Close Menu
महाराष्ट्र संवादमहाराष्ट्र संवाद
  • Home
  • आंदोलन
  • आरोग्य
  • इतिहास
  • क्रिडा व कला
  • गुन्हेगारी
  • न्यायालय
  • महाराष्ट्र संवाद विशेष
  • राजकारण
  • विकास
  • विश्लेषण
  • शिक्षण
What's Hot

आमदार सत्यजीत तांबे यांच्या प्रयत्नांना यश; संगमनेरच्या रस्ते विकासासाठी १० कोटींचा निधी मंजूर! बसस्थानक ते प्रवरापुलापर्यंतच्या रस्त्याचा होणार विकास; रुंदीकरणासह ड्रेनेज व्यवस्थेचाही समावेश

16/10/2026

दसरा विशेष: संगमनेरच्या मालपाणी पार्कमध्ये होणाऱ्या ‘या’ खास सोहळ्याचे संपूर्ण वेळापत्रक आणि प्रमुख आकर्षणे एका क्लिकवर!

16/10/2026

२ वर्षे २ महिने तुरुंगवास अन् अखेर न्याय! पोक्सो खटल्यातून संगमनेरच्या तरुणाची सुटका; न्यायालयाचा ‘हा’ महत्त्वाचा निर्णय

16/10/2026
Facebook X (Twitter) Instagram
महाराष्ट्र संवादमहाराष्ट्र संवाद
  • Home
  • आंदोलन
  • आरोग्य
  • इतिहास
  • क्रिडा व कला
  • गुन्हेगारी
  • न्यायालय
  • महाराष्ट्र संवाद विशेष
  • राजकारण
  • विकास
  • विश्लेषण
  • शिक्षण
Facebook X (Twitter) Instagram
महाराष्ट्र संवादमहाराष्ट्र संवाद
Home » घारगावमध्ये केमिकलयुक्त ताडीच्या अड्ड्यावर राज्य उत्पादन शुल्कचा छापा; २२० लिटर ताडी नष्ट!
गुन्हेगारी

घारगावमध्ये केमिकलयुक्त ताडीच्या अड्ड्यावर राज्य उत्पादन शुल्कचा छापा; २२० लिटर ताडी नष्ट!

पोलीस आणि उत्पादन शुल्क विभागाने केवळ कागदोपत्री कारवाई न करता या सर्व मुख्य सूत्रधारांवर आणि अवैध धंद्यांवर कायमस्वरूपी कठोर कारवाई करावी, अशी मागणी पठार भागातील जनतेकडून केली जात आहे.
Annant PpangarkarBy Annant Ppangarkar15/07/2026No Comments2 Mins Read
Facebook Twitter WhatsApp
Share
Facebook Twitter Email Telegram WhatsApp

महाराष्ट्र संवाद न्यूज ऑनलाईन
संगमनेर :
संगमनेर तालुक्यातील पठार भागातील घारगाव येथे गेल्या अनेक वर्षांपासून राजरोसपणे सुरू असलेल्या केमिकलयुक्त ताडी विक्रीच्या अड्ड्यावर राज्य उत्पादन शुल्क विभागाच्या संगमनेर पथकाने मंगळवारी सकाळी छापा टाकून कारवाई केली. पुणे-नाशिक राष्ट्रीय महामार्गालगत असलेल्या एका फिटनेस क्लबच्या पाठीमागील पत्र्याच्या शेडमध्ये हा काळा धंदा सुरू होता. या कारवाईत पथकाने तब्बल २२० लिटर केमिकलयुक्त ताडीचा मोठा साठा हस्तगत करून तो जागेवरच नष्ट केला आहे. या प्रकरणी सुनीता शेखय्या गुत्तेदार (वय ४४, रा. घारगाव) या महिला आरोपीविरुद्ध कारवाई करण्यात आली आहे.
राज्य उत्पादन शुल्क विभागाचे निरीक्षक योगेश सावखेडकर, उपनिरीक्षक गोकुळ नायकोडी, महिला जवान स्वाती फटांगरे, सरस्वती वराट, जवान दत्ता खाडे आणि विपुल कर्पे यांच्या पथकाने ही धडक कारवाई केली. विशेष म्हणजे, नोव्हेंबर २०२५ च्या ग्रामसभेत घारगावमधील अनधिकृत ताडी विक्री केंद्र, गावठी दारूचे अड्डे आणि इतर अवैध व्यवसाय बंद करण्याचा ठराव मंजूर करण्यात आला होता. त्यानंतर डिसेंबर २०२५ मध्येही उत्पादन शुल्क विभागाने याच अड्ड्यावर छापा टाकून मुद्देमाल नष्ट केला होता.
संशयित आरोपी सुनीता गुत्तेदार हिच्यावर मागील वर्षभरात चार गुन्हे दाखल असून, उपविभागीय दंडाधिकाऱ्यांकडे तिच्याकडून एक लाख रुपयांचे बंधपत्रही लिहून घेण्यात आले होते. मात्र, तरीही हा अवैध व्यवसाय पुन्हा सुरूच राहिल्याने ग्रामस्थांमधून तीव्र संताप व्यक्त होत आहे. वारंवार गुन्हे करणाऱ्या या आरोपीवर आता थेट ‘मकोका’ अंतर्गत कठोर कारवाई करावी, अशी मागणी घारगावमधील नागरिकांनी केली आहे.
दरम्यान, घारगाव पोलीस ठाण्याच्या हद्दीत पुणे-नाशिक राष्ट्रीय महामार्गालगत असलेल्या अनेक हॉटेल्समध्ये जेवणाच्या नावाखाली देशी-विदेशी दारूची बेकायदेशीर विक्री होत असल्याचे समोर आले आहे. तसेच परिसरातील किराणा दुकाने, हॉटेल्स आणि पानटपऱ्यांवर राज्यात प्रतिबंधित असलेला गुटखा व पानमसाला सर्रास विकला जात आहे, तर बोटा परिसरात मोठ्या प्रमाणावर अमली पदार्थ गांजाची विक्री सुरू आहे. या घातक अमली पदार्थांमुळे आणि अवैध व्यवसायांमुळे अनेक नागरिकांना दुर्धर आजार जडले असून अनेकांचे संसार उद्ध्वस्त झाले आहेत.
या पार्श्वभूमीवर, पोलीस आणि उत्पादन शुल्क विभागाने केवळ कागदोपत्री कारवाई न करता या सर्व मुख्य सूत्रधारांवर आणि अवैध धंद्यांवर कायमस्वरूपी कठोर कारवाई करावी, अशी मागणी पठार भागातील जनतेकडून केली जात आहे.

