Close Menu
महाराष्ट्र संवादमहाराष्ट्र संवाद
  • Home
  • आंदोलन
  • आरोग्य
  • इतिहास
  • क्रिडा व कला
  • गुन्हेगारी
  • न्यायालय
  • महाराष्ट्र संवाद विशेष
  • राजकारण
  • विकास
  • विश्लेषण
  • शिक्षण
What's Hot

संगमनेरात प्रशासनाविरोधात संतापाचा उद्रेक; यांचा ‘दिमाग और दफ्तर ठीक करो’ आंदोलनाचा इशारा

17/10/2026

शनिवार, १७ ऑक्टोंबर — तुमचा आजचा दिवस कसा असेल

17/10/2026

आमदार सत्यजीत तांबे यांच्या प्रयत्नांना यश; संगमनेरच्या रस्ते विकासासाठी १० कोटींचा निधी मंजूर! बसस्थानक ते प्रवरापुलापर्यंतच्या रस्त्याचा होणार विकास; रुंदीकरणासह ड्रेनेज व्यवस्थेचाही समावेश

16/10/2026
Facebook X (Twitter) Instagram
महाराष्ट्र संवादमहाराष्ट्र संवाद
  • Home
  • आंदोलन
  • आरोग्य
  • इतिहास
  • क्रिडा व कला
  • गुन्हेगारी
  • न्यायालय
  • महाराष्ट्र संवाद विशेष
  • राजकारण
  • विकास
  • विश्लेषण
  • शिक्षण
Facebook X (Twitter) Instagram
महाराष्ट्र संवादमहाराष्ट्र संवाद
Home » कोतुळमध्ये ६ लाखांचा गुटखा व कार जप्त; पोलीस उपअधीक्षकांच्या पथकाची मोठी कारवाई
गुन्हेगारी

कोतुळमध्ये ६ लाखांचा गुटखा व कार जप्त; पोलीस उपअधीक्षकांच्या पथकाची मोठी कारवाई

पोलीस पथकाने पंचांसमक्ष घटनास्थळी जाऊन छापा टाकला असता, आरोपी शोएब काझी याच्या ताब्यातील स्विफ्ट गाडीमध्ये (क्रमांक MH 02 BD 7599) मोठ्या प्रमाणावर प्रतिबंधित अन्नपदार्थांचा साठा मिळून आला
Annant PpangarkarBy Annant Ppangarkar17/07/2026Updated:17/07/2026No Comments2 Mins Read
Facebook Twitter WhatsApp
Share
Facebook Twitter Email Telegram WhatsApp

महाराष्ट्र संवाद न्यूज ऑनलाईन
अकोले: अकोले तालुक्यातील कोतुळ गावात संगमनेरच्या उपविभागीय पोलीस अधिकारी कार्यालयाच्या पथकाने मोठी कारवाई करत ६ लाख ११ हजार २३० रुपयांचा बेकायदेशीर गुटखा, सुगंधित तंबाखू आणि एक कार जप्त केली आहे. अहिल्यानगरचे पोलीस अधीक्षक मुम्मका सुदर्शन, अपर पोलीस अधीक्षक सोमनाथ वाघचौरे आणि संगमनेरचे उपविभागीय पोलीस अधिकारी डॉ. कुणाल सोनवणे यांच्या मार्गदर्शनाखाली ही कारवाई करण्यात आली.
डॉ. कुणाल सोनवणे यांना कोतुळ गावातील रहिवासी शोएब शावीद काझी याने आपल्या घराजवळ एका स्विफ्ट कारमध्ये गुटखा आणि सुगंधित तंबाखू विक्रीसाठी साठा करून ठेवल्याची गोपनीय माहिती मिळाली होती. या माहितीच्या आधारे त्यांनी उपविभागीय कार्यालयाच्या पथकाला तातडीने कारवाईचे आदेश दिले.
पोलीस पथकाने पंचांसमक्ष घटनास्थळी जाऊन छापा टाकला असता, आरोपी शोएब काझी याच्या ताब्यातील स्विफ्ट गाडीमध्ये (क्रमांक MH 02 BD 7599) मोठ्या प्रमाणावर प्रतिबंधित अन्नपदार्थांचा साठा मिळून आला. या कारवाईत २५,६५० रुपये किमतीचा तुळशी जर्दा, १,२१,६८० रुपयांचा रजनीगंधा पान मसाला, ९६,००० रुपयांचा विमल पान मसाला, ४,००० रुपयांची व्ही-१ बिग तंबाखू, ३१,५०० रुपयांचा प्रीमियम आरएमडी पान मसाला (निळा) आणि ३२,४०० रुपये किमतीचा प्रीमियम आरएमडी पान मसाला (लाल) जप्त करण्यात आला. या प्रतिबंधित साठ्यासह ३ लाख रुपये किमतीची स्विफ्ट कार असा एकूण ६ लाख ११ हजार २३० रुपयांचा मुद्देमाल पोलिसांनी जप्त केला.
या प्रकरणी अकोले पोलीस ठाण्यात आरोपीविरुद्ध भारतीय न्याय संहिता २०२३ आणि अन्न सुरक्षा व मानके अधिनियम २००६ च्या विविध कलमांनुसार गुन्हा दाखल करण्यात आला असून, आरोपीसह जप्त मुद्देमाल पोलिसांच्या स्वाधीन करण्यात आला आहे.
सदर यशस्वी कारवाईमध्ये उपविभागीय पोलीस अधिकारी कार्यालयातील पोलीस अंमलदार दत्तात्रय मेंगाळ, अनिल कडलग, बापुसाहेब हांडे, राहुल सारबंदे आणि सुनिल ढाकणे यांच्या पथकाने केली.

