Close Menu
महाराष्ट्र संवादमहाराष्ट्र संवाद
  • Home
  • आंदोलन
  • आरोग्य
  • इतिहास
  • क्रिडा व कला
  • गुन्हेगारी
  • न्यायालय
  • महाराष्ट्र संवाद विशेष
  • राजकारण
  • विकास
  • विश्लेषण
  • शिक्षण
What's Hot

संगमनेर महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. अरुण गायकवाड यांना ‘डॉ. जे. पी. नाईक आदर्श राज्य शिक्षक पुरस्कार’ प्रदान

06/09/2026

महात्मा फुले जन्मद्विशताब्दी निमित्त संगमनेरात उद्या प्रा. डॉ. शरद बाविस्कर यांचे ‘अस्वस्थ भारताचे अंतरंग’ विषयावर व्याख्यान

06/09/2026

आज रविवार, ०६ सप्टेंबर २०२६ — तुमचा आजचा दिवस कसा असेल, जाणून घ्या

06/09/2026
Facebook X (Twitter) Instagram
महाराष्ट्र संवादमहाराष्ट्र संवाद
  • Home
  • आंदोलन
  • आरोग्य
  • इतिहास
  • क्रिडा व कला
  • गुन्हेगारी
  • न्यायालय
  • महाराष्ट्र संवाद विशेष
  • राजकारण
  • विकास
  • विश्लेषण
  • शिक्षण
Facebook X (Twitter) Instagram
महाराष्ट्र संवादमहाराष्ट्र संवाद
Home » विद्यार्थ्यांवरील लाठीहल्ल्याचा निषेध; सरकारच्या निषेधार्थ मशाल मोर्चात संगमनेरकर एकवटले, रस्त्यावर उतरले; बाळासाहेब थोरातांसह सर्व समविचारी पक्षीयांचा समावेश
आंदोलन

विद्यार्थ्यांवरील लाठीहल्ल्याचा निषेध; सरकारच्या निषेधार्थ मशाल मोर्चात संगमनेरकर एकवटले, रस्त्यावर उतरले; बाळासाहेब थोरातांसह सर्व समविचारी पक्षीयांचा समावेश

माजी आमदार डॉ. सुधीर तांबे यांनी नीट पेपरफुटीच्या मुद्द्यावरून सरकारला धारेवर धरले.
Annant PpangarkarBy Annant Ppangarkar22/07/2026No Comments2 Mins Read
Facebook Twitter WhatsApp
Share
Facebook Twitter Email Telegram WhatsApp

महाराष्ट्र संवाद न्यूज ऑनलाईन
संगमनेर :
दिल्ली येथे आंदोलक विद्यार्थ्यांवर झालेल्या अमानुष लाठीहल्ल्याच्या निषेधार्थ संगमनेर शहर आणि तालुक्यातील हजारो नागरिक, युवक, महिला व सर्व समविचारी पक्षांचे कार्यकर्ते रस्त्यावर उतरले. पंतप्रधान, गृहमंत्री व शिक्षण मंत्री यांनी तातडीने राजीनामा द्यावा अशी मागणी घरात सरकारविरोधी घोषणांनी वातावरण दुमदुमून गेले होते. 
माजी मंत्री बाळासाहेब थोरात यांच्यासह समविचारी, महाविकास आघाडीतील घटक पक्ष असं विद्यार्थी व संगमनेरकर मोठ्या संख्येने मशाल मोर्चात सहभागी झाले होते. हा विराट मशाल मोर्चा संगमनेर बस स्थानकापासून सुरू झाला. छत्रपती शिवाजी महाराज आणि डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या पुतळ्यांना अभिवादन करून चावडी मार्गे हा मोर्चा महात्मा फुले स्मारकापर्यंत पोहोचला.
यावेळी झालेल्या सभेत बोलताना बाळासाहेब थोरात यांनी केंद्र सरकारवर जोरदार हल्लाबोल केला. सोनम वागचुकसारख्या आदर्श व्यक्तिमत्त्वाला आणि जंतर-मंतरवर उपोषण करणाऱ्या युवकांना केंद्र सरकार अमानुषपणे दडपण्याचा प्रयत्न करत असल्याचे त्यांनी सांगितले. संसदेत विरोधी पक्षांचा आवाज दाबला जात असून खासदार राहुल गांधी आणि प्रियंका गांधी यांच्यासारख्या नेत्यांनाही पोलिसांनी अत्यंत चुकीच्या पद्धतीने ताब्यात घेतले. देशातील स्वायत्त संस्था, न्यायालय आणि प्रसारमाध्यमांचा राजकीय वापर सुरू असून लोकशाहीचा गळा घोटला जात असल्याची घणाघाती टीका थोरात यांनी केली. तसेच सावित्रीबाई फुले यांच्यावरील मालिका आणि फुले यांच्या जीवनावरील चित्रपट बंद पाडणाऱ्या जातीयवादी शक्तींविरुद्ध युवकांनी एकजुटीने संघर्षासाठी पुढे यावे, असे आवाहन त्यांनी केले.
या वेळी बोलताना माजी आमदार डॉ. सुधीर तांबे यांनी नीट पेपरफुटीच्या मुद्द्यावरून सरकारला धारेवर धरले. केंद्र सरकारमध्ये कोणतीही नैतिकता उरलेली नसून शिक्षण मंत्री धर्मेंद्र प्रधान यांनी तातडीने राजीनामा दिला पाहिजे, अशी मागणी त्यांनी केली. देशामध्ये दररोज लोकशाहीची हत्या होत असून विद्यार्थ्यांवर लाठीमार होत असताना पंतप्रधान मौन बाळगून आहेत, हे दुर्दैवी असल्याचे ते म्हणाले.
या आंदोलनात माजी आमदार डॉ. सुधीर तांबे, दुर्गाताई तांबे, काँग्रेसचे जिल्हाध्यक्ष सचिन गुजर, वंचित बहुजन आघाडीचे अजिज व्होरा, शिवसेनेचे जिल्हा संघटक अमोल बोराडे, तालुकाध्यक्ष अजय फटांगरे, शहराध्यक्ष सोमेश्वर दिवटे, कार्याध्यक्ष अमोल शेलकर, ॲड. रंजना गवांदे, छात्र भारतीचे तुषार पानसरे, अनुराधा आहेर यांच्यासह काँग्रेस, शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे), वंचित बहुजन आघाडी, छात्र भारती, NSUI, RPI, कम्युनिस्ट पक्ष, अंनिस, सत्यशोधक समाज, जय हिंद लोक चळवळ आणि एकविरा फाउंडेशन यांसारख्या विविध पुरोगामी संघटनांचे पदाधिकारी व नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते.

