Close Menu
महाराष्ट्र संवादमहाराष्ट्र संवाद
  • Home
  • आंदोलन
  • आरोग्य
  • इतिहास
  • क्रिडा व कला
  • गुन्हेगारी
  • न्यायालय
  • महाराष्ट्र संवाद विशेष
  • राजकारण
  • विकास
  • विश्लेषण
  • शिक्षण
What's Hot

दसरा विशेष: संगमनेरच्या मालपाणी पार्कमध्ये होणाऱ्या ‘या’ खास सोहळ्याचे संपूर्ण वेळापत्रक आणि प्रमुख आकर्षणे एका क्लिकवर!

16/10/2026

२ वर्षे २ महिने तुरुंगवास अन् अखेर न्याय! पोक्सो खटल्यातून संगमनेरच्या तरुणाची सुटका; न्यायालयाचा ‘हा’ महत्त्वाचा निर्णय

16/10/2026

वय विसरले अन् झिंगाटवर थिरकले! ४० वर्षांनंतर भेटले सेवानिवृत्त शिक्षक मित्र; भंडारदऱ्यातील भाऊक ‘गेट-टुगेदर’ची खास बातमी

16/10/2026
Facebook X (Twitter) Instagram
महाराष्ट्र संवादमहाराष्ट्र संवाद
  • Home
  • आंदोलन
  • आरोग्य
  • इतिहास
  • क्रिडा व कला
  • गुन्हेगारी
  • न्यायालय
  • महाराष्ट्र संवाद विशेष
  • राजकारण
  • विकास
  • विश्लेषण
  • शिक्षण
Facebook X (Twitter) Instagram
महाराष्ट्र संवादमहाराष्ट्र संवाद
Home » खरातचा बोलवता धनी कोण? मंत्र्यांपासून आमदारांपर्यंत साऱ्यांची चौकशी हवी, सुषमा अंधारे यांची मागणी
महाराष्ट्र संवाद विशेष

खरातचा बोलवता धनी कोण? मंत्र्यांपासून आमदारांपर्यंत साऱ्यांची चौकशी हवी, सुषमा अंधारे यांची मागणी

रुपाली चाकणकर यांना आतापर्यंत चौकशीला बोलवलं जात नाही. अशोक खरातचा निकटवर्तीय नामकर्ण आवारे याच्यावर कारवाई का केली जात नाही? अशोक खरातचा सीए ललित पोकळे याची चौकशी का केली जात नाही? नाशिकच्या काही वरिष्ठ अधिकाऱ्यांचा यामध्ये हात असून त्याची माहिती आम्ही एसआयटीला दिली आहे
Annant PpangarkarBy Annant Ppangarkar06/04/2026No Comments2 Mins Read
Facebook Twitter WhatsApp
Share
Facebook Twitter Email Telegram WhatsApp

विशेष प्रतिनिधी | मुंबई
अशोक खरातचा सीडीआर हा एसआयटी काढत नाही तर कुणीतरी बाहेरचा व्यक्ती काढते, ही बाब अत्यंत गंभीर आहे. त्यामुळे सीडीआर बाहेर काढलेल्या दमानिया यांच्यावर कारवाई करावीच, पण त्यामध्ये नाव असलेल्या एकनाथ शिंदे यांची एसआयटी चौकशी कधी करणार, असा प्रश्न ठाकरे गटाच्या नेत्या सुषमा अंधारे यांनी विचारला. दीपक केसरकर हे या प्रकरणातील सर्व कड्या जोडणारे व्यक्ती आहेत, त्यांना एसआयटीकडून कधी चौकशीला बोलावलं जाणार याची माहिती द्यावी अशी मागणीही अंधारे यांनी केली.
सुषमा अंधारे म्हणाल्या की, ज्यांनी सीडीआर काढले त्यांच्यावर कारवाई करावीच, पण ज्यांचे सीडीआरमध्ये नाव निघाले त्यांच्यावर काय कारवाई करणार? या सीडीआर प्रकरणात एकनाथ शिंदे यांचं नाव आहे. त्यांच्यावर काय कारवाई करणार? सातारा ड्रग्जच्या प्रकरणात आम्ही अनेक आरोप केले, पण त्यावर कोणतीही कारवाई करण्यात आली नाही. राज्याचे उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे तसेच राज्याच्या महिला आयोगाच्या आधीच्या अध्यक्षा यांनी इतक्या वेळा अशोक खरातला कॉल का केला याची माहिती समोर आली पाहिजे.
एकनाथ शिंदे यांच्यावर एसआयटी कारवाई करणार आहे का? एसआयटी चांगलं काम करेल अशी अपेक्षा आहे, पण नाईलाजाने त्याच्या तपासाच्या गतीवर टीका करावी लागतेय असं सुषमा अंधारे म्हणाल्या. एखादी माहिती अंजली दमानिया आणि माझ्यापर्यंत पोहोचते, पण तीच माहिती एसआयटीपर्यंत का पोहोचत नाही असा प्रश्न पडतोय, असंही त्या म्हणाल्या. या काळात पुरावे नष्ट केले जाऊ शकतात. एकनाथ शिंदे आणि दीपक केसरकर ही नावं मोठी आहेत, त्यामुळे त्यांची चौकशी का केली जात नाही? असा प्रश्नही अंधारे यांनी विचारला.
रुपाली चाकणकर यांना आतापर्यंत चौकशीला बोलवलं जात नाही. अशोक खरातचा निकटवर्तीय नामकर्ण आवारे याच्यावर कारवाई का केली जात नाही? अशोक खरातचा सीए ललित पोकळे याची चौकशी का केली जात नाही? नाशिकच्या काही वरिष्ठ अधिकाऱ्यांचा यामध्ये हात असून त्याची माहिती आम्ही एसआयटीला दिली आहे. परंतु त्यावर अद्याप काहीही कारवाई केली जात नाही, असं सुषमा अंधारे म्हणाल्या.
सुषमा अंधारे म्हणाल्या की, दीपक लोंढे हा अशोक खरात आणि दीपक केसरकर यांचा अत्यंत निकटवर्तीय आहे. केसरकरांनी कितीही नाही म्हटलं तरी ते या प्रकरणातील ते अनेक कडा जोडणारे आहेत. दीपक केसरकर हे दीपक लोंढेच्या कायम संपर्कात होते, त्यांच्यामध्ये काय संभाषण होत होतं? अधोरी विद्या, तंत्रमंत्र आणि वर्षा बंगल्यावर रेड्याचे शिंग पुरले आहेत अशी सारखी चर्चा केली जात आहे. कुणाच्या तरी फोटोवर फुल्या मारल्या याची चर्चा सातत्याने सुरू असते. फोटोवर जर कुणी फुल्या मारल्या असतील तर ती अत्यंत गंभीर गोष्ट आहे. त्यामुळे कुणाचा फायदा होणार आहे? याची माहिती समोर आणावी, अशी मागणी सुषमा अंधारे यांनी केली.

