Close Menu
महाराष्ट्र संवादमहाराष्ट्र संवाद
  • Home
  • आंदोलन
  • आरोग्य
  • इतिहास
  • क्रिडा व कला
  • गुन्हेगारी
  • न्यायालय
  • महाराष्ट्र संवाद विशेष
  • राजकारण
  • विकास
  • विश्लेषण
  • शिक्षण
What's Hot

अवैध वाळू वाहतूक करणारा हायवा जप्त, २५.६० लाखांचा मुद्देमाल हस्तगत

03/09/2026

आज गुरुवार, ०३ सप्टेंबर २०२६ — तुमचा आजचा दिवस कसा असेल, जाणून घ्या

03/09/2026

जवळेकडलगच्या दुर्देवी घटनेनंतर माजी मंत्री बाळासाहेब थोरात यांची पवार कुटुंबाला सांत्वन भेट; बिबट्यांच्या दहशतीवर प्रशासनाने ठोस उपाययोजना करण्याची मागणी

02/09/2026
Facebook X (Twitter) Instagram
महाराष्ट्र संवादमहाराष्ट्र संवाद
  • Home
  • आंदोलन
  • आरोग्य
  • इतिहास
  • क्रिडा व कला
  • गुन्हेगारी
  • न्यायालय
  • महाराष्ट्र संवाद विशेष
  • राजकारण
  • विकास
  • विश्लेषण
  • शिक्षण
Facebook X (Twitter) Instagram
महाराष्ट्र संवादमहाराष्ट्र संवाद
Home » मुख्याधिकाऱ्यांवर गोळीबार; उपनगराध्यक्षांच्या पतीविरोधात गुन्हा दाखल
गुन्हेगारी

मुख्याधिकाऱ्यांवर गोळीबार; उपनगराध्यक्षांच्या पतीविरोधात गुन्हा दाखल

१३ एप्रिल रोजी घडलेल्या या घटनेनंतर मुख्याधिकारी प्रचंड दहशतीखाली असल्याने त्यांनी शनिवारी उशिरा फिर्याद दिली, त्यानंतर पोलिसांनी वेगाने हालचाली सुरू केल्या आहेत.
Annant PpangarkarBy Annant Ppangarkar19/04/2026No Comments2 Mins Read
Facebook Twitter WhatsApp
Share
Facebook Twitter Email Telegram WhatsApp

अहिल्यानगर:

नेवासा नगरपंचायतीचे मुख्याधिकारी निखिल फराटे यांच्यावर गोळीबार करून त्यांच्या हत्येचा प्रयत्न केल्याची धक्कादायक घटना समोर आली आहे. याप्रकरणी नेवासा नगरपंचायतीच्या उपनगराध्यक्षांचे पती संजय लक्ष्मण सुखदान यांच्याविरुद्ध पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

१३ एप्रिल रोजी घडलेल्या या घटनेनंतर मुख्याधिकारी प्रचंड दहशतीखाली असल्याने त्यांनी शनिवारी उशिरा फिर्याद दिली, त्यानंतर पोलिसांनी वेगाने हालचाली सुरू केल्या आहेत.

मुख्याधिकारी फराटे यांनी दिलेल्या फिर्यादीनुसार, संजय सुखदान यांनी यापूर्वीही अनेकदा नियमबाह्य कामांसाठी त्यांच्यावर दबाव आणला होता. मागणी पूर्ण न केल्याने त्यांनी मुख्याधिकाऱ्यांना चप्पल उगारून मारहाणीचा प्रयत्न केला होता आणि गंभीर परिणाम भोगण्याची धमकीही दिली होती.

१३ एप्रिल रोजी सायंकाळी नगरपंचायत कार्यालयात सुरू असलेल्या वादाचे पर्यावसान पुढे गोळीबारात झाले. फराटे हे कार्यालयीन काम संपवून अहिल्यानगरच्या दिशेने जात असताना सुखदान यांनी त्यांच्या बुलेटने मुख्याधिकाऱ्यांच्या चारचाकीला धडक दिली. त्यानंतर खोलेश्वर मंदिर चौकात गाडी अडवून सुखदान यांनी गावठी कट्ट्यातून थेट निखिल फराटे यांच्या दिशेने गोळी झाडली. फराटे प्रसंगावधान राखून खाली वाकल्याने त्यांचा जीव वाचला, तर दुसरी गोळी झाडताना कट्ट्याचा ट्रिगर अडकल्याने मोठा अनर्थ टळला.