anantpangarkar
Annant Ppangarkar

Post Views: 504
आंदोलन मशाल मोर्चा महाविकास आघाडी समविचारी पक्ष
Share. Facebook Twitter Pinterest WhatsApp
Annant Ppangarkar
  • Website

Related Posts

संगमनेरमध्ये लोड शेडिंगविरोधात काँग्रेस आक्रमक; सायंकाळी वीजपुरवठा सुरळीत ठेवण्याची महावितरणकडे मागणी

05/09/2026

एमआयडीसीच्या जागेवर सौर प्रकल्प चालणार नाही! कौठे मलकापूर येथे भाजपचे आक्रमक आंदोलन; भोसले यांच्यासह पदाधिकाऱ्यांना पोलिसांनी घेतले ताब्यात

19/08/2026

संगमनेर येथे आदिवासी विद्यार्थ्यांचे अर्धनग्न धरणे आंदोलन सुरुच; जयश्री थोरात यांची आंदोलनस्थळी भेट

17/08/2026
Leave A Reply Cancel Reply

Document
Our Picks
  • Facebook
  • Twitter
  • Pinterest
  • Instagram
  • YouTube
Advertisement 1 Advertisement 2 Advertisement 3 Advertisement 4
Don't Miss
पुरस्कार

संगमनेर महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. अरुण गायकवाड यांना ‘डॉ. जे. पी. नाईक आदर्श राज्य शिक्षक पुरस्कार’ प्रदान

By Annant Ppangarkar06/09/20260

Annant Ppangarkar महाराष्ट्र संवाद न्यूज ऑनलाईन सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठात पार पडलेल्या दिमाखदार सोहळ्यात महाराष्ट्र…

महात्मा फुले जन्मद्विशताब्दी निमित्त संगमनेरात उद्या प्रा. डॉ. शरद बाविस्कर यांचे ‘अस्वस्थ भारताचे अंतरंग’ विषयावर व्याख्यान

06/09/2026

आज रविवार, ०६ सप्टेंबर २०२६ — तुमचा आजचा दिवस कसा असेल, जाणून घ्या

06/09/2026

रविवार विशेष लेख — बोगस जीडीपीचा फज्जा…!

06/09/2026
Thumbnail 1
Thumbnail 2
Thumbnail 3
Thumbnail 4
previous arrow
next arrow
Thumbnail 1
Thumbnail 2
Thumbnail 3
Thumbnail 4
previous arrow
next arrow

तुमचे हक्काचे व्यासपीठ

Facebook YouTube
Our Picks
September 2026
M T W T F S S
 123456
78910111213
14151617181920
21222324252627
282930  
« Aug    
  • Home
  • आंदोलन
  • आरोग्य
  • इतिहास
  • क्रिडा व कला
  • गुन्हेगारी
  • न्यायालय
  • पत्रकारिता
  • फोटो / गॅलरी
  • महाराष्ट्र संवाद विशेष
  • राजकारण
  • विकास
  • विश्लेषण
  • शिक्षण
  • शेती व सहकार
  • सामाजिक
  • CONTACT US
  • ABOUT US
  • PRIVACY POLICY
© 2026 ThemeSphere. Designed by ThemeSphere.

Type above and press Enter to search. Press Esc to cancel.