Close Menu
महाराष्ट्र संवादमहाराष्ट्र संवाद
  • Home
  • आंदोलन
  • आरोग्य
  • इतिहास
  • क्रिडा व कला
  • गुन्हेगारी
  • न्यायालय
  • महाराष्ट्र संवाद विशेष
  • राजकारण
  • विकास
  • विश्लेषण
  • शिक्षण
What's Hot

संगमनेरमध्ये १७ ते २० सप्टेंबरदरम्यान अमृत उद्योग समूहातील सहकारी संस्थांच्या वार्षिक सर्वसाधारण सभा; माजी मंत्री बाळासाहेब थोरात, माजी आमदार डॉ. सुधीर तांबे यांची मुख्य उपस्थिती

14/09/2026

सोमवार १४ सप्टेंबर; जाणून घ्या आजचे राशिभविष्य

14/09/2026

भंडारदरा धरणातून खरीप पिकांसाठी सोमवारपासून पाणी सुटणार; गणेशोत्सवात दिलासा : आमदार खताळ

13/09/2026
Facebook X (Twitter) Instagram
महाराष्ट्र संवादमहाराष्ट्र संवाद
  • Home
  • आंदोलन
  • आरोग्य
  • इतिहास
  • क्रिडा व कला
  • गुन्हेगारी
  • न्यायालय
  • महाराष्ट्र संवाद विशेष
  • राजकारण
  • विकास
  • विश्लेषण
  • शिक्षण
Facebook X (Twitter) Instagram
महाराष्ट्र संवादमहाराष्ट्र संवाद
Home » अपुऱ्या पावसामुळे पाणी जपून वापरण्याचे जलसंपदा मंत्र्यांचे आवाहन; ३१ ऑगस्टपर्यंत पिण्याचे पाणी निश्चित करण्याचे मंत्री विखे पाटलांचे निर्देश
बैठक

अपुऱ्या पावसामुळे पाणी जपून वापरण्याचे जलसंपदा मंत्र्यांचे आवाहन; ३१ ऑगस्टपर्यंत पिण्याचे पाणी निश्चित करण्याचे मंत्री विखे पाटलांचे निर्देश

बेकायदेशीर पाणी उपसा रोखण्यासाठी महसूल, पोलीस आणि जलसंपदा विभागाच्या संयुक्त पथकांमार्फत तातडीने कडक कारवाई मोहीम राबवण्याचे आदेशही मंत्र्यांनी बैठकीत दिले आहेत.
Annant PpangarkarBy Annant Ppangarkar14/06/2026No Comments2 Mins Read
Facebook Twitter WhatsApp
Share
Facebook Twitter Email Telegram WhatsApp

महाराष्ट्र संवाद न्यूज ऑनलाईन
पुणे: 
राज्यातील अपुऱ्या पर्जन्यमानाची पार्श्वभूमी आणि धरणांमधील खालावलेला पाणीसाठा लक्षात घेऊन जलसंपदा मंत्री राधाकृष्ण विखे पाटील यांनी ३१ ऑगस्ट २०२६ पर्यंत नागरिकांना पिण्याच्या पाण्याचा पुरवठा सुनिश्चित करण्यास सर्वोच्च प्राधान्य देण्याचे निर्देश दिले आहेत.
सिंचन भवन येथे आयोजित एका महत्त्वपूर्ण बैठकीत त्यांनी या परिस्थितीचा आढावा घेतला. या बैठकीला कृष्णा व गोदावरी लाभक्षेत्रांतर्गत येणाऱ्या महामंडळांचे कार्यकारी संचालक हनमंत धुमाळ, जयवंत गवळी यांच्यासह मुख्य अभियंता व इतर वरिष्ठ अधिकारी उपस्थित होते.
सध्या राज्यातील धरणांमध्ये एकूण उपयुक्त जलसाठा केवळ ३५७.५ टीएमसी म्हणजेच २५ टक्के इतकाच शिल्लक असून, तो गतवर्षीच्या तुलनेत कमालीचा कमी आहे. चालू वर्षात आतापर्यंत अत्यंत कमी पाऊस झाल्यामुळे धरणांमध्ये नवीन पाण्याची आवक झालेली नाही. ही परिस्थिती अत्यंत गंभीर असल्याने, विशेषतः पुणे आणि पिंपरी चिंचवड महानगर क्षेत्रातील सुमारे ८५ लाख नागरिकांसाठी ३१ ऑगस्टपर्यंत आवश्यक असणारे पाणी राखीव ठेवण्याच्या सूचना मंत्र्यांनी दिल्या आहेत.
तसेच मराठवाडा आणि कृष्णा महामंडळाच्या अंतर्गत येणाऱ्या सर्व धरणे व जलस्रोतांचा तातडीने आढावा घेऊन लोकसंख्येनुसार पिण्याच्या पाण्याचा कोटा निश्चित करण्याचे सांगण्यात आले आहे. यासाठी जलसंपदा विभाग, जिल्हाधिकारी, महानगरपालिका आणि जिल्हा परिषद यांच्यात प्रभावी समन्वय ठेवून पाणी व्यवस्थापनाचा कृती आराखडा तातडीने तयार केला जाणार आहे.
नाशिक आणि मराठवाडा विभागाचा आढावा घेतला असता, नाशिकमध्ये २६ टक्के तर मराठवाड्यात २८ टक्के उपयुक्त जलसाठा शिल्लक आहे. दोन्ही विभागांतील प्रकल्पांमध्ये अपेक्षित पाऊस न झाल्याने, पिण्याच्या पाण्याच्या गरजांना प्राधान्य देऊन उपलब्ध जलसाठ्याचे काटेकोर नियोजन करण्याचे आदेश देण्यात आले आहेत. जोपर्यंत धरणांमध्ये मोठ्या प्रमाणावर नवीन पाण्याची आवक सुरू होत नाही, तोपर्यंत पाण्याचा वापर अत्यंत जपून करावा लागणार आहे. आगामी मान्सूनच्या अनिश्चिततेमुळे प्रत्येक जिल्ह्यासाठी स्वतंत्र कृती आराखडा तयार करून ग्रामीण व शहरी भागातील टंचाई निवारणावर भर दिला जाईल.
अहिल्यानगर जिल्ह्यासह गोदावरी खोऱ्यातील विविध प्रकल्पांची स्थिती पाहता, स्थानिक प्रशासन आणि पाणीपुरवठा यंत्रणांनी समन्वयाने काम करावे आणि नागरिकांमध्ये पाणी बचतीबाबत जनजागृती करावी, असे आवाहनही मंत्री विखे पाटील यांनी केले आहे.
या काळात उपलब्ध पाण्याचा वापर सर्वप्रथम केवळ पिण्यासाठीच केला जाईल, असे स्पष्ट करतानाच बेकायदेशीर पाणी उपसा रोखण्यासाठी महसूल, पोलीस आणि जलसंपदा विभागाच्या संयुक्त पथकांमार्फत तातडीने कडक कारवाई मोहीम राबवण्याचे आदेशही मंत्र्यांनी बैठकीत दिले आहेत.

