महाराष्ट्र संवाद न्यूज ऑनलाईन संगमनेर: छत्रपती शिवाजी महाराजस्व अभियानाअंतर्गत संगमनेर तालुकास्तरीय विशेष शिबिर व कार्यक्रम उद्या शुक्रवारी (३१ जुलै) आयोजित करण्यात आला आहे. मालपाणी लॉन्स येथे सकाळी १०.३० ते सायंकाळी ६ या वेळेत हे शिबिर पार पडणार आहे.
या कार्यक्रमात विविध शासकीय विभागांच्या योजनांचे लाभ नागरिकांना प्रत्यक्ष वाटप केले जातील. तसेच नवीन योजनांचे अर्ज स्वीकारण्याची व्यवस्था देखील करण्यात आली आहे.
या शिबिराच्या माध्यमातून शासनाच्या विविध विभागांच्या कल्याणकारी योजना एकाच छताखाली उपलब्ध होणार आहेत. नागरिकांनी या सुवर्णसंधीचा लाभ घ्यावा आणि मोठ्या संख्येने उपस्थित राहावे, असे आवाहन संगमनेरचे तहसीलदार धीरज मांजरे यांनी केले आहे.