Close Menu
महाराष्ट्र संवादमहाराष्ट्र संवाद
  • Home
  • आंदोलन
  • आरोग्य
  • इतिहास
  • क्रिडा व कला
  • गुन्हेगारी
  • न्यायालय
  • महाराष्ट्र संवाद विशेष
  • राजकारण
  • विकास
  • विश्लेषण
  • शिक्षण
What's Hot

पंचनाम्यात वेळ घालवू नका, सरसकट मदत करा! दिल्लीवरून थेट शेतकऱ्यांच्या बांधावर पोहोचून बाळासाहेब थोरात आक्रमक!

13/10/2026

डीजेचा आवाज आणि लेझर लाईट्स खरोखरच जीवघेणे ठरू शकतात? तज्ज्ञ डॉक्टर काय म्हणतात, पाहा… शिंदेवाडीतील विद्यार्थ्यांच्या शिबिरात नेमकं काय घडलं…

13/10/2026

शिक्षण क्षेत्राची मान उंचावणारी बातमी! संगमनेरच्या या लेखकाच्या चार पुस्तकांचा शासनमान्य ग्रंथ निवडसुचित समावेश; वाचा सविस्तर

13/10/2026
Facebook X (Twitter) Instagram
महाराष्ट्र संवादमहाराष्ट्र संवाद
  • Home
  • आंदोलन
  • आरोग्य
  • इतिहास
  • क्रिडा व कला
  • गुन्हेगारी
  • न्यायालय
  • महाराष्ट्र संवाद विशेष
  • राजकारण
  • विकास
  • विश्लेषण
  • शिक्षण
Facebook X (Twitter) Instagram
महाराष्ट्र संवादमहाराष्ट्र संवाद
Home » संगमनेर ब्रँड राज्यपातळीवर बदनाम करण्याचा नवा डाव; निळवंडे थेट पाईपलाईन चौकशीच्या निर्णयावर माजी नगराध्यक्ष दुर्गाताई तांबे यांची घणाघाती टीका
राजकारण

संगमनेर ब्रँड राज्यपातळीवर बदनाम करण्याचा नवा डाव; निळवंडे थेट पाईपलाईन चौकशीच्या निर्णयावर माजी नगराध्यक्ष दुर्गाताई तांबे यांची घणाघाती टीका

आतापर्यंत शहर व तालुक्यासाठी एक रुपयाचाही निधी न आणता फक्त बदनामीचे राजकारण करणाऱ्यांच्या आरोपांमधील हवा चौकशीतून नक्कीच निघेल, असा विश्वास त्यांनी व्यक्त केला.
Annant PpangarkarBy Annant Ppangarkar08/07/2026No Comments3 Mins Read
Facebook Twitter WhatsApp
Share
Facebook Twitter Email Telegram WhatsApp

