Close Menu
महाराष्ट्र संवादमहाराष्ट्र संवाद
  • Home
  • आंदोलन
  • आरोग्य
  • इतिहास
  • क्रिडा व कला
  • गुन्हेगारी
  • न्यायालय
  • महाराष्ट्र संवाद विशेष
  • राजकारण
  • विकास
  • विश्लेषण
  • शिक्षण
What's Hot

आज सोमवार, ३१ ऑगस्ट २०२६ — तुमचा आजचा दिवस कसा असेल, जाणून घ्या

31/08/2026

आमदार अमोल खताळ यांच्या सूचनेनंतर लोहारे-कासारे पाझर तलावातून पाण्याचा विसर्ग सुरू

30/08/2026

कृष्णाच्या कुटुंबीयांच्या पाठीशी भक्कमपणे उभे राहणार: आमदार अमोल खताळ यांनी घेतली पवार कुटुंबीयांची भेट

30/08/2026
Facebook X (Twitter) Instagram
महाराष्ट्र संवादमहाराष्ट्र संवाद
  • Home
  • आंदोलन
  • आरोग्य
  • इतिहास
  • क्रिडा व कला
  • गुन्हेगारी
  • न्यायालय
  • महाराष्ट्र संवाद विशेष
  • राजकारण
  • विकास
  • विश्लेषण
  • शिक्षण
Facebook X (Twitter) Instagram
महाराष्ट्र संवादमहाराष्ट्र संवाद
Home » समनापूर प्राणघातक हल्ल्यातील मुख्य आरोपी जुनेद आणि अरबाज गजाआड; संगमनेर पोलिसांची पुण्यात धडाकेबाज कारवाई
गुन्हेगारी

समनापूर प्राणघातक हल्ल्यातील मुख्य आरोपी जुनेद आणि अरबाज गजाआड; संगमनेर पोलिसांची पुण्यात धडाकेबाज कारवाई

गेल्या एक महिन्यापासून पोलिसांना गुंगारा देणाऱ्या अरबाजला पोलिसांनी थेट पुण्यातून ताब्यात घेतले, तर जुनेदला संगमनेरमधील त्याच्या राहत्या घरातून अटक करण्यात आली.
Annant PpangarkarBy Annant Ppangarkar01/06/2026No Comments2 Mins Read
Facebook Twitter WhatsApp
Share
Facebook Twitter Email Telegram WhatsApp

महाराष्ट्र संवाद न्यूज ऑनलाईन, संगमनेर:

समनापूर बायपास चौफुली येथे महिनाभरापूर्वी झालेल्या गंभीर आणि प्राणघातक हल्ल्यातील मुख्य आरोपी अरबाज जहागीरदार आणि जुनेद शेख यांना अटक करण्यात संगमनेर शहर पोलिसांना अखेर यश आले आहे.

गेल्या एक महिन्यापासून पोलिसांना गुंगारा देणाऱ्या अरबाजला पोलिसांनी थेट पुण्यातून ताब्यात घेतले, तर जुनेदला संगमनेरमधील त्याच्या राहत्या घरातून अटक करण्यात आली. पोलिसांच्या या धडाकेबाज कामगिरीमुळे संगमनेर आणि परिसरातून त्यांचे कौतुक होत आहे.

सुमारे एका महिन्यापूर्वी संगमनेर जवळील समनापूर बायपास चौफुली येथे दोन गटात किरकोळ कारणावरून वाद झाला होता. या वादाचे रूपांतर मोठ्या संघर्षात होऊन परिसरात प्रचंड तणाव निर्माण झाला होता. हल्लेखोरांनी फिर्यादीवर चाकूने तब्बल ७ वार केले होते. या जीवघेण्या हल्ल्याची गांभीर्याने दखल घेत पोलिसांनी आरोपींविरुद्ध भारतीय न्याय संहिता (BNS) च्या कलम १०९ (खुनाचा प्रयत्न) अंतर्गत गुन्हा दाखल केला होता. या प्रकरणातील काही आरोपींना आधी अटकपूर्व जामीन मिळाला होता, मात्र मुख्य आरोपी फरार होते.

घटना घडल्यापासूनच जुनेद शेख आणि अरबाज जहागीरदार फरार झाल्यामुळे पोलीस त्यांचा कसून शोध घेत होते. दुसरीकडे तक्रारदारांकडूनही आरोपींना तात्काळ अटक करण्याची मागणी होत होती. आरोपी सापडत नसल्याने पोलिसांच्या कार्यपद्धतीवर काही प्रमाणात टीकाही झाली होती. मात्र, कोणत्याही टीकेला उत्तर न देता संगमनेर शहर पोलिसांनी गुप्ततेने आणि चिकाटीने आपला तपास सुरू ठेवला.

दरम्यान, मुख्य आरोपी अरबाज हा पुण्यात लपून बसल्याची खात्रीलायक माहिती पोलिसांना मिळाली. तो पुण्यातील खराडी परिसरात एका रूममध्ये ‘पेइंग गेस्ट’ म्हणून राहत होता.

मिळालेल्या माहितीच्या आधारे, संगमनेर पोलिसांनी पुण्याच्या स्थानिक पोलिसांच्या मदतीने मध्यरात्री १ वाजेच्या सुमारास सापळा रचून अरबाजला जेरबंद केले. त्याला पहाटे साडेपाच वाजता संगमनेर शहर पोलीस ठाण्यात आणण्यात आले आणि त्यानंतर लगेचच जुनेद शेख यालाही त्याच्या राहत्या घरातून ताब्यात घेण्यात आले. या दोन्ही मुख्य आरोपींची वैद्यकीय चाचणी करून त्यांना पोलीस कोठडीत रवाना करण्यात आले असून आज त्यांना न्यायालयात हजर केले जाणार आहे.

ही यशस्वी कारवाई अप्पर पोलीस अधीक्षक सोमनाथ वाघचौरे आणि संगमनेरचे उपविभागीय पोलीस अधिकारी डॉ. कुणाल सोनवणे यांच्या मार्गदर्शनाखाली संगमनेर शहर पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक समीर बारवकर, विशेष पथकातील पोलीस उपनिरीक्षक सचिन वाकडे, पोलीस शिपाई साईनाथ पवार आणि शशिकांत दाभाडे यांनी केली आहे.

anantpangarkar
Annant Ppangarkar

Post Views: 1,754
यशस्वी कारवाई संगमनेर शहर पोलीस समनापूर
Share. Facebook Twitter Pinterest WhatsApp
Annant Ppangarkar
  • Website

Related Posts

जिल्ह्यात अवैध गुटखा विक्रीवर एलसीबीचा सर्जिकल स्ट्राईक; एकाच दिवशी ६ छापे, सुमारे ६ लाखांचा मुद्देमाल जप्त

30/08/2026

वाळू तस्करांवर कारवाई, ट्रॅक्टरसह ११ लाखांचा मुद्देमाल जप्त, दोघांना अटक तर तिघे फरार

30/08/2026

स्थानिक गुन्हे शाखेकडून सराईत गुन्हेगाराला बेड्या

29/08/2026
Leave A Reply Cancel Reply

Document
Our Picks
  • Facebook
  • Twitter
  • Pinterest
  • Instagram
  • YouTube
Advertisement 1 Advertisement 2 Advertisement 3 Advertisement 4
Don't Miss
राशिभविष्य

आज सोमवार, ३१ ऑगस्ट २०२६ — तुमचा आजचा दिवस कसा असेल, जाणून घ्या

By Annant Ppangarkar31/08/20260

आजचे राशिभविष्य मेष आजचा दिवस तुमच्यासाठी अत्यंत ऊर्जेने भरलेला असेल. नवीन कामे सुरू करण्यासाठी वेळ…

आमदार अमोल खताळ यांच्या सूचनेनंतर लोहारे-कासारे पाझर तलावातून पाण्याचा विसर्ग सुरू

30/08/2026

कृष्णाच्या कुटुंबीयांच्या पाठीशी भक्कमपणे उभे राहणार: आमदार अमोल खताळ यांनी घेतली पवार कुटुंबीयांची भेट

30/08/2026

जिल्ह्यात अवैध गुटखा विक्रीवर एलसीबीचा सर्जिकल स्ट्राईक; एकाच दिवशी ६ छापे, सुमारे ६ लाखांचा मुद्देमाल जप्त

30/08/2026
Thumbnail 1
Thumbnail 2
Thumbnail 3
Thumbnail 4
previous arrow
next arrow
Thumbnail 1
Thumbnail 2
Thumbnail 3
Thumbnail 4
previous arrow
next arrow

तुमचे हक्काचे व्यासपीठ

Facebook YouTube
Our Picks
August 2026
M T W T F S S
 12
3456789
10111213141516
17181920212223
24252627282930
31  
« Jul    
  • Home
  • आंदोलन
  • आरोग्य
  • इतिहास
  • क्रिडा व कला
  • गुन्हेगारी
  • न्यायालय
  • पत्रकारिता
  • फोटो / गॅलरी
  • महाराष्ट्र संवाद विशेष
  • राजकारण
  • विकास
  • विश्लेषण
  • शिक्षण
  • शेती व सहकार
  • सामाजिक
  • CONTACT US
  • ABOUT US
  • PRIVACY POLICY
© 2026 ThemeSphere. Designed by ThemeSphere.

Type above and press Enter to search. Press Esc to cancel.