anantpangarkar
Annant Ppangarkar

Views: 456
ताडी अड्ड्यावर छापा दारूबंदी विभाग राज्य उत्पादन शुल्क
Share. Facebook Twitter Pinterest WhatsApp
Annant Ppangarkar
  • Website

Related Posts

कर्ज वसुलीच्या नावाखाली संगमनेरात महिलेचा विनयभंग; आरोपीवर गुन्हा दाखल

15/10/2026

संगमनेरमध्ये ८८ लाखांचा गांजा जप्त; दोन तस्करांना अटक, तीन साथीदार फरार

06/10/2026

एलसीबी अन्‌ एफडीएची धडक कारवाई; १२.८१ लाखांच्या गुटख्यासह दोघांना अटक, चार जण फरार

05/10/2026
Leave A Reply Cancel Reply

Document
Our Picks
  • Facebook
  • Twitter
  • Pinterest
  • Instagram
  • YouTube
Advertisement 1 Advertisement 2 Advertisement 3 Advertisement 4
Don't Miss
राजकारण

आमदार सत्यजीत तांबे यांच्या प्रयत्नांना यश; संगमनेरच्या रस्ते विकासासाठी १० कोटींचा निधी मंजूर! बसस्थानक ते प्रवरापुलापर्यंतच्या रस्त्याचा होणार विकास; रुंदीकरणासह ड्रेनेज व्यवस्थेचाही समावेश

By Annant Ppangarkar16/10/20260

महाराष्ट्र संवाद न्यूज ऑनलाईन- संगमनेर शहराच्या पायाभूत सुविधा विकासाला चालना देण्यासाठी आमदार सत्यजीत तांबे यांच्या…

दसरा विशेष: संगमनेरच्या मालपाणी पार्कमध्ये होणाऱ्या ‘या’ खास सोहळ्याचे संपूर्ण वेळापत्रक आणि प्रमुख आकर्षणे एका क्लिकवर!

16/10/2026

२ वर्षे २ महिने तुरुंगवास अन् अखेर न्याय! पोक्सो खटल्यातून संगमनेरच्या तरुणाची सुटका; न्यायालयाचा ‘हा’ महत्त्वाचा निर्णय

16/10/2026

वय विसरले अन् झिंगाटवर थिरकले! ४० वर्षांनंतर भेटले सेवानिवृत्त शिक्षक मित्र; भंडारदऱ्यातील भाऊक ‘गेट-टुगेदर’ची खास बातमी

16/10/2026
Thumbnail 1
Thumbnail 2
Thumbnail 3
Thumbnail 4
previous arrow
next arrow
Thumbnail 1
Thumbnail 2
Thumbnail 3
Thumbnail 4
previous arrow
next arrow

तुमचे हक्काचे व्यासपीठ

Facebook YouTube
Our Picks
October 2026
M T W T F S S
 1234
567891011
12131415161718
19202122232425
262728293031  
« Sep    
  • Home
  • आंदोलन
  • आरोग्य
  • इतिहास
  • क्रिडा व कला
  • गुन्हेगारी
  • न्यायालय
  • पत्रकारिता
  • फोटो / गॅलरी
  • महाराष्ट्र संवाद विशेष
  • राजकारण
  • विकास
  • विश्लेषण
  • शिक्षण
  • शेती व सहकार
  • सामाजिक
  • CONTACT US
  • ABOUT US
  • PRIVACY POLICY
© 2026 ThemeSphere. Designed by ThemeSphere.

Type above and press Enter to search. Press Esc to cancel.