Close Menu
महाराष्ट्र संवादमहाराष्ट्र संवाद
  • Home
  • आंदोलन
  • आरोग्य
  • इतिहास
  • क्रिडा व कला
  • गुन्हेगारी
  • न्यायालय
  • महाराष्ट्र संवाद विशेष
  • राजकारण
  • विकास
  • विश्लेषण
  • शिक्षण
What's Hot

संगमनेर शहरात गणेशोत्सवाची जोरदार तयारी: खड्डेमुक्त रस्ते आणि मंडळांच्या समस्या सोडवण्यावर नगराध्यक्षा डॉ. मैथिली तांबे यांचा भर

09/09/2026

सोशल मीडिया रिल्सच्या प्रभावापासून दूर राहून तरुणांनी ‘गुंतवणूक भान’ जपावे : सुनील कडलग

09/09/2026

आज बुधवार, ०९ सप्टेंबर २०२६ — तुमचा आजचा दिवस कसा असेल, जाणून घ्या

09/09/2026
Facebook X (Twitter) Instagram
महाराष्ट्र संवादमहाराष्ट्र संवाद
  • Home
  • आंदोलन
  • आरोग्य
  • इतिहास
  • क्रिडा व कला
  • गुन्हेगारी
  • न्यायालय
  • महाराष्ट्र संवाद विशेष
  • राजकारण
  • विकास
  • विश्लेषण
  • शिक्षण
Facebook X (Twitter) Instagram
महाराष्ट्र संवादमहाराष्ट्र संवाद
Home » मालपाणी बजाज शोरूममधील मारहाण प्रकरण: आरोपींच्या अटकेसाठी संगमनेर प्रशासकीय भवनावर मोर्चा; तीव्र आंदोलनाचा इशारा
आंदोलन

मालपाणी बजाज शोरूममधील मारहाण प्रकरण: आरोपींच्या अटकेसाठी संगमनेर प्रशासकीय भवनावर मोर्चा; तीव्र आंदोलनाचा इशारा

येत्या काळात तीव्र स्वरूपाचे उपोषण करण्याचा इशाराही ग्रामस्थांनी दिला आहे
Annant PpangarkarBy Annant Ppangarkar06/06/2026No Comments2 Mins Read
Facebook Twitter WhatsApp
Share
Facebook Twitter Email Telegram WhatsApp

महाराष्ट्र संवाद न्यूज ऑनलाईन | संगमनेर:

संगमनेर तालुक्यातील कासारा-दुमाला येथील रहिवासी स्वप्नील रोहिदास सातपुते यांना झालेल्या मारहाणीच्या निषेधार्थ शुक्रवारी (दि. ५) संगमनेर येथील यशवंतराव चव्हाण मध्यवर्ती प्रशासकीय भवनावर ग्रामस्थांच्या वतीने एक भव्य मोर्चा काढण्यात आला. ३० मे रोजी घडलेल्या या घटनेनंतर गुन्हा दाखल होऊनही आरोपींना अद्याप अटक न झाल्याने नागरिकांमध्ये तीव्र संताप असून, आरोपींवर तात्काळ कठोर कारवाई करण्याची जोरदार मागणी यावेळी मोर्चेकर्‍यांनी केली.

मिळालेल्या माहितीनुसार, स्वप्नील सातपुते आणि त्यांचे सासरे त्र्यंबक लक्ष्मण राऊत हे आपले नादुरुस्त वाहन घेऊन मालपाणी बजाज शोरूममध्ये गेले होते. वाहनाची जबाबदारी स्वीकारून त्याची पावती देण्याबाबत चर्चा सुरू असताना, शोरूम व्यवस्थापक सचिन पलोड व इतर कर्मचाऱ्यांनी त्यांच्याशी अरेरावीची भाषा वापरत शिवीगाळ केली. एवढ्यावरूनच न थांबता त्यांनी फोन करून इतर लोकांना बोलावून घेतले आणि सातपुते व राऊत यांना बेदम मारहाण केल्याचा आरोप करण्यात आला आहे. याप्रकरणी संगमनेर शहर पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

गुन्हा दाखल होऊनही संबंधित आरोपींना पोलिसांनी अद्याप गजाआड न केल्यामुळे कासारा-दुमाला आणि परिसरातील नागरिकांमध्ये कमालीची नाराजी पसरली आहे. याच पार्श्वभूमीवर शुक्रवारी परिसरातील नागरिक, महिला व तरुण मोठ्या संख्येने एकत्र आले आणि त्यांनी प्रशासकीय भवनावर मोर्चा नेला.

या मोर्चादरम्यान आंदोलकांच्या हातात आरोपींचे फोटो असलेले फलक होते, तसेच सर्वांनी हाताला काळ्या फिती बांधून शोरूम व्यवस्थापन आणि पोलिसांच्या संथ कारभाराचा निषेध केला. आरोपींना तात्काळ अटक करा आणि पीडितांना न्याय द्या अशा घोषणांनी संपूर्ण शासकीय भवन परिसर दणाणून गेला होता.

