Close Menu
महाराष्ट्र संवादमहाराष्ट्र संवाद
  • Home
  • आंदोलन
  • आरोग्य
  • इतिहास
  • क्रिडा व कला
  • गुन्हेगारी
  • न्यायालय
  • महाराष्ट्र संवाद विशेष
  • राजकारण
  • विकास
  • विश्लेषण
  • शिक्षण
What's Hot

अहिल्यानगर जिल्ह्यात अवैध गुटखा विक्रीवर स्थानिक गुन्हे शाखेची मोठी कारवाई; ५.३० लाखांचा मुद्देमाल जप्त, ११ जणांवर गुन्हे दाखल

03/09/2026

अवैध वाळू वाहतूक करणारा हायवा जप्त, २५.६० लाखांचा मुद्देमाल हस्तगत

03/09/2026

आज गुरुवार, ०३ सप्टेंबर २०२६ — तुमचा आजचा दिवस कसा असेल, जाणून घ्या

03/09/2026
Facebook X (Twitter) Instagram
महाराष्ट्र संवादमहाराष्ट्र संवाद
  • Home
  • आंदोलन
  • आरोग्य
  • इतिहास
  • क्रिडा व कला
  • गुन्हेगारी
  • न्यायालय
  • महाराष्ट्र संवाद विशेष
  • राजकारण
  • विकास
  • विश्लेषण
  • शिक्षण
Facebook X (Twitter) Instagram
महाराष्ट्र संवादमहाराष्ट्र संवाद
Home » शासकीय कामात अडथळा आणणाऱ्या दोघांवर गुन्हा दाखल; प्रशासकीय कारवाईदरम्यान राडा
गुन्हेगारी

शासकीय कामात अडथळा आणणाऱ्या दोघांवर गुन्हा दाखल; प्रशासकीय कारवाईदरम्यान राडा

परिस्थिती हाताबाहेर जात असल्याचे पाहून पोलीस निरीक्षक समीर बारवकर यांच्या मार्गदर्शनाखाली पोलिसांचा ताफा तात्काळ घटनास्थळी दाखल झाला
Annant PpangarkarBy Annant Ppangarkar04/06/2026Updated:04/06/2026No Comments2 Mins Read
Facebook Twitter WhatsApp
Share
Facebook Twitter Email Telegram WhatsApp

विशेष प्रतिनिधी | संगमनेर:

शहरातील वाहतुकीला अडथळा ठरणाऱ्या भाजीपाला विक्रेत्यांच्या अतिक्रमणांवर पालिकेने धडक कारवाईचा बडगा उगारला आहे. मात्र, या अधिकृत कारवाईदरम्यान शासकीय कामात अडथळा आणून पालिका कर्मचाऱ्यांना दमदाटी व मारहाण केल्याप्रकरणी शहर पोलिसांनी दोन संशयितांवर गुन्हा दाखल केला आहे. या प्रकारामुळे परिसरात काही काळ प्रचंड तणावाचे वातावरण निर्माण झाले होते.

नेमकी घटना काय?

मिळालेल्या माहितीनुसार, पेटीट सर्कल परिसरातील भाजी व फळ विक्रेत्यांमुळे वाहतुकीची मोठी कोंडी होत होती. यावर तोडगा म्हणून नगरपालिकेने मेडिकव्हर हॉस्पिटलसमोरील जागेत शेड उभारून ३८ पदपथ विक्रेत्यांसाठी पर्यायी गाळ्यांची व्यवस्था केली होती. या गाळ्यांचे वाटप करण्यासाठी प्रशासनाकडून आधीच पूर्वसूचना व नोटिसा देण्यात आल्या होत्या.

मात्र, काही विक्रेत्यांनी नव्या जागेवर जाण्यास साफ नकार दिला आणि जुन्याच ठिकाणी व्यवसाय करण्याचा हट्ट धरला. त्यामुळे अखेर अतिक्रमण विभागाने पोलिसांच्या बंदोबस्तात थेट कारवाई सुरू केली.

रस्त्यावर ठिय्या आंदोलन अन् राडा

कारवाई सुरू होताच संतप्त झालेल्या काही विक्रेत्यांनी रस्त्यावर ठिय्या आंदोलन करत सुमारे अर्धा तास रस्ता रोखून धरला होता. यामुळे वाहतूक पूर्णपणे ठप्प झाली. यादरम्यान अतिक्रमण विभागाचे कर्मचारी महेश बोर्डे यांना दोन संशयितांनी दमदाटी करत मारहाण केली.

