Close Menu
महाराष्ट्र संवादमहाराष्ट्र संवाद
  • Home
  • आंदोलन
  • आरोग्य
  • इतिहास
  • क्रिडा व कला
  • गुन्हेगारी
  • न्यायालय
  • महाराष्ट्र संवाद विशेष
  • राजकारण
  • विकास
  • विश्लेषण
  • शिक्षण
What's Hot

आज सोमवार, ३१ ऑगस्ट २०२६ — तुमचा आजचा दिवस कसा असेल, जाणून घ्या

31/08/2026

आमदार अमोल खताळ यांच्या सूचनेनंतर लोहारे-कासारे पाझर तलावातून पाण्याचा विसर्ग सुरू

30/08/2026

कृष्णाच्या कुटुंबीयांच्या पाठीशी भक्कमपणे उभे राहणार: आमदार अमोल खताळ यांनी घेतली पवार कुटुंबीयांची भेट

30/08/2026
Facebook X (Twitter) Instagram
महाराष्ट्र संवादमहाराष्ट्र संवाद
  • Home
  • आंदोलन
  • आरोग्य
  • इतिहास
  • क्रिडा व कला
  • गुन्हेगारी
  • न्यायालय
  • महाराष्ट्र संवाद विशेष
  • राजकारण
  • विकास
  • विश्लेषण
  • शिक्षण
Facebook X (Twitter) Instagram
महाराष्ट्र संवादमहाराष्ट्र संवाद
Home » वडझरी बुद्रुक येथे खाण व क्रेशरविरोधात ग्रामस्थांचे आमरण उपोषण; ‘आता आरपारची लढाई’ म्हणत तीव्र एल्गार
आंदोलन

वडझरी बुद्रुक येथे खाण व क्रेशरविरोधात ग्रामस्थांचे आमरण उपोषण; ‘आता आरपारची लढाई’ म्हणत तीव्र एल्गार

आता मागण्या मान्य झाल्याशिवाय मागे हटणार नाही, अशी ठाम भूमिका उपोषणकर्त्यांनी घेतली आहे.
Annant PpangarkarBy Annant Ppangarkar01/06/2026No Comments2 Mins Read
Facebook Twitter WhatsApp
Share
Facebook Twitter Email Telegram WhatsApp

महाराष्ट्र संवाद न्यूज ऑनलाईन, संगमनेर
संगमनेर तालुक्यातील वडझरी बुद्रुक परिसरात सुरू असलेल्या बेकायदेशीर खाणकाम, तीव्र ब्लास्टिंग आणि स्टोन क्रेशरच्या त्रासाला कंटाळून अखेर स्थानिक शेतकरी व ग्रामस्थांनी आमरण उपोषणाचे हत्यार उपसले आहे. याबाबत वारंवार तक्रारी करूनही प्रशासनाकडून कोणतीही ठोस कारवाई होत नसल्याने संतप्त झालेल्या नागरिकांनी आजपासून (१ जून) उपोषण आंदोलनाला सुरुवात केली आहे.
गावालगत अव्याहतपणे सुरू असलेल्या या खाणकामामुळे परिसरातील शेतीचे मोठे नुकसान झाले आहे. सतत होणाऱ्या जोरदार ब्लास्टिंगमुळे परिसरातील घरांना तडे गेले असून, नागरिकांच्या पिण्याच्या पाण्याचे मुख्य स्रोत असलेल्या विहिरी आणि बोअरवेलच्या पाणी पातळीवरही याचा विपरीत परिणाम झाला आहे.
याशिवाय, क्रेशरमधून उडणाऱ्या धूळ प्रदूषणामुळे स्थानिक नागरिकांच्या, विशेषतः लहान मुले आणि वृद्धांच्या आरोग्याचा प्रश्न अत्यंत गंभीर बनला आहे. महसूल विभाग आणि संबंधित यंत्रणांनी यापूर्वी केवळ चौकशीचे आदेश देऊन वेळ मारून नेल्याचा आरोप करत, आता मागण्या मान्य झाल्याशिवाय मागे हटणार नाही, अशी ठाम भूमिका उपोषणकर्त्यांनी घेतली आहे.
या आंदोलनाच्या माध्यमातून ग्रामस्थांनी बेकायदेशीर खाणकाम व स्टोन क्रेशर तात्काळ पूर्णपणे बंद करण्याची प्रमुख मागणी केली आहे. तसेच, आजवर झालेल्या ब्लास्टिंगमुळे घरांच्या व शेतीच्या झालेल्या नुकसानीचे शासकीय पंचनामे करून योग्य ती नुकसानभरपाई मिळावी, प्रदूषणाचे नियम धाब्यावर बसवणाऱ्यांवर कठोर कायदेशीर कारवाई व्हावी आणि या संपूर्ण प्रकरणाची उच्चस्तरीय चौकशी करण्यात यावी, अशी मागणीही लावून धरण्यात आली आहे.
सध्या उपोषणस्थळी गावातील शेतकरी, युवक, महिला आणि विविध सामाजिक संघटनांचे प्रतिनिधी मोठ्या संख्येने उपस्थित राहत असून, या आंदोलनाला लोकपाठिंबा सातत्याने वाढत आहे. वारंवार निवेदने देऊनही आणि प्रशासकीय चौकशीचे आदेश निघूनही प्रत्यक्षात कारवाई का होत नाही, तसेच या खाण व क्रेशर चालकांना नेमके कोणाचे राजकीय किंवा प्रशासकीय अभय लाभले आहे, असा संतप्त सवाल आता वडझरीचे ग्रामस्थ उघडपणे विचारू लागले आहेत.

