Close Menu
महाराष्ट्र संवादमहाराष्ट्र संवाद
  • Home
  • आंदोलन
  • आरोग्य
  • इतिहास
  • क्रिडा व कला
  • गुन्हेगारी
  • न्यायालय
  • महाराष्ट्र संवाद विशेष
  • राजकारण
  • विकास
  • विश्लेषण
  • शिक्षण
What's Hot

अहिल्यानगर जिल्ह्यात अवैध गुटखा विक्रीवर स्थानिक गुन्हे शाखेची मोठी कारवाई; ५.३० लाखांचा मुद्देमाल जप्त, ११ जणांवर गुन्हे दाखल

03/09/2026

अवैध वाळू वाहतूक करणारा हायवा जप्त, २५.६० लाखांचा मुद्देमाल हस्तगत

03/09/2026

आज गुरुवार, ०३ सप्टेंबर २०२६ — तुमचा आजचा दिवस कसा असेल, जाणून घ्या

03/09/2026
Facebook X (Twitter) Instagram
महाराष्ट्र संवादमहाराष्ट्र संवाद
  • Home
  • आंदोलन
  • आरोग्य
  • इतिहास
  • क्रिडा व कला
  • गुन्हेगारी
  • न्यायालय
  • महाराष्ट्र संवाद विशेष
  • राजकारण
  • विकास
  • विश्लेषण
  • शिक्षण
Facebook X (Twitter) Instagram
महाराष्ट्र संवादमहाराष्ट्र संवाद
Home » सहा मटका अड्ड्यांवर पोलिसांचे छापे; दीड लाखांचा मुद्देमाल जप्त, १० जण ताब्यात
गुन्हेगारी

सहा मटका अड्ड्यांवर पोलिसांचे छापे; दीड लाखांचा मुद्देमाल जप्त, १० जण ताब्यात

कारवाईत पोलिसांनी एकूण १० जणांना ताब्यात घेतले असून त्यांच्याकडून १ लाख ४५ हजार ६७० रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे.
Annant PpangarkarBy Annant Ppangarkar04/06/2026Updated:04/06/2026No Comments2 Mins Read
Facebook Twitter WhatsApp
Share
Facebook Twitter Email Telegram WhatsApp

महाराष्ट्र संवाद न्यूज ऑनलाईन, अहिल्यानगर:

शहरातील तोफखाना पोलीस ठाण्याच्या हद्दीत अवैध रित्या चालणाऱ्या मटका अड्ड्यांवर पोलिसांनी एकाच दिवशी मोठी धडक कारवाई केली आहे. पोलीस अधीक्षक मुम्मका सुदर्शन यांच्या आदेशानुसार, एमआयडीसी पोलीस ठाण्याचे प्रभारी अधिकारी सहायक पोलीस निरीक्षक माणिक चौधरी यांच्या पथकाने १ जून रोजी ६ वेगवेगळ्या ठिकाणी छापे टाकले. या कारवाईत पोलिसांनी एकूण १० जणांना ताब्यात घेतले असून त्यांच्याकडून १ लाख ४५ हजार ६७० रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे.

या धडक कारवाईत बागडपट्टी रोडवरील सदगुरू ऑटो सर्व्हिसच्या पाठीमागे नरेश नागेश यनगुल (वय ४५) आणि दिनकर मच्छिंद्र दोंडकर (वय ४०) यांना पकडण्यात आले. तसेच नवरंग व्यायामशाळेजवळील सटवाई मंदिराच्या मागे प्रदीप शंकर चिल्का (वय ४३) याला, तर जगदंबा मोटार गॅरेजशेजारील एका पत्र्याच्या शेडमध्ये सतीश रामदास खेत्रे (वय ४२) आणि सतीश एकनाथ हिवाळे (वय ५१) यांना ताब्यात घेण्यात आले. याशिवाय मंगळगेट भागात घनश्याम मोहनलाल परदेशी (वय ४२), सर्जेपुरा चौकात बडे भोले फुटाणा दुकानाच्या पाठीमागे सचिन मधुकर राठोड (वय ४१) व आकाश राजेंद्र कांबळे (वय २८) आणि प्रियदर्शिनी कॉम्प्लेक्स इमारतीच्या बाजूला प्रशांत मोहन खैरे (वय ४३) व सुरज श्रीराम शेटे (वय ४०) यांना मटका खेळताना आणि खेळवताना रंगेहात पकडण्यात आले.

