Close Menu
महाराष्ट्र संवादमहाराष्ट्र संवाद
  • Home
  • आंदोलन
  • आरोग्य
  • इतिहास
  • क्रिडा व कला
  • गुन्हेगारी
  • न्यायालय
  • महाराष्ट्र संवाद विशेष
  • राजकारण
  • विकास
  • विश्लेषण
  • शिक्षण
What's Hot

आमदार खताळ यांच्या प्रयत्नांना यश; डोळासणे निवासी वीजजोडणीसाठी १० लाखांचा निधी मंजूर, प्रत्यक्ष कामालाही सुरुवात

26/08/2026

पत्रकारावर हल्ला करणाऱ्या कुख्यात गुन्हेगार टोळीचे तोफखाना पोलिसांनी मोडले कंबरडे; केली ही मोठी कारवाई

26/08/2026

आज बुधवार, २६ ऑगस्ट २०२६ — तुमचा आजचा दिवस कसा असेल, जाणून घ्या

26/08/2026
Facebook X (Twitter) Instagram
महाराष्ट्र संवादमहाराष्ट्र संवाद
  • Home
  • आंदोलन
  • आरोग्य
  • इतिहास
  • क्रिडा व कला
  • गुन्हेगारी
  • न्यायालय
  • महाराष्ट्र संवाद विशेष
  • राजकारण
  • विकास
  • विश्लेषण
  • शिक्षण
Facebook X (Twitter) Instagram
महाराष्ट्र संवादमहाराष्ट्र संवाद
Home » माझ्या रक्तात लोकशाहीचा आदर आणि संस्कारात सभागृहाचा सन्मान, विधिमंडळ कालही पवित्र होते आणि उद्याही राहील : माजी नगराध्यक्ष दुर्गाताई तांबे यांचे विरोधकांना चोख उत्तर
राजकारण

माझ्या रक्तात लोकशाहीचा आदर आणि संस्कारात सभागृहाचा सन्मान, विधिमंडळ कालही पवित्र होते आणि उद्याही राहील : माजी नगराध्यक्ष दुर्गाताई तांबे यांचे विरोधकांना चोख उत्तर

https://www.facebook.com/share/p/1CsR6BBat3/
Annant PpangarkarBy Annant Ppangarkar11/07/2026Updated:11/07/2026No Comments2 Mins Read
Facebook Twitter WhatsApp
Share
Facebook Twitter Email Telegram WhatsApp

महाराष्ट्र संवाद न्यूज ऑनलाईन
संगमनेर:
तत्कालीन नगराध्यक्ष दुर्गाताई तांबे यांच्या कार्यकाळातील पाणीपुरवठा योजनेचा प्रश्न विधिमंडळ अधिवेशनात उपस्थित झाल्यानंतर विरोधकांनी त्यांच्यावर आणि त्यांच्या संस्कारावर प्रश्नचिन्ह उपस्थित केले होते. या पार्श्वभूमीवर माजी नगराध्यक्ष दुर्गाताई तांबे यांनी सोशल मीडियाच्या माध्यमातून एक पत्रक जारी करत विरोधकांच्या आरोपांना अत्यंत जळजळीत आणि चोख उत्तर दिले आहे. राजकीय फायद्यासाठी एवढ्या खालच्या पातळीवर जाऊन एखाद्याच्या संस्कारांवर प्रश्न उपस्थित करणे अत्यंत दुर्दैवी असल्याचे सांगत, ज्यांना कसलेही भान नाही अशा विरोधकांच्या प्रश्नांना आपण उत्तर देणार नसल्याचे त्यांनी स्पष्ट केले आहे. त्यांचे हे पत्र सध्या राजकीय वर्तुळात आणि समाज माध्यमांवर विशेष चर्चेत आले आहे.
आपली भूमिका मांडताना दुर्गाताई तांबे म्हणाल्या की, मी भारतीय लोकशाहीचा मनापासून आदर करते आणि लोकशाहीचे पवित्र मंदिर असलेल्या विधिमंडळाबद्दल माझ्या मनात नेहमीच नितांत आदर राहिला आहे. मी स्वतः लोकांनी निवडून दिलेली संगमनेर शहराची नगराध्यक्ष म्हणून तब्बल साडेबारा वर्षे काम केले असून सभागृह चालवले आहे. त्यामुळे एक लोकप्रतिनिधी म्हणून सभागृहाची प्रतिष्ठा, मर्यादा आणि परंपरा जपण्याचे संस्कार माझ्यावर झाले आहेत. आपण स्वातंत्र्य सेनानी स्वर्गीय भाऊसाहेब थोरात यांची मुलगी असून ज्या पिढीने देशाच्या स्वातंत्र्यासाठी संघर्ष केला आणि लोकशाहीची पायाभरणी केली, त्याच पिढीचे संस्कार आपल्यावर असल्याचे त्यांनी अभिमानाने नमूद केले.
आपल्या कुटुंबाच्या संसदीय परंपरेचा दाखला देत त्यांनी विरोधकांचे आरोप खोडून काढले. त्यांचे बंधू बाळासाहेब थोरात यांनी तब्बल ४० वर्षे विधिमंडळात जनतेचा आवाज मांडला आहे, पती डॉ. सुधीर तांबे यांनी १४ वर्षे विधानपरिषदेच्या वरिष्ठ सभागृहात काम केले आहे, तर आज त्यांचा मुलगा आमदार सत्यजीत तांबे देखील याच विधिमंडळात जनतेचे प्रश्न मांडत आहे. ज्या कुटुंबातील चार पिढ्यांनी लोकशाहीवर श्रद्धा ठेवली आणि लोकांनी दिलेल्या जबाबदारीचा सन्मान केला, त्या कुटुंबातील व्यक्ती विधिमंडळाचा अपमान करेल, असा आरोप करणे हे केवळ चुकीचेच नसून अत्यंत वेदनादायी आहे. आमच्या परिवाराला ओळखणारे आणि मला जवळून पाहणारे कोणतेही सुजाण नागरिक या खोट्या आरोपांवर कधीही विश्वास ठेवू शकत नाहीत, असा ठाम विश्वास त्यांनी व्यक्त केला.
शेवटी दुर्गाताई म्हणाल्या की, राजकारणात विरोध करा, टीका करा आणि विचारांची लढाई लढा, हीच तर लोकशाहीची खरी सुंदरता आहे. परंतु, शब्दांचा खोटा अर्थ काढून आणि जाणीवपूर्वक गैरसमज पसरवून एखाद्या व्यक्तीची प्रतिमा मलिन करण्याचा प्रयत्न करणे ही लोकशाहीची परंपरा नाही. माझ्या रक्तात लोकशाहीचा आदर आहे, संस्कारात संसदीय सभागृहांचा सन्मान आहे आणि आयुष्यात केवळ लोकसेवेचीच वाट आहे. त्यामुळे विधिमंडळ माझ्यासाठी कालही पवित्र होते, आजही पवित्र आहे आणि उद्याही पवित्रच राहील, असे सांगत त्यांनी भान नसलेल्या टीकाकारांना उत्तर देण्याचे साफ नाकारले आहे.

