब्दी वर्ष हा एक ऐतिहासिक टप्पा असून, या निमित्ताने राज्य शासनाने मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या नेतृत्वाखाली विशेष समितीची स्थापना केली आहे. या महोत्सवांतर्गत जलाशय परिसराचे सुशोभीकरण करणे, सांस्कृतिक वारसा जपणे आणि पर्यटन विकासाला चालना देणे यावर प्रामुख्याने भर दिला जाणार आहे. जलसंपदा विभागाने तयार केलेला हा विशेष आराखडा लवकरच अंतिम मान्यतेसाठी मुख्यमंत्र्यांसमोर सादर केला जाईल, अशी माहिती मंत्री विखे यांनी दिली.
या धरणामुळे गेल्या शंभर वर्षांत जिल्ह्याच्या सामाजिक आणि आर्थिक स्थितीत जे क्रांतिकारी बदल झाले आहेत, ते नव्या पिढीसमोर प्रभावी सादरीकरणाच्या माध्यमातून मांडण्याची गरज त्यांनी व्यक्त केली. या शताब्दी महोत्सवासाठी एक स्वतंत्र आणि वैशिष्ट्यपूर्ण ‘लोगो’ तयार करण्यात येणार असून, वर्षभर दरमहा विविध कार्यक्रमांचे आयोजन केले जाणार आहे. या उपक्रमांमध्ये स्थानिक कलाकारांना जास्तीत जास्त संधी देऊन त्यांच्यासाठी रोजगाराच्या नव्या वाटा शोधण्यावरही मंत्र्यांनी भर दिला. पर्यटकांना आकर्षित करण्यासाठी जलक्रीडा आणि पाण्यावर आधारित इतर नाविन्यपूर्ण उपक्रम राबवण्याच्या सूचनाही त्यांनी यावेळी दिल्या.
शताब्दी महोत्सवाची व्याप्ती केवळ धरणापुरती मर्यादित न ठेवता ती लाभक्षेत्रातील अंतिम चारीपर्यंत असावी, असेही त्यांनी स्पष्ट केले. या ऐतिहासिक सोहळ्याची माहिती जागतिक स्तरावर पोहोचवण्यासाठी स्वतंत्र वेबसाईट विकसित करावी आणि समाजमाध्यमांद्वारे या महोत्सवाचा व्यापक प्रचार व प्रसिद्धी करावी, असे आदेश विखे यांनी प्रशासकीय अधिकाऱ्यांना दिले आहेत.

anantpangarkar
Annant Ppangarkar

Views: 335
बैठक भंडारदरा राधाकृष्ण विखे शताब्दी महोत्सव
Share. Facebook Twitter Pinterest WhatsApp
Annant Ppangarkar
  • Website

Related Posts

“राजा किती क्रूर आणि खोटारडा आहे…” आई-बाळाची आर्त हाक अन् पोलिसांचा पाशवी हात; संजय राऊतांनी शेअर केलेल्या ‘त्या’ एका छायाचित्राने हादरवला महाराष्ट्र!

12/10/2026

MPSC आंदोलनाला डॉ. जयश्रीताई थोरात यांचा पाठिंबा; समाज आणि आयोगातील ब्लड कॅन्सर ठीक करायचाय!

10/10/2026

महात्मा गांधी हे भारतीय तत्त्वज्ञानाचे प्रतिबिंब: संदीप वाकचौरे

07/10/2026
Leave A Reply Cancel Reply

Document
Our Picks
  • Facebook
  • Twitter
  • Pinterest
  • Instagram
  • YouTube
Advertisement 1 Advertisement 2 Advertisement 3 Advertisement 4
Don't Miss
बैठक

१९७२ पेक्षा भयावह दुष्काळ; राजकारण बाजूला ठेवून जनतेला दिलासा द्या, मागेल त्याला पिण्याच्या पाण्याचे टँकर द्या – सत्यजित तांबे यांचे अधिकाऱ्यांना निर्देश

By Annant Ppangarkar15/10/20260

महाराष्ट्र संवाद न्यूज ऑनलाईन- संगमनेर तालुका विस्ताराने मोठा असून यंदा पावसात झालेल्या मोठ्या घटीमुळे तालुक्यात…

गुरुवार, १५ ऑक्टोंबर — आजचा दिवस कसा असेल जाणून घ्या!

15/10/2026

संगमनेरच्या बाजारपेठेला मोठा दिलासा, दुष्काळाच्या संकटातही थोरात कारखान्याचा मोठा निर्णय; कामगारांना मिळणार इतका बोनस अन् सानुग्रह अनुदान; ऊस उत्पादकांना प्रतिटन एवढी मदत! लोकनेते बाळासाहेब थोरात यांची घोषणा

14/10/2026

रस्त्यावरील वादातून मारहाण, जीवे मारण्याची धमकी; संगमनेर न्यायालयाने सुनावली ही शिक्षा

14/10/2026
Thumbnail 1
Thumbnail 2
Thumbnail 3
Thumbnail 4
previous arrow
next arrow
Thumbnail 1
Thumbnail 2
Thumbnail 3
Thumbnail 4
previous arrow
next arrow

तुमचे हक्काचे व्यासपीठ

Facebook YouTube
Our Picks
October 2026
M T W T F S S
 1234
567891011
12131415161718
19202122232425
262728293031  
« Sep    
  • Home
  • आंदोलन
  • आरोग्य
  • इतिहास
  • क्रिडा व कला
  • गुन्हेगारी
  • न्यायालय
  • पत्रकारिता
  • फोटो / गॅलरी
  • महाराष्ट्र संवाद विशेष
  • राजकारण
  • विकास
  • विश्लेषण
  • शिक्षण
  • शेती व सहकार
  • सामाजिक
  • CONTACT US
  • ABOUT US
  • PRIVACY POLICY
© 2026 ThemeSphere. Designed by ThemeSphere.

Type above and press Enter to search. Press Esc to cancel.