Close Menu
महाराष्ट्र संवादमहाराष्ट्र संवाद
  • Home
  • आंदोलन
  • आरोग्य
  • इतिहास
  • क्रिडा व कला
  • गुन्हेगारी
  • न्यायालय
  • महाराष्ट्र संवाद विशेष
  • राजकारण
  • विकास
  • विश्लेषण
  • शिक्षण
What's Hot

कर्ज वसुलीच्या नावाखाली संगमनेरात महिलेचा विनयभंग; आरोपीवर गुन्हा दाखल

15/10/2026

‘ब्रिक्स’ आंतरराष्ट्रीय महोत्सवात संगमनेरी योगवैभव! अहमदाबादेत ध्रुव ग्लोबलच्या १० खेळाडूंनी घडवले योगपरंपरेचे दर्शन

15/10/2026

१९७२ पेक्षा भयावह दुष्काळ; राजकारण बाजूला ठेवून जनतेला दिलासा द्या, मागेल त्याला पिण्याच्या पाण्याचे टँकर द्या – सत्यजित तांबे यांचे अधिकाऱ्यांना निर्देश

15/10/2026
Facebook X (Twitter) Instagram
महाराष्ट्र संवादमहाराष्ट्र संवाद
  • Home
  • आंदोलन
  • आरोग्य
  • इतिहास
  • क्रिडा व कला
  • गुन्हेगारी
  • न्यायालय
  • महाराष्ट्र संवाद विशेष
  • राजकारण
  • विकास
  • विश्लेषण
  • शिक्षण
Facebook X (Twitter) Instagram
महाराष्ट्र संवादमहाराष्ट्र संवाद
Home » माहिती अधिकाराच्या नियमांत महाराष्ट्र शासनाकडून मोठे बदल; अधिकार महागला
महाराष्ट्र संवाद विशेष

माहिती अधिकाराच्या नियमांत महाराष्ट्र शासनाकडून मोठे बदल; अधिकार महागला

सरकारला देशाला माहिती अधिकार देण्यास भाग पाडणाऱ्या ज्येष्ठ समाजसेवक अण्णा हजारे यांच्या भूमिकेकडे यामुळे लक्ष लागले आहे
Annant PpangarkarBy Annant Ppangarkar22/06/2026Updated:22/06/2026No Comments2 Mins Read
Facebook Twitter WhatsApp
Share
Facebook Twitter Email Telegram WhatsApp

महाराष्ट्र संवाद न्यूज ऑनलाईन 
मुंबई: 
महाराष्ट्रात माहितीचा अधिकार (RTI) कायद्यांतर्गत माहिती मागवणे आता सर्वसामान्य नागरिकांसाठी महाग झाले आहे. राज्य शासनाने माहितीचा अधिकार अधिनियम २००५ मध्ये महत्त्वपूर्ण सुधारणा करत नवे नियम १२ जून २०२६ पासून संपूर्ण राज्यात लागू केले आहेत. या नव्या नियमांनुसार अर्ज प्रक्रियेपासून ते कागदपत्रांच्या प्रती मिळविण्यापर्यंतच्या सर्वच शुल्कात मोठी वाढ करण्यात आली असून, अर्जदारांना आता खिसा अधिक रिकामा करावा लागणार आहे.
नवीन नियमांनुसार माहिती मिळवण्यासाठी केला जाणारा पहिला अधिकृत अर्ज आता १० रुपयांऐवजी ३० रुपयांचा कोर्ट फी स्टॅम्प लावून करावा लागणार आहे. याशिवाय, आतापर्यंत माहिती मागण्याचे कारण देणे बंधनकारक नसताना, नव्या नियमात अर्जदाराने माहिती मागण्यामागचे नेमके कारण स्पष्ट करणे आणि स्वतःचे नागरिकत्व सिद्ध करणारा अधिकृत पुरावा अर्जासोबत जोडणे अनिवार्य केले आहे. शासकीय अभिलेखांच्या निरीक्षणासाठी (Inspection) देखील आता खिसा जड होणार आहे. यामध्ये पहिला तास जरी मोफत ठेवण्यात आला असला, तरी त्यानंतरच्या प्रत्येक तासासाठी पूर्वीच्या ५ रुपयांऐवजी थेट ५० रुपये शुल्क आकारले जाईल.
माहितीच्या कागदपत्रांच्या झेरॉक्स आणि स्कॅन प्रती मिळवण्याचा खर्चही अडीच पटीने वाढला आहे. पूर्वी प्रति पानासाठी २ रुपये आकारले जात होते, ते शुल्क आता ५ रुपये करण्यात आले आहे. हीच दरवाढ स्कॅन प्रतींसाठीही लागू राहील. केवळ अर्जच नव्हे तर अपीलाची प्रक्रियाही महागली आहे. प्रथम अपीलासाठीचे शुल्क २० रुपयांवरून ५० रुपये, तर राज्य माहिती आयोगाकडे कराव्या लागणाऱ्या द्वितीय अपीलासाठी आता थेट १०० रुपयांचा कोर्ट फी स्टॅम्प आवश्यक करण्यात आला आहे. तसेच द्वितीय अपीलासोबत संबंधित अर्ज, पूर्वपीठिका आणि आवश्यक कागदपत्रांची जोडणी करणे बंधनकारक असेल. माहिती मिळवण्यासाठी कोणालाही आर्थिक सवलत नसून आता सर्वांना आर्थिक उदंड सोसावा लागणार आहे. या कठोर बदलांमुळे माहिती अधिकार प्रक्रियेत अधिक शिस्त आणि पारदर्शकता येईल असा दावा प्रशासनाकडून केला जात असला, तरी या अचानक झालेल्या शुल्कवाढीमुळे सर्वसामान्य नागरिक आणि सामाजिक कार्यकर्त्यांवर मोठा आर्थिक भार पडणार असल्याने चिंता व्यक्त केली जात आहे.