ताब्यात घेतलेल्या या सर्व आरोपींविरुद्ध तोफखाना पोलीस ठाण्यात महाराष्ट्र जुगार कायद्याच्या कलम १२ (अ) नुसार सहा स्वतंत्र गुन्हे दाखल करण्यात आले असून, त्यांना पुढील कारवाईसाठी तोफखाना पोलिसांच्या स्वाधीन करण्यात आले आहे. सदर कामगिरी पोलीस अधीक्षक मुम्मका सुदर्शन यांच्या मार्गदर्शनाखाली सपोनि माणिक चौधरी, सहायक फौजदार राकेश खेडकर, पोलीस हेड कॉन्स्टेबल राजू सुद्रीक, कॉन्स्टेबल किशोर जाधव, नवनाथ दहिफळे, सुरज देशमुख आणि उमेश शेरकर यांच्या पथकाने केली.

Thumbnail 1
Thumbnail 2
Thumbnail 3
Thumbnail 4
previous arrow
next arrow
Thumbnail 1
Thumbnail 2
Thumbnail 3
Thumbnail 4
previous arrow
next arrow
anantpangarkar
Annant Ppangarkar

Post Views: 588
गुन्हेगारी पोलीस कारवाई मटका
Share. Facebook Twitter Pinterest WhatsApp
Annant Ppangarkar
  • Website

Related Posts

अहिल्यानगर जिल्ह्यात अवैध गुटखा विक्रीवर स्थानिक गुन्हे शाखेची मोठी कारवाई; ५.३० लाखांचा मुद्देमाल जप्त, ११ जणांवर गुन्हे दाखल

03/09/2026

अवैध वाळू वाहतूक करणारा हायवा जप्त, २५.६० लाखांचा मुद्देमाल हस्तगत

03/09/2026

पोलिसांचा वाळू माफियांना मोठा धक्का; या दोन तालुक्यातून २० लाखांचा मुद्देमाल जप्त

02/09/2026
Leave A Reply Cancel Reply

Document
Our Picks
  • Facebook
  • Twitter
  • Pinterest
  • Instagram
  • YouTube
Advertisement 1 Advertisement 2 Advertisement 3 Advertisement 4
Don't Miss
गुन्हेगारी

अहिल्यानगर जिल्ह्यात अवैध गुटखा विक्रीवर स्थानिक गुन्हे शाखेची मोठी कारवाई; ५.३० लाखांचा मुद्देमाल जप्त, ११ जणांवर गुन्हे दाखल

By Annant Ppangarkar03/09/20260

Annant Ppangarkar महाराष्ट्र संवाद न्यूज ऑनलाईन: जिल्ह्यातील अवैध गुटखा, सुगंधीत तंबाखू आणि मावा विक्री करणाऱ्या…

अवैध वाळू वाहतूक करणारा हायवा जप्त, २५.६० लाखांचा मुद्देमाल हस्तगत

03/09/2026

आज गुरुवार, ०३ सप्टेंबर २०२६ — तुमचा आजचा दिवस कसा असेल, जाणून घ्या

03/09/2026

जवळेकडलगच्या दुर्देवी घटनेनंतर माजी मंत्री बाळासाहेब थोरात यांची पवार कुटुंबाला सांत्वन भेट; बिबट्यांच्या दहशतीवर प्रशासनाने ठोस उपाययोजना करण्याची मागणी

02/09/2026
Thumbnail 1
Thumbnail 2
Thumbnail 3
Thumbnail 4
previous arrow
next arrow
Thumbnail 1
Thumbnail 2
Thumbnail 3
Thumbnail 4
previous arrow
next arrow

तुमचे हक्काचे व्यासपीठ

Facebook YouTube
Our Picks
September 2026
M T W T F S S
 123456
78910111213
14151617181920
21222324252627
282930  
« Aug    
  • Home
  • आंदोलन
  • आरोग्य
  • इतिहास
  • क्रिडा व कला
  • गुन्हेगारी
  • न्यायालय
  • पत्रकारिता
  • फोटो / गॅलरी
  • महाराष्ट्र संवाद विशेष
  • राजकारण
  • विकास
  • विश्लेषण
  • शिक्षण
  • शेती व सहकार
  • सामाजिक
  • CONTACT US
  • ABOUT US
  • PRIVACY POLICY
© 2026 ThemeSphere. Designed by ThemeSphere.

Type above and press Enter to search. Press Esc to cancel.