anantpangarkar
Annant Ppangarkar

Post Views: 758
आंदोलन उपोषण बेकायदेशीर खाण व क्रशर
Share. Facebook Twitter Pinterest WhatsApp
Annant Ppangarkar
  • Website

Related Posts

एमआयडीसीच्या जागेवर सौर प्रकल्प चालणार नाही! कौठे मलकापूर येथे भाजपचे आक्रमक आंदोलन; भोसले यांच्यासह पदाधिकाऱ्यांना पोलिसांनी घेतले ताब्यात

19/08/2026

संगमनेर येथे आदिवासी विद्यार्थ्यांचे अर्धनग्न धरणे आंदोलन सुरुच; जयश्री थोरात यांची आंदोलनस्थळी भेट

17/08/2026

बिरेवाडीत पोल्ट्री शेडवर कारवाईसाठी ग्रामपंचायत कार्यालयासमोर उपोषण सुरु; मांडवे-बिरेवाडी हद्दीतील तीन पोल्ट्रीचा वाद पेटला

14/08/2026
Leave A Reply Cancel Reply

Document
Our Picks
  • Facebook
  • Twitter
  • Pinterest
  • Instagram
  • YouTube
Advertisement 1 Advertisement 2 Advertisement 3 Advertisement 4
Don't Miss
राशिभविष्य

आज सोमवार, ३१ ऑगस्ट २०२६ — तुमचा आजचा दिवस कसा असेल, जाणून घ्या

By Annant Ppangarkar31/08/20260

आजचे राशिभविष्य मेष आजचा दिवस तुमच्यासाठी अत्यंत ऊर्जेने भरलेला असेल. नवीन कामे सुरू करण्यासाठी वेळ…

आमदार अमोल खताळ यांच्या सूचनेनंतर लोहारे-कासारे पाझर तलावातून पाण्याचा विसर्ग सुरू

30/08/2026

कृष्णाच्या कुटुंबीयांच्या पाठीशी भक्कमपणे उभे राहणार: आमदार अमोल खताळ यांनी घेतली पवार कुटुंबीयांची भेट

30/08/2026

जिल्ह्यात अवैध गुटखा विक्रीवर एलसीबीचा सर्जिकल स्ट्राईक; एकाच दिवशी ६ छापे, सुमारे ६ लाखांचा मुद्देमाल जप्त

30/08/2026
Thumbnail 1
Thumbnail 2
Thumbnail 3
Thumbnail 4
previous arrow
next arrow
Thumbnail 1
Thumbnail 2
Thumbnail 3
Thumbnail 4
previous arrow
next arrow

तुमचे हक्काचे व्यासपीठ

Facebook YouTube
Our Picks
August 2026
M T W T F S S
 12
3456789
10111213141516
17181920212223
24252627282930
31  
« Jul    
  • Home
  • आंदोलन
  • आरोग्य
  • इतिहास
  • क्रिडा व कला
  • गुन्हेगारी
  • न्यायालय
  • पत्रकारिता
  • फोटो / गॅलरी
  • महाराष्ट्र संवाद विशेष
  • राजकारण
  • विकास
  • विश्लेषण
  • शिक्षण
  • शेती व सहकार
  • सामाजिक
  • CONTACT US
  • ABOUT US
  • PRIVACY POLICY
© 2026 ThemeSphere. Designed by ThemeSphere.

Type above and press Enter to search. Press Esc to cancel.