Close Menu
महाराष्ट्र संवादमहाराष्ट्र संवाद
  • Home
  • आंदोलन
  • आरोग्य
  • इतिहास
  • क्रिडा व कला
  • गुन्हेगारी
  • न्यायालय
  • महाराष्ट्र संवाद विशेष
  • राजकारण
  • विकास
  • विश्लेषण
  • शिक्षण
What's Hot

आधीच मुसळधार, त्यात दूषित पाण्याचा धोका! संगमनेर पालिकेच्या ढिसाळ कारभारावर विरोधी नगरसेविका साक्षी सूर्यवंशी कडाडल्या… मुख्याधिकाऱ्यांकडे केल्या ‘या’ मागण्या

July 9, 2026

आज गुरुवार, ९ जुलै २०२६ – कसा असेल तुमचा आजचा दिवस जाणून घ्या

July 9, 2026

संगमनेरला स्वतंत्र आरटीओ कार्यालय मिळणार; आमदार सत्यजीत तांबे यांच्या पाठपुराव्याला परिवहन मंत्र्यांचा सकारात्मक प्रतिसाद

July 8, 2026
Facebook X (Twitter) Instagram
महाराष्ट्र संवादमहाराष्ट्र संवाद
  • Home
  • आंदोलन
  • आरोग्य
  • इतिहास
  • क्रिडा व कला
  • गुन्हेगारी
  • न्यायालय
  • महाराष्ट्र संवाद विशेष
  • राजकारण
  • विकास
  • विश्लेषण
  • शिक्षण
Facebook X (Twitter) Instagram
महाराष्ट्र संवादमहाराष्ट्र संवाद
Home » ग्रीनफिल्ड महामार्गग्रस्त शेतकऱ्यांच्या मोबदल्याचा फेरविचार होणार; मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचे सकारात्मक आश्वासन
राजकारण

ग्रीनफिल्ड महामार्गग्रस्त शेतकऱ्यांच्या मोबदल्याचा फेरविचार होणार; मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचे सकारात्मक आश्वासन

भूसंपादनामुळे शेतकऱ्यांचा उपजीविकेचा आधार हिरावला जात असल्याने, शासनाने ‘फेअर कम्पेन्सेशन अॅक्ट २०१३’ मधील तरतुदीनुसार बाजारभावाच्या चारपटपर्यंत वाढीव मोबदला देऊन जमिनींचे फेरमूल्यांकन करावे, अशी आग्रही मागणी आमदार खताळ यांनी मुख्यमंत्र्यांकडे केली आहे.
अनंत पांगारकरBy अनंत पांगारकरMay 24, 2026No Comments2 Mins Read
Facebook Twitter WhatsApp
Share
Facebook Twitter Email Telegram WhatsApp

महाराष्ट्र संवाद न्यूज ऑनलाईन, संगमनेर:

सूरत–चेन्नई ग्रीनफिल्ड महामार्गासाठी संपादित करण्यात आलेल्या जमिनींच्या अत्यंत कमी मोबदल्याबाबत संगमनेर तालुक्यातील शेतकऱ्यांमध्ये तीव्र नाराजी आहे. या पार्श्वभूमीवर, आमदार अमोल खताळ यांनी शिर्डी येथे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची भेट घेऊन शेतकऱ्यांना समृद्धी महामार्गाप्रमाणे वाढीव व न्याय्य मोबदला देण्याची मागणी निवेदनाद्वारे केली. यावर मुख्यमंत्री फडणवीस यांनी सकारात्मक विचार करून लवकरच निर्णय घेण्याचे आश्वासन दिले आहे. याप्रसंगी जलसंपदा तथा पालकमंत्री राधाकृष्ण विखे पाटील देखील उपस्थित होते.

तालुक्यातील वडझरी बु., अजमपूर, आरामपूर, चिंचोली गुरव, हसनाबाद, तळेगावसह अनेक गावांमधील सुपीक आणि निळवंडे कालव्याच्या सिंचनाखालील बागायती जमिनी या महामार्गासाठी संपादित करण्यात आल्या आहेत. सन २०२१-२२ मध्ये जाहीर झालेला भूसंपादनाचा निवाडा प्रत्यक्ष बाजारभावाच्या तुलनेत अत्यंत कमी असून, काही ठिकाणी तो प्रतिएकर दहा लाख रुपयांपेक्षाही कमी आहे.

स्थानिक बाजारभाव प्रतिएकर २५ ते ३० लाख रुपये असताना, मिरपूर येथील एका शेतकऱ्याला २४ गुंठ्यांसाठी केवळ ५ लाख ९ हजार रुपये मंजूर झाल्याचे उदाहरण शेतकऱ्यांनी दिले आहे. या अल्प रकमेत इतरत्र पर्यायी जमीन खरेदी करणे अशक्य असल्याचे शेतकऱ्यांचे म्हणणे आहे.