anantpangarkar
Annant Ppangarkar

Views: 347
अशोक खरात सुषमा अंधारे
Share. Facebook Twitter Pinterest WhatsApp
Annant Ppangarkar
  • Website

Related Posts

वय विसरले अन् झिंगाटवर थिरकले! ४० वर्षांनंतर भेटले सेवानिवृत्त शिक्षक मित्र; भंडारदऱ्यातील भाऊक ‘गेट-टुगेदर’ची खास बातमी

16/10/2026

“राजा किती क्रूर आणि खोटारडा आहे…” आई-बाळाची आर्त हाक अन् पोलिसांचा पाशवी हात; संजय राऊतांनी शेअर केलेल्या ‘त्या’ एका छायाचित्राने हादरवला महाराष्ट्र!

12/10/2026

MPSC आंदोलनाला डॉ. जयश्रीताई थोरात यांचा पाठिंबा; समाज आणि आयोगातील ब्लड कॅन्सर ठीक करायचाय!

10/10/2026
Leave A Reply Cancel Reply

Document
Our Picks
  • Facebook
  • Twitter
  • Pinterest
  • Instagram
  • YouTube
Advertisement 1 Advertisement 2 Advertisement 3 Advertisement 4
Don't Miss
Uncategorized

दसरा विशेष: संगमनेरच्या मालपाणी पार्कमध्ये होणाऱ्या ‘या’ खास सोहळ्याचे संपूर्ण वेळापत्रक आणि प्रमुख आकर्षणे एका क्लिकवर!

By Annant Ppangarkar16/10/20260

महाराष्ट्र संवाद न्यूज ऑनलाईन- विजयादशमीच्या मंगलपर्वानिमित्त संगमनेरमधील अकोले रोडवरील मालपाणी इंडस्ट्रियल पार्कमध्ये मंगळवारी, (२० ऑक्टोंबर)…

२ वर्षे २ महिने तुरुंगवास अन् अखेर न्याय! पोक्सो खटल्यातून संगमनेरच्या तरुणाची सुटका; न्यायालयाचा ‘हा’ महत्त्वाचा निर्णय

16/10/2026

वय विसरले अन् झिंगाटवर थिरकले! ४० वर्षांनंतर भेटले सेवानिवृत्त शिक्षक मित्र; भंडारदऱ्यातील भाऊक ‘गेट-टुगेदर’ची खास बातमी

16/10/2026

आदिवासी बांधवांचा शिंदेंच्या शिवसेनेत प्रवेश! आमदार खताळ सोडविणार शिरसगाव धुप्याचा पाणी, रस्ते, वीज प्रश्न

16/10/2026
Thumbnail 1
Thumbnail 2
Thumbnail 3
Thumbnail 4
previous arrow
next arrow
Thumbnail 1
Thumbnail 2
Thumbnail 3
Thumbnail 4
previous arrow
next arrow

तुमचे हक्काचे व्यासपीठ

Facebook YouTube
Our Picks
October 2026
M T W T F S S
 1234
567891011
12131415161718
19202122232425
262728293031  
« Sep    
  • Home
  • आंदोलन
  • आरोग्य
  • इतिहास
  • क्रिडा व कला
  • गुन्हेगारी
  • न्यायालय
  • पत्रकारिता
  • फोटो / गॅलरी
  • महाराष्ट्र संवाद विशेष
  • राजकारण
  • विकास
  • विश्लेषण
  • शिक्षण
  • शेती व सहकार
  • सामाजिक
  • CONTACT US
  • ABOUT US
  • PRIVACY POLICY
© 2026 ThemeSphere. Designed by ThemeSphere.

Type above and press Enter to search. Press Esc to cancel.