पोलिसांची मध्यस्थी 

परिस्थिती हाताबाहेर जात असल्याचे पाहून पोलीस निरीक्षक समीर बारवकर यांच्या मार्गदर्शनाखाली पोलिसांचा ताफा तात्काळ घटनास्थळी दाखल झाला. पोलिसांनी मध्यस्थी करत आंदोलनकर्त्यांना ताब्यात घेतले आणि परिस्थिती नियंत्रणात आणली.

यांच्यावर गुन्हा दाखल

अतिक्रमण विभागाचे कर्मचारी महेश बोर्डे यांनी दिलेल्या तक्रारीवरून संशयित आरोपी शुभम ढोले व विलास पंधारे यांच्यावर शासकीय कामात अडथळा आणणे, दमदाटी व मारहाण केल्याप्रकरणी कलम १३२, ११९ (२), ३५२, २, ३ (५) नुसार शहर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

मुख्याधिकाऱ्यांचा इशारा

पर्यायी जागेला विनाकारण विरोध केल्यामुळेच ही कारवाई करावी लागली. संबंधित मार्गावर यापुढे कोणत्याही विक्रेत्याने रस्त्याच्या कडेला व्यवसाय करू नये, अन्यथा अधिक कडक कायदेशीर कारवाई करण्यात येईल.

— दयानंद गोरे, मुख्याधिकारी

anantpangarkar
Annant Ppangarkar

Post Views: 888
अतिक्रमण अतिक्रमण कारवाई गुन्हा भाजी विक्रेते सरकारी कामात अडथळा
Share. Facebook Twitter Pinterest WhatsApp
Annant Ppangarkar
  • Website

Related Posts

अहिल्यानगर जिल्ह्यात अवैध गुटखा विक्रीवर स्थानिक गुन्हे शाखेची मोठी कारवाई; ५.३० लाखांचा मुद्देमाल जप्त, ११ जणांवर गुन्हे दाखल

03/09/2026

अवैध वाळू वाहतूक करणारा हायवा जप्त, २५.६० लाखांचा मुद्देमाल हस्तगत

03/09/2026

पोलिसांचा वाळू माफियांना मोठा धक्का; या दोन तालुक्यातून २० लाखांचा मुद्देमाल जप्त

02/09/2026
Leave A Reply Cancel Reply

Document
Our Picks
  • Facebook
  • Twitter
  • Pinterest
  • Instagram
  • YouTube
Advertisement 1 Advertisement 2 Advertisement 3 Advertisement 4
Don't Miss
गुन्हेगारी

अहिल्यानगर जिल्ह्यात अवैध गुटखा विक्रीवर स्थानिक गुन्हे शाखेची मोठी कारवाई; ५.३० लाखांचा मुद्देमाल जप्त, ११ जणांवर गुन्हे दाखल

By Annant Ppangarkar03/09/20260

Annant Ppangarkar महाराष्ट्र संवाद न्यूज ऑनलाईन: जिल्ह्यातील अवैध गुटखा, सुगंधीत तंबाखू आणि मावा विक्री करणाऱ्या…

अवैध वाळू वाहतूक करणारा हायवा जप्त, २५.६० लाखांचा मुद्देमाल हस्तगत

03/09/2026

आज गुरुवार, ०३ सप्टेंबर २०२६ — तुमचा आजचा दिवस कसा असेल, जाणून घ्या

03/09/2026

जवळेकडलगच्या दुर्देवी घटनेनंतर माजी मंत्री बाळासाहेब थोरात यांची पवार कुटुंबाला सांत्वन भेट; बिबट्यांच्या दहशतीवर प्रशासनाने ठोस उपाययोजना करण्याची मागणी

02/09/2026
Thumbnail 1
Thumbnail 2
Thumbnail 3
Thumbnail 4
previous arrow
next arrow
Thumbnail 1
Thumbnail 2
Thumbnail 3
Thumbnail 4
previous arrow
next arrow

तुमचे हक्काचे व्यासपीठ

Facebook YouTube
Our Picks
September 2026
M T W T F S S
 123456
78910111213
14151617181920
21222324252627
282930  
« Aug    
  • Home
  • आंदोलन
  • आरोग्य
  • इतिहास
  • क्रिडा व कला
  • गुन्हेगारी
  • न्यायालय
  • पत्रकारिता
  • फोटो / गॅलरी
  • महाराष्ट्र संवाद विशेष
  • राजकारण
  • विकास
  • विश्लेषण
  • शिक्षण
  • शेती व सहकार
  • सामाजिक
  • CONTACT US
  • ABOUT US
  • PRIVACY POLICY
© 2026 ThemeSphere. Designed by ThemeSphere.

Type above and press Enter to search. Press Esc to cancel.