anantpangarkar
Annant Ppangarkar

Views: 797
Share. Facebook Twitter Pinterest WhatsApp
Annant Ppangarkar
  • Website

Related Posts

कर्ज वसुलीच्या नावाखाली संगमनेरात महिलेचा विनयभंग; आरोपीवर गुन्हा दाखल

15/10/2026

संगमनेरमध्ये ८८ लाखांचा गांजा जप्त; दोन तस्करांना अटक, तीन साथीदार फरार

06/10/2026

एलसीबी अन्‌ एफडीएची धडक कारवाई; १२.८१ लाखांच्या गुटख्यासह दोघांना अटक, चार जण फरार

05/10/2026
Leave A Reply Cancel Reply

Document
Our Picks
  • Facebook
  • Twitter
  • Pinterest
  • Instagram
  • YouTube
Advertisement 1 Advertisement 2 Advertisement 3 Advertisement 4
Don't Miss
राजकारण

संगमनेरात प्रशासनाविरोधात संतापाचा उद्रेक; यांचा ‘दिमाग और दफ्तर ठीक करो’ आंदोलनाचा इशारा

By Annant Ppangarkar17/10/20260

महाराष्ट्र संवाद न्यूज ऑनलाईन – सामान्य माणसाने स्थानिक पातळीवर न्याय मागायचा, तिथे न्याय मिळाला नाही…

शनिवार, १७ ऑक्टोंबर — तुमचा आजचा दिवस कसा असेल

17/10/2026

आमदार सत्यजीत तांबे यांच्या प्रयत्नांना यश; संगमनेरच्या रस्ते विकासासाठी १० कोटींचा निधी मंजूर! बसस्थानक ते प्रवरापुलापर्यंतच्या रस्त्याचा होणार विकास; रुंदीकरणासह ड्रेनेज व्यवस्थेचाही समावेश

16/10/2026

दसरा विशेष: संगमनेरच्या मालपाणी पार्कमध्ये होणाऱ्या ‘या’ खास सोहळ्याचे संपूर्ण वेळापत्रक आणि प्रमुख आकर्षणे एका क्लिकवर!

16/10/2026
Thumbnail 1
Thumbnail 2
Thumbnail 3
Thumbnail 4
previous arrow
next arrow
Thumbnail 1
Thumbnail 2
Thumbnail 3
Thumbnail 4
previous arrow
next arrow

तुमचे हक्काचे व्यासपीठ

Facebook YouTube
Our Picks
October 2026
M T W T F S S
 1234
567891011
12131415161718
19202122232425
262728293031  
« Sep    
  • Home
  • आंदोलन
  • आरोग्य
  • इतिहास
  • क्रिडा व कला
  • गुन्हेगारी
  • न्यायालय
  • पत्रकारिता
  • फोटो / गॅलरी
  • महाराष्ट्र संवाद विशेष
  • राजकारण
  • विकास
  • विश्लेषण
  • शिक्षण
  • शेती व सहकार
  • सामाजिक
  • CONTACT US
  • ABOUT US
  • PRIVACY POLICY
© 2026 ThemeSphere. Designed by ThemeSphere.

Type above and press Enter to search. Press Esc to cancel.