सुरुवातीला प्रचंड घाबरलेल्या मुख्याधिकाऱ्यांनी तक्रार करण्यास विलंब केला, मात्र आरोपीचे काही साथीदार सातत्याने पाठलाग करत असल्याचे लक्षात आल्यानंतर त्यांनी तोफखाना पोलीस ठाण्यात धाव घेऊन तक्रार नोंदवली. तोफखाना पोलिसांनी गुन्हा दाखल करून पुढील तपासासाठी तो नेवासा पोलिसांकडे वर्ग केला आहे.

या प्रकरणातील मुख्य आरोपी संजय सुखदान सध्या फरार असून, पोलीस निरीक्षक महेश पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस पथके त्याचा शोध घेत आहेत. या घटनेमुळे शासकीय वर्तुळात आणि नेवासा शहरात मोठी खळबळ माजली आहे.

anantpangarkar
Annant Ppangarkar

Post Views: 979
क्राईम गोळीबार नेवासे नगरपंचायत मुख्याधिकारी
Share. Facebook Twitter Pinterest WhatsApp
Annant Ppangarkar
  • Website

Related Posts

अवैध वाळू वाहतूक करणारा हायवा जप्त, २५.६० लाखांचा मुद्देमाल हस्तगत

03/09/2026

पोलिसांचा वाळू माफियांना मोठा धक्का; या दोन तालुक्यातून २० लाखांचा मुद्देमाल जप्त

02/09/2026

पोलिसांच्या ताब्यात असलेल्या तरुणाला आमदार खताळ यांच्या कार्यकर्त्याकडून मारहाण; संदेश देशमुख यांच्यावर एनसी दाखल

01/09/2026
Leave A Reply Cancel Reply

Document
Our Picks
  • Facebook
  • Twitter
  • Pinterest
  • Instagram
  • YouTube
Advertisement 1 Advertisement 2 Advertisement 3 Advertisement 4
Don't Miss
गुन्हेगारी

अवैध वाळू वाहतूक करणारा हायवा जप्त, २५.६० लाखांचा मुद्देमाल हस्तगत

By Annant Ppangarkar03/09/20260

महाराष्ट्र संवाद न्यूज ऑनलाईन: जिल्ह्यातील अवैध वाळू वाहतुकीविरुद्ध अहिल्यानगरचे पोलीस अधीक्षक मुम्मका सुदर्शन यांनी दिलेल्या…

आज गुरुवार, ०३ सप्टेंबर २०२६ — तुमचा आजचा दिवस कसा असेल, जाणून घ्या

03/09/2026

जवळेकडलगच्या दुर्देवी घटनेनंतर माजी मंत्री बाळासाहेब थोरात यांची पवार कुटुंबाला सांत्वन भेट; बिबट्यांच्या दहशतीवर प्रशासनाने ठोस उपाययोजना करण्याची मागणी

02/09/2026

संगमनेर सत्र न्यायालयाचा महत्त्वपूर्ण निकाल: प्राणघातक हल्ल्याप्रकरणी तिघा आरोपींची २ वर्षांची सक्तमजुरी कायम

02/09/2026
Thumbnail 1
Thumbnail 2
Thumbnail 3
Thumbnail 4
previous arrow
next arrow
Thumbnail 1
Thumbnail 2
Thumbnail 3
Thumbnail 4
previous arrow
next arrow

तुमचे हक्काचे व्यासपीठ

Facebook YouTube
Our Picks
September 2026
M T W T F S S
 123456
78910111213
14151617181920
21222324252627
282930  
« Aug    
  • Home
  • आंदोलन
  • आरोग्य
  • इतिहास
  • क्रिडा व कला
  • गुन्हेगारी
  • न्यायालय
  • पत्रकारिता
  • फोटो / गॅलरी
  • महाराष्ट्र संवाद विशेष
  • राजकारण
  • विकास
  • विश्लेषण
  • शिक्षण
  • शेती व सहकार
  • सामाजिक
  • CONTACT US
  • ABOUT US
  • PRIVACY POLICY
© 2026 ThemeSphere. Designed by ThemeSphere.

Type above and press Enter to search. Press Esc to cancel.