महाराष्ट्र संवाद न्यूज ऑनलाईन
संगमनेर:
निळवंडे धरणातून संगमनेर शहरासाठी राबविण्यात आलेली ऐतिहासिक थेट पाईपलाईन योजना पूर्णपणे यशस्वी झाली असून शहरवासीयांना दररोज स्वच्छ व मुबलक पाणी मिळत आहे. असे असताना २००९ च्या योजनेबाबत २०२६ मध्ये विधानसभेत अत्यंत खोटे, चुकीचे आणि अपूर्ण माहितीच्या आधारे आरोप करून संगमनेर शहर व तालुक्याची राज्यात बदनामी करण्याचे काम येथील नवीन लोकप्रतिनिधी करत आहेत. पालिका निवडणुकीत घरातील उमेदवारासह सर्वच जागांवर सपाटून मार खाल्ल्यामुळे आलेल्या वैफल्यग्रस्ततेतूनच हे आरोप केले जात असून, राज्य शासनाने जाहीर केलेल्या चौकशीचे आम्ही स्वागतच करतो. या चौकशीतून ‘दूध का दूध, पानी का पानी’ होऊन तोंडाच्या वाफा दवडणारे विरोधक तोंडघाशी पडतील, अशी घणाघाती टीका माजी नगराध्यक्ष दुर्गाताई तांबे यांनी केली आहे.
प्रसिद्धीस दिलेल्या पत्रकात दुर्गाताई तांबे यांनी म्हटले आहे की, संगमनेर हे विकसित व शांततेचे शहर आहे. शहराची वाढती लोकसंख्या लक्षात घेऊन ही थेट पाईपलाईन योजना राबविण्यात आली. ५ मे २००९ रोजी प्रधान सचिव व सर्व विभागांच्या बैठकीत लोकसभा व विधानसभेची आचारसंहिता लक्षात घेऊन ३१ जुलै २००९ पूर्वी कार्यादेश देण्याचे स्पष्ट आदेश होते. त्यानुसार तत्कालीन मुख्याधिकाऱ्यांनी जीवन प्राधिकरणासह सर्व संबंधित विभागांच्या आवश्यक मंजुऱ्या घेऊनच प्रशासकीय बाबी पूर्ण केल्या होत्या.
या योजनेचे काम अत्यंत दर्जेदार झाले असून, त्याचे ‘थर्ड पार्टी ऑडिट’ करूनच बिले अदा करण्यात आली आहेत. यामध्ये कुठेही चुकीचे काम झालेले नसताना केवळ जनतेची दिशाभूल करण्यासाठी हे उद्योग सुरू आहेत. आतापर्यंत शहर व तालुक्यासाठी एक रुपयाचाही निधी न आणता फक्त बदनामीचे राजकारण करणाऱ्यांच्या आरोपांमधील हवा चौकशीतून नक्कीच निघेल, असा विश्वास त्यांनी व्यक्त केला.
पालिकेतील पराभवाच्या वैफल्यातून तथ्यहीन आरोप – संगमनेर नगरपालिकेच्या निवडणुकीत नवीन लोकप्रतिनिधींच्या घरातील नगराध्यक्षपदाच्या उमेदवारासह त्यांच्या सर्व उमेदवारांना जनतेने मोठ्या मताधिक्याने पराभूत केले. या सपाटून झालेल्या पराभवामुळे मूलभूत प्रश्न सोडून वेगळ्याच विषयांवर लक्ष केंद्रित करण्यासाठी हा खोटा डाव रचला गेला आहे. कदाचित शहरातील टक्केवारी बंद झाल्यामुळे आलेल्या वैफल्यग्रस्ततेतून हे तथ्यहीन आरोप होत असावेत, अशी टीका शहराध्यक्ष सोमेश्वर दिवटे यांनी केली आहे.
प्रशासकीय बाबींना प्रशासनच जबाबदार – नगर परिषदेचे कामकाज करताना सर्व प्रशासकीय बाबींची आणि मंजुऱ्यांची जबाबदारी ही मुख्याधिकाऱ्यांची म्हणजेच प्रशासनाची असते. यामध्ये नगराध्यक्ष, उपनगराध्यक्ष किंवा नगरसेवकांचा कोणताही थेट संबंध नसतो. त्यामुळे प्रशासकीय बाबींबाबत अधिकारी उत्तर देतील. असे असताना राजकीय आकस ठेवून माजी पदाधिकाऱ्यांची नावे घेत संगमनेरला बदनाम करणाऱ्या प्रवृत्तीचा आम्ही तीव्र निषेध करतो, असे माजी नगराध्यक्ष विश्वासराव मुर्तडक यांनी म्हटले आहे.
संगमनेर शहर व तालुक्याची प्रगती ही राज्यात ‘संगमनेर ब्रँड’ म्हणून प्रसिद्ध आहे. याचे श्रेय विरोधकांना कधी घेता आले नाही आणि भविष्यातही घेता येणार नाही, म्हणूनच पवित्र सभागृहाचा गैरवापर करून ही बदनामी सुरू आहे. राज्यमंत्री माधुरी मिसाळ यांनी दिलेल्या चौकशीच्या आदेशाचे आम्ही स्वागत करतो, कारण यामुळे खोटे आरोप करणाऱ्यांचे चेहरे जनतेसमोर उघडे पडतील. – दुर्गाताई तांबे, माजी नगराध्यक्ष.