anantpangarkar
Annant Ppangarkar

Views: 691
अण्णा हजारे आर्थिक बदल बदल माहिती अधिकार
Share. Facebook Twitter Pinterest WhatsApp
Annant Ppangarkar
  • Website

Related Posts

“राजा किती क्रूर आणि खोटारडा आहे…” आई-बाळाची आर्त हाक अन् पोलिसांचा पाशवी हात; संजय राऊतांनी शेअर केलेल्या ‘त्या’ एका छायाचित्राने हादरवला महाराष्ट्र!

12/10/2026

MPSC आंदोलनाला डॉ. जयश्रीताई थोरात यांचा पाठिंबा; समाज आणि आयोगातील ब्लड कॅन्सर ठीक करायचाय!

10/10/2026

महात्मा गांधी हे भारतीय तत्त्वज्ञानाचे प्रतिबिंब: संदीप वाकचौरे

07/10/2026
Leave A Reply Cancel Reply

Document
Our Picks
  • Facebook
  • Twitter
  • Pinterest
  • Instagram
  • YouTube
Advertisement 1 Advertisement 2 Advertisement 3 Advertisement 4
Don't Miss
गुन्हेगारी

कर्ज वसुलीच्या नावाखाली संगमनेरात महिलेचा विनयभंग; आरोपीवर गुन्हा दाखल

By Annant Ppangarkar15/10/20260

महाराष्ट्र संवाद न्यूज ऑनलाईन- खाजगी बँकेच्या कर्जाचा हप्ता भरण्यासाठी सतत फोन करून धमकावणे, घरी येऊन…

‘ब्रिक्स’ आंतरराष्ट्रीय महोत्सवात संगमनेरी योगवैभव! अहमदाबादेत ध्रुव ग्लोबलच्या १० खेळाडूंनी घडवले योगपरंपरेचे दर्शन

15/10/2026

१९७२ पेक्षा भयावह दुष्काळ; राजकारण बाजूला ठेवून जनतेला दिलासा द्या, मागेल त्याला पिण्याच्या पाण्याचे टँकर द्या – सत्यजित तांबे यांचे अधिकाऱ्यांना निर्देश

15/10/2026

गुरुवार, १५ ऑक्टोंबर — आजचा दिवस कसा असेल जाणून घ्या!

15/10/2026
Thumbnail 1
Thumbnail 2
Thumbnail 3
Thumbnail 4
previous arrow
next arrow
Thumbnail 1
Thumbnail 2
Thumbnail 3
Thumbnail 4
previous arrow
next arrow

तुमचे हक्काचे व्यासपीठ

Facebook YouTube
Our Picks
October 2026
M T W T F S S
 1234
567891011
12131415161718
19202122232425
262728293031  
« Sep    
  • Home
  • आंदोलन
  • आरोग्य
  • इतिहास
  • क्रिडा व कला
  • गुन्हेगारी
  • न्यायालय
  • पत्रकारिता
  • फोटो / गॅलरी
  • महाराष्ट्र संवाद विशेष
  • राजकारण
  • विकास
  • विश्लेषण
  • शिक्षण
  • शेती व सहकार
  • सामाजिक
  • CONTACT US
  • ABOUT US
  • PRIVACY POLICY
© 2026 ThemeSphere. Designed by ThemeSphere.

Type above and press Enter to search. Press Esc to cancel.