anantpangarkar
Annant Ppangarkar

Post Views: 358
जलसंपदा विभाग पिण्याचे पाणी बैठक राधाकृष्ण विखे पाटील
Share. Facebook Twitter Pinterest WhatsApp
Annant Ppangarkar
  • Website

Related Posts

अवैध धंद्यांवर ‘मोक्का’, ‘एमपीडीए’नुसार कठोर कारवाई करा: अहिल्यानगरचे जिल्हाधिकारी डॉ. पंकज आशियांचे संगमनेरात निर्देश

05/09/2026

महायुती सरकारचा मोठा निर्णय: भोजापूर पूरचारीचा नदीजोड प्रकल्पात समावेश; संगमनेर, सिन्नर तालुक्यातील दुष्काळी ३५ गावांना दिलासा!

01/09/2026

संगमनेरमध्ये विवाह सोहळ्यांसाठी ‘आचारसंहिता’ लागू; रात्री १० नंतर डीजे बंद

06/08/2026
Leave A Reply Cancel Reply

Document
Our Picks
  • Facebook
  • Twitter
  • Pinterest
  • Instagram
  • YouTube
Advertisement 1 Advertisement 2 Advertisement 3 Advertisement 4
Don't Miss
शेती व सहकार

संगमनेरमध्ये १७ ते २० सप्टेंबरदरम्यान अमृत उद्योग समूहातील सहकारी संस्थांच्या वार्षिक सर्वसाधारण सभा; माजी मंत्री बाळासाहेब थोरात, माजी आमदार डॉ. सुधीर तांबे यांची मुख्य उपस्थिती

By Annant Ppangarkar14/09/20260

Annant Ppangarkar महाराष्ट्र संवाद न्यूज ऑनलाईन – सहकार क्षेत्रातील उत्कृष्ट कामगिरीमुळे देशात आदर्श मॉडेल ठरलेल्या…

सोमवार १४ सप्टेंबर; जाणून घ्या आजचे राशिभविष्य

14/09/2026

भंडारदरा धरणातून खरीप पिकांसाठी सोमवारपासून पाणी सुटणार; गणेशोत्सवात दिलासा : आमदार खताळ

13/09/2026

माजी मंत्री थोरात आणि डॉ. तांबे यांनी घेतली पद्मभूषण अण्णा हजारे यांची भेट; प्रकृतीची केली चौकशी

13/09/2026
Thumbnail 1
Thumbnail 2
Thumbnail 3
Thumbnail 4
previous arrow
next arrow
Thumbnail 1
Thumbnail 2
Thumbnail 3
Thumbnail 4
previous arrow
next arrow

तुमचे हक्काचे व्यासपीठ

Facebook YouTube
Our Picks
September 2026
M T W T F S S
 123456
78910111213
14151617181920
21222324252627
282930  
« Aug    
  • Home
  • आंदोलन
  • आरोग्य
  • इतिहास
  • क्रिडा व कला
  • गुन्हेगारी
  • न्यायालय
  • पत्रकारिता
  • फोटो / गॅलरी
  • महाराष्ट्र संवाद विशेष
  • राजकारण
  • विकास
  • विश्लेषण
  • शिक्षण
  • शेती व सहकार
  • सामाजिक
  • CONTACT US
  • ABOUT US
  • PRIVACY POLICY
© 2026 ThemeSphere. Designed by ThemeSphere.

Type above and press Enter to search. Press Esc to cancel.