Close Menu
महाराष्ट्र संवादमहाराष्ट्र संवाद
  • Home
  • आंदोलन
  • आरोग्य
  • इतिहास
  • क्रिडा व कला
  • गुन्हेगारी
  • न्यायालय
  • महाराष्ट्र संवाद विशेष
  • राजकारण
  • विकास
  • विश्लेषण
  • शिक्षण
What's Hot

दसरा विशेष: संगमनेरच्या मालपाणी पार्कमध्ये होणाऱ्या ‘या’ खास सोहळ्याचे संपूर्ण वेळापत्रक आणि प्रमुख आकर्षणे एका क्लिकवर!

16/10/2026

२ वर्षे २ महिने तुरुंगवास अन् अखेर न्याय! पोक्सो खटल्यातून संगमनेरच्या तरुणाची सुटका; न्यायालयाचा ‘हा’ महत्त्वाचा निर्णय

16/10/2026

वय विसरले अन् झिंगाटवर थिरकले! ४० वर्षांनंतर भेटले सेवानिवृत्त शिक्षक मित्र; भंडारदऱ्यातील भाऊक ‘गेट-टुगेदर’ची खास बातमी

16/10/2026
Facebook X (Twitter) Instagram
महाराष्ट्र संवादमहाराष्ट्र संवाद
  • Home
  • आंदोलन
  • आरोग्य
  • इतिहास
  • क्रिडा व कला
  • गुन्हेगारी
  • न्यायालय
  • महाराष्ट्र संवाद विशेष
  • राजकारण
  • विकास
  • विश्लेषण
  • शिक्षण
Facebook X (Twitter) Instagram
महाराष्ट्र संवादमहाराष्ट्र संवाद
Home » दिंडी नियोजनावरून झालेल्या वादातून तरुणाला अमानुष मारहाण; आळेफाटा येथे संगमनेरमधील अकरा जणांवर गुन्हा दाखल
गुन्हेगारी

दिंडी नियोजनावरून झालेल्या वादातून तरुणाला अमानुष मारहाण; आळेफाटा येथे संगमनेरमधील अकरा जणांवर गुन्हा दाखल

आळेफाटा पोलीस ठाण्यात भारतीय न्याय संहिता (बी एन एस) कलम ११८(१), ११५(२), ३५२, ३५१(२)(३), १८९(२) आणि १९१(२) अन्वये गुन्हा दाखल करण्यात आला आहे. या घटनेचा पुढील तपास आळेफाटा पोलीस करत आहेत.
Annant PpangarkarBy Annant Ppangarkar06/04/2026No Comments2 Mins Read
Facebook Twitter WhatsApp
Share
Facebook Twitter Email Telegram WhatsApp

महाराष्ट्र संवाद न्यूज ऑनलाईन | आळेफाटा
शिखर शिंगणापूरहून पायी दिंडी घेऊन धांदरफळ (ता. संगमनेर) येथे परतत असताना वाटेत नियोजनावरून वाद झाल्याने एका तरुणाला लाथाबुक्क्यांनी, वायरने आणि लाकडी काठीने अमानुष मारहाण केल्याची धक्कादायक घटना समोर आली आहे. या प्रकरणी आळेफाटा पोलीस ठाण्यात ११ आरोपींविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे. मनोज सुरेश खुरपे (वय ३४) असे फिर्यादीचे नाव असून ते धांदरफळ येथील रहिवासी आहेत.
मिळालेल्या माहितीनुसार, मनोज खुरपे व त्यांच्या गावातील अंदाजे ७० लोक दिंडीनिमित्त शिखर शिंगणापूरला गेले होते. ३० मार्च रोजी ते सर्वजण पायी गावाकडे निघाले होते. ४ एप्रिल रोजी दुपारी एकच्या सुमारास हे लोक आळे रोडने जात असताना चार मोटारसायकलवरून आलेल्या १० ते १२ जणांनी त्यांना अडवले.
यावेळी प्रशांत बाळासाहेब कोल्हे, ओमकार अण्णासाहेब तोरकडी, संतोष सुनील शिंदे, प्रविण कारभारी शिंदे, विशाल अशोक कोल्हे, कौस्तुभ संजय बिडवे आणि एक अनोळखी इसम यांनी फिर्यादीला ‘तू तुझ्या मनानेच नियोजन का करतोस, तुला कोणी अधिकार दिला?’ असे म्हणत शिवीगाळ केली.
यावेळी प्रशांत कोल्हे याने त्याच्याजवळील वायरने आणि ओमकार तोरकडी याने लाकडी काठीने मनोज खुरपे यांना डोक्यात, पाठीवर, पोटावर आणि हातापायावर मारहाण करण्यास सुरुवात केली. त्याच वेळी संतोष शिंदे, प्रविण कारभारी शिंदे, विशाल अशोक कोल्हे, कौस्तुभ बिडवे आणि एक अनोळखी इसम यांनी फिर्यादी आणि त्यांच्यासोबत असलेल्या विशाल मुरलीधर काळे व सुनील हासे यांना हाताने व लाथाबुक्क्यांनी मारहाण करून तेथून निघून गेले.
मारहाण करून पुढे गेल्यानंतर आरोपी आळेगावातील महादेव मंदिरासमोर थांबले होते. तिथे पुन्हा प्रशांत कोल्हे, ओमकार तोरकडी, संतोष शिंदे, प्रविण कारभारी शिंदे, विशाल कोल्हे, कौस्तुभ बिडवे, एक अनोळखी इसम तसेच दिंडीतील आशिष मच्छिंद्र कोल्हे, निखिल संजय जाधव, विकास गोरख कोल्हे आणि कार्तिक कैलास कोल्हे हे सर्वजण उपस्थित होते. यावेळी निखिल जाधव आणि आशिष कोल्हे यांनी फिर्यादीला ‘तुला जास्त माज आला आहे का, तू आमच्या नादी लागू नको, नाहीतर तुला संपवून टाकू’ अशी जिवे मारण्याची धमकी दिली. या मारहाणीत फिर्यादीच्या गळ्यातील एक तोळा वजनाची सोन्याची चैन गहाळ झाली. त्यानंतर घाबरलेले फिर्यादी आळेगावातील अंबिका माता मंदिराजवळ आले असता, तेथेही आरोपींनी त्यांना पुन्हा धमकी दिली.
या सर्व प्रकारानंतर फिर्यादीने इतर साथीदारांना बोलावून पोलीस ठाण्यात धाव घेतली. त्यांनी दिलेल्या फिर्यादीवरून आळेफाटा पोलीस ठाण्यात भारतीय न्याय संहिता (बी एन एस) कलम ११८(१), ११५(२), ३५२, ३५१(२)(३), १८९(२) आणि १९१(२) अन्वये गुन्हा दाखल करण्यात आला आहे. या घटनेचा पुढील तपास आळेफाटा पोलीस करत आहेत.