anantpangarkar
Annant Ppangarkar

Post Views: 977
आरोप टीका दुर्गाताई तांबे संगमनेर नगरपालिका पाणीपुरवठा
Share. Facebook Twitter Pinterest WhatsApp
Annant Ppangarkar
  • Website

Related Posts

नुकसानग्रस्त शेतकऱ्यांना आर्थिक मदत कधी मिळणार? आमदार अमोल खताळांनी दिली ही माहिती

13/10/2026

संगमनेर आगारात आणखी पाच इलेक्ट्रिक शिवाई बसेस; जिल्ह्यांतर्गत मार्गांवर धावणार

12/10/2026

दिल्लीतील भव्य आंदोलनात बाळासाहेब थोरात यांचा सहभाग: लोकशाही आणि संविधान वाचवण्यासाठी मुख्य निवडणूक आयुक्तांचा राजीनामा आवश्यक

12/10/2026
Leave A Reply Cancel Reply

Document
Our Picks
  • Facebook
  • Twitter
  • Pinterest
  • Instagram
  • YouTube
Advertisement 1 Advertisement 2 Advertisement 3 Advertisement 4
Don't Miss
नैसर्गिक आपत्ती

पंचनाम्यात वेळ घालवू नका, सरसकट मदत करा! दिल्लीवरून थेट शेतकऱ्यांच्या बांधावर पोहोचून बाळासाहेब थोरात आक्रमक!

By Annant Ppangarkar13/10/20260

महाराष्ट्र संवाद न्यूज ऑनलाईन- महाराष्ट्राच्या ग्रामीण भागात सध्या दुष्काळाची अत्यंत भयानक परिस्थिती निर्माण झाली असून…

डीजेचा आवाज आणि लेझर लाईट्स खरोखरच जीवघेणे ठरू शकतात? तज्ज्ञ डॉक्टर काय म्हणतात, पाहा… शिंदेवाडीतील विद्यार्थ्यांच्या शिबिरात नेमकं काय घडलं…

13/10/2026

शिक्षण क्षेत्राची मान उंचावणारी बातमी! संगमनेरच्या या लेखकाच्या चार पुस्तकांचा शासनमान्य ग्रंथ निवडसुचित समावेश; वाचा सविस्तर

13/10/2026

नुकसानग्रस्त शेतकऱ्यांना आर्थिक मदत कधी मिळणार? आमदार अमोल खताळांनी दिली ही माहिती

13/10/2026
Thumbnail 1
Thumbnail 2
Thumbnail 3
Thumbnail 4
previous arrow
next arrow
Thumbnail 1
Thumbnail 2
Thumbnail 3
Thumbnail 4
previous arrow
next arrow

तुमचे हक्काचे व्यासपीठ

Facebook YouTube
Our Picks
October 2026
M T W T F S S
 1234
567891011
12131415161718
19202122232425
262728293031  
« Sep    
  • Home
  • आंदोलन
  • आरोग्य
  • इतिहास
  • क्रिडा व कला
  • गुन्हेगारी
  • न्यायालय
  • पत्रकारिता
  • फोटो / गॅलरी
  • महाराष्ट्र संवाद विशेष
  • राजकारण
  • विकास
  • विश्लेषण
  • शिक्षण
  • शेती व सहकार
  • सामाजिक
  • CONTACT US
  • ABOUT US
  • PRIVACY POLICY
© 2026 ThemeSphere. Designed by ThemeSphere.

Type above and press Enter to search. Press Esc to cancel.