anantpangarkar
Annant Ppangarkar

Post Views: 572
दुर्गाताई तांबे
Share. Facebook Twitter Pinterest WhatsApp
Annant Ppangarkar
  • Website

Related Posts

आमदार खताळ यांच्या प्रयत्नांना यश; डोळासणे निवासी वीजजोडणीसाठी १० लाखांचा निधी मंजूर, प्रत्यक्ष कामालाही सुरुवात

26/08/2026

निमोण-सोनेवाडीतील तरुणांचा शिवसेनेत प्रवेश, आमदार खताळ यांच्या कामाच्या पद्धतीवर विश्वास

25/08/2026

रेल्वेमंत्र्यांच्या ‘वडापाव’च्या पोस्टवर आमदार सत्यजीत तांबे यांची थेट प्रतिक्रिया… पुणे-नाशिक रेल्वेची मागणी मांडत म्हणाले, ‘आम्ही अनेक वर्षांपासून उपाशी आहोत!’

24/08/2026
Leave A Reply Cancel Reply

Document
Our Picks
  • Facebook
  • Twitter
  • Pinterest
  • Instagram
  • YouTube
Advertisement 1 Advertisement 2 Advertisement 3 Advertisement 4
Don't Miss
राजकारण

आमदार खताळ यांच्या प्रयत्नांना यश; डोळासणे निवासी वीजजोडणीसाठी १० लाखांचा निधी मंजूर, प्रत्यक्ष कामालाही सुरुवात

By Annant Ppangarkar26/08/20260

Annant Ppangarkar महाराष्ट्र संवाद न्यूज ऑनलाईन संगमनेर : संगमनेर तालुक्यातील पठार भागातील डोळासणे परिसरातील नागरिकांच्या…

पत्रकारावर हल्ला करणाऱ्या कुख्यात गुन्हेगार टोळीचे तोफखाना पोलिसांनी मोडले कंबरडे; केली ही मोठी कारवाई

26/08/2026

आज बुधवार, २६ ऑगस्ट २०२६ — तुमचा आजचा दिवस कसा असेल, जाणून घ्या

26/08/2026

उसनवारीवरील कर्मचाऱ्यांना १० सप्टेंबरपर्यंत मूळ विभागात पाठवा; मुख्यमंत्र्यांच्या सूचनेनंतर मुख्य सचिवांचे कडक आदेश

25/08/2026
Thumbnail 1
Thumbnail 2
Thumbnail 3
Thumbnail 4
previous arrow
next arrow
Thumbnail 1
Thumbnail 2
Thumbnail 3
Thumbnail 4
previous arrow
next arrow

तुमचे हक्काचे व्यासपीठ

Facebook YouTube
Our Picks
August 2026
M T W T F S S
 12
3456789
10111213141516
17181920212223
24252627282930
31  
« Jul    
  • Home
  • आंदोलन
  • आरोग्य
  • इतिहास
  • क्रिडा व कला
  • गुन्हेगारी
  • न्यायालय
  • पत्रकारिता
  • फोटो / गॅलरी
  • महाराष्ट्र संवाद विशेष
  • राजकारण
  • विकास
  • विश्लेषण
  • शिक्षण
  • शेती व सहकार
  • सामाजिक
  • CONTACT US
  • ABOUT US
  • PRIVACY POLICY
© 2026 ThemeSphere. Designed by ThemeSphere.

Type above and press Enter to search. Press Esc to cancel.