anantpangarkar
Annant Ppangarkar

Views: 3,101
आळेफाटा पोलीस मारामारी
Share. Facebook Twitter Pinterest WhatsApp
Annant Ppangarkar
  • Website

Related Posts

कर्ज वसुलीच्या नावाखाली संगमनेरात महिलेचा विनयभंग; आरोपीवर गुन्हा दाखल

15/10/2026

संगमनेरमध्ये ८८ लाखांचा गांजा जप्त; दोन तस्करांना अटक, तीन साथीदार फरार

06/10/2026

एलसीबी अन्‌ एफडीएची धडक कारवाई; १२.८१ लाखांच्या गुटख्यासह दोघांना अटक, चार जण फरार

05/10/2026
Leave A Reply Cancel Reply

Document
Our Picks
  • Facebook
  • Twitter
  • Pinterest
  • Instagram
  • YouTube
Advertisement 1 Advertisement 2 Advertisement 3 Advertisement 4
Don't Miss
Uncategorized

दसरा विशेष: संगमनेरच्या मालपाणी पार्कमध्ये होणाऱ्या ‘या’ खास सोहळ्याचे संपूर्ण वेळापत्रक आणि प्रमुख आकर्षणे एका क्लिकवर!

By Annant Ppangarkar16/10/20260

महाराष्ट्र संवाद न्यूज ऑनलाईन- विजयादशमीच्या मंगलपर्वानिमित्त संगमनेरमधील अकोले रोडवरील मालपाणी इंडस्ट्रियल पार्कमध्ये मंगळवारी, (२० ऑक्टोंबर)…

२ वर्षे २ महिने तुरुंगवास अन् अखेर न्याय! पोक्सो खटल्यातून संगमनेरच्या तरुणाची सुटका; न्यायालयाचा ‘हा’ महत्त्वाचा निर्णय

16/10/2026

वय विसरले अन् झिंगाटवर थिरकले! ४० वर्षांनंतर भेटले सेवानिवृत्त शिक्षक मित्र; भंडारदऱ्यातील भाऊक ‘गेट-टुगेदर’ची खास बातमी

16/10/2026

आदिवासी बांधवांचा शिंदेंच्या शिवसेनेत प्रवेश! आमदार खताळ सोडविणार शिरसगाव धुप्याचा पाणी, रस्ते, वीज प्रश्न

16/10/2026
Thumbnail 1
Thumbnail 2
Thumbnail 3
Thumbnail 4
previous arrow
next arrow
Thumbnail 1
Thumbnail 2
Thumbnail 3
Thumbnail 4
previous arrow
next arrow

तुमचे हक्काचे व्यासपीठ

Facebook YouTube
Our Picks
October 2026
M T W T F S S
 1234
567891011
12131415161718
19202122232425
262728293031  
« Sep    
  • Home
  • आंदोलन
  • आरोग्य
  • इतिहास
  • क्रिडा व कला
  • गुन्हेगारी
  • न्यायालय
  • पत्रकारिता
  • फोटो / गॅलरी
  • महाराष्ट्र संवाद विशेष
  • राजकारण
  • विकास
  • विश्लेषण
  • शिक्षण
  • शेती व सहकार
  • सामाजिक
  • CONTACT US
  • ABOUT US
  • PRIVACY POLICY
© 2026 ThemeSphere. Designed by ThemeSphere.

Type above and press Enter to search. Press Esc to cancel.