मोर्चानंतर आंदोलकांनी प्रशासकीय भवनाच्या आवारातच ठिय्या आंदोलन सुरू केले. यावेळी उपस्थित सामाजिक कार्यकर्ते आणि ग्रामस्थांनी आपल्या भावना व्यक्त करताना या कृत्याचा तीव्र शब्दांत धिक्कार केला. पीडित कुटुंबाला न्याय मिळवून देण्यासाठी आणि आरोपींवर कठोर कलमान्वये कारवाई करण्यासाठी नागरिक एकवटले आहेत. आम्ही लोकशाही मार्गाने आमचा आवाज उठवत असून, पोलिस प्रशासनाने कोणतीही दिरंगाई न करता निष्पक्ष चौकशी करावी आणि आरोपींना अटक करावी, अशी एकमुखी मागणी यावेळी करण्यात आली. तसेच आरोपींना तात्काळ अटक न झाल्यास येत्या काळात तीव्र स्वरूपाचे उपोषण करण्याचा इशाराही ग्रामस्थांनी दिला आहे.

या आंदोलनात स्वप्नील सातपुते यांच्या कुटुंबीयांसह विविध सामाजिक संघटनांचे पदाधिकारी, महिला आणि तरुण मोठ्या संख्येने सहभागी झाले होते. आंदोलकांच्या तीव्र भावना लक्षात घेऊन शहर पोलिस निरीक्षक समीर बारवकर यांनी स्वतः आंदोलनस्थळी येऊन मागण्यांचे निवेदन स्वीकारले आणि या प्रकरणात योग्य ती कायदेशीर कारवाई करण्याचे आश्वासन दिले.

anantpangarkar
Annant Ppangarkar

Post Views: 775
पोलीस उपाधीक्षक मालपाणी बजाज शोरूम मोर्चा वाद शहर पोलीस
Share. Facebook Twitter Pinterest WhatsApp
Annant Ppangarkar
  • Website

Related Posts

संगमनेरमध्ये लोड शेडिंगविरोधात काँग्रेस आक्रमक; सायंकाळी वीजपुरवठा सुरळीत ठेवण्याची महावितरणकडे मागणी

05/09/2026

राजहंस मिल्क पार्लर चोरी प्रकरण: संगमनेर पोलिसांकडून अवघ्या काही तासांत दोन चोरट्यांना बेड्या

04/09/2026

संगमनेरमध्ये सह्याद्री कॉलेज शेजारील ‘बर्गेज कॅफे’वर पोलिसांची धाड; अश्लील चाळ्यांसाठी जागा पुरवणाऱ्या चालकावर गुन्हा दाखल

25/08/2026
Leave A Reply Cancel Reply

Document
Our Picks
  • Facebook
  • Twitter
  • Pinterest
  • Instagram
  • YouTube
Advertisement 1 Advertisement 2 Advertisement 3 Advertisement 4
Don't Miss
धार्मिक

संगमनेर शहरात गणेशोत्सवाची जोरदार तयारी: खड्डेमुक्त रस्ते आणि मंडळांच्या समस्या सोडवण्यावर नगराध्यक्षा डॉ. मैथिली तांबे यांचा भर

By Annant Ppangarkar09/09/20260

Annant Ppangarkar महाराष्ट्र संवाद न्यूज ऑनलाईन  संगमनेर: आगामी गणेशोत्सव भव्य, सुरक्षित आणि शिस्तबद्ध वातावरणात पार…

सोशल मीडिया रिल्सच्या प्रभावापासून दूर राहून तरुणांनी ‘गुंतवणूक भान’ जपावे : सुनील कडलग

09/09/2026

आज बुधवार, ०९ सप्टेंबर २०२६ — तुमचा आजचा दिवस कसा असेल, जाणून घ्या

09/09/2026

विशेष वृत्त राजकीय दबावातून पोलिसांची संगमनेरच्या सुरक्षेकडे पाठ; २०० कॅमेऱ्यांच्या लोकार्पण सोहळ्यावर बहिष्कारातून नागरिकांमध्ये संताप… नगरपालिकेची सुरक्षेसाठी धडपड, तर पोलीस प्रशासनाची उघड-उघड उदासीनता

08/09/2026
Thumbnail 1
Thumbnail 2
Thumbnail 3
Thumbnail 4
previous arrow
next arrow
Thumbnail 1
Thumbnail 2
Thumbnail 3
Thumbnail 4
previous arrow
next arrow

तुमचे हक्काचे व्यासपीठ

Facebook YouTube
Our Picks
September 2026
M T W T F S S
 123456
78910111213
14151617181920
21222324252627
282930  
« Aug    
  • Home
  • आंदोलन
  • आरोग्य
  • इतिहास
  • क्रिडा व कला
  • गुन्हेगारी
  • न्यायालय
  • पत्रकारिता
  • फोटो / गॅलरी
  • महाराष्ट्र संवाद विशेष
  • राजकारण
  • विकास
  • विश्लेषण
  • शिक्षण
  • शेती व सहकार
  • सामाजिक
  • CONTACT US
  • ABOUT US
  • PRIVACY POLICY
© 2026 ThemeSphere. Designed by ThemeSphere.

Type above and press Enter to search. Press Esc to cancel.