राज्यात समृद्धी महामार्ग व पालखी मार्गासाठी शेतकऱ्यांना बाजारभावाच्या अनेक पटीने आणि कोट्यवधी रुपयांची नुकसानभरपाई देण्यात आली आहे. मात्र, संगमनेर तालुक्यातील शेतकऱ्यांच्या बाबतीत वेगळी भूमिका घेतली गेल्याने समानतेच्या तत्त्वाचे उल्लंघन होत असल्याची भावना निर्माण झाली आहे.

भूसंपादनामुळे शेतकऱ्यांचा उपजीविकेचा आधार हिरावला जात असल्याने, शासनाने ‘फेअर कम्पेन्सेशन अॅक्ट २०१३’ मधील तरतुदीनुसार बाजारभावाच्या चारपटपर्यंत वाढीव मोबदला देऊन जमिनींचे फेरमूल्यांकन करावे, अशी आग्रही मागणी आमदार खताळ यांनी मुख्यमंत्र्यांकडे केली आहे.

anantpangarkar
अनंत पांगारकर

Post Views: 413
अमोल खताळ ग्रीन फील्ड महामार्ग देवेंद्र फडणवीस भूसंपादन मोबदला
Share. Facebook Twitter Pinterest WhatsApp
अनंत पांगारकर
  • Website

Related Posts

आधीच मुसळधार, त्यात दूषित पाण्याचा धोका! संगमनेर पालिकेच्या ढिसाळ कारभारावर विरोधी नगरसेविका साक्षी सूर्यवंशी कडाडल्या… मुख्याधिकाऱ्यांकडे केल्या ‘या’ मागण्या

July 9, 2026

संगमनेरला स्वतंत्र आरटीओ कार्यालय मिळणार; आमदार सत्यजीत तांबे यांच्या पाठपुराव्याला परिवहन मंत्र्यांचा सकारात्मक प्रतिसाद

July 8, 2026

संगमनेर ब्रँड राज्यपातळीवर बदनाम करण्याचा नवा डाव; निळवंडे थेट पाईपलाईन चौकशीच्या निर्णयावर माजी नगराध्यक्ष दुर्गाताई तांबे यांची घणाघाती टीका

July 8, 2026
Leave A Reply Cancel Reply

Document
Our Picks
  • Facebook
  • Twitter
  • Pinterest
  • Instagram
  • YouTube
Advertisement 1 Advertisement 2 Advertisement 3 Advertisement 4
Don't Miss
राजकारण

आधीच मुसळधार, त्यात दूषित पाण्याचा धोका! संगमनेर पालिकेच्या ढिसाळ कारभारावर विरोधी नगरसेविका साक्षी सूर्यवंशी कडाडल्या… मुख्याधिकाऱ्यांकडे केल्या ‘या’ मागण्या

By अनंत पांगारकरJuly 9, 20260

महाराष्ट्र संवाद न्यूज ऑनलाईन संगमनेर: संगमनेर शहरात मुसळधार पावसामुळे ठिकठिकाणी सांडपाणी साचले असून, पिण्याच्या पाण्याच्या…

आज गुरुवार, ९ जुलै २०२६ – कसा असेल तुमचा आजचा दिवस जाणून घ्या

July 9, 2026

संगमनेरला स्वतंत्र आरटीओ कार्यालय मिळणार; आमदार सत्यजीत तांबे यांच्या पाठपुराव्याला परिवहन मंत्र्यांचा सकारात्मक प्रतिसाद

July 8, 2026

संगमनेर ब्रँड राज्यपातळीवर बदनाम करण्याचा नवा डाव; निळवंडे थेट पाईपलाईन चौकशीच्या निर्णयावर माजी नगराध्यक्ष दुर्गाताई तांबे यांची घणाघाती टीका

July 8, 2026
Thumbnail 1
Thumbnail 2
Thumbnail 3
Thumbnail 4
previous arrow
next arrow
Thumbnail 1
Thumbnail 2
Thumbnail 3
Thumbnail 4
previous arrow
next arrow

तुमचे हक्काचे व्यासपीठ

Facebook YouTube
Our Picks
July 2026
M T W T F S S
 12345
6789101112
13141516171819
20212223242526
2728293031  
« Jun    
  • Home
  • आंदोलन
  • आरोग्य
  • इतिहास
  • क्रिडा व कला
  • गुन्हेगारी
  • न्यायालय
  • पत्रकारिता
  • फोटो / गॅलरी
  • महाराष्ट्र संवाद विशेष
  • राजकारण
  • विकास
  • विश्लेषण
  • शिक्षण
  • शेती व सहकार
  • सामाजिक
  • CONTACT US
  • ABOUT US
  • PRIVACY POLICY
© 2026 ThemeSphere. Designed by ThemeSphere.

Type above and press Enter to search. Press Esc to cancel.