Close Menu
महाराष्ट्र संवादमहाराष्ट्र संवाद
  • Home
  • आंदोलन
  • आरोग्य
  • इतिहास
  • क्रिडा व कला
  • गुन्हेगारी
  • न्यायालय
  • महाराष्ट्र संवाद विशेष
  • राजकारण
  • विकास
  • विश्लेषण
  • शिक्षण
What's Hot

स्थानिक गुन्हे शाखेची कारवाई: साडेसहा लाखांचा गुटखा जप्त, संगमनेरातील दोघांसह चार जणांवर गुन्हा दाखल

17/10/2026

संगमनेरातील ‘या’ मुख्य रस्त्याचे नशीब बदलणार! आमदार अमोल खताळ यांच्या प्रयत्नांना यश; १० कोटींचा मोठा निधी मंजूर

17/10/2026

संगमनेर तालुक्यातील धांदरफळ बुद्रुक येथे नवरात्रोत्सवातील दांडिया कार्यक्रमादरम्यान तुफान राडा; दोन्ही बाजूंच्या परस्परविरोधी गुन्ह्यांत लोखंडी रॉड, चाकू आणि फायटरने जीवघेणा हल्ला

17/10/2026
Facebook X (Twitter) Instagram
महाराष्ट्र संवादमहाराष्ट्र संवाद
  • Home
  • आंदोलन
  • आरोग्य
  • इतिहास
  • क्रिडा व कला
  • गुन्हेगारी
  • न्यायालय
  • महाराष्ट्र संवाद विशेष
  • राजकारण
  • विकास
  • विश्लेषण
  • शिक्षण
Facebook X (Twitter) Instagram
महाराष्ट्र संवादमहाराष्ट्र संवाद
Home » संगमनेरमधील अवैध कत्तलखान्यांवर नगर परिषद व पोलिसांचा मोठा हातोडा; सात कत्तलखाने केले जमीनदोस्त
प्रशासन

संगमनेरमधील अवैध कत्तलखान्यांवर नगर परिषद व पोलिसांचा मोठा हातोडा; सात कत्तलखाने केले जमीनदोस्त

मुख्याधिकारी दयानंद गोरे यांनी दिलेल्या माहितीनुसार, संगमनेर शहरातील जमजम कॉलनी, कादरी नगर आणि त्याच्या आसपासच्या परिसरात मोठ्या प्रमाणावर अवैध कत्तलखाने सुरू असल्याची माहिती प्रशासनाला मिळाली होती
Annant PpangarkarBy Annant Ppangarkar02/06/2026No Comments2 Mins Read
Facebook Twitter WhatsApp
Share
Facebook Twitter Email Telegram WhatsApp

महाराष्ट्र संवाद न्यूज ऑनलाईन, संगमनेर:

शहरातील अवैध व्यवसायांवर आणि अतिक्रमणांवर प्रशासनाने मंगळवारी मोठी कारवाई केली आहे. संगमनेर नगर परिषद आणि शहर पोलीस स्टेशन यांच्या संयुक्त विद्यमाने शहरातील विविध भागांत सुरू असलेल्या तब्बल सात अवैध कत्तलखान्यांवर बुलडोझर फिरवून ते पूर्णपणे जमीनदोस्त करण्यात आले आहेत. या धडक मोहिमेमुळे अवैध कत्तलखाना चालकांचे धाबे दणाणले आहे.

मुख्याधिकारी दयानंद गोरे यांनी दिलेल्या माहितीनुसार, संगमनेर शहरातील जमजम कॉलनी, कादरी नगर आणि त्याच्या आसपासच्या परिसरात मोठ्या प्रमाणावर अवैध कत्तलखाने सुरू असल्याची माहिती प्रशासनाला मिळाली होती. या माहितीच्या आधारे नगर परिषदेचे मुख्याधिकारी दयानंद गोरे आणि संगमनेर शहर पोलीस स्टेशनचे पोलीस निरीक्षक समीर बारवकर यांच्या मार्गदर्शनाखाली एका विशेष मोहिमेचे नियोजन करण्यात आले.

ही कारवाई अत्यंत गोपनीय आणि नियोजनबद्ध पद्धतीने पार पाडण्यात आली. कत्तलखाने पाडण्यासाठी नगर परिषदेचे एक जेसीबी यंत्र, दोन ट्रॅक्टर आणि २० मजूर तैनात करण्यात आले होते. कोणताही अनुचित प्रकार घडू नये आणि कायदा व सुव्यवस्थेचा प्रश्न निर्माण होऊ नये, यासाठी संगमनेर शहर पोलीस स्टेशनचे पोलीस निरीक्षक समीर बारवकर यांच्या नेतृत्वाखाली पोलीस पथक आणि नगर परिषदेच्या सुरक्षा दलाने घटनास्थळी चोख पोलीस बंदोबस्त तैनात केला होता. कडक बंदोबस्तात जेसीबीच्या साहाय्याने सातही अवैध कत्तलखान्यांचे बांधकाम पूर्णपणे निष्कासित करण्यात आले.

या धडक मोहिमेत सुरक्षा दलासह नगर परिषदेचे प्रशासन अधिकारी प्रल्हाद देवरे, अतिक्रमण विभाग प्रमुख महेश गोरडे, अल्ताफ शेख, जयराम मंडलिक, भीमाशंकर वर्पे, राजेंद्र मस्के, किशोर बिडगर, प्रदीप मावलकर आणि वसंत मेहेर यांच्यासह नगर परिषदेच्या इतर कर्मचाऱ्यांनी प्रत्यक्ष सहभाग नोंदवून ही कारवाई यशस्वी केली.

शहरातील शांतता व सुव्यवस्था अबाधित राखण्यासाठी आणि अवैध कृत्यांना आळा घालण्यासाठी प्रशासनाची ही मोहीम यापुढेही अशीच सुरू राहील, असा इशारा नगर परिषद प्रशासनाच्या वतीने देण्यात आला आहे. या धाडसी कारवाईमुळे संगमनेर नागरिकांमधून समाधान व्यक्त होत आहे.

anantpangarkar
Annant Ppangarkar

Views: 967
अवैध कत्तलखाने कारवाई दयानंद गोरे संगमनेर नगर परिषद संगमनेर शहर पोलीस समीर बारवकर
Share. Facebook Twitter Pinterest WhatsApp
Annant Ppangarkar
  • Website

Related Posts

सरकारी जमिनीवर अतिक्रमण! प्रशासनाचा डोळेझाक कारभार; अधिकाऱ्यांना सरकारी मालमत्ता सांभाळता येईना

14/10/2026

संगमनेरकरांची सुरक्षा होणार अधिक भक्कम; नगरपरिषदेसाठी २ नवीन अग्निशामक वाहनांना प्रशासकीय मान्यता, आमदार अमोल खताळ यांच्या प्रयत्नांना यश! साक्षी सूर्यवंशी यांची माहिती

30/09/2026

संगमनेरमध्ये डीजे नियमांचे उल्लंघन; ६ जणांवर गुन्हा दाखल

25/09/2026
Leave A Reply Cancel Reply

Document
Our Picks
  • Facebook
  • Twitter
  • Pinterest
  • Instagram
  • YouTube
Advertisement 1 Advertisement 2 Advertisement 3 Advertisement 4
Don't Miss
गुन्हेगारी

स्थानिक गुन्हे शाखेची कारवाई: साडेसहा लाखांचा गुटखा जप्त, संगमनेरातील दोघांसह चार जणांवर गुन्हा दाखल

By Annant Ppangarkar17/10/20260

महाराष्ट्र संवाद न्यूज ऑनलाईन- संगमनेर शहरालगतच्या गुंजाळवाडी परिसरात अवैधरित्या गुटख्याची वाहतूक करणाऱ्या वाहनावर स्थानिक गुन्हे…

संगमनेरातील ‘या’ मुख्य रस्त्याचे नशीब बदलणार! आमदार अमोल खताळ यांच्या प्रयत्नांना यश; १० कोटींचा मोठा निधी मंजूर

17/10/2026

संगमनेर तालुक्यातील धांदरफळ बुद्रुक येथे नवरात्रोत्सवातील दांडिया कार्यक्रमादरम्यान तुफान राडा; दोन्ही बाजूंच्या परस्परविरोधी गुन्ह्यांत लोखंडी रॉड, चाकू आणि फायटरने जीवघेणा हल्ला

17/10/2026

महावितरण कर्मचाऱ्यांवर हल्ला आणि शासकीय कामात अडथळा आणल्याचा गंभीर गुन्हा ठरला फोल; संगमनेर कोर्टाकडून सर्व ५ आरोपींची निर्दोष मुक्तता!

17/10/2026
Thumbnail 1
Thumbnail 2
Thumbnail 3
Thumbnail 4
previous arrow
next arrow
Thumbnail 1
Thumbnail 2
Thumbnail 3
Thumbnail 4
previous arrow
next arrow

तुमचे हक्काचे व्यासपीठ

Facebook YouTube
Our Picks
October 2026
M T W T F S S
 1234
567891011
12131415161718
19202122232425
262728293031  
« Sep    
  • Home
  • आंदोलन
  • आरोग्य
  • इतिहास
  • क्रिडा व कला
  • गुन्हेगारी
  • न्यायालय
  • पत्रकारिता
  • फोटो / गॅलरी
  • महाराष्ट्र संवाद विशेष
  • राजकारण
  • विकास
  • विश्लेषण
  • शिक्षण
  • शेती व सहकार
  • सामाजिक
  • CONTACT US
  • ABOUT US
  • PRIVACY POLICY
© 2026 ThemeSphere. Designed by ThemeSphere.

Type above and press Enter to search